Table of Contents
बारावी निकाल 2024 महाराष्ट्र बोर्ड जाहीर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) ने अधिकृत वेबसाइट https://mahresult.nic.in/ वर 21 मे 2024 रोजी महाराष्ट्र HSC निकाल 2024 जाहीर केलेला आहे. दुपारी 1 नंतर निकाल लिंक सक्रिय होणार आहे. ही लिंक सक्रिय झाल्यानंतर, विद्यार्थी www.mahresult.nic.in आणि www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल पाहू शकतील.
यावर्षी महाराष्ट्र HSC 2024 परीक्षेसाठी सुमारे 14,33,331 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी फक्त 14,23,923 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. महाराष्ट्र बोर्ड HSC निकाल 2024 ची एकूण उत्तीर्ण टक्केवारी 93.37% आहे, सुमारे 13,29,684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत . 8,782 विद्यार्थ्यांनी 12वीच्या 2024 च्या परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. तसेच, 26 वेगवेगळ्या विषयांमध्ये जवळपास 100% निकाल लागला आहे. महाराष्ट्र बोर्ड 12 वी चा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी चा रोल नंबर आणि आईचे नाव अधिकृत साईटवर टाकणे आवश्यक आहे.
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हावार टक्केवारी 2024
बोर्डाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 97.91% उत्तीर्णतेसह कोकण पुन्हा एकदा राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा ठरला आहे. तसेच, 91.95% उत्तीर्णतेसह मुंबई राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी आहे.
- कोकण – 97.91%
- नाशिक – 94.71%
- पुणे – 94.44%
- कोल्हापूर – 94.24%
- संभाजी नगर – 94.08%
- अमरावती – 93%
- लातूर – 92.36%
- नागपूर – 92.12%
- मुंबई – 91.95%
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.