Table of Contents
उताऱ्यावरील प्रश्न: आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य
महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. आदिवासी विकास विभाग भरती 2023 परीक्षेमध्ये मराठी विषयात मराठी व्याकरणावर हमखास प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी व्याकरण हा कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे. थोड्याशा सरावाने या विषयामध्ये जास्त गुण मिळवता येतात. आज या लेखात आपण मराठी व्याकरणातील उताऱ्यावरील प्रश्न कसे सोडवायचे ? याची व अधिक सरावासाठी त्यावर काही प्रश्न – उत्तरे याबद्दल माहिती पाहणार आहोत.
उताऱ्यावरील प्रश्न: विहंगावलोकन
उताऱ्यावरील प्रश्न: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
विषय | मराठी व्याकरण |
उपयोगिता | आदिवासी विकास विभाग भरती 2023 आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी |
लेखाचे नाव | उताऱ्यावरील प्रश्न |
लेख तुम्हाला काय प्रदान करतो? |
|
उताऱ्यावरील प्रश्न
उताऱ्यावरील प्रश्न सोडवण्यासाठी, तुम्हाला प्रथम उताऱ्याचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. तुम्ही उतारा काळजीपूर्वक वाचून महत्त्वाच्या कल्पना आणि माहितीला चिन्हांकित करू शकता. तुम्ही उताऱ्याच्या संकल्पनांचे स्पष्टीकरण देण्यासाठी शब्दकोश किंवा इतर संदर्भ पुस्तकांचा वापर देखील करू शकता.
एकदा तुम्हाला उताऱ्याचा अर्थ समजला की, तुम्ही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्या माहितीचा वापर करू शकता. तुम्ही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी खालील पद्धती वापरू शकता:
- उताऱ्यामधील माहितीचा थेट वापर करा. काही प्रश्नांची उत्तरे उताऱ्यात थेट दिली असतील. उदाहरणार्थ, “उताऱ्यातील मुख्य पात्र कोण आहे?” या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला उताऱ्यामधील पात्रांच्या वर्णनाद्वारे मिळू शकते.
- उताऱ्यामधील माहितीचा वितर्क वापरून निष्कर्ष काढा. काही प्रश्नांची उत्तरे उताऱ्यातील माहितीचा वितर्क वापरून काढली जाऊ शकतात. उदाहरणार्थ, “उताऱ्याच्या शेवटी पात्राचा काय उद्देश असेल?” या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला उताऱ्यामधील पात्राच्या कृतींवरून आणि त्याच्या भावनांवरून काढू शकता.
- उताऱ्यामधील माहितीचा तुलना आणि विरोधाभास वापरून निष्कर्ष काढा. काही प्रश्नांची उत्तरे उताऱ्यामधील माहितीचा तुलना आणि विरोधाभास वापरून काढली जाऊ शकतात. उदाहरणार्थ, “उताऱ्यातील दोन पात्रांमध्ये काय फरक आहे?” या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दोन्ही पात्रांच्या वर्णनांवरून आणि त्यांच्या कृतींवरून काढू शकता.
उताऱ्यावरील प्रश्न सोडवण्यासाठी, तुम्हाला सर्जनशील आणि विश्लेषणात्मक विचार करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. तुम्हाला उताऱ्यातील माहितीचे अर्थ लावणे आणि त्याचा वापर प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी करणे आवश्यक आहे.
तुम्हाला उताऱ्यावरील प्रश्न सोडवण्यात मदत करण्यासाठी येथे काही महत्वाच्या टिपा दिलेल्या आहेत:
- प्रश्नांचे काळजीपूर्वक वाचन – प्रश्नाची विनंती काय आहे याची खात्री करा. तुम्हाला प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कोणती माहिती आवश्यक आहे हे समजून घेण्यासाठी प्रश्नाचे काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे.
- प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती उताऱ्यात आहे याची खात्री करा- जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आवश्यक असलेली माहिती उताऱ्यात नसेल, तर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देणे कठीण होऊ शकते.
- तुमच्या उत्तरांची तपासणी करा- तुम्ही तुमच्या उत्तरांची तपासणी करण्यासाठी उताऱ्याचा संदर्भ घेऊ शकता.
उताऱ्यावरील प्रश्न सोडवण्याचा अधिकाधिक सराव करून, तुम्ही या कौशल्यामध्ये पारंगत होऊ शकता.
