Marathi govt jobs   »   आदिवासी विकास विभाग भरती 2023   »   आदिवासी विकास विभाग भरती 2023 अपडेट

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अपडेट, अधिकृत सूचना पहा

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अपडेट

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अपडेट: आदिवासी विकास विभागाने दि. 07 डिसेंबर 2023 रोजी आदिवासी विकास विभाग भरती 2023 बद्दल प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ज्या नुसार प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) पदाच्या शैक्षणिक अर्हतेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आदिवासी विकास विभाग, नाशिक अंतर्गत विवध संवर्गातील एकूण 602 पदांच्या भरतीसाठी आदिवासी विकास विभाग भरती 2023 जाहीर झाली आहे. या लेखात आदिवासी विकास विभाग भरती 2023 अपडेट बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अपडेट: विहंगावलोकन

विविध पदांच्या भरतीसाठी आदिवासी विकास विभाग भरती 2023 जाहीर झाली आहे. आदिवासी विकास विभाग भरती 2023 अपडेट चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अपडेट: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कंपनीचे नाव आदिवासी विकास विभाग
भरतीचे नाव आदिवासी विकास विभाग भरती 2023
पदाचे नाव गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील विविध पदे
एकूण रिक्त पदे 602
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर
अधिकृत संकेतस्थळ https://tribal.maharashtra.gov.in/

आदिवासी विकास विभाग भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 23 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु होणार असून इतर महत्वाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. जसे आदिवासी विकास विभाग भरती 2023 च्या तारखा जाहीर होतील तसे आम्ही या लेखात अपडेट करू.

आदिवासी विकास विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
आदिवासी विकास विभाग भरती 2023 अधिसुचना तारीख 22 नोव्हेंबर 2023
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 23 नोव्हेंबर 2023
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अपडेट: अधिकृत सूचना 

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अंतर्गत प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) या पदाच्या एकूण 48 जागा भरण्यात येणार आहेत. दि. 07 डिसेंबर 2023 रोजी आदिवासी विकास विभागाने आदिवासी विकास विभाग भरती 2023 बद्दल प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ज्या नुसार प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) पदाच्या शैक्षणिक अर्हतेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्याबद्दलची माहिती खाली देण्यात आली आहे.

शैक्षणिक अर्हता:

सदर पदाची शैक्षणिक पात्रता ही उमेदवार हा इयत्ता 1 ते 10 वी इंग्रजी माध्यमामधून शिकलेला असावा किंवा 1 ते 12 वी इंग्रजी माध्यमामधून शिक्षण शिकलेला असावा तसेच DED पदविका इंग्रजी माध्यमातून केलेली असावी व TET उत्तीर्ण अनिवार्य आहे.

स्पष्टीकरण

  • प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) या पदाकरीता अर्जदाराने लिंकवर अर्ज भरतांना इयत्ता 1 ते 10 वी चे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे किंवा कसे या पर्यायावर NO पर्याय निवडला व त्यापुढील पर्यायात 1 ते 12 वी चे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे किंवा कसे या पर्यायावर Yes हा पर्याय निवडला असेल तरी अशा उमेदवारांचा अर्ज स्विकारला जातो.
  • या बाबत विभागामार्फत खुलासा करण्यात येतो की, सदर पदाकरीता उमेदवारांचे 1 ते 10 वी चे शिक्षण इंग्रजी माध्यमातूनच झाले असल्याचे बंधनकारक आहे तथापि, लिंक मध्ये अशा उमेदवारांनी या पर्यायासमोर No हा पर्याय निवडला तरी त्याला पुढील 1 ते 12 चे शिक्षण इंग्रजी माध्यमातून पर्याय उपलब्ध होतो.
  • ह्या पर्यायात काही अर्जदाराचे केवळ 11 वी व 12 वी चे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असल्याने त्यांनी तेथे Yes हा पर्याय निवडला तरी त्याचे 1 ते 10 वी चे मुळ शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले नसल्याने जरी अशा उमेदवाराचा अर्ज त्यांने भरलेल्या चुकीच्या माहितीमुळे स्विकारला गेला असेल तरी असा उमेदवार पात्र केला जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी व अशा उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सुयोग्य पदाकरीता अर्ज करावा.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज 23 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होणार आहेत. अधिकृत अधिसूचनेत ऑनलाईन अर्जाचा कालावधी आणि अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती दिली असेल. आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिली आहे.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अर्ज लिंक

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅकमहाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अपडेट कधी जाहीर झाला?

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अपडेट 07 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाला.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अपडेट कोणत्या पदासाठी जाहीर झाला?

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अपडेट प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) पदासाठी जाहीर झाला.