Marathi govt jobs   »   Study Materials   »   महाराष्ट्रातील लोकसंख्या

महाराष्ट्रातील लोकसंख्या : आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

महाराष्ट्रातील लोकसंख्या: आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य 

महाराष्ट्रातील लोकसंख्या : आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी तसेच महाराष्ट्रातील अन्य भरती परीक्षांसाठी महाराष्ट्राचा भूगोल या मधील महाराष्ट्रातील लोकसंख्या हा विषय अतिशय महत्वाचा आहे.  यावर सर्वच परीक्षांमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात. आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी उपयुक्त अशी महाराष्ट्रातील लोकसंख्येवर माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.तसेच त्यावरील परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असणारे काही निवडक प्रश्न-उत्तरे ही येथे पाहणार आहोत. 

महाराष्ट्रातील लोकसंख्या: विहंगावलोकन

महाराष्ट्रातील लोकसंख्या : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
विषय महाराष्ट्राचा भूगोल
उपयोगिता आदिवासी विकास विभाग भरती 2023 आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
लेखाचे नाव महाराष्ट्रातील लोकसंख्या
लेख तुम्हाला काय प्रदान करतो?
  • महाराष्ट्रातील लोकसंख्येविषयी सविस्तर माहिती 
  • महाराष्ट्रातील लोकसंख्येवरील प्रश्न-उत्तरे

महाराष्ट्रातील लोकसंख्या 

  • 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,72,972 आहे.
  • महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारतात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. 

महाराष्ट्रातील सर्वात जास्त  लोकसंख्या असणारे पहिले पाच जिल्हे-

जिल्हा जिल्ह्याची लोकसंख्या
ठाणे 1.10 कोटी
पुणे 94.3 लाख
मुंबई उपनगर 93.60 लाख
4 नाशिक 61 लाख
5 नागपूर 46.5 लाख

महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारे पहिले 5 जिल्हे :

जिल्हा जिल्ह्याची लोकसंख्या
1 सिंधुदुर्ग 8.5 लाख
गडचिरोली 10.7 लाख
हिंगोली 11.7 लाख
वाशीम 11.9 लाख
भंडारा 12  लाख

महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता 

एका विशिष्ट क्षेत्रफळात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या म्हणजे लोकसंख्येची घनता होय.

  • भारत : 382 
  • महाराष्ट्र : 365 

महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असणारे पहिले 3 जिल्हे –

जिल्हा लोकसंख्या घनता 
मुंबई उपनगर 20980 
मुंबई शहर 19653 
ठाणे (2014 पूर्वीचा) 1157 

महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारे पहिले 3 जिल्हे –

जिल्हा लोकसंख्या घनता
गडचिरोली 74 
सिंधुदुर्ग 163 
चंद्रपूर 193 

महाराष्ट्रातील साक्षरता दर

  • भारत  : 74.4%
  • महाराष्ट्र : 82.30%

महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षरता दर असणारे पहिले 3 जिल्हे

जिल्हा       साक्षरता दर
मुंबई उपनगर 89.9%
मुंबई शहर 89.2%
नागपूर 88.4%

महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता दर असणारे पहिले 3 जिल्हे –

जिल्हा साक्षरता दर
नंदुरबार 64.4%
जालना 71.5%
धुळे 72.8%

महाराष्ट्रातील पुरुष व महिला साक्षरता दर 

  • भारत पुरुष आणि महिला साक्षरता दर – अनुक्रमे 82 आणि 65.5%.
  • महाराष्ट्र पुरुष साक्षरता दर : 88.40%
  • महाराष्ट्र स्त्री साक्षरता दर : 75.90%

महाराष्ट्रातील सर्वात जास्त पुरुष साक्षरता दर असणारे पहिले 3 जिल्हे – 

जिल्हा पुरुष साक्षरता दर
मुंबई उपनगर 93%
अकोला 92.3%
नागपूर 92.10%

महाराष्ट्रातील सर्वात जास्त स्त्री साक्षरता दर असणारे पहिले 3 जिल्हे –

जिल्हा स्त्री साक्षरता दर
मुंबई उपनगर 86.40%
मुंबई शहर 86.50%
नागपूर 84.50%

महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर 

  • लिंग गुणोत्तर (Sex ratio) हे लोकसंख्येमधील पुरुष व स्त्रीयांचे गुणोत्तर आहे.
  • 2011 च्या जनगणनेनुसार, लिंग गुणोत्तराच्या संदर्भात, भारतातील 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या 943 (अंदाजे 940) होती. तर महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 929 होते.  

महाराष्ट्रातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारे पहिले 3 जिल्हे – 

जिल्हा  लिंग        गुणोत्तर 
रत्नागिरी      1122 
सिंधुदुर्ग       1036 
गोंदिया

999 

महाराष्ट्रातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारे पहिले 3 जिल्हे – 

जिल्हा लिंग गुणोत्तर
मुंबई शहर 832 
2 मुंबई उपनगर 860 
ठाणे (2014 पूर्वीचा) 886 

महाराष्ट्रातील बाल लिंग गुणोत्तर

  • 0  ते 6 वर्ष वयोगटातील बालकांमध्ये दर 1000 मुलांमागे असणारे मुलींचे प्रमाण म्हणजे बाललिंगगुणोत्तर होय.
  • भारत बाललिंग गुणोत्तर : 919
  • महाराष्ट्र बाललिंग गुणोत्तर : 894

महाराष्ट्रातील सर्वात जास्त बाल लिंगगुणोत्तर असणारे पहिले 3 जिल्हे –

जिल्हा बाल लिंग गुणोत्तर
गडचिरोली 961 
गोंदिया 956 
चंद्रपूर 953

महाराष्ट्रातील सर्वात कमी बाल लिंगगुणोत्तर असणारे पहिले 3 जिल्हे –

जिल्हा बाल लिंग गुणोत्तर
बीड 807 
जळगाव 842 
अहमदनगर 852 

                                                   प्रश्न – उत्तरे 

Q1. उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र हे देशातील ……….. सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे.

Ans –  दुसरे  

Q2. 2001-2011 या कालावधीत महाराष्ट्राची शहरी लोकसंख्या ……….. टक्क्यांनी वाढली. 

Ans – 23.64 

Q3. 2001 ते 2011 पर्यंत महाराष्ट्राची लोकसंख्या ………. टक्क्यांनी वाढली.

Ans –16

Q4. महाराष्ट्र राज्यात, 1961 च्या जनगणनेनुसार आणि 2011 च्या जनगणनेनुसार ….. लिंग गुणोत्तर होते.

Ans – 936 आणि 929 

Q5.0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी, महाराष्ट्र राज्यातील बाल लिंग गुणोत्तर ……… हे 1991मध्ये आणि ………..2011 मध्ये होते.

Ans – 946 आणि 894 

Q6. 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक (961) आणि सर्वात कमी (807) बाल लिंग गुणोत्तर होते?

Ans –  गडचिरोली आणि बीड

Q7. महाराष्ट्रातील 2011 च्या जनगणनेनुसार, अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची टक्केवारी किती आहे?

Ans –11.81

Q8. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे?

Ans – पुणे

Q9. 2001 च्या जनगणनेनुसार, कोणत्या राज्यातून पुरुष लोकसंख्येच्या स्थलांतराचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक होते?

Ans – उत्तर प्रदेश

Q10. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या लोकांचे प्रमाण किती आहे?

Ans – 365

Q11. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील साक्षरता दर ………… आहे.

Ans – 82.34

Q12. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा साक्षरता दर सर्वात कमी आहे?

Ans – नंदुरबार

Q13. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ………. आहे आणि 2011 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या …… टक्के आहे.

Ans –11.24 कोटी आणि 9.28

Q14. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात पुरुष साक्षरता दर ….. आणि महिला साक्षरता दर ….. आहे.

Ans – 88.38% आणि 75.87%

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा-महापॅक
महाराष्ट्राचा-महापॅक

Sharing is caring!

FAQs

आदिवासी विकास विभाग भरतीसाठी महाराष्ट्रातील लोकसंख्या घटकावरील माहिती अभ्यासात उपयुक्त आहे का ?

होय, आदिवासी विकास विभाग भरतीसाठी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महाराष्ट्रातील लोकसंख्या घटकावरील माहिती अभ्यासात अतिशय उपयुक्त आहे.

या लेखात आपण महाराष्ट्रातील लोकसंख्या घटकावरील माहिती पाहणार आहोत का ?

होय,या लेखात आपण महाराष्ट्रातील लोकसंख्या घटकाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

या लेखात आपण महाराष्ट्रातील लोकसंख्या विषयी अत्यंत महत्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत का ?

होय, या लेखात आपण महाराष्ट्रातील लोकसंख्या विषयी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत.