Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi-1 July...

Daily Current Affairs In Marathi-1 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-1 जुलै 2021

Daily Current Affairs In Marathi-1 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-1 जुलै 2021_2.1

 

दैनिक चालू घडामोडी: 1  जुलै 2021

 

चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला  1 जुलै 2021 चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.

 

राज्य बातम्या

  1. जम्मू-काश्मीर च्या नायब राज्यपालांनी केंद्रशासित प्रदेशातील महिलांसाठी ‘होसला’ ही योजना सुरु केली

Daily Current Affairs In Marathi-1 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-1 जुलै 2021_3.1

  • जम्मू-काश्मीर चे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केंद्रशासित प्रदेशातील महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी  “हौसला – तिच्या प्रगतीस प्रेरणा” हा कार्यक्रम सुरु केला.
  • महिला आणि पुरुष उद्योजकांमधील दरी कमी करणे आणि योजनाबद्ध पद्धतीने विविध व्यवसायात गुंतलेल्या महिलांना होसला कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी प्रवृत्त करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

 

2. जम्मू-काश्मीर च्या मुख्य सचिवांनी “सुकून” या हेल्पलाइन चे उद्घाटन केले

Daily Current Affairs In Marathi-1 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-1 जुलै 2021_4.1

  • जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव अरुण कुमार मेहता यांनी एसडीआरएफच्या प्रथम बटालियनच्या  मानसिक आरोग्या साठीच्या कायमस्वरूपी हेल्पलाईन ‘सुकून’ चे उद्घाटन बटालियनच्या मुख्यालयात केले.
  • या हेल्पलाईन ची सुरुवात काश्मीर एसडीआरएफ च्या फर्स्ट बटालियन ने मिशन यूथ जम्मू-काश्मीर आणि पर्यटन विभागाच्या सहकार्याने केली आहे.
  • यामध्ये गरजूंना क्लिनिकल समुपदेशक, थेरपिस्ट आणि मानसशास्त्रज्ञांच्या सेवा मिळविण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे.

 

नियुक्ती बातम्या

3. निती आयोगाच्या सीईओ पदी अमिताभ कांत यांना एका वर्षाची मुदतवाढ

Daily Current Affairs In Marathi-1 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-1 जुलै 2021_5.1

  • कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने (एसीसी) नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांचा कार्यकाळ 30 जून 2022 पर्यंत वाढविला आहे.
  • कार्यकाळ वाढवून मिळण्याची ही तिसरी वेळ आहे त्यांना सर्वप्रथम 17 फेब्रुवारी 2016 रोजी दोन वर्षांकरिता आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. ते 1980 च्या आयएएस अधिकारी आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • नीती आयोगाची स्थापनाः 1 जानेवारी 2015
  • नीती आयोगाचे मुख्यालय: नवी दिल्ली
  • नीती आयोगाचे अध्यक्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

4. एअर मार्शल विवेक राम चौधरी यांची आयएएफचे उपाध्यक्षपदी निवड

Daily Current Affairs In Marathi-1 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-1 जुलै 2021_6.1

  • एअर मार्शल विवेक राम चौधरी यांची एअर मार्शल हरजितसिंग अरोरा यांच्यानंतर भारतीय हवाई दलाच्या नवीन उपाध्यक्षपदी नेमणूक करणायत आली.
  • एअर मार्शल चौधरी सध्या आयएएफच्या वेस्टर्न एअर कमांड (डब्ल्यूएसी) चे प्रमुख आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी, एअर मार्शल चौधरी यांनी 29 डिसेंबर 1982 रोजी वायुसेनेत प्रवेश केला.
  • त्यांना 3800 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव असून मिग -21, मिग -23 एमएफ, मिग 29 आणि एसयू -30 एमकेआय लढाऊ विमान इत्यादी विमानाचे त्यांनी उड्डाण केले आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • एअर चीफ मार्शल: राकेश कुमारसिंग भदौरिया
  • भारतीय हवाईदलाची स्थापना: 8 ऑक्टोबर 1932
  • भारतीय हवाई दल मुख्यालय: नवी दिल्ली

 

पुरस्कार बातम्या

5. टोरोंटो आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सवात ‘डिकोडिंग शंकर’ विजयी

Daily Current Affairs In Marathi-1 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-1 जुलै 2021_7.1

  • स्वतंत्र चित्रपट दिग्दर्शक दीप्ती पिल्ले सिवन यांच्या प्रख्यात संगीतकार शंकर महादेवन यांच्या आयुष्याविषयी आणि त्याच्या कारकिर्दीबद्दल असलेल्या “डिकोडिंग शंकर” या माहितीपर चित्रपटास नुकताच टोरोंटो आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सव 2021 चा माहितीपट (डॉक्युमेंटरी) विभागात सर्वोत्कृष्ट जीवनचरित्र चा पुरस्कार मिळाला.

 

6. ओडिया कवी राजेंद्र किशोर पांडा यांना कुवेम्पू राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

Daily Current Affairs In Marathi-1 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-1 जुलै 2021_8.1

  • दिवंगत कवी कुवेम्पू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा कुवेम्पू राष्ट्रीय पुरस्कार 2020 ओरिसातील महान कवी डॉ.राजेंद्र किशोर पांडा यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये, चांदीचे पदक आणि सन्मानपत्र असे आहे.
  • 24 जून 1944 रोजी जन्मलेल्या पांडा यांनी ओरिया भाषेत अनेक काव्यकृती लिहिल्या असून त्यांना 2010 साली गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार1985 साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले आहेत आणि त्यांना संबलपूर विद्यापीठाने डी.लिट. पदवी देखील बहाल केली आहे.
  • हा पुरस्कार 1992 साली स्थापन झालेल्या राष्ट्रकवी कुवेम्पू ट्रस्टद्वारे 2013 पासून भारतीय राज्यघटनेने मान्यता दिलेल्या भाषांमधील साहित्यिकांना देण्यात येतो.

 

रॅक्स आनि अहवाल बातम्या

7. आयटीयूच्या जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक 2020 मध्ये भारत 10 व्या स्थानी

Daily Current Affairs In Marathi-1 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-1 जुलै 2021_9.1

  • आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेने (आयटीयू) जाहीर केलेल्या जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक 2020 मध्ये भारत 10 व्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट देश ठरला असून भारताला 97.5 गुण मिळाले आहेत.
  • जीसीआय ची ही चौथी आवृत्ती असून यामध्ये 194 देशांचे मोजमाप करण्यात आले आहे. कायदेशीर उपाय, तांत्रिक उपाय, संघटनात्मक उपाय, क्षमता विकास आणि सहकार या पाच मापदंडांच्या आधारे हा निर्देशांक मोजला जातो.
  • या निर्देशांकामध्ये यूएसए पहिल्या स्थानी असून युनायटेड किंगडम आणि सौदी अरेबिया संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर असून ईस्टोनिया हा देश तिसऱ्या स्थानी आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:

  • आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेचे मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड
  • आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेची स्थापना: 17 मे 1865
  • आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेचे सरचिटणीस: होलिन झाओ

 

8. ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम इंडेक्स 2021 मध्ये भारत 20व्या क्रमांकावर

Daily Current Affairs In Marathi-1 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-1 जुलै 2021_10.1

  • स्टार्टअप ब्किंक ने प्रकाशित केलेल्या ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम इंडेक्स 2021 (जागतिक नवउद्योग परिसंस्था निर्देशांक) मध्ये 100 देशांच्या यादीत भारत 20 व्या क्रमांकावर आहे.
  • 2019 साली भारत 17 व्या क्रमांकावर आणि 2020 साली 23व्या क्रमांकावर होता. या अहवालाच्या म्हणण्यानुसार भारताने आपली नवउद्योग परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी पायाभूत सुविधा व इंटरनेटचा वेग अधिक चांगला  करण्याची आवश्यकता आहे.
  •  शहरांचा विचार केल्यास पहिल्या 1000 शहरांमध्ये भारतातील 43 शहरे आहेत आणि त्यातील बेंगळुरू (10 वे)नवी दिल्ली (14 वे)मुंबई (16 वे) ही शहरे पहिल्या 20 शहरांमध्ये आहेत.
  • देशांचा विचार केल्यास गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही अमेरिका, ब्रिटन, इस्त्राईल, कॅनडा आणि जर्मनी पहिल्या पाच स्थानांवर आहेत.
  • अहवालात प्रत्येक स्थानासाठी गुण आहेत जे तीन मापदंडांच्या साहय्याने ठरविले जातात, ते म्हणजे संख्या, गुणवत्ता आणि व्यवसाय वातावरण.

 

क्रीडा बातम्या

9. भारतीय वंशाचा अमेरिकन अभिमन्यू मिश्रा ठरला सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रँडमास्टर

Daily Current Affairs In Marathi-1 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-1 जुलै 2021_11.1

  • 12 वर्षे, चार महिने आणि 25 दिवस वय असलेला भारतीय वंशाचा अमेरिकेत राहणारा अभिमन्यू मिश्रा जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे.
  • अभिमन्यूने सर्जे कर्जाकिनचा 12 वर्ष आणि सात महिने वयाचा दीर्घकालीन जागतिक विक्रम मोडला. तीन वर्षांपूर्वी, भारताच्या आर. प्रग्नानंधाने ने हा विक्रम  जवळजवळ मोडला होता पण थोडक्यात त्याची संधी हुकली.

 

महत्वाचे दिवस

10. 01 जुलै: राष्ट्रीय पोस्टल (टपाल) कामगार दिवस

Daily Current Affairs In Marathi-1 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-1 जुलै 2021_12.1

  • समाजातील टपाल कामगारांनी दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ दरवर्षी 1 जुलै रोजी राष्ट्रीय टपाल कामगार दिन साजरा केला जातो.
  • 1997 साली अमेरिकेच्या सिएटल येथील लोकप्रिय टपाल सेवा प्रदात्याने या दिवसाची सुरूवात टपाल कामगारांचा सन्मान करण्यासाठी केली.

