Marathi govt jobs   »   Study Materials   »   वाक्याचे प्रकार

वाक्याचे प्रकार : आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

वाक्याचे प्रकार 

महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. आदिवासी विकास विभाग भरती 2023 परीक्षेमध्ये मराठी विषयात मराठी व्याकरणावर हमखास प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी व्याकरण हा कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे. थोड्याशा सरावाने या विषयामध्ये जास्त गुण मिळवता येतात. आज या लेखात आपण मराठी व्याकरणातील वाक्याचे प्रकार , त्यांच्या व्याख्या व अधिक सरावासाठी त्यावर काही उदाहरणे याबद्दल माहिती पाहणार आहोत.

वाक्याचे प्रकार : विहंगावलोकन 

वाक्याचे प्रकार : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता आदिवासी विकास विभाग भरती 2023 आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
विषय मराठी व्याकरण
लेखाचे नाव वाक्याचे प्रकार
लेखातील प्रमुख मुद्दे
  • वाक्याचे प्रकार
  • नमुना प्रश्न

वाक्य व त्याचे प्रकार

वाक्य व त्याचे प्रकार: प्रत्येक वाक्य शब्दाचे बनलेले असते. वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दाचा समूह होय. वाक्यात केवळ शब्दाची रचना करून चालत नाहीत तर, ती अर्थपूर्ण शब्दाची रचना असावयास पाहिजे तेव्हाच ते वाक्य होऊ शकते. वाक्याचा अर्थ स्पष्ट कळण्याकरीता वाक्यात आलेल्या प्रत्येक शब्दाचा (पदाचा) परस्परांशी संबंध काय हे कळणे महत्वाचे असते. प्रत्येक वाक्यात कर्ता व क्रियापद हे महत्वपूर्ण भाग मानले जातात.

वाक्याचे प्रकार: मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

  • अर्थावरून पडणारे प्रकार
  • स्वरूपावरुण पडणारे प्रकार

अर्थावरून पडणारे प्रकार:

विधांनार्थी वाक्य: ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते. त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. श्यामआंबा खातो.

प्रश्नार्थी वाक्य: ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. कोन आहे हा?

उद्गारार्थी वाक्य:  ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो. त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. अबब ! केवढा मोठा हा साप

होकारार्थी वाक्य:  ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किवा करणरूपी वाक्य म्हणतात . उदा. मी गाणे गातो.

नकारार्थी वाक्य: ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी क्रिकेट खेळत नाही.

स्वार्थी वाक्य: ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो अशा वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. त्याने चित्र लिहिले.

आज्ञार्थी वाक्य: ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थन ई. गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. सर्वांनी शांत बसावे.

विधार्थी वाक्य: जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य असे म्हणतात.  उदा. विद्यार्थ्याने नियमित अभ्यास करावा.

संकेतार्थी वाक्य: जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. जर चांगला अभ्यास केला असता तर पास झालो असतो.

स्वरूपावरुण पडणारे प्रकार 

केवल वाक्य: ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवळ वाक्य किवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. उदा. राम आंबा खातो.

संयुक्त वाक्य: जेव्हा वाक्यात दोन किवा अधिक केवळ वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदा. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली.

मिश्र वाक्य: जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किवा अधिक गौणवाक्य उभयान्वि अव्यानि जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. उदा. तो आजारी असल्यामुळे आज आला नाही.

नमुना प्रश्न

Q1. पुढील वाक्याचा प्रकार सांगा.

‘वादळ आले आणि लोकांची भीतीने पळापळ झाली.’

(a)   मिश्र वाक्य

(b)  केवल वाक्य

(c)   संयुक्त वाक्य

(d)  प्रधान वाक्य

Q2. खालील वाक्याचा प्रकार कोणता?

‘जे चकाकते ते सोने नसते.’

(a)   केवल वाक्य

(b)  मिश्र वाक्य

(c)   संयुक्त वाक्य

(d)  गौण वाक्य

Q3.मायलेकी अंथरुणावर आडव्या झाल्या कारण की त्यांना झोप येत होती. 

यातील वाक्य प्रकार ओळखा.

(a)   संयुक्त वाक्य

(b)  मिश्र वाक्य

(c)   केवल वाक्य

(d)  यापैकी नाही

Q4. ‘दुपारी सोसाट्याचा वारा आला आणि पाऊस गेला.’ – या वाक्याचा प्रकार ओळखा.

(a)   संयुक्त वाक्य

(b)  केवलवाक्य

(c)   मिश्रवाक्य

(d)  योग्यवाक्य

Q5. त्याने चांगले परिश्रम केले म्हणूनच यश दिसले – या वाक्याचा प्रकार कोणता ?

(a)   संयुक्त वाक्य

(b)  मिश्रवाक्य

(c)   केवलवाक्य

(d)  शुद्धवाक्य

Q6.खाली दिलेल्या वाक्यातून केवलवाक्य नसलेले वाक्य ओळखा.

(a)   खूप अभ्यास केल्यामुळे प्रभाला उज्वल यश मिळाले.

(b)  देवळात प्रभाने स्वतःभोवती गिरकी घेऊन देवाला नमस्कार केला.

(c)   प्रभाने पाठवलेल्या डब्यात गोड पदार्थ होते.

(d)  प्रभाने डबा पाठवला तेव्हा त्यांत गोड पदार्थ होते.

Q7. पुढीलपैकी केवल वाक्य कोणते ?

(a)   ऐश्वर्या कादंबऱ्या वाचते.

(b)  तो नेहमी उत्कृष्ट काम करतो.

(c)  पंतप्रधान दौऱ्यावर गेले होते.

(d)  वरील सर्व बरोबर

Q8. पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणते ?

(a)   तितके आपल्या विचारांना महत्त्व आहे, तितकेच आपल्या भावनांनाही आहे.

(b)  ती इतकी रडली की तिचे डोळे सुजले.

(c)  मी काल जो मुलगा पाहिला तो हा.

(d)  वरील सर्व 

Q9. तानाजी लढता लढता मेला. हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे?

(a)  मिश्रवाक्य

(b)  केवलवाक्य

(c)  संयुक्तवाक्य

(d)  यापैकी नाही

Q10. वाक्याचा प्रकार ओळखा. – काल फार पाऊस पडला.

(a)  विधानार्थी – होकारार्थी

(b)   नकारार्थी

(c)   उद्गारवाचक

(d)   प्रश्नार्थक

Solutions

S1. Ans (c)

Sol. 

  • हे वाक्य ‘आणि’ या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहे,  
  • समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य हे संयुक्त वाक्य असते.

S2. Ans (b)

Sol. 

  • जो, जी, जे, ज्या या संबंधी सर्वनामांनी जोडलेली वाक्ये ही मिश्र वाक्य असतात. 
  • जे चकाकते – गौण वाक्य. 
  • ते सोने नसते- प्रधान वाक्य. 

S3. Ans (b)

Sol. 

  • गौणत्वबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य हे मिश्र वाक्य असते.

S4. Ans (a)

Sol.

  • समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य संयुक्त वाक्य असते.
  • समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय – आणि, व, अन्, शिवाय, आणिक, न्, नि. 

S5. Ans (a)

Sol.

  • परिणामबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य संयुक्त वाक्य असते. 
  • परिणामबोधक उभयान्वयी अव्यय-  पहिल्या वाक्यात जे घडले, त्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिसतो. 

S6. Ans (d)

Sol.

  • प्रभाने डबा पाठवला होता तेव्हा त्यांत गोड पदार्थ होते. हे मिश्र वाक्य आहे. 
  • यात दोन विधेय आहेत- पाठवला आणि होता.

S7. Ans (d)

Sol. 

(a)   ऐश्वर्या कादंबऱ्या वाचते.

(b)  तो नेहमी उत्कृष्ट काम करतो.

(c)  पंतप्रधान दौऱ्यावर गेले होते.

  • ही सर्व वाक्य केवल वाक्य आहेत. कारण त्यांच्यात एकच कर्ता व एकच विधेय आहे.

S8. Ans (d)

Sol. 

(a)   तितके आपल्या विचारांना महत्त्व आहे, तितकेच आपल्या भावनांनाही आहे.

(b)  ती इतकी रडली की तिचे डोळे सुजले.

(c)   मी काल जो मुलगा पाहिला तो हा.

  • ही तीनही वाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली आहेत, म्हणू ते मिश्र वाक्य आहेत. 

S9. Ans (b)

Sol. 

  • उद्देश्य – तानाजी 
  • विधेय -मेला

S10. Ans (a)

Sol.  

  • काल फार पाऊस पडला. हे  विधानार्थी- होकारार्थी वाक्य आहे. 
  • कारण यात कुठलाही नकार नाही व उद्गारवाचक चिन्ह ही नाही. 

Sharing is caring!

FAQs

वाक्याचे प्रकार हा topic आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी महत्वाचा आहे का ?

होय, वाक्याचे प्रकार हा topic आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी महत्वाचा आहे.

वाक्याचे प्रकार या topic वरील आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी उपयुक्त प्रश्न - उत्तरे मला कोठे मिळतील ?

वाक्याचे प्रकार या topic वरील आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी उपयुक्त प्रश्न - उत्तरे या लेखात मिळतील.