Table of Contents
स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप
भारताचे स्वातंत्र्य पूर्व काळातील राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे प्रयत्न पुढीलप्रमाणे :
- दादाभाई नौरोजी: हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी भारताचे राष्ट्रीय राष्ट्रीय उत्पन्न उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न केला. त्यांच्या मोजमापानुसार राष्ट्रीय उत्प 1867-68 मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न रू. 340 कोटी तर दर डोई उत्पन्न रू. 20 इतके होते. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे विभाजन दोन क्षेत्रांमध्ये कृषि क्षेत्र व गैरकृषि क्षेत्र केले होते. होते. मात्र दादाभाईंच्या गणना पद्धतीला वैज्ञानिक मानले जात नाही.
- विल्यम डिग्बी : यांनी 1897-98 मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न रू. 390 कोटी तर दर डोई उत्पन्न रू. 17 इतके असल्याचे सांगितले.
- फिंडले शिरास: 1911 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न रू.1942 कोटी, तर दर डोई उत्पन्न रू. 80 इतके होते.
- डॉ. व्ही. के. आर. व्ही. राव: यांनी 1925-29 या कालावधीसाठी राष्ट्रीय उत्पन्न रू. 2301 कोटी, तर दर डोई उत्पन्न रू. 78 इतके सांगितले. त्यांनी सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना तसेच राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे प्रतिपादन केले. म्हणून त्यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक (Father of national income accounting) असे मानले जाते.
- आर. सी. देसाई: यांनी 1930-31 साठी राष्ट्रीय उत्पन्न रू. 2809, तर दर डोई उत्पन्न रू. 72 इतके असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती
National Income Accounting – Methods of measurement: कोणत्याही देशाचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या तीन पद्धती आहेत:
- उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत
- उत्पन्न / आय पद्धत
- खर्च पद्धत
- उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत (Production method or Value Added Method): उत्पादन पद्धत ही मूल्यवर्धित (value added) संकल्पनेवर आधारलेली आहे. या पद्धतीत देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धितांची बेरीज केली जाते. उत्पादन पद्धतीने काढलेले राष्ट्रीय उत्पन्न हे बाजारभावाला मोजलेले असते. उदा. GDPmp, NDPmp, GNPmp, NNPmp.
- उत्पन्न / आय पद्धत (Income method): वस्तू-सेवांच्या उत्पादन प्रक्रियेत उत्पादनाचे घटक (भूमी, श्रम, भांडवल व उद्योजकता) वापरले गेल्याने त्यांच्या मालकांना घटक उत्पन्न (खंड, मजुरी, व्याज व नफा) प्राप्त होत असते. अशा सर्व घटक उत्पन्नांची बेरीज म्हणजे घटक किंमतींना काढलेले राष्ट्रीय उत्पन्न होय. उदा. GDPfc, NDPfc, GNPfc, NNPfc.
- खर्च पद्धत (Expenditure method): उत्पादन संस्थांनी निर्माण केलेल्या अंतिम वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी लोकांनी केलेल्या खर्चाचा विचार केला जातो. लोक वस्तू व सेवांची खरेदी उपभोगासाठी आणि गुंतवणुकीसाठी करतात.
भारतात वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. सध्या CSO मार्फत GDP च्या गणनेसाठी वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी पुढील पद्धतींचा वापर केला जातोः
- उत्पादन पद्धतीचा वापर वस्तू उत्पादक क्षेत्रांसाठी (कृषि व उद्योग) केला जातो.
- उत्पन्न पद्धतीचा वापर साधारणतः सेवा क्षेत्रासाठी केला जातो.
- खर्च व वस्तू प्रवाह (commodity flow) पद्धतींचा एकत्रित वापर बांधकाम क्षेत्रासाठी केला जातो. त्यापैकी ग्रामीण बांधकामासाठी खर्च पद्धत, तर शहरी बांधकामासाठी वस्तू प्रवाह पद्धत वापरली जाते.
भारताच्या पंचवार्षिक योजना
योजना |
प्रतिमान/ अध्यक्ष |
लक्ष्य वाढ (%) |
वास्तविक वाढ (%) |
मुख्य भर / घोषवाक्य |
वैशिष्ट्ये |
पहिली योजना
1951-56 |
प्रतिमान- हेरॉल्ड डोमर | 2.1 | 3.6 | कृषी क्षेत्र |
|
दुसरी योजना
1956-61 |
प्रतिमान- पी. सी. महालनोबिस | 4.5 | 4.1 | जड व मूलभूत उद्योग |
|
तिसरी योजना
1961-66 |
प्रतिमान-पी. सी. महालनोबिस | 5.6 | 2.7 | कृषी व मूलभूत उद्योग |
|
चौथी योजना
1969-74 |
प्रतिमान-धनंजय गाडगीळ | 5.7 | 2 | घोषवाक्य – स्थैर्यासह आर्थिक विकास साधणे |
|
पाचवी योजना
1974-78 |
प्रतिमान-अॅलन मान व अशोक रुद्र | 4.4 | 4.8 | दारिद्र्य नर्मूलन व स्वावलंबन |
|
सहावी योजना
1980-85 |
प्रतिमान-अॅलन मान व अशोक रुद्र | 5.2 | 5.54 | दारिद्र्य नर्मूलन व रोजगार निर्मिती |
|
सातवी योजना
1985-90 |
प्रतिमान-ब्रह्मानंद – वकील | 5 | 6 | उत्पादक रोजगार निर्मिती |
|
आठवी योजना
1992-97 |
प्रतिमान-राव- मनमोहन /LPG | 5.6 | 6.8 | मानवी विकास |
|
नववी योजना
1997-2002 |
अध्यक्ष –आय.के.गुजराल आणि अटलबिहारी वाजपेयी | 6.5 | 5.5 | घोषवाक्य – सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक विकास |
|
दहावी योजना
2002-07 |
अध्यक्ष – अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग | 8 | 7.8 | कृषी क्षेत्र- अर्थव्यवस्थेचे प्रेरक बळ आणि गाभा क्षेत्र |
|
अकरावी योजना
2007-12 |
अध्यक्ष- मनमोहन सिंग
प्रतिमान – पुरा |
9 | 8.2 | घोषवाक्य – जलद,शाश्वत आणि अधिक समावेशक वृद्धी |
|
बारावी योजना
2012-17 |
अध्यक्ष –मनमोहन सिंग (2017 पर्यंतच) | 8 | 7.4 | घोषवाक्य – जलद,शाश्वत आणि अधिक समावेशक वृद्धी |
|
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.