प्रश्न- उत्तरे:
Directions (1-5): खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या.
मराठी काव्य दोन प्रकारचे आहे. जुने मराठी काव्य व नवे मराठी काव्य. जुनी कविता कुसुमाग्रजांपर्यंत व नवी कविता कुसुमाग्रजांनंतरची. अनेक कवींनी विविध विषयांवर आशयपूर्ण काव्यरचना करून पदय हा साहित्यप्रकार लोकप्रिय केला. आद्यकवी मुकुंदराज यांच्यापासून सुरू झालेला कवितेचा प्रवास पुढे केशवसुत, बालकवी, बा. सी. मर्ढेकर, कवी बी यांच्या पर्यंत अखंडपणे चालत राहिला. या सर्व कवींनी मराठी साहित्य समृद्ध केले. जुन्या कवितेत प्रामुख्याने भा. रा. पाळंदेंची ‘रत्नमाला’, गोडबोलेंची ‘सीता विवाह,’ किर्तीकरांची ‘भक्तसुधा’, ‘कृष्णशास्त्री चिपळूणकर’ पेठकर, लोंढे, राजा माधवराव, इत्यादींचे काव्य या प्रकारात येते. नवकविता अभ्यासताना केशवसुतांचे नाव अग्रणी ठरते. केशवसुतांच्या काव्यात त्यांनी परंपरेविरुद्ध बंड पुकारल्याचे दिसून येते. केशवसुतांच्या नवकाव्यप्रणालीने कवितेच्या आशयात व विषयात आमूलाग्र बदल घडून आला. आधुनिक काव्यातून कवींनी समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अधंश्रद्धा, चालीरीती यांचे बाबत प्रखर भावना व्यक्त करून मोठी सामाजिक क्रांती केली आहे. त्यानंतर गोविंदाग्रज व आप्पासाहेब कारखानीस इ. कवींचे ‘तुतारीमंडळ’ त्यानंतर ‘रविकिरण मंडळ’ स्थापन झाले. त्यात माधव ज्युलियन, यशवंत व गिरीश हे तीन नावाजलेले कवी होते.
Q1. वरील उताऱ्यात मराठी काव्याचे किती प्रकार सांगितले आहे?
(a) पाच
(b) चार
(c) दोन
(d) तीन
Q2. मराठी मधील आद्यकवी कोण आहेत?
(a) कवीबी
(b) मुकुंदराज
(c) बालकवी
(d) बा.सी.मर्ढेकर
Q3. नव मराठी कवीता अभ्यासतांना कोणाचे नाव अग्रणी ठरते?
(a) आप्पासाहेब कारखानीस
(b) गोविंदाग्रज
(c) केशवसुत
(d) माधव ज्युलियन
Q4. कोणत्या काव्यातून कवींनी समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा, अंधश्रध्दा यांचे बाबत प्रखर भावना व्यक्त केल्या?
(a) आधुनिक काव्य
(b) जुने काव्य
(c) नवकाव्य
(d) यापैकी नाही
Q5. रविकिरण मंडळातील प्रसिद्ध कवींची नावे पर्यायातून निवडा.
(a) माधव ज्युलियन
(b) यशवंत
(c) गिरीश
(d) वरील सर्व
Solutions –
S1. Ans. (c)
Sol. वरील उताऱ्यात मराठी काव्याचे दोन प्रकार सांगितले आहे.
S2. Ans. (b)
Sol. मराठी मधील आद्यकवी मुकुंदराज आहेत.
S3. Ans. (c)
Sol. नव मराठी कवीता अभ्यासतांना केशवसुतांचे नाव अग्रणी ठरते.
S4. Ans. (a)
Sol. आधुनिक काव्यातून कवींनी समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा, अंधश्रध्दा यांचे बाबत प्रखर भावना व्यक्त केल्या.
S5. Ans. (d)
Sol.रविकिरण मंडळात माधव ज्युलियन, यशवंत व गिरीश हे तीन नावाजलेले कवी होते.
Directions (6-10): खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या.
‘Megas’ म्हणजे मोठा व ‘litho’ म्हणजे दगड या दोन शब्दांपासून Megalith म्हणजेच मोठा दगड हा शब्द बनला आहे. मृत्यूनंतर मृताच्या दैनंदिन व आवडीच्या वस्तू पुरल्या जात व त्याजागी त्याची स्मृती म्हणून एक मोठा दगड किंवा दगडाचा ढीग विशिष्ट पद्धतीने ठेवला जाई. दफनासाठी वापरलेल्या यापाषाणाच्या विशिष्ट पद्धतीमुळे या कालखंडाला ‘महापाषाण युग‘ असे म्हणतात. महाराष्ट्रातील महापाषाण युगाचा काळ हा इ. स. पू. १००० वर्षांपूर्वीचा आहे. ही एक लोहयुगीन संस्कृती आहे. महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील रंजाळा, जळगाव जिल्ह्यातील बहाळ, टेकवाडे तसेच नागपूर जिल्ह्यातील माहुरझरी इ. ठिकाणी याचे अवशेष प्राप्त होतात.
महाराष्ट्रातून प्राप्त महापाषाण उत्खननाद्वारे या काळाची पुढील वैशिष्ट्ये दिसून येतात.
1) गहू, ज्वारी, बाजरी, उडीद, तांदूळ यांचे उत्पादन या काळात घेतले जाई.
2) या काळातील मानव मातीच्या घरात, कच्च्या विटा व कुडांनी बांधलेल्या घरात राहात असत.
3) या काळातील मानव सोने, चांदी, ब्राँझ धातूपासून बनवलेले अलंकार वापरत असत.
4)विदर्भातील नैकुंड येथे लोह शुद्ध करण्याची भट्टी सापडली आहे. यावरून धातू व्यवसाय हा या काळात मोठ्या प्रमाणात चालत असल्याचे संकेत प्राप्त होतात.
5) या काळातील मानवांनी शेतीबरोबरच पशुपालनासही महत्त्व दिले होते.
6) कुंभाराच्या चाकावर मृदभांडी बनवणे, त्यावर चित्रकला,नक्षीकाम व भाजून पक्के बनवणे यामध्ये ते कुशल असल्याचे पुरावे मिळतात.
Q6.दफनासाठी वापरलेल्या यापाषाणाच्या विशिष्ट पद्धतीमुळे या कालखंडाला काय म्हणतात ?
(a) महापाषण युग
(b) ताम्रपाषाण युग
(c) अश्मयुग
(d) धातुयुग
Q7. या काळातील मानव कोणत्या धातूपासून बनवलेले अलंकार वापरत असत ?
(a) सोने
(b) चांदी
(c) ब्राँझ
(d) वरीलसर्व
Q8. विदर्भातील – – – येथे लोह शुद्ध करण्याची भट्टी सापडली आहे.
(a) कळंब
(b) नैकुंड
(c) वाशिम
(d) अकोट
Q9. या काळातील मानवांनी शेतीबरोबरच कशाला महत्त्व दिले होते ?
(a) शिकार
(b) चाकावर भांडी बनविणे
(c) पशुपालन
(d) दुग्धव्यवसाय
Q10. कुंभाराच्या चाकावर ते काय बनवत असत?
(a) मृदभांडी
(b) ब्रान्झची भांडी
(c) दगडी भांडी
(d) यापैकी नाही
Solutions –
S6. Ans. (a)
Sol. मृत्यूनंतर मृताच्या दैनंदिन व आवडीच्या वस्तू . पुरल्या जात व याजागी त्याची स्मृती म्हणून एक मोठा दगड किंवा दगडाचा ढीग विशिष्ट पद्धतीने ठेवला जाई. दफनासाठी वापरलेल्या यापाषाणाच्या विशिष्ट पद्धतीमुळे या कालखंडाला ‘महापाषाण युग‘ असे म्हणतात.
S7. Ans. (d)
Sol. या काळातील मानव सोने, चांदी, ब्राँझ धातूपासून बनवलेले अलंकार वापरत असत.
S8. Ans. (b)
Sol. विदर्भातील नैकुंड येथे लोह शुद्ध करण्याची भट्टी सापडली आहे. यावरून धातू व्यवसाय हा या काळात मोठ्या प्रमाणात चालत असल्याचे संकेत प्राप्त होतात. ही एक लोहयुगीन संस्कृती आहे.
S9. Ans. (c)
Sol. या काळातील मानवांनी शेतीबरोबरच पशुपालनासही महत्त्व दिले होते.
S10. Ans. (a)
Sol.कुंभाराच्या चाकावर मृदभांडी बनवणे, त्यावर चित्रकला,नक्षीकाम व भाजून पक्के बनवणे.
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.