Marathi govt jobs   »   Study Materials   »   काळ व काळाचे प्रकार
Top Performing

काळ व काळाचे प्रकार : आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

काळ व काळाचे प्रकार: आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य 

महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. आदिवासी विकास विभाग भरती 2023 परीक्षेमध्ये मराठी विषयात मराठी व्याकरणावर हमखास प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी व्याकरण हा कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे. थोड्याशा सरावाने या विषयामध्ये जास्त गुण मिळवता येतात. आज या लेखात आपण मराठी व्याकरणातील काळ व काळाचे प्रकार, त्यांच्या व्याख्या व अधिक सरावासाठी त्यावर काही प्रश्न – उत्तरे याबद्दल माहिती पाहणार आहोत.

काळ व काळाचे प्रकार: विहंगावलोकन

काळ व काळाचे प्रकार: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
विषय मराठी व्याकरण
उपयोगिता आदिवासी विकास विभाग भरती 2023 आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
लेखाचे नाव काळ व काळाचे प्रकार
लेख तुम्हाला काय प्रदान करतो?
  • काळ व काळाचे प्रकार या विषयी सविस्तर माहिती
  • काळ व काळाचे प्रकार यावरील महत्वाचे प्रश्न – उत्तरे

काळ व काळाचे प्रकार
काळ व काळाचे प्रकार: वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला ‘काळ’ असे म्हणतात.

काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात.

वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ
वर्तमान काळ
वर्तमान काळ

वर्तमान काळ: क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ ‘वर्तमानकाळ’ असतो. उदा. मी पत्र लिहितो.

वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार आहेत.

साधा वर्तमानकाळ
अपूर्ण वर्तमानकाळ
पूर्ण वर्तमानकाळ
रीती वर्तमानकाळ

साधा वर्तमानकाळ: जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळ असतो. उदा. सुरेश गाणे गातो.

अपूर्ण वर्तमानकाळ: एखादी क्रिया चालू आहे हे दर्शविण्यासाठी अपूर्ण वर्तमानकाळ वापरतात. उदा. गोलू खेळत आहे.

पूर्ण वर्तमानकाळ: नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शविण्यासाठी पूर्ण वर्तमानकाळ वापरतात. उदा. श्यामने पेपर सोडवला आहे.

रीती वर्तमानकाळ: वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला ‘रीती वर्तमानकाळ’ असे म्हणतात. उदा. माधुरी रोज डान्स क्लासला जाते.

भूतकाळ

भूतकाळ: जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला ‘भूतकाळ’ असे म्हणतात. उदा. मी पत्र लिहिले.

भूतकाळचे 4 उपप्रकार आहेत.

साधा भूतकाळ
अपूर्ण भूतकाळ
पूर्ण भूतकाळ
रीती भूतकाळ

साधा भूतकाळ: एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास ‘साधा भूतकाळ’ असे म्हणतात. उदा. मी गृहपाठ केला.

अपूर्ण भूतकाळ: एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला ‘अपूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात. उदा तो वाचत होता.

पूर्ण भूतकाळ: एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला ‘पूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात. उदा. तो उठला होता.

रीती भूतकाळ: भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला ‘रीती भूतकाळ’ असे म्हणतात. उदा. मी दररोज शेतात जात असे.

भविष्यकाळ
भविष्यकाळ: क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे हे दर्शविण्यासाठी भविष्यकाळाचा उपयोग होतो.

भविष्यकाळाचे 4 उपप्रकार आहेत.

साधा भविष्यकाळ
अपूर्ण भविष्यकाळ
पूर्ण भविष्यकाळ
रीती भविष्यकाळ

साधा भविष्यकाळ: जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी ‘साधा भविष्यकाळ’ असतो. उदा. पुढीलवर्षी मी ट्रीप ला जाईन.

अपूर्ण भविष्यकाळ: जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला ‘अपूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात. उदा. मी उद्या नागपुरात असेन.

पूर्ण भविष्यकाळ: जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला ‘पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात. याने पुस्तक वाचले असेल.

रीती भविष्यकाळ: जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल, तर त्याला ‘रीती भविष्यकाळ’ असे म्हणतात. उदा. मी रोज व्यायाम करत जाईल.

काळ: नमुना प्रश्न 

Q1.वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध होत असेल, तर त्याला ………वाक्य म्हणतात.

(a)   कालवाचन

(b)  विधानार्थी

(c)   संकेतार्थ

(d)  स्वार्थी

Q2.काळ कशाला म्हणतात ?

(a)   क्रियापदाला

(b)  कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या योग्य वापराला

(c)   क्रियापदावरून क्रियेची वेळ काढण्याला

(d)  वरील सर्व पर्याय बरोबर

Q3.’देव त्याचे भले करो’ या वाक्याचा प्रकार कोणता ?

(a)   आज्ञार्थी

(b)  विध्यर्थी

(c)   संकेतार्थी

(d)  विधानार्थी

Q4. ‘मला दोन रुपये हवे होते’ – या विधानातील काळ ओळखा.

(a)   भूतकाळ

(b)  वर्तमानकाळ

(c)   भविष्यकाळ

(d)  रीतिकाळ

Q5. ‘ई-आख्यात’ हा कोणत्या काळाशी वा अर्थाशी निगडित आहे?

(a)   भविष्यकाळ

(b)  रीति भूतकाळ 

(c)   विध्यर्थ

(d)  संकेतार्थ

Q6. ‘सूर पारंब्याचा खेळ अलीकडे कुठे दिसला नाही’ या वाक्याचा प्रकार व काळ ओळखा. 

(a)   नकारार्थी भूतकाळ

(b)  नकारार्थी भविष्यकाळ

(c)   नकारार्थी वर्तमानकाळ

(d)  यापैकी नाही

Q7. ‘त्याचे पुस्तक वाचून झाले’ – भविष्यकाळ करा. 

(a)   तो पुस्तक वाचणार आहे.

(b)  त्याने पुस्तक वाचले होते.

(c)   त्याचे पुस्तक वाचून झाले होते.

(d)  त्याचे पुस्तक वाचून होईल.

Q8. “परीक्षेत नापास झालास की मार बसलाच म्हणून समज.”

वाक्यातील काळ ओळखा. 

(a)  अपूर्ण भविष्यकाळ

(b)  पूर्ण भविष्यकाळ

(c)  अपूर्ण वर्तमानकाळ

(d)  पूर्ण वर्तमानकाळ

Q9. ‘सूर्य मावळत आहे’ – पूर्ण भविष्यकाळ करा. 

(a)   सूर्य मावळेल

(b)  सूर्य मावळलेला असेल

(c)   सूर्य मावळत असेल

(d)  सूर्य मावळला.

Q10. ‘जा’ या क्रियापदाचे भूतकाळाचे रूप कोणते होईल ?

(a)   गेला

(b)  जातो

(c)   जा

(d)  जाताना

Solutions

S1. Ans (d)

Sol.  

क्रियापदाचे अर्थ – स्वार्थ, आज्ञार्थ, विध्यर्थ, संकेतार्थ. 

स्वार्थ म्हणजे स्वत:चा किंवा मूळचा अर्थ असतो.

ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो, त्याला स्वार्थी क्रियापद म्हणतात.

क्रियापदाची सर्व काळातील रुपे ही स्वार्थी असतात.

S2. Ans (c)

Sol. 

क्रियापदावरून क्रियेची वेळ काढण्याला काळ म्हणतात. 

S3. Ans (a)

Sol. 

या वाक्यात देवाकडे प्रार्थना केली आहे, म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे.

S4. Ans (c)

Sol.

‘मला दोन रुपये हवे होते’ – या विधानातील काळ भविष्यकाळ आहे. 

येथे हवे असण्याची इच्छा व्यक्त होत आहे त्यामुळे हा भविष्यकाळ आहे.

S5. Ans (b)

Sol.

 ई-आख्यात हा रीति भूतकाळाशी संबंधित आहे.

                    काळ                आख्याताचे नाव
वर्तमानकाळ प्रथम ताख्यात
भूतकाळ लाख्यात
रीति भूतकाळ ई-आख्यात
भविष्यकाळ ई-लाख्यात
आज्ञार्थ ऊ-आख्यात
विध्यर्थ वा-ख्यात
संकेतार्थ  द्वितीय – ताख्यात

S6. Ans (a)

Sol.

दिसत नाही : वर्तमानकाळ

दिसला नाही : भूतकाळ

दिसेल की नाही : भविष्यकाळ

जेव्हा क्रियापदाला ला, लो, ली, ले हे प्रत्यय असतात ,तेव्हा वाक्याचा काळ हा भूतकाळ असतो.

S7. Ans (d)

Sol. 

तो पुस्तक वाचणार आहे – वर्तमानकाळ

त्याने पुस्तक वाचले होते – भूतकाळ

त्याचे पुस्तक वाचून झाले होते -भूतकाळ

त्याचे पुस्तक वाचून होईल- भविष्यकाळ 

S8. Ans (a)

Sol. 

अपूर्ण भविष्यकाळ – धातुसाधिताच्या शेवटी ‘त’ + असेन. 

S9. Ans (b)

Sol. 

पूर्ण भविष्यकाळ – धातुसाधिताच्या शेवटी ‘ला’ येतो + असेन/असेल. 

S10. Ans (a)

Sol. 

 जा – जातो (वर्तमानकाळ)

 गेला – (भूतकाळ)

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा-महापॅक
महाराष्ट्राचा-महापॅक

Sharing is caring!

काळ व काळाचे प्रकार : आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य_4.1

FAQs

काळ व काळाचे प्रकार बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

काळ व काळाचे प्रकार बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

मराठीत काळाचे किती प्रमुख प्रकार पडतात?

मराठीत काळाचे 3 प्रमुख प्रकार पडतात.