Table of Contents
शहरी स्थानिक संस्था प्रशासन तुलनात्मक अभ्यास
MPSC परीक्षेसाठी राज्याशास्त्र विषयाचा अभ्यास करताना शहरी स्थानिक संस्था घटकाला अनन्यसाधारण महत्व आहे. शहरी स्थानिक संस्था घटकाचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा ठरतो. त्यामुळेच आजच्या लेखात आपण MPSC परीक्षांच्या अभ्यासक्रमातील शहरी स्थानिक संस्था (Urban Local Bodies Administration) या घटकाचा अभ्यास करणार आहोत.
Title | Link | Link |
MPSC परीक्षा 2024 – अभ्यास योजना | MPSC Exam 2024 – Study Plan | अँप लिंक | वेब लिंक |
शहरी स्थानिक संस्था प्रशासन- रचना:
शहरी स्थानिक संस्था रचना पुढील तक्त्यात दिलेली आहे. त्याचा तुलनात्मक अभ्यास केल्यास आपल्याला लक्षात ठेवणे सोपे जाईल.
नगरपंचायत | नगरपरिषद | बृहन्मुंबई वगळून इतर मनपा |
बृहन्मुंबई मनपा
|
|
निर्वाचित सदस्य | 17 | 17-65 | 65-175 | 227 |
नामनिर्देशित सदस्य | निर्वाचित सदस्यांच्या 10% किंवा 5 यापैकी कमी संख्या |
निर्वाचित सदस्यांच्या 10% किंवा 5 यापैकी कमी संख्या
|
कमाल 5 | कमाल 5 |
कालावधी | 5 वर्षे | 5 वर्षे | 5 वर्षे | 5 वर्षे |
सदस्य निवडीसाठीचे मतदारसंघ | प्रभाग/ वॉर्ड | प्रभाग/ वॉर्ड | प्रभाग/ वॉर्ड | प्रभाग/ वॉर्ड |
एका मतदार संघातून निवडावयाचे सदस्य | 1 | शक्यतो 2 (कमाल 3) |
शक्यतो 4 (किमान 3 व कमाल 5)
|
1 |
मतदारसंघ रचना | राज्य निवडणूक आयुक्त | राज्य निवडणूक आयुक्त | राज्य निवडणूक आयुक्त | राज्य निवडणूक आयुक्त |
पहिली बैठक कोण बोलवणार? | जिल्हाधिकारी | जिल्हाधिकारी | विभागीय आयुक्त | मनपा आयुक्त |
अध्यक्ष निवड | अध्यक्ष थेट मतदारांकडून निवड | अध्यक्ष थेट मतदारांकडून निवड | निर्वाचित सदस्य त्यांच्यापैकी एका सदस्याला महापौर म्हणून निवडतात | निर्वाचित सदस्य त्यांच्यापैकी एका सदस्याला महापौर म्हणून निवडतात |
उपाध्यक्ष | उपाध्यक्ष | उपाध्यक्ष | उपमहापौर | उपमहापौर |
अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा पदावधी | 5 वर्ष | 5 वर्ष | 2 ½ वर्ष | 2 ½ वर्ष |
शहरी स्थानिक संस्था प्रशासन- अविश्वास ठराव:
शहरी स्थानिक संस्था यांमध्ये अविश्वास ठरावाची पद्धत पुढील तक्त्यात दिलेली आहे. त्याचा तुलनात्मक अभ्यास केल्यास आपल्याला लक्षात ठेवणे सोपे जाईल.
नगरपंचायत (अध्यक्ष- उपाध्यक्ष) | नगरपरिषद (अध्यक्ष- उपाध्यक्ष) | |
अविश्वासाच्या ठरावाच्या विशेष सभेकरिता किमान किती सदस्यांनी मागणी करावी लागते? | किमान 1/2 | किमान 1/2 |
विशेष सभेची मागणी कोणाकडे करावी? | जिल्हाधिकारी | जिल्हाधिकारी |
किती दिवसाच्या आत सभा बोलावली जाते? | १० | १० |
अध्यक्षस्थानी कोण असतात? | जिल्हाधिकारी / त्याने प्राधिकृत केलेला अधिकारी |
जिल्हाधिकारी / त्याने प्राधिकृत केलेला अधिकारी |
ठराव मंजूरी करिता बहुमत | किमान 3/4 |
किमान 3/4 |
कोणत्या कालावधीत अविश्वास ठराव मांडता येत नाही? | निवडी पासून 2 वर्ष आणि अविश्वास ठराव असफल झाल्या पासून 2 वर्षाच्या आत. | निवडी पासून 2 वर्ष आणि अविश्वास ठराव असफल झाल्या पासून 2 वर्षाच्या आत. |
शहरी स्थानिक संस्था प्रशासन- बैठकांची प्रक्रिया:
शहरी स्थानिक संस्था यांमध्ये बैठकांची प्रक्रिया पुढील तक्त्यात दिलेली आहे. त्याचा तुलनात्मक अभ्यास केल्यास आपल्याला लक्षात ठेवणे सोपे जाईल.
