Marathi govt jobs   »   आदिवासी विकास विभाग भरती 2023   »   आदिवासी विकास विभाग अर्ज प्रक्रिया 2023...
Top Performing

आदिवासी विकास विभाग अर्ज प्रक्रिया 2023 सुरु, ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय

आदिवासी विकास विभाग अर्ज प्रक्रिया 2023 सुरु

आदिवासी विकास विभाग अर्ज प्रक्रिया 2023 सुरु: आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. आदिवासी विकास विभाग, नाशिक अंतर्गत विवध संवर्गातील एकूण 602 पदांच्या भरतीसाठी आदिवासी विकास विभाग भरती 2023 जाहीर झाली आहे. आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी इच्छुक आणि पात्र  उमेदवार 13 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. आज या लेखात आपण आदिवासी विकास विभाग भरती 2023 अर्ज प्रक्रियेबद्दल बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात ऑनलाईन अर्ज लिंक व इतर महत्वाची माहिती दिली आहे 

आदिवासी विकास विभाग अर्ज प्रक्रिया 2023: विहंगावलोकन

विविध पदांच्या भरतीसाठी आदिवासी विकास विभाग भरती 2023 जाहीर झाली आहे. आदिवासी विकास विभाग अर्ज प्रक्रिया 2023 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

आदिवासी विकास विभाग अर्ज प्रक्रिया 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कंपनीचे नाव आदिवासी विकास विभाग
भरतीचे नाव आदिवासी विकास विभाग भरती 2023
पदाचे नाव गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील विविध पदे
एकूण रिक्त पदे 110
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर
अधिकृत संकेतस्थळ https://tribal.maharashtra.gov.in/

आदिवासी विकास विभाग अर्ज प्रक्रिया 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 23 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु होणार असून इतर महत्वाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. जसे आदिवासी विकास विभाग भरती 2023 च्या तारखा जाहीर होतील तसे आम्ही या लेखात अपडेट करू.

आदिवासी विकास विभाग अर्ज प्रक्रिया 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
आदिवासी विकास विभाग भरती 2023 अधिसुचना तारीख 22 नोव्हेंबर 2023
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 23 नोव्हेंबर 2023
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

आदिवासी विकास विभाग भरती 2023: अधिसुचना 

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 602 पदांची भरती होणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभाग भरती 2023 अंतर्गत पदानुसार अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अधिसुचना PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आदिवासी विकास विभाग भरती 2023 मधील रिक्त पदांचा  तपशील

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील 602 पदांची भरती होणार आहे. आदिवासी विकास विभाग भरती 2023 मधील पदानुसार रिक्त पदाचा तपशील खाली देण्यात आला आहे.

आदिवासी विकास विभाग भरती 2023: रिक्त पदांचा तपशील 
पदाचे नाव रिक्त पदे
उच्च श्रेणी लघुलेखक 3
निम्न श्रेणी लघुलेखक 13
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 14
संशोधन सहाय्यक 17
उपलेखापाल/ मुख्य लिपिक 41
वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक 187
लघुटंकलेखक 5
गृहपाल (पुरुष) 43
गृहपाल (स्त्री) 25
अधीक्षक (पुरुष) 26
अधीक्षक (स्त्री) 48
ग्रंथपाल 38
प्रयोगशाळा सहाय्यक 29
आदिवासी विकास निरीक्षक 8
सहाय्यक ग्रंथपाल 1
प्राथमिक शिक्षणसेवक(मराठी माध्यम) 27
माध्यमिक शिक्षणसेवक(मराठी माध्यम) 15
उच्च माध्यमिक शिक्षणसेवक 14
प्राथमिक शिक्षणसेवक(इंग्रजी माध्यम) 48
एकूण 602

आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज 23 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होणार आहेत. अधिकृत अधिसूचनेत ऑनलाईन अर्जाचा कालावधी आणि अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती दिली असेल. आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिली आहे.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अर्ज लिंक

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अर्ज करण्याची पद्धत

  1. उमेदवार कोणत्याही अपर आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या पदांसाठी अर्ज करुन शकेल. अशा उमेदवारांस तो त्याने राज्यातील निवड केलेलया परिक्षा केंद्रावर परिक्षेस उपस्थित राहून परिक्षा देणे बंधनकारक राहिल.
  2. शैक्षणिक अर्हतेनुसार उमेदवारास एका पेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करावयाचा असल्यास, प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परिक्षा शुल्क भरावे लागेल.
  3. उमेदवारास अर्ज करतांना अपर आयुक्त, नाशिक / अमरावती / ठाणे व नागपुर या चार अपर आयुक्तांच्या कार्यक्षेत्रातील पदांपैकी एकाच पदाकरीता अर्ज करायचा असल्यास कोणत्याही एकाच अपर आयुक्त कार्यालयासाठी अर्ज करणे बंधनकारक राहील.
  4. प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाइन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येईल.
  5. पात्र उमेदवाराला वेव आधारीत (web-based) ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/ या संकेतस्थळाद्वारे दिनांक २३.११.२०२३ ते १३.१२.२०२३ या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील.
  6. विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.
  7. उमेदवाराच्या पात्रतेनुसार उमेदवार एका पेक्षा जास्त पदाकरीता अर्ज करु शकेल, तथापि, प्रत्येक पदाकरीता स्वतंत्रपणे अर्ज करणे बंधनकारक राहील व प्रत्येक पदांकरीता स्वतंत्र शुल्क भरणे बंधनकारक राहिल.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अर्ज करण्याच्या सूचना 

  1. उपरोक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/या संकेतस्थळावर मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक 23.11.2023 ते दिनांक 13.12.2023 या कालावधीमध्ये वेब बेस्ड (Web-Based) ऑनलाईन आवेदन पत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक 23.11.2023 ते दिनांक 13.12.2023 या कालावधीमध्ये करता येईल.
  2. विहित पद्धतीने मुदतीत म्हणजेच दिनांक 13.12.2023 पर्यंत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरण्याची कार्यवाही दिनांक 13.12.2023 रोजी रात्री 23.55 वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर वेब लिंक बंद होईल.
  3. परीक्षा स्थगित व रद्द करणे, परीक्षेचे स्वरूप, परीक्षेची तारीख व ठिकाणात बदल करणे, पदसंख्या वाढ किंवा घट करण्याचे अधिकार विभागास राहतील व विभागाचा निर्णय अंतिम असेल, त्याबाबत कोणताही दावा सांगता येणार नाही. तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात वा तक्रारी बाबत निर्णय घेण्याचा अधिकार विभागास राहील व विभागाचा निर्णय अंतिम असेल. याबाबत कोणत्याही पत्र व्यवहाराची दखल घेतली जाणार नाही.
  4. उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक नाही. तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास भरतीच्या कोणत्याही टप्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी व पात्रता तपासूनच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावा.
  5. उमेदवारांची परीक्षा ही त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणतीही कागदपत्रे पूर्व तपासणी / छाननी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत. कागदपत्रांच्या पूर्ण छाननीनंतरच उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येईल. उमेदवाराना ऑनलाईन परीक्षेतील मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार अंतरिम यादी प्रसिद्ध करून उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल छाननी केली जाईल. सदर प्रक्रियेत उमेदवार अपात्र आढळल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टप्यावर अपात्र करण्याचे सर्व अधिकार नियुक्ती प्राधिकारी राखून ठेवीत आहेत.
  6. परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रात किंवा परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल, गणकयंत्र (calculator), आय पेंड वा तत्सम इलेक्ट्रॉनिक यंत्रे किंवा इतर संपर्काची साधने वापरण्यास सक्त मनाई आहे.
  7. उमेदवारास परीक्षा / कागदपत्र पडताळणी इत्यादी करीता स्वखर्चाने यावे लागेल.
  8. ऑनलाईन परीक्षा स्थळामध्ये वाढ/ बदल करण्याचे अधिकार विभागाकडे राहतील. परिक्षेचे ठिकाण, वेळ, दिनांक उक्त संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  9. परीक्षेचे प्रवेशपत्र उक्त संकेतस्थळावरून स्वतंत्र लिंक द्वारे उपलब्ध करुन दिले जाईलव उमेदवाराने स्वतः डाऊनलोड करुन घेण्याची जबाबदारी सर्वस्वी उमेदवाराची असेल. परीक्षेचे प्रवेशपत्र इतर कोणत्याही पद्धतीने पाठविले जाणार नाही.
  10. पात्र उमेदवारांचा अंतिम निकाल विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अर्ज करताना लागणारी कागदपत्रे 

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे खाली दिलेली आहेत.

  1. छायाचित्र
  2. स्वत:ची स्वाक्षरी (काळ्या शाईने)
  3. डाव्या अंगठ्याचा ठसा (काळ्या किंवा निळ्या शाईने)
  4. इंग्रजी भाषेतील खाली दिलेला मजकूर स्वहस्ताक्षरात लिहिलेले घोषणापत्र

Declaration
I, (name of the candidate) hereby declare that all the Information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.

आदिवासी विकास विभाग भरती 2023: परीक्षा शुल्क 

आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी परीक्षा शुल्क खाली दिलेले आहे.

आदिवासी विकास विभाग भरती 2023: परीक्षा शुल्क 
प्रवर्ग  परीक्षा शुल्क 
अराखीव प्रवर्ग रु. 1000/-
इतर सर्व प्रवर्ग रु. 900/-

आदिवासी विकास विभाग भरती 2023: वेतनश्रेणी 

आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी पदानुसार वेतन श्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

आदिवासी विकास विभाग अर्ज प्रक्रिया 2023 सुरु, ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय_4.1

FAQs

आदिवासी विकास विभाग भरती 2023 कधी जाहीर झाली?

आदिवासी विकास विभाग भरती 2023 22 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 किती पदांसाठी जाहीर झाली?

आदिवासी विकास विभाग भरती 2023 602 पदांसाठी जाहीर झाली.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अर्ज प्रक्रिया कधी सुरु झाली?

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अर्ज प्रक्रिया 23 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु झाली.