 

11. 01 जुलै: राष्ट्रीय सनदी लेखापाल दिन

Daily Current Affairs In Marathi-1 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-1 जुलै 2021_13.1

  • 1949 साली स्थापन झालेल्या भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या ((आयसीएआय) वर्धापनदिनाचे औचित्य साधून देशभरात दरवर्षी 1 जुलै रोजी राष्ट्रीय सनदी लेखापाल दिवस किंवा सीए दिवस साजरा करण्यात येतो.
  • आयसीएआय ही भारताची राष्ट्रीय व्यावसायिक लेखा संस्था आणि जगातील दुसर्‍या क्रमांकाची लेखा संस्था आहे. या संस्थेची स्थापना 1 जुलै 1949 रोजी संसदेच्या कायद्याद्वारे करण्यात आली.
  • आयसीएआय ही भारतातील वित्तीय लेखापरीक्षण आणि लेखा व्यवसायासाठी परवाना देणारी व नियामक संस्था असून तिच्या शिफारशींचे पालन नॅशनल फायनान्शिअल रिपोर्टिंग अथॉरिटी (एनएफआरए) सह सर्व खासगी कंपन्या व लेखा संस्थांकडून केले जाते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया मुख्यालय: नवी दिल्ली
  • आयसीएआयचे अध्यक्षः सीए निहार एन जांबूसरिया

 

12. 01 जुलै: राष्ट्रीय डॉक्टर दिवस

Daily Current Affairs In Marathi-1 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-1 जुलै 2021_14.1

  • इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या वतीने दरवर्षी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे आयोजन केले जाते.
  • हा दिवस महानतम शल्यचिकित्सक आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो. त्यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी आणि निधन 1 जुलै 1962 रोजी झाले.

 

निधन बातम्या

13. संस्कृत दैनिक वृत्तपत्र ‘सुधर्म’ चे संपादक के.व्ही. संपत कुमार यांचे निधन

Daily Current Affairs In Marathi-1 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-1 जुलै 2021_15.1

  • 2020 साली साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार विजेते संस्कृत दैनिक वृत्तपत्र ‘सुधर्म’ चे संपादक के.व्ही. संपत कुमार यांचे निधन झाले.
  • पद्मश्री पुरस्कार त्यांना व त्यांच्या पत्नीला मिळाला होता. त्यांना सिद्धारुद्ध पुरस्कार, शिवरात्र देशिकेंद्र मीडिया पुरस्कार, अब्दुल कलाम पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
  • संपत कुमार यांचे वडील पंडित वरदराज अय्यंगार यांनी 1970 साली ‘सुधर्म‘ वृत्तपत्र सुरु केले. हे जगातील एकमेव संस्कृत दैनिक असून म्हैसूर येथून प्रकाशित करण्यात येते.

 

14. चित्रपट निर्माते व दिग्दर्शक राज कौशल यांचे निधन

Daily Current Affairs In Marathi-1 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-1 जुलै 2021_16.1

  • “शादी का लड्डू” आणि “प्यार में कभी कभी” सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे चित्रपट निर्माता-दिग्दर्शक राज कौशल यांचे निधन झाले, ते अभिनेत्री-टीव्ही सादरकर्ती मंदिरा बेदी यांचे पती होते.
  • त्यांनी दिग्दर्शक ओनीर यांचा, जुही चावला आणि संजय सुरी अभिनित  2005 सालचा चित्रपट “माय ब्रदर… निखिल” या चित्रपटाची निर्मिती देखील केली होती. त्याचा शेवटचा दिग्दर्शित चित्रपट 2006 मधील रहस्यपट “अँथनी कौन है?” होता, ज्यात अर्शद वारसी आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत होते.

 

विविध बातम्या

15. भारतातील सर्वात जुन्या आणि अद्यापही सुरु असलेल्या ‘मुंबई समाचार’ या वृत्तपत्राला 200 वर्ष पूर्ण

Daily Current Affairs In Marathi-1 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-1 जुलै 2021_17.1

  • 1 जुलै रोजी, भारतातातील सर्वात जुने सुरु असलेले वृत्तपत्र असलेल्या, मुंबई समाचार ने त्याच्या 200 व्या वर्षांत पदार्पण केले.
  • मुंबईच्या फोर्ट परिसरातील हॉर्निमॅन सर्कल येथील लाल इमारतीत मुख्यालय असलेल्या या गुजराती भाषिक वृत्तपत्राचे संपादन 1822 साली सुरु झाले. याची सरुवात पारशी अभ्यासक फरदूनजी मुराझबान यांनी केली.
  • पूर्वी गुजराती भाषेत याला बॉम्बे ना समाचार असे म्हटले जात होते. यामध्ये मुख्यत्वेकरून समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापारातील मालाबद्दल आणि इतर व्यावसायिक बाबींबद्दल माहिती असे.
  • अनेक मालकांकडे हस्तांतरित होत होत शेवटी दिवाळखोरी घोषीत झाल्यानंतर 1933 ला कामा कुटुंबाकडे आले.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!