नगरपंचायत | नगरपरिषद | बृहन्मुंबई वगळून इतर मनपा |
बृहन्मुंबई मनपा
|
|
लगतच्या २ सभांमधील कमाल अंतर | प्रत्येक महिन्यात किमान 1 सभा | प्रत्येक महिन्यात किमान 1 सभा | प्रत्येक महिन्यात 20 तारखेपूर्वी किमान 1 सभा | प्रत्येक महिन्यात किमान 1 सभा |
पहिली सभा कोण बोलवतात | जिल्हाधिकारी | जिल्हाधिकारी | विभागीय आयुक्त | मनपा आयुक्त |
सर्वसाधारण सभेची नोटीस किती दिवस अगोदर द्यावी? | 7 दिवस | 7 दिवस | 7 दिवस | — |
विशेष सभेची नोटीस | 3 दिवस | 3 दिवस | 3 दिवस |
— |
विशेष सभेकरिता किमान सदस्यांची मागणी | 1/4 सदस्य | 1/4 सदस्य | 1/4 सदस्य किंवा स्थायी समितीचे किमान 5 सदस्य | 1/6 सदस्य |
गणसंख्या | 1/3 | 1/3 | 1/3 | 1/5 |
विशेष सभेची गणसंख्या | 1/2 | 1/2 | — | — |
सर्व साधारण सभा व विशेष सभा (सर्व संस्थाच्या बाबतीत लागू) :
१) सर्वसाधारण सभेतत्या सभेच्या नोटीस मध्ये नमूद नसलेल्या विषयावर सभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या व्यक्तीच्या परवानगीने चर्चा होऊन निर्णय घेतले जातात.
२) विशेष सभेतत्या सभेच्या नोटीस मध्ये नमूद असलेल्या विषयाबाबत चर्चा होऊन निर्णय घेतले जातात. विशेष सभेतत्या सभेच्या नोटीसमध्ये नमूद नसलेल्या विषयावर कामकाज होत नसते.
शहरी स्थानिक संस्था प्रशासन – स्थायी समिती:
शहरी स्थानिक संस्था यांमध्ये स्थायी समितीची रचना खाली दर्शवल्याप्रमाणे आहे. परीक्षेच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे.
नगरपंचायत | अ, ब वर्ग नगरपरिषद | क वर्ग नगरपरिषद | बृहन्मुंबई वगळून इतर मनपा |
बृहन्मुंबई मनपा |
|
स्थायी समिती रचना | बंधनकारक | बंधनकारक | बंधनकारक | बंधनकारक | बंधनकारक |
रचना | नगर पंचायती कडून संख्या निश्चित (परंतू एकूण सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त नसावे) | अध्यक्ष + विषय समिती सभापती (6) + 3 सदस्य = 10 सदस्य | नगर परिषदे कडून संख्या निश्चित (परंतू एकूण सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त नसावे) | 16 सदस्य | 27 सदस्य |
सभापती | नगराध्यक्ष: पदसिद्ध अध्यक्ष | नगराध्यक्ष: पदसिद्ध अध्यक्ष | नगराध्यक्ष: पदसिद्ध अध्यक्ष | सदस्यांमधून निवडतात. | सदस्यांमधून निवडतात. |
सदस्यांचा कलावधी | नगर पंचायतीच्या कालावधी इतका | नगर परिषदेच्या कालावधी इतका | नगर परिषदेच्या कालावधी इतका | दरवर्षी निम्मे सदस्य निवृत्त होतात व तेवढेच नवे भरले जातात. | दरवर्षी निम्मे सदस्य निवृत्त होतात व तेवढेच नवे भरले जातात. |
अध्यक्षांचा पदावधी | त्यांच्या मुदती समान | त्यांच्या मुदती समान | त्यांच्या मुदती समान | 1 वर्ष | 1 वर्ष |
शहरी स्थानिक संस्था प्रशासन- इतर समित्या:
शहरी स्थानिक संस्था यांमधील इतर समित्या पुढे दिल्या आहेत. परीक्षेला जाताना त्याचा अभ्यास करून गेल्यास त्याचा नक्की फायदा होईल.
अ, ब वर्ग नगरपरिषदमधील समित्या: 8 समित्या
अ) स्थायी समिती (1+7+3) = 11 सदस्य
ब) परिवहन समिती : (परिवहन उपक्रम असल्यास)
क) विषय समित्या: एकूण 6
- सार्वजनिक बांधकाम समिती :
- शिक्षण, क्रीडा व संस्कृतिक कार्य समिती :
- स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती :
- पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती :
- नियोजन व विकास समिती :
- महिला व बालकल्याण समिती :
क वर्ग नगरपरिषदमधील समित्या:
- स्थायी समिती स्थापना करणे बंधनकारक.
- विषय समित्यांची स्थापना करणे ऐच्छिक आहे.
बृहनमुंबई वगळता इतर मनपामधील समित्या:
- स्थायी समिती (स्थापना बंधनकारक): 16 सदस्य
- परिवहन समिती (परिवहन उपक्रम असल्यास): 13 सदस्य
- विशेष व तदर्थ समित्या – आवश्यतेनुसार स्थापन करता.
बृहनमुंबई मनपामधील समित्या:
- स्थायी समिती (स्थापना बंधनकारक): 27 सदस्य
- विशेष समित्या – आवश्यकतेनुसार
- प्राथमिक शिक्षण समिती: 26 सदस्य (22+4)
- रूग्णालय समिती
- सुधारसमिती ( बंधनकारक ): 26 सदस्य
- बृहनमुंबई विदयूत पुरवठा व वाहतूक समिती (बंधनकारक): 17 सदस्य
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.