Table of Contents
आम्ल आणि आम्लारी
आम्ल आणि आम्लारी हे रसायनशास्त्राच्या मूलभूत गोष्टी आहेत आम्ल आणि आम्लारी हे रसायनशास्त्राचे आधारस्तंभ तयार करतात. आगामी काळातील जिल्हा परिषद भरती 2023, आरोग्य भरती 2023, नगर परिषद भरती 2023, MIDC भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेत रसायनशास्त्र हा विषय फार महत्वाचा आहे. रसायनशास्त्रातील महत्वाच्या घटक म्हणजे आम्ल आणि आम्लारी होय. आम्ल हे लैक्टिक किंवा लिंबूवर्गीय ऍसिडच्या स्वरूपात असतात जे लिंबू किंवा संत्र्यासारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये असतात. आम्लारी पावडरच्या स्वरूपात असतात जसे की ब्लीचिंग पावडर, अमोनिया इ. आम्ल बेस रसायनशास्त्रातील अनेक संयुगे वेगळे करण्यात मदत करते. आज या लेखात आपण आम्ल आणि आम्लारी बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल आणि आम्लारी: विहंगावलोकन
आम्ल आणि आम्लारी हे रसायन आहेत जे एकमेकांसोबत क्रिया करून पाणी आणि मीठ तयार करतात. या लेखात आम्ल आणि आम्लारी बद्दल थोडक्यात माहिती दिली आहे. ज्यात आम्ल आणि आम्लारीचे गुणधर्म आणि उपयोग याबद्दल चर्चा केली आहे.
आम्ल आणि आम्लारी: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | सर्व स्पर्धा परीक्षा |
विषय | सामान्य विज्ञान (रसायनशास्त्र) |
लेखाचे नाव | आम्ल आणि आम्लारी |
हा लेख तुम्हाला काय प्रदान करतो? |
|
आम्ल आणि आम्लारी: आम्ल (Acid) ची ओळख
काही पदार्थ चवीला गोड, काही कडू तर काही आंबट किंवा तुरट असतात. लिंबू, चिंच, व्हिनेगर किंवा आवळा यांसारख्या पदार्थांना आंबट चव, ही त्यांच्यात असलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या संयुगांमुळे प्राप्त होते. ह्या आंबट चव देणाऱ्या संयुगांना आम्ल असे म्हणतात. आम्ल पाण्यात विद्राव्य असतात व ते क्षरणकारकही असतात. प्राणी आणि वनस्पतींमध्ये सुद्धा आम्ले असतात.
आम्ल (Acid): आम्ल हा एक असा पदार्थ असतो की ज्याचे पाण्यातील द्रावण हायड्रोजन आयन (H+) उपलब्ध करून देते/निर्माण करते.
आम्लांची काही उदाहरणे: हायड्रोक्लोरिक आम्ल(HCl), नायट्रिक आम्ल (HNO3), सल्फ्युरिक आम्ल (H2S04), व इतर अनेक फळांतील ॲस्काॅर्बिक आम्ल, सायट्रिक आम्ल, व्हिनेगरमधील ॲसेटिक आम्ल, इत्यादी.
आम्ल आणि आम्लारी: आम्लाचे प्रकार
आम्लाचे प्रमुख दोन प्रकार आहेत. एक म्हणे सौम्य आम्ल (Weak Acid) आणि दुसरे तीव्र आम्ल (Strong Acid)
सौम्य आम्ल (Weak Acid) – जे आम्ल पाण्यातील आयनांचे अंशतः पृथक्करण करू शकतात त्यांना कमकुवत आम्ल म्हणतात. खाद्यपदार्थांमध्ये असणाऱ्या आम्लांना नैसर्गिक आम्ल किंवा सेंद्रीय आम्ल असेही म्हणतात. ही आम्ले क्षीण प्रकृतीची असल्यामुळे त्यांना सौम्य आम्ल (weak acid) म्हणतात. उदा.
तीव्र आम्ल (Strong Acid) – जे आम्ल पाण्यात सहज आणि पूर्णपणे आयन विलग करू शकतात त्यांना मजबूत आम्ल म्हणतात. उदाहरण- HCl, H2S04 इ.
काही नैसर्गिक आम्ले व त्यांचे स्त्रोत खाली दिले आहे.
आम्लाचे नाव | नैसगिक स्रोत |
ॲसिटिक आम्ल | व्हिनेगर |
ॲस्कॉर्बिक आम्ल | संत्रे |
टार्टारिक आम्ल | चिंच |
ऑक्सॅलिक आम्ल | टमाटा |
लॅक्टिक आम्ल | दही |
सायट्रिक आम्ल | लिंबू |
आम्ल आणि आम्लारी: आम्लाचे गुणधर्म
आम्लाचे गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत.
- आम्लाची चव आंबट असते.
- आम्लाच्या रेणूत हायड्रोजन आयन (H+) हा मुख्य घटक असतो.
- आम्लाची धातूशी अभिक्रिया होऊन हायड्रोजनची निर्मिती होते.
- आम्लाची कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन कार्बन डाय ऑक्साईड (CO2) वायू मुक्त होतो.
- आम्लामुळे निळा लिटमस कागद तांबडा होतो.
आम्ल आणि आम्लारी: आम्लाचे उपयोग
आम्लाचे सर्वसामान्य उपयोग खालीलप्रमाणे आहेत.
- रासायनिक खतांच्या उत्पादनात आम्ले वापरली जातात.
- तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत, औषधी द्रव्ये, रंग (dyes/ paints), स्फोटक द्रव्येयांच्या निर्मिती प्रक्रियेत आम्लांचा वापर होतो.
- भिन्न-भिन्न क्लोराइड क्षार बनविण्याकरिता हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात.
- विरल सल्फ्युरिक आम्ल बॅटरी (विद्युत घट) मध्येही वापरतात.
- पाणी जंतुविरहित करण्याकरिता विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर होतो.
- लाकडाच्या लगद्यापासून पांढराशुभ्र कागद बनविण्याकरिता आम्लाचा वापर होतो.
आम्ल आणि आम्लारी: आम्लारी (Base) ची ओळख
आम्लारी हा एक असा पदार्थ असतो ज्याचे पाण्यातील द्रावण हायड्रॉक्साइड आयन (OH-) निर्माण करतात. उदा. NaOH (aq) ब्रॉन्स्टेड-लॉरी बेस थिअरी असे सांगते की प्रोटॉन स्वीकारणारे कोणतेही पदार्थ आम्लारी असतात. ते जितक्या वेगाने प्रोटॉन स्वीकारेल तितकी मूलभूतता अधिक मजबूत होईल. काही आम्लारीचे नाव, रासायनिक सूत्र आणि त्यांचे उपयोग खाली देण्यात आली आहे.
आम्लारीचे नाव | रासायनिक सूत्र | उपयोग |
सोडिअम हायड्रॉक्साइड /कॉस्टिक सोडा | NaOH | कपडे धुण्याच्या साबण बनविण्याकरिता |
पोटॅशिअम हायड्रॉक्साइड/पोटॅश | KOH | आंघोळीचे साबण आणि शॅम्पू |
कॅल्शिअम हायडॉक्साइड/चुन्याची निळी | Ca(OH)2 | चुना/रंग सफेदीकरिता |
अमोनिअम हायड्रॉक्साइड | NH4OH | खते तयार करण्यासाठी |
मॅग्नेशिअम हायड्रॉक्साइड/मिल्क ऑफ मॅग्नेशिआ | Mg(OH)2 | आम्लविरोधक औषध |
आम्ल आणि आम्लारी: आम्लारीचे गुणधर्म
आम्लारीचे गुणधर्म खालीलप्रमाणे आहे.
- आम्लारीची चव कडवट असते.
- त्यांचा स्पर्श बुळबुळीत असतो.
- आम्लारीमध्ये हायड्रॉक्साइड आयन (OH-)हा मुख्य घटक असतो.
- सामान्यतः धातूंची ऑक्साइड आम्लारीधर्मी असतात
आम्ल आणि आम्लारी: दर्शक (Indicator)
जे पदार्थ आम्लधर्मी किंवा आम्लारीधर्मी नसतात, ते रासायनिकदृष्ट्या उदासीन असतात. आम्ल किंवा आम्लारी पदार्थांची चव घेणे किंवा त्यांना स्पर्श करणे खूप अपायकारक असल्याने त्यांची ओळख करण्यासाठी दर्शक (Indicator) म्हणून विशिष्ट पदार्थांचा वापर केला जातो. जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्काने स्वतःचा रंग बदलतात त्यांना ‘दर्शक’ असे म्हणतात.
