Table of Contents
प्राकृतिक महाराष्ट्र – कोकण किनारपट्टी
भारतातील कोकण हा प्रदेश पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. भारतीय प्राकृतिक विभाग किनारपट्टी मैदानी प्रदेशापैकी एक असणारा पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशाचे तीन भागांत वर्गीकरण केले जाते. त्यातील सुरत ते गोवा इथपर्यंतची किनारपट्टी ही कोकण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते.आगामी MPSC 2024 व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महाराष्ट्राचा भूगोल हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. महाराष्ट्राच्या भूगोल मधील प्राकृतिक महाराष्ट्र – कोकण किनारपट्टी हा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा समजला जाणारा घटक आहे. या लेखात आपण प्राकृतिक महाराष्ट्र – कोकण किनारपट्टी यावर सविस्तर माहिती पाहणार आहोत.
प्राकृतिक महाराष्ट्र – कोकण किनारपट्टी: विहंगावलोकन
खालील तक्त्यात आम्ही विहंगावलोकन बद्दल दिले आहे.
प्राकृतिक महाराष्ट्र – कोकण किनारपट्टी: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | MPSC 2024 |
विषय | महाराष्ट्राचा भूगोल |
टॉपिकचे नाव | प्राकृतिक महाराष्ट्र – कोकण किनारपट्टी |
लेखातील प्रमुख मुद्दे |
|
महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचार करता कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेकडील तळासरी ते दक्षिणेकडील तेरेखोलच्या खाडीपर्यंत आहे, तर पूर्व-पश्चिम विस्तार हा महाराष्ट्राच्या पश्चिमेस असलेल्या अरबी समुद्रापासून तर सह्याद्री पर्वतापर्यंत आहे.
कोकणचे 3 विभाग पडतात –
- उत्तर कोकण विभाग– पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व रायगड जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुके.
- मध्य कोकण विभाग- रायगड जिल्ह्याचे दक्षिणेकडे तालुके व रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तरेकडील तालुक्यांचा समावेश.
- दक्षिण कोकण – रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश या मध्ये होतो. हा प्रदेश मुख्यत : डोंगराळ आहे.
निर्मिती – महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग प्रस्तंर भंगामुळे खाली खचल्याने कोकणची अरुंद किनारपट्टी निर्माण झाली आहे.
खलाटी – पश्चिमेकडील अरबी समुद्रालगतच्या सखल भागास खलाटीचा प्रदेश म्हणतात. या भागाची उंची 5 ते 15 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक असते.
वलाटी – कोकण किनारपट्टीच्या सह्याद्री पर्वताकडील पायथ्यालगतच्या भागास वलाटी असे म्हणतात. या भागाची उंची सरासरी 200 ते 300 मीटर आहे. याचा उतार तीव्र स्वरूपाचा आहे.
- कोकण किनारपट्टीचे एकूण क्षेत्रफळ 30,394 चौ. कि.मी. आहे.
- कोकण किनारपट्टीला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा – रत्नागिरी
- कोकण किनारपट्टीला सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला जिल्हा – ठाणे
- समुद्रसपाटीपासून कोकण किनारपट्टीची उंची 5 – 300 मीटर आहे.
- कोकण किनारपट्टी ही ठिकठिकाणी वक्राकार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी ही दंतूर स्वरूपाची आहे .
- कोकण किनारपट्टीची रुंदी 30 ते 60 कि.मी. आहे जी उल्हास नदीच्या खोऱ्यात सर्वांत जास्त म्हणजे 100 कि.मी. आहे. तर सर्वात कमी रुंदी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे 40 किलोमीटर आहे.
- कोकणचा उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे तीव्र आहे.
- किनारपट्टीची रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत गेलेली आहे.
- कोकण किनारपट्टीला समुद्रात येऊन मिळणाऱ्या बऱ्याचशा नद्यांमुळे ही किनारपट्टी सलग न राहता खंडित झालेली असल्याने कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे.
- कोकणात उत्तरेकडील भागात तांबूस तपकिरी मृदा आढळले. तर दक्षिणेकडील भागात (सिंधुदुर्ग व रत्नागिरी ) लोहयुक्त जांभी मृदा आढळते.
कोकणातील खाडया उत्तरेकडून दक्षिणेकडे –
समुद्राचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आतमध्ये शिरते तिथपर्यंतच्या भागास खाडी असे म्हणतात.
खालील तक्त्यात कोकणातील खाड्या,नद्या आणि जिल्हे दिलेले आहे.
क्र. | खाडीचे नाव | नदीचे नाव | जिल्हा |
01 | दातीवरा | वैतरणा | पालघर |
02 | वसई | उल्हास | पालघर |
03 | ठाणे | उल्हास | ठाणे |
04 | मणोरी | दहिसर | मुंबई |
05 | मालाड | ओशिवरा | मुंबई |
06 | माहीम | मिठी | मुंबई |
07 | धरमतर | पाताळगंगा व अंबा | रायगड |
08 | रोहा | कुंडलिका | रायगड |
09 | राजापुरी | काळ | रायगड |
10 | बाणकोट | सावित्री | रायगड व रत्नागिरी ची सीमा |
11 | केळशी | भारजा | रत्नागिरी |
12 | दाभोळ | वशिष्ठी | रत्नागिरी |
13 | जयगड | शास्त्री | रत्नागिरी |
14 | भाट्ये | काजळी | रत्नागिरी |
15 | पूर्णगड | मुचकुंदी | रत्नागिरी |
16 | जैतापूर | काजवी | रत्नागिरी |
17 | विजयदुर्ग | शुक | रत्नागिरी व सिंधुदुर्ग ची सीमा |
18 | देवगड | देवगड | सिंधुदुर्ग |
19 | आचरा | आचरा | सिंधुदुर्ग |
20 | कलावली | गड | सिंधुदुर्ग |
21 | कर्ली | कर्ली | सिंधुदुर्ग |
22 | तेरेखोल | तेरेखोल | सिंधुदुर्ग |
बंदरे – कोकण किनारपट्टीवर एकूण 49 बंदरे असून मुंबई हे त्यातील प्रमुख बंदर आहे.
बेटे – मुंबई हे कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे सात बेटांचा समूह मिळून तयार झालेले एक बेट आहे.
जंजिरा, कुलाबा, खांदेरी, उंदेरी (रायगड), साष्टी, मढ, छोटा कुलाबा, माजगाव, परळ, माहिम (मुंबई शहर व मुंबई उपनगर), कुरटे (सिंधुदुर्ग), अंजनदीव, घारापुरी (एलिफंटा) ही बेटे पश्चिम किनाऱ्यावर आहेत.
MPSC 2024 अभ्यास साहित्य
Topic | Link |
जालियनवाला बाग हत्याकांड | Link |
गांधी युग | Link |
रक्ताभिसरण संस्था | Link |
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.