Marathi govt jobs   »   Study Materials   »   पोषण आणि आहार
Top Performing

पोषण आणि आहार : आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

पोषण आणि आहार

पोषण आणि आहार– महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये पोषण आणि आहार यावर हमखास प्रश्न विचारल्या जातात. आगामी आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा 2023  व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा Topic आहे. आज आपण या लेखात पोषण आणि आहार विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. 

पोषण आणि आहार : विहंगावलोकन

पोषण आणि आहार : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
विषय सामान्य विज्ञान
उपयोगिता आदिवासी विकास विभाग भरती 2023 आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
लेखाचे नाव पोषण आणि आहार
लेख तुम्हाला काय प्रदान करतो?
  • पोषण आणि आहार विषयी सविस्तर माहिती

पोषण आणि आहार

वाढ आणि विकास सर्वसामान्य तऱ्हेने होण्यासाठी सुयोग्य पोषण आवश्यक असते. कुपोषणामुळे केवळ शारीरिक वाढ व विकास नव्हे त व्यक्तिच्या बौद्धिक क्षमतेवर तसेच आकलन शक्ती व वर्तनावर विपरीत परिणाम होतात. गरोदरपणात स्त्रीचे कुपोषण झाल्यास गर्भावर त्याचे वाईट परिणाम होतात. जसे की, मृत अपत्याचा जन्म, अपुऱ्या दिवसाचे मूल, पूर्ण दिवसाचे पण अपुऱ्या वाढीचे मुल इ. बालपणीच्या पूर्वार्धात कुपोषणामुळे शारीरिक व मानसिक वाढ मंद होते. अशी बालके (माईल स्टोन) फार हळुहळु वाढतात. माईल स्टोन म्हणजे – ठराविक कालावधीत बालकांच्या शारीरिक व मानसिक वाढ व विकासाने गाठलेल्या टप्पा अशी मुले शाळेतल्या अभ्यासातही मागे पडतात. प्रौढामध्ये देखिल सुयोग्य आरोग्य आणि कार्यक्षमता टिकवण्यासाठी चांगल्या पोषणाची आवश्यकता असते. थोडक्यात आपणास असे म्हणता येईल की, पोषणाचे बरे वाईट परिणाम माणसाच्या आयुष्यावर जन्मापासून मृत्यू पर्यंत होत असतात.

आहाराचे घटक किंवा मूलतत्त्वे: सजीवांनी अन्न व पाणी घेऊन त्यांच्या वाढ व इतर सर्व कामासाठी वापर करणे या प्रक्रियेला पोषण म्हणतात आणि या कामासाठी उपयोगी पडणाऱ्या अन्न घटकांना पोषकतत्वे म्हणतात. आपण खातो त्या विविध अन्नपदार्थांमध्ये ही पोषक तत्त्वे वेगवेगळ्या प्रमाणात असतात. आपल्या अन्नातील पोषकतत्वे खालीलप्रमाणे आहेत.

nutrition and food

  1. उष्मांक (कार्यशक्ती) देणारे पदार्थ: कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. (मुख्यत: पिठूळ पदार्थ)
  2. शरीराच्या घडणीसाठी लागणारे पदार्थ: प्रथिने.
  3. चयापचयासाठी व प्रतिकारशक्तीसाठी सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असणारी विविध जीवनसत्त्वे
  4. क्षार : लोह, चुना, इत्यादी खनिज पदार्थ
  5. पाणी (रोजची गरज एक ते दीड लिटर)
  6. मलविसर्जनासाठी व पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारा चोथा

आहाराचे घटक – कर्बोदके : शरीरातले प्रत्येक काम पार पाडण्यासाठी कार्यशक्तीची गरज लागते. मोटारसायकलला जसे पेट्रोल लागते, इंजिनाला डिझेल, कोळसा लागतो, पंपाला वीज लागते, मोबाईल फोनला जसे चार्जिंग लागते तशीच शरीराला या कार्यशक्तीची गरज असते. ही कार्यशक्ती उष्मांकाच्या भाषेत समजावून घेऊया. एक उष्मांक म्हणजे एक कॅलरी. आहारशास्त्रात किलो कॅलरी हे माप वापरतात. एक किलो कॅलरी म्हणजे एक लिटर पाण्याचे तापमान एक सेंटीग्रेडने वाढवायला जेवढी कार्यशक्ती (उष्णता) लागते तेवढी. आपल्याला माहीत आहेच, की सर्व विश्वातली शक्ती किंवा ऊर्जा ही निरनिराळया स्वरूपांत बदलू शकते.उदा. सूर्याची प्रखर उष्णता किंवा आग पाण्याची वाफ करते आणि ही वाफ कोंडून ती शक्ती वापरता येते. समुद्रावर तयार होणारे वारे लाटा निर्माण करतात आणि या लाटा किंवा वारा वापरून (पाणचक्की, पवनचक्कीने) वीज तयार करता येते. ही वीज वापरून अनेक प्रकारची कामे करता येतात. म्हणजेच ऊर्जा किंवा कार्यशक्ती ही अनेक रूपांत मिळते.

स्त्रोत: फळे, भाज्या आणि मध, साखर मध्ये सुक्रोज आणि दुधात लैक्टोज, तर कॉम्प्लेक्स पॉलीसेकेराइड्स अन्नधान्य, बाजरी, डाळी

आहाराचे घटक – प्रथिने : प्रथिने ही नत्रयुक्त आम्लांची (nitric acid) बनलेली असतात. शरीराच्या बांधणीत प्रथिने हा मुख्य घटक असतो. याशिवाय शरीरातल्या अनेक कामांसाठी प्रथिने ही यंत्रे,हत्यारे आणि उपकरणे म्हणून वापरली जातात. आपण स्नायूंचे उदाहरण घेऊ या. स्नायू अनेक तंतूंचे बनलेले असतात. हे स्नायूतंतू म्हणजे विशिष्ट अणुरचना असणारी दोन प्रकारची प्रथिने असतात. त्यांचे वैशिष्टय म्हणजे ती एकमेकांवर सरकून स्नायूंची लांबी कमी होते (स्नायूंचे आकुंचन) आणि परत सैल होण्यासाठी ती प्रथिने एकमेकांपासून लांब सरकतात. हे काम प्रथिनांमुळेच होते.

दुसरे उदाहरण श्वसनाचे. रक्तातल्या तांबडया पेशीत हिमोग्लोबीन नावाचे प्रथिन असते. या प्रथिनाला प्राणवायूचे आकर्षण असते व त्यामानाने कार्बवायूचे कमी आकर्षण असते. या विशिष्ट गुणधर्मामुळे फुप्फुसात रक्तपेशी प्राणवायू घेऊन कार्बवायू सोडतात.

स्त्रोत : तृणधान्ये, बाजरी आणि डाळींचे मिश्रण, दुध, अंडी, मांस

आहाराचे घटक – जीवनसत्व व खनिजे : जीवनसत्त्वे ही रासायनिक संयुगे असतात जी शरीराला कमी प्रमाणात आवश्यक असतात. ते आहारात असणे आवश्यक आहे कारण ते शरीरात संश्लेषित केले जाऊ शकत नाही. शरीरातील असंख्य प्रक्रियांसाठी आणि त्वचा, हाडे, नसा, डोळा, मेंदू, रक्त आणि श्लेष्मल त्वचा यांच्या संरचनेसाठी जीवनसत्त्वे आवश्यक असतात. ते एकतर पाण्यात विरघळणारे किंवा चरबी-विद्रव्य असतात.

खनिजे शरीरातील द्रव आणि ऊतींमध्ये आढळणारे अजैविक घटक आहेत. महत्त्वपूर्ण मॅक्रो खनिजे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि सल्फर आहेत, तर जस्त, तांबे, सेलेनियम, मोलिब्डेनम, फ्लोरीन, कोबाल्ट, क्रोमियम आणि आयोडीन हे सूक्ष्म खनिजे आहेत. ते त्वचा, केस, नखे, रक्त आणि मऊ ऊतकांच्या देखभाल आणि अखंडतेसाठी आवश्यक आहेत. ते तंत्रिका पेशींचे संचरण, acid/बेस आणि द्रव संतुलन, एंजाइम आणि संप्रेरक क्रियाकलाप तसेच रक्ताच्या गोठण्याच्या प्रक्रियेस देखील नियंत्रित करतात.

जीवनसत्वे स्त्रोत व त्यांच्या कमतरतेमुळे होणारे आजार

जीवनसत्व

(Vitamins)

शास्त्रीय नाव

(Scientific Name)

शरीराला आवश्यक का आहे?

(What we use it for?)

स्त्रोत

(Sources)

कमतरतेमुळे होणारे आजार

(Difficiency due to lack of vitamins) 

A रेटिनॉल

(Retinol)

डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवणे हिरव्या भाज्या जसे कि पालक, मेथी, हरबरा, दुध, मका, मोड आलेले कडधान्य रातांधळेपणा
B-1 थायमिन

(Thymin)

B जीवनसत्व विकारांसोबत चयापचय क्रियेत सहभागी होते हिरव्या भाज्या जसे कि पालक,  हरबरा, दुध, मांस, अंडी, काजू, बटाटा, सफरचंद, चिकू
  • बेरीबेरी
  • डायरिया
  • पेलाग्रे
B-2 रायबोफ्लेवीन

(Rayaboflevin)

B-3 निओक्सिन

(Niacin)

B-5 पँटोथिनिक ऍसिड

(Pantothenic Acid)

B-7 बायोटीन

(Biotin)

B-9 फॉलीक ऍसिड

(Folic Acid)

 

B-12 कोबालमिन

(Cobalamin)

C अँस्कॉर्बिक ऍसिड

(Ascorbic acid)

  • कुठलीही जखम लवकरात लवकर भरण्यास मदत होते.
  • जेवणातील जास्तीत जास्त लोह शोषून घेते.
  • रक्तातील केश वाहिन्यांची कार्यक्षमता वाढवितो.
आंबट फळे, लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी, पेरू, चिंच स्कर्व्ही
D कॅल्शिफेरॉल

(Calciferol)

  • हाडे मजबूत करणे
  • हाडे व दाताचा विकास करून मजबूत करणे
  • जखम झाल्यानंतर रक्त लवकर थांबणे (जमा होणे)
कोवळे सूर्यकिरण, अंडी, मासे, कॉड लिव्हर ऑइल
  • मूडधूस,
  • रिकेट्स
  • ऑस्टियोमलेशिया

 

E टोकोफ़ेरल

(Tocopherol)

चरबीयुक्त पदार्थांना सामोरे जाणाऱ्या ऊती आणि पेशीच्या पडद्याच्या निर्मितीसाठी हे आवश्यक आहे. वनस्पती तेल आणि इतर अनेक खाद्यपदार्थ प्रजनन क्षमता कमी होणे

संतुलित आहार – 
संतुलित आहाराच्या कल्पनेप्रमाणे जेवणात पिठूळ पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने,क्षार, जीवनसत्त्वे या सर्वांचा पुरेसा समावेश असणे आवश्यक आहे. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, नाचणी या धान्यांबरोबर डाळी, शेंगदाणे, भाजीपाला, फळभाजी, फळे, तेल, तूप इतक्या गोष्टी आवश्यक असतात. हे पदार्थ अगदी रोज नाही तरी आठवडयातून दोन-तीन वेळेस अदलून बदलून मिळावेत. दूध हा तसा संपूर्ण पण महाग आहार आहे. दूध, शेंगदाणे, इत्यादींतून मिळणारी प्रथिने तुलनेने ‘महाग’ प्रथिने आहेत आणि ज्वारी, बाजरीतून मिळणारी प्रथिने स्वस्त आहेत. प्राणिज पदार्थ, मांस, मासे, अंडी ही महाग प्रथिने आहेत. त्यातल्या त्यात अंडे सर्वात स्वस्त व परिपूर्ण प्राणिज प्रथिन आहे.

चौरंगी आहार कल्पना

आहारशास्त्र सर्वांना सोपे करून सांगण्यासाठी चौरंगी आहार ही कल्पना चौरस आहार म्हणून सांगता येईल. चौरंगी म्हणजे चार रंग. पांढरा, पिवळा हिरवा, लाल. कोणत्याही जेवणात हे चार रंग असावे म्हणजे आहार चौरस होतो.

food pyramid

                                                      संतुलित आहार पिरॅमिड
पांढरा – भात, कांदा, लसूण, अंडे, दूध, फ्लॉवर, कोबी
पिवळा – भाकरी, चपाती, वरण, पिवळी फळे, लिंबू, भोपळा, पेरु
हिरवा – हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या
लाल – फळभाज्या, (टोमॅटो), गाजर, मांस, मिरची
(यातील मांसाहारी पदार्थ ऐच्छिक आहेत) ही कल्पना वापरून आहारात समतोलता आणता येते.

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा-महापॅक
महाराष्ट्राचा-महापॅक

Sharing is caring!

पोषण आणि आहार : आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य_6.1

FAQs

विटामिन B-1 चे शास्त्रीय नाव काय?

विटामिन B-1 चे शास्त्रीय नाव थायमिन आहे.

कोवळ्या सूर्यकिरणातून कोणते विटामिन मिळते?

कोवळ्या सूर्यकिरणातून विटामिन D मिळते.

संतुलित आहार म्हणजे काय?

जेवणात पिठूळ पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने,क्षार, जीवनसत्त्वे या सर्वांचा पुरेसा समावेश असलेला आहार म्हणजे संतुलित आहार.

या लेखात आपण पोषण आणि आहार या घटकावरील माहिती पाहणार आहोत का ?

होय,या लेखात आपण पोषण आणि आहार या घटकावरील सविस्तर माहिती पाहणार आहोत.