Marathi govt jobs   »   Study Materials   »   मराठी व्याकरण भाग 1 - प्रयोग...

मराठी व्याकरण भाग 1 – प्रयोग व प्रयोगाचे प्रकार : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

प्रयोग

प्रयोग: वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते. वाक्याती कर्ता-कर्म-क्रियापद यांच्या परस्परसंबंधाला प्रयोग असे म्हणतात. ‘प्रयोग’ हा शब्द संस्कृत ‘प्र+युज’ (यश) यावरून तयार झाला असून त्याचा अर्थ ‘जुळणी’ किंवा ‘रचना’ असा आहे. प्रत्येक वाक्यात जे क्रियापद अ त्याच्या रूपाची ठेवण किंवा रचनाच अशी असते की, ते क्रियापद कधी कर्त्याचे किंवा कर्माचे लिंग, वचन किं पुरुष याप्रमाणे बदलते, तर कधी ते क्रियापद मुळीच बदलत नाही.

प्रयोगाचे प्रकार 

मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.

  • कर्तरी प्रयोग
  • कर्मणी प्रयोग
  • भावे प्रयोग

कर्तरी प्रयोग: जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वाचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग (Active Voice) असे म्हणतात. उदा.

श्याम      गाणे        गातो.

(कर्ता)   (कर्म)   (क्रियापद)

आता यात कर्ता बदलला तर,  सीता गाणे गाते. (कर्ता बदलला की क्रियापद बदलेल.)

कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.

  1. सकर्मक कर्तरी प्रयोग
  2. अकर्मक कर्तरी प्रयोग

1. सकर्मक कर्तरी प्रयोग: ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदा. राम बैल बांधतो.

2. अकर्मक कर्तरी प्रयोग: ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदा. सारे पोपट उडाले.

कर्मणी प्रयोग (Passive Voice): क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग (Passive Voice) असे म्हणतात. उदा. रामने बैल बांधला.

कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.

  1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग
  2. नवीन कर्मणी प्रयोग
  3. समापन कर्मणी प्रयोग
  4. शक्य कर्मणी प्रयोग
  5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग

प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग: प्राचीन मराठी काव्यातील सकर्मक धातूला ‘ज’ प्रत्यय जोडून तयार केलेल्या वाक्यांचा यात समावेश होतो. उदा. नळे इंद्रासी असे बोलिजेले.

नवीन कर्मणी प्रयोग: ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्या कडून प्रत्यय लागतात. उदा. कंस कृष्णाकडून मारला गेला.

समापन कर्मणी प्रयोग: ज्या कर्मणी प्रयोगातून कृती पूर्ण झाल्याचे सूचित केले जाते. क्रियापद शक्यतो ऊन/हून झाला/झाली या प्रकारचे असते. उदा. त्याचा गृहपाठ करून झाला.

शक्य कर्मणी प्रयोग: जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. उदा. मुलाच्याने धावले जाते.

प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग: कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात. उदा. त्याने पत्र लिहीले.

भावे प्रयोग: जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वाचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात. उदा. रामने बैलाला बांधले.

भावे प्रयोगाचे दोन उपप्रकर पडतात.

  1. सकर्मक भावे प्रयोग
  2. अकर्मक भावे प्रयोग

सकर्मक भावे प्रयोग: ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात. उदा. रामाने रावणास मारले.

अकर्मक भावे प्रयोग: ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसल्यास त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात उदा.  मुलांनी खेळावे.

भावकर्तरी प्रयोग:  भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तुक भावे प्रयोग असे म्हणतात. उदा. आता सांजावले. (सायंकाळ झाली.)

मिश्र किंवा संकर प्रयोग: एकाच वाक्यात दोन प्रयोगांचे मिश्रण असल्यास त्याला संकर प्रयोग म्हणतात.

कर्तृ-कर्मसंकर: ज्या वाक्यातील क्रियापद कर्ता व कर्म अशा दोन्हींनुसार बदलते, त्यास कर्तृ-कर्मसंकर असे म्हणतात.

कर्म भाव संकर: कर्ता व कर्माला प्रत्यय असतो. क्रियापद कर्माच्या लिंग, वचनानुसार बदलते.

कर्तृ- भावसंकर:या प्रयोगात भावे प्रयोगाची छटा असून कर्त्यांच्या वचनानुसार क्रियापद बदलते.

प्रयोग: नमुना प्रश्न 

Q1. तो गाणे गातो. प्रयोग ओळखा.

(a)   कर्मणी प्रयोग

(b)  भावे प्रयोग

(c)   कर्तरी प्रयोग

(d)  कर्मकर्तरी प्रयोग

Q2.’तू मला पुस्तक दिलेस’ हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे?

(a)   कर्तृ-कर्मसंकर प्रयोग

(b)  कर्म भावसंकर प्रयोग

(c)   भावकर्तरी प्रयोग

(d)  कर्तृ-भाव संकर प्रयोग

Q3. क्रियापदाचे रूप कर्ता व कर्म यांच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे बदलत नसते तेव्हा कोणता प्रयोग होतो?

(a)   अकर्मक कर्तरी प्रयोग

(b)  शक्य कर्मणी प्रयोग

(c)   कर्तृकर्मसंकर प्रयोग

(d)  भावे प्रयोग

Q4. “विद्यार्थी अभ्यास करतो’ – प्रयोग ओळखा.

(a)   सकर्मक कर्तरी

(b)  प्रधानकर्तृक कर्मणी

(c)   अकर्मक कर्तरी

(d)  कर्मणी

Q5. ‘सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले,’ प्रयोग ओळखा.

(a)   कर्तरी प्रयोग

(b)  शक्य कर्मणी प्रयोग

(c)   नवीन कर्मणी प्रयोग

(d)  भावे प्रयोग

Q6. ‘विजय निबंध लिहितो’ प्रयोग ओळखा.

(a)   कर्मणी

(b)  कर्तरी

(c)   भावे

(d)  संकीर्ण

Q7. माझ्याकडून कॉफी घेतली गेली. प्रयोग ओळखा. 

(a)   कर्मणी प्रयोग

(b)  भावे प्रयोग

(c)   कर्तरी प्रयोग

(d)  संकीर्ण प्रयोग

Q8. “न्यायाधिशाकडून दंड करण्यात आला” या प्रयोगाचे नाव सांगा.

(a)   कर्तरी प्रयोग

(b)  भावे प्रयोग

(c)   समापन कर्मणी प्रयोग

(d)  नवीन कर्मणी प्रयोग

Q9. पुढील वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा. ‘आईवडिलांनी मुलांना मायेने वाढविले.’

(a)   कर्तरी प्रयोग

(b)  कर्मणी प्रयोग

(c)   भावे प्रयोग

(d)  संकरित प्रयोग

Q10. ‘आजी दृष्ट काढते.’ वाक्यातील प्रयोग ओळखा. 

(a)   कर्मणी प्रयोग

(b)  कर्तरी प्रयोग

(c)   भावे प्रयोग

(d)  शक्यकर्मणी प्रयोग

Solutions

S1. Ans (c)

Sol.  

  • येथे क्रियापद हे कर्त्यानुसार बदलत आहे.त्यामुळे हा कर्तरी प्रयोग आहे. 
  • कर्तरी प्रयोगाचे वाक्य हे सामान्यतः वर्तमानकाळात असते. 

S2. Ans (a)

Sol. 

  • कर्तृ-कर्म संकर प्रयोगात कर्ता हा द्वितीयपुरुषी असतो- तू, तुम्ही. 
  • कर्म हे प्रथमान्त असते. 

S3. Ans (d)

Sol. 

  • क्रियापदाचे रूप कर्ता व कर्म यांच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलत नसते, तेव्हा भावे प्रयोग होतो. 
  • भावे प्रयोगात क्रियापद नेहमी तृतीयपुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी व स्वतंत्र असते.

S4. Ans (a)

Sol.

  • येथे कर्ता व कर्म दोन्ही प्रथमान्त आहेत व क्रियापद वर्तमानकाळात आहे, म्हणून हे वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाचे आहे. 

S5. Ans (d)

Sol.

  • भावकर्तृक क्रियापदाचे वाक्य हे अकर्तृक भावे प्रयोगाचे असते.
  • या वाक्यात क्रियेचा भाव हाच वाक्यातील कर्ता असल्यामुळे हा भावकर्तरी प्रयोग/अकर्तृक भावे प्रयोग आहे. 

S6. Ans (b)

Sol.

  • येथे कर्ता व कर्म दोन्ही प्रथमान्त आहेत, तसेच हे वाक्य वर्तमानकाळात आहे. त्यामुळे हा कर्तरी प्रयोग आहे.

S7. Ans (a)

Sol. 

  • येथे कर्त्याला ‘कडून’ हा प्रत्यय लागलेला आहे व शेवटी संयुक्त क्रियापद (घेतली गेली) आहे. 
  • तसेच या वाक्याची रचना ही Passive Voice प्रमाणे आहे. त्यामुळे हा नवीन कर्मणी (कर्मकर्तरी) प्रयोग आहे.

S8. Ans (d)

Sol. 

  • येथे कर्त्याला ‘कडून’ हा प्रत्यय लागलेला आहे व शेवटी संयुक्त क्रियापद आहे, त्यामुळे हा नवीन कर्मणी/कर्मकर्तरी प्रयोग आहे.

S9. Ans (c)

Sol. 

  • क्रियापदाचे रूप कर्ता व कर्म यांच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे बदलत नसते, तेव्हा भावे प्रयोग होतो. 
  • भावे प्रयोगात क्रियापद नेहमी तृतीयपुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी व स्वतंत्र असते.

S10. Ans (b)

Sol. 

  • या वाक्यात कर्त्याला प्रत्यय लागलेला नाही व कर्त्यानुसार क्रियापद बदलत आहे, त्यामुळे हा कर्तरी प्रयोग आहे. 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

मराठी व्याकरण भाग 1 - प्रयोग व प्रयोगाचे प्रकार : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन_4.1

FAQs

मराठीत प्रयोगाचे किती प्रमुख प्रकार पडतात?

मराठीत प्रयोगाचे 3 प्रमुख प्रकार पडतात.

प्रयोगाचे प्रकार बद्दल माहिती मला कोठे मिळेल?

प्रयोगाचे प्रकार बद्दल माहिती या लेखात दिली आहे.