प्रयोगशाळेतील दर्शक: आम्ल व आम्लारी पदार्थांचे परीक्षण करण्यासाठी प्रयोगशाळेत मुख्यत्वे लिटमस
कागदाचा वापर केला जातो. हा कागद लायकेन (दगडफूल) नावाच्या वनस्पतीच्या अर्कापासून तयार
केला जातो. तो तांबडा किंवा निळ्या रंगाचा असतो. निळा लिटमस आम्लात बुडविल्यावर तांबडा होतो आणि तांबडा लिटमस कागद आम्लारीमुळे निळा होतो. त्याच प्रमाणे फिनॉल्फथॅलिन, मिथिल ऑरेंज व मिथिल रेड हे दर्शक द्रावणस्वरूपात प्रयोगशाळेत वापरले जातात. मिथिल ऑरेंज हा दर्शक आम्लामध्ये गुलाबी, तर आम्लारीमध्ये पिवळा होतो. फिनॉल्फथॅलिन आम्लामध्ये रंगहीन व आम्लारीमध्ये गुलाबी असतो. वैश्विक दर्शक (Universal Indicator) हे द्रावणरूपात असणारे दर्शक आम्ल, आम्लारीच्या संपर्कात आल्यावर वेगवेगळे रंगबदल दाखवितात
दर्शक पदार्थाचे नाव | दर्शकाचे मूळ रंग | आम्लातील रंग | आम्लारीतील रंग |
लिटमस कागद | निळा | तांबडा | निळा (तसाच राहतो) |
लिटमस कागद | तांबडा | तांबडा (तसाच राहतो) | निळा |
मिथिल ऑरेंज | नारंगी | गुलाबी | पिवळा |
फिनॉल्फ्थॅलिन | रंगहीन | रंगहीन | गुलाबी |
मिथिल रेड | तांबडा | तांबडा | पिवळा |
आम्ल आणि आम्लारी यावरील वस्तुनिष्ठ प्रश्न
Q1. मिथिल ऑरेंज आम्लात टाकल्यानंतर कोणता रंग दर्शवितो?
(a) गुलाबी
(b) पिवळा
(c) तांबडा
(d) लाल
S1. Ans. (a)
Sol. मिथिल ऑरेंज आम्लात टाकल्यानंतर गुलाबी रंग दर्शवितो
Q2. अमोनिअम हायड्रॉक्साइडचा उपयोग कशासाठी होतो?
(a) चुना तयार करण्यासाठी
(b) साबण बनविण्यासाठी
(c) खते तयार करण्यासाठी
(d) यापैकी नाही
S2. Ans. (c)
Sol. अमोनिअम हायड्रॉक्साइडचा उपयोग खते तयार करण्यासाठी होतो.
Q3. आम्लाची चव कशी आहे?
(a) आंबट
(b) तिखट
(c) कडू
(d) तुरट
S3. Ans. (a)
Sol. आम्लाची चव आंबट असते.
Q4. खालीलपैकी ॲसिटिक आम्लाचा नैसर्गिक स्त्रोत कोणता आहे?
(a) दही
(b) संत्र
(c) लिंबू
(d) व्हिनेगर
S4. Ans. (d)
Sol. व्हिनेगर हे ॲसिटिक आम्लचे नैसर्गिक स्त्रोत आहे.
नोट: अश्याच महत्वपूर्ण टॉपिक वर आधारित सर्वसमावेशक महाराष्ट्र तलाठी भरती 2023 साठी एक सर्वसमावेशक टेस्ट सिरीज लाँच केली आहे. ही टेस्ट सिरीज सोडवून आपण आपल्या अभ्यासाला गती द्या.
महाराष्ट्र तलाठी भरती फुल लेन्थ टेस्ट सिरीज
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
जिल्हा परिषद परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य
सरळ सेवा जसे की, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.
लेखाचे नाव | लिंक |
प्रकाशाचे गुणधर्म | |
महाराष्ट्राची मानचिन्हे | |
भारतातील शेती | |
भौतिक राशी आणि त्यांचे एकके | |
राष्ट्रीय आणीबाणी कलम 352: व्याख्या, परिचय, प्रकार, कालावधी आणि परिणाम | |
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP) | |
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग | |
भारतातल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळी | |
राष्ट्रीय आरोग्य अभियान | |
महाराष्ट्रातील लोकजीवन | |
भारतीय संविधानाची उद्देशिका | |
मराठा साम्राज्य – इतिहास, शासक, राज्य विस्तार आणि प्रशासन | |
2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला | |
जालियनवाला बाग हत्याकांड – पार्श्वभूमी, कारणे आणि परिणाम | |
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023) | |
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे | |
चंद्रयान 3 | |
भारताची जणगणना 2011 | |
लोकपाल आणि लोकायुक्त | |
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग | |
कार्य आणि उर्जा | |
गांधी युग
|
|
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
|
|
भारताचे नागरिकत्व
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतीय संविधानाची उद्देशिका
|
|
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्राचे हवामान | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
सिंधू संस्कृती | |
जगातील 07 खंड | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
|
|
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
|
|
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
गती व गतीचे प्रकार | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
आम्ल व आम्लारी | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतातील सर्वात लांब पूल 2023
|
|
रोग व रोगांचे प्रकार | |
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
|
|
महाराष्ट्रातील लोकजीवन
|
|
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
|
|
वनस्पतीची रचना आणि कार्ये
|
|
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
|
|
लोकपाल आणि लोकायुक्त
|
|
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
|
|
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
|
|
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
|
|
पृथ्वीवरील महासागर
|
|
महाराष्ट्राचे हवामान | |
भारताची क्षेपणास्त्रे | |
महाराष्ट्रातील शहरांची यादी
|
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |