Marathi govt jobs   »   Job Notification   »   आदिवासी विकास विभाग भरती 2023

आदिवासी विकास विभाग भरती 2023, 602 पदांच्या भरतीसाठी अधिसुचना जाहीर

Table of Contents

आदिवासी विकास विभाग भरती 2023

आदिवासी विकास विभाग भरती 2023: आदिवासी विकास विभाग, नाशिक अंतर्गत विवध संवर्गातील एकूण 602 पदांच्या भरतीसाठी आदिवासी विकास विभाग भरती 2023 जाहीर झाली आहे. आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी इच्छुक आणि पात्र  उमेदवार 13 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. आज या लेखात आपण आदिवासी विकास विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर महत्वाची माहिती दिली आहे 

आदिवासी विकास विभाग भरती 2023: विहंगावलोकन

विविध पदांच्या भरतीसाठी आदिवासी विकास विभाग भरती 2023 जाहीर झाली आहे. आदिवासी विकास विभाग भरती 2023 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

आदिवासी विकास विभाग भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कंपनीचे नाव आदिवासी विकास विभाग
भरतीचे नाव आदिवासी विकास विभाग भरती 2023
पदाचे नाव गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील विविध पदे
एकूण रिक्त पदे 602
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर
अधिकृत संकेतस्थळ https://tribal.maharashtra.gov.in/

आदिवासी विकास विभाग भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 23 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु होणार असून इतर महत्वाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. जसे आदिवासी विकास विभाग भरती 2023 च्या तारखा जाहीर होतील तसे आम्ही या लेखात अपडेट करू.

आदिवासी विकास विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
आदिवासी विकास विभाग भरती 2023 अधिसुचना तारीख 22 नोव्हेंबर 2023
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 23 नोव्हेंबर 2023
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

आदिवासी विकास विभाग भरती 2023: अधिसुचना 

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 602 पदांची भरती होणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभाग भरती 2023 अंतर्गत पदानुसार अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अधिसुचना PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आदिवासी विकास विभाग भरती 2023 मधील रिक्त पदांचा  तपशील

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील 602 पदांची भरती होणार आहे. आदिवासी विकास विभाग भरती 2023 मधील पदानुसार रिक्त पदाचा तपशील खाली देण्यात आला आहे.

आदिवासी विकास विभाग भरती 2023: रिक्त पदांचा तपशील 
पदाचे नाव रिक्त पदे
उच्च श्रेणी लघुलेखक 3
निम्न श्रेणी लघुलेखक 13
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 14
संशोधन सहाय्यक 17
उपलेखापाल/ मुख्य लिपिक 41
वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक 187
लघुटंकलेखक 5
गृहपाल (पुरुष) 43
गृहपाल (स्त्री) 25
अधीक्षक (पुरुष) 26
अधीक्षक (स्त्री) 48
ग्रंथपाल 38
प्रयोगशाळा सहाय्यक 29
आदिवासी विकास निरीक्षक 8
सहाय्यक ग्रंथपाल 1
प्राथमिक शिक्षणसेवक(मराठी माध्यम) 27
माध्यमिक शिक्षणसेवक(मराठी माध्यम) 15
उच्च माध्यमिक शिक्षणसेवक 14
प्राथमिक शिक्षणसेवक(इंग्रजी माध्यम) 48
एकूण 602

आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष खाली देण्यात आला आहे.

उमेदवार हा भारतीय नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

वयोमर्यादा-

  • जाहिरातीत नमुद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 01.11.2023 या तारखेस गणण्यात येईल.
  • जाहिरातीत नमुद केलेल्या पदांसाठी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. एसआरव्ही- 2015/प्र.क्र.404/ कार्या.12, दिनांक 25 एप्रिल 2016 मधील तरतुदीनुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा किमान वय 18 वर्ष असावे व कमाल वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.

शैक्षणिक अर्हता-

पदाचे नाव शैक्षणिक अर्हता
उच्च श्रेणी लघुलेखक

अ) शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम

ब)1. उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी)- शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण

2. उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी) – शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण

वरील ब मधील 1 व 2 करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 120 शब्द प्रति मिनीट असल्यास प्राधान्य)

क) टंकलेखन (इंग्रजी) 40 शब्द प्रतिमिनीट

ड) टंकलेखन (मराठी) 30 शब्द प्रतिमिनीट

इ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी. संगणक अर्हता परीक्षा वा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ई) सदर पदासाठी व्यावयासिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल.

निम्न श्रेणी लघुलेखक अ) शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम

ब) 1. निम्न श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) – शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण

2. निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी) – शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 100 शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण

वरील ब मधील 1 व 2 करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 100 शब्द प्रति मिनीट असल्यास प्राधान्य)

क) टंकलेखन (इंग्रजी) 40 शब्द प्रतिमिनीट

ड) टंकलेखन (मराठी) 30 शब्द प्रतिमिनीट

इ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी. संगणक अर्हता परीक्षा वा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ई) सदर पदासाठी व्यावयासिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल.

वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची किमान ब्दितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी.
  • संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहिल
संशोधन सहाय्यक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
उपलेखापाल/ मुख्य लिपिक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शाखातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील
वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
लघुटंकलेखक
  • ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी किंवा शासनमान्य समकक्ष परिक्षा उत्तीर्ण केली असावी. आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र).
गृहपाल (पुरुष)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
गृहपाल (स्त्री)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
अधीक्षक (पुरुष)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
अधीक्षक (स्त्री)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
ग्रंथपाल
  • ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे. परंतू ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान दोन वर्षांपेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम राहील
प्रयोगशाळा सहाय्यक
  • ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
आदिवासी विकास निरीक्षक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील
सहाय्यक ग्रंथपाल
  • ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केले आहे.
प्राथमिक शिक्षणसेवक(मराठी माध्यम)
  • उमेदवार एसएससी / एचएससी अधिक डी.एड व समकक्ष अर्हता धारण करणारा असावा.
  • शिक्षण पात्रता परिक्षा (Teacher Eligibility Test /Central Teacher Eligibility Test) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे
माध्यमिक शिक्षणसेवक(मराठी माध्यम) उमेदवार पदवी अधिक बी.एड व समकक्ष अर्हता धारण करणारा असावा.

विषयनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता खालील प्रमाणे

  • इंग्रजी :- बी.ए. (इंग्रजी) बी.एड
  • गणित :- बी.एस्सी. (गणित) बी.एड
  • विज्ञान :- बी.एस्सी. (विज्ञान) बी.एड
  • इतर:- बी.ए (मराठी/ इतिहास/ भुगोल/ हिंदी/ अर्थशास्त्र इ.) बी.एड
उच्च माध्यमिक शिक्षणसेवक
  1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  2. तसेच बी.एड व समकक्ष पदवी धारण करणारा उमेदवार.

विषयनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता खालील प्रमाणे

विषय : इंग्रजी

  • एम.ए (इंग्रजी) किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • बी.एड किमान व्दितीय श्रेणीत  उत्तीर्ण असणे आवश्यक

विषय : मराठी

  • एम.ए (मराठी) किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • बी.एड ला संबधीत विषयाची अध्यापन पध्दती किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक

विषय : गणित

  • एम.एस्सी (गणित) किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • बी.एड किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक

विषय : जीवशास्त्र

  • एम.एस्सी (जीवशास्त्र) किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • बी.एड किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक

विषय : रसायनशास्त्र

  • एम.एस्सी (रसायनशास्त्र) किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • बी.एड किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक

विषय : भौतिकशास्त्र

  • एम.एस्सी (भौतिकशास्त्र) किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • बी.एड किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक
प्राथमिक शिक्षणसेवक(इंग्रजी माध्यम)
  • उमेदवाराचे इयत्ता 1 ते 12 वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक आहे तसेच डी.एड पदवीका इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • शिक्षण पात्रता परिक्षा (Teacher Eligibility Teacher Test Eligibility /Central Test) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज 23 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होणार आहेत. अधिकृत अधिसूचनेत ऑनलाईन अर्जाचा कालावधी आणि अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती दिली असेल. आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिली आहे.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अर्ज लिंक

आदिवासी विकास विभाग भरती 2023: निवड प्रक्रिया

आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी निवड प्रक्रिया खाली दिलेली आहे. उमेदवार खाली आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी निवडप्रक्रिया तपासू शकतात.

  • सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातुन संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येईल.
  • संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

आदिवासी विकास विभाग भरती 2023: परीक्षेचे स्वरूप 

  • संगणक आधारीत परीक्षेद्वारे (Computer Based online examination) घेण्यात येणान्या ऑनलाईन परिक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल व प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील.
  • ज्या पदांसाठी शारिरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरीता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारीत (Computer Based examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयाकरीता प्रत्येकी 50 गुण ठेवुन एकूण 200 गुणांची असेल. परिक्षा कालावधी दोन तासांचा राहील.
  • आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात दिलेले आहे.
अ.क्र. पदनाम  एकूण गुण  मराठी इंग्रजी  सामान्य ज्ञान  बौद्धिक चाचणी  वेळ
1 गृहपाल (पुरुष) 200 50 50 50 50 120 मिनिट
2 गृहपाल (स्त्री) 200 50 50 50 50 120 मिनिट
3 संशोधन सहाय्यक 200 50 50 50 50 120 मिनिट
4 उपलेखापाल/ मुख्य लिपिक 200 50 50 50 50 120 मिनिट
5 आदिवासी विकास निरीक्षक 200 50 50 50 50 120 मिनिट
6 वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 200 50 50 50 50 120 मिनिट
7 वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक 200 50 50 50 50 120 मिनिट
8 प्राथमिक शिक्षणसेवक(मराठी माध्यम) 200 50 50 50 50 120 मिनिट
9 माध्यमिक शिक्षणसेवक(मराठी माध्यम) 200 50 50 50 50 120 मिनिट
10 उच्च माध्यमिक शिक्षणसेवक 200 50 50 50 50 120 मिनिट
11 अधीक्षक (पुरुष) 200 50 50 50 50 120 मिनिट
12 अधीक्षक (स्त्री) 200 50 50 50 50 120 मिनिट
13 ग्रंथपाल 200 50 50 50 50 120 मिनिट
14 सहाय्यक ग्रंथपाल 200 50 50 50 50 120 मिनिट
15 लघुटंकलेखक 100 25 25 25 25 60 मिनिट
16 उच्च श्रेणी लघुलेखक 100 25 25 25 25 60 मिनिट
17 निम्न श्रेणी लघुलेखक 100 25 25 25 25 60 मिनिट

आदिवासी विकास विभाग भरती 2023: परीक्षा शुल्क 

आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी परीक्षा शुल्क खाली दिलेले आहे.

आदिवासी विकास विभाग भरती 2023: परीक्षा शुल्क 
प्रवर्ग  परीक्षा शुल्क 
अराखीव प्रवर्ग रु. 1000/-
इतर सर्व प्रवर्ग रु. 900/-

आदिवासी विकास विभाग भरती 2023: वेतनश्रेणी 

आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी पदानुसार वेतन श्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

आदिवासी विकास विभाग भरती 2023: वेतन श्रेणी
पदाचे नाव वेतन श्रेणी
उच्च श्रेणी लघुलेखक S-15 41800-132300
निम्न श्रेणी लघुलेखक S-14 38600-122800
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक S-14 38600-122800
संशोधन सहाय्यक S-14 38600-122800
उपलेखापाल/ मुख्य लिपिक S-13 35400-112400
वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक S-8 25500-81100
लघुटंकलेखक S-8 25500-81100
गृहपाल (पुरुष) S-14 38600-122800
गृहपाल (स्त्री) S-14 38600-122800
अधीक्षक (पुरुष) S-8 25500-81100
अधीक्षक (स्त्री) S-8 25500-81100
ग्रंथपाल S-8 25500-81100
प्रयोगशाळा सहाय्यक S-6 19900-63200
आदिवासी विकास निरीक्षक S-13 35400-112400
सहाय्यक ग्रंथपाल S-7 21700-69100
प्राथमिक शिक्षणसेवक(मराठी माध्यम) 16000
माध्यमिक शिक्षणसेवक(मराठी माध्यम) 18000
उच्च माध्यमिक शिक्षणसेवक 20000
प्राथमिक शिक्षणसेवक(इंग्रजी माध्यम) 16000

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

आदिवासी विकास विभाग भरती 2023, 602 पदांच्या भरतीसाठी अधिसुचना जाहीर_4.1

FAQs

आदिवासी विकास विभाग भरती 2023 कधी जाहीर झाली?

आदिवासी विकास विभाग भरती 2023 22 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 किती पदांसाठी जाहीर झाली?

आदिवासी विकास विभाग भरती 2023 602 पदांसाठी जाहीर झाली.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

आदिवासी विकास विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.