Table of Contents
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2022 was held from 22nd April 2022 to 24th April 2022 on the premises of Udayagiri College at Udgir. In this article, we will see detailed information about Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan. Including the history of Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan, current president, women president.
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2022 | |
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2022 | 95th |
Place | Udgir, Latur |
Sammelan Dates | 22 to 24 April 2022 |
President | Bharat Sasane |
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2022
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2022: साहित्य –संमेलने हे महाराष्ट्राचे एक खास वैशिष्ट्य आहे. अखिल भारतीय, प्रादेशिक, प्रांतिक, उपनगरीय, शारदीय. वासंतिक, महिलांची, बाल-कुमारांची, नवोदितांची, होतकरूंची, ग्रामीण, दलित इ. नाना प्रकारची मराठी भाषिकांची साहित्यसंमेलने मोठ्या संख्येने व उत्साहाने होतात. या सर्व संमेलनांमध्ये ‘अखिल भारतीय मराठी साहित्य – संमेलन’ या नावाने ओळखल्या जाणार्या व सर्व मराठी भाषिकांचे प्रातिनिधिक ठरलेल्या संमेलनाला विशेष महत्तव दिले जाते. अलीकडेच लातूर येथील उदगीर येथे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. आज आपण या लेखात Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे. ज्यात Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan चा इतिहास, आत्तापर्यंतचे अध्यक्ष, महिला अध्यक्ष या सर्व बाबीचा समावेश आहे.
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2022 | अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2022
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2022: लातूर येथील उदगीर येथे 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) सुरुवात होत आहे. या निमित्तानं उदगीरमध्ये तीन दिवस साहित्यिकांचा मेळा भरला होता. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे हे यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. उदगीर येथे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 22, 23 आणि 24 एप्रिल रोजी पार पडले. संमेलनाचा समारोप सोहळा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागरळकर, प्रमुख कार्यवाह रामचंद्र तिरुके, शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार रमेश कराड यांच्यासह संमेलनाअध्यक्ष भारत सासणे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक दामोदर मावजो, कौतिकराव ठाले-पाटील उपस्थित होते.
उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात 22 ते 24 एप्रिल दरम्यान 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) पार पडले. या संमेलनासाठी देशभरातून साहित्यिक, लेखक आणि रसिकांनी हजेरी लावली. 155 लेखकांच्या पुस्तकांचं प्रकाशन यावेळी झाले. तर संमेलनात 216 बुकस्टॉल लागले होते
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: History (इतिहास)
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: History: ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश (07 फेब्रुवारी 1878) मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार 11 मे 1876 रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. या संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले. ग्रंथकार संमेलने या आरंभीच्या नावाने भरणार्या अधिवेशनांचे वेळोवेळी नामांतर होत गेले. 1908 मध्ये लेखक – संमेलन, 1909 मध्ये महाराष्ट्र साहित्य संमेलन, मध्यंतरी काही काळ मराठी साहित्य – संमेलन, 1935 पासून 1953 पर्यत पुनश्च महाराष्ट्र साहित्य संमेलन, 1954 पासून पुन्हा ‘मराठी साहित्य संमेलन’ या व्यापक नावाच्या धोरणाचा केलेला स्वीकार व महामंडळाकडे संमेलने गेल्यानंतर त्याच्या मागे ‘अखिल भारतीय’ या उपाधीची वाढ करण्यात आली व त्यानंतर त्याचे नावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असे ठेवण्यात आले.
Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: President (अध्यक्ष)
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: President: 2022 मध्ये 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले. परीक्षेत अलीकडच्या काळातील Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan च्या अध्यक्षांची नावे व संमेलनाचे ठिकाण विचारल्या जातात त्यामुळे 2001 ते 2022 च्या सर्व Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan च्या अध्यक्षांची नावे खालील तक्त्यात दिले आहे.
संमेलन क्र. | वर्ष | स्थळ | अध्यक्ष |
95 | 22,23,24 एप्रिल 2022 | उदगीर | भारत सासणे |
94 | 2021 | नाशिक | जयंत नारळीकर |
93 | 2020 | उस्मानाबाद | फादर फ्रान्सिस दिब्रिटो |
92 | 2019 | यवतमाळ | अरुणा ढेरे |
91 | 2018 | बडोदे | लक्ष्मीकांत देशमुख |
90 | 2017 | डोंबिवली | अक्षयकुमार काळे |
89 | 2016 | पिंपरी-चिंचवड (पुणे) | श्रीपाल सबनीस |
88 | 2015 | घुमान (पंजाब) | सदानंद मोरे |
87 | 2014 | सासवड | फ. मुं. शिंदे |
86 | 2013 | चिपळूण | नागनाथ कोत्तापल्ले |
85 | 2012 | चंद्रपूर | वसंत आबाजी डहाके |
84 | 2011 | ठाणे | उत्तम कांबळे |
83 | 2010 | पुणे | द.भि.कुलकर्णी |
82 | 2009 | महाबळेश्वर | आनंद यादव |
81 | 2008 | सांगली | म.द. हातकणंगलेकर |
80 | 2007 | नागपूर | अरुण साधू |
79 | 2006 | सोलापूर | मारुती चितमपल्ली |
78 | 2005 | नाशिक | केशव मेश्राम |
77 | 2004 | औरंगाबाद | रा.ग. जाधव |
76 | 2003 | कऱ्हाड | सुभाष भेंडे |
75 | 2002 | पुणे | राजेंद्र बनहट्टी |
74 | 2001 | इंदूर | विजया राजाध्यक्ष |
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: Female President (महिला अध्यक्ष)
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: Female President: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आतापर्यत केवळ 5 वेळा महिला अध्यक्षा होत्या. त्याची माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
संमेलन क्र. | वर्ष | ठिकाण | अध्यक्षांचे नाव |
---|---|---|---|
92 | 2019 | यवतमाळ | अरुणा रामचंद्र ढेरे |
74 | 2001 | इन्दौर | विजया राजाध्यक्ष |
69 | 1996 | आळंदी | शांता शेळके |
51 | 1975 | कराड | दुर्गा भागवत |
43 | 1961 | ग्वालियर | कुसुमावती देशपांडे |
Election Commission of India (ECI)
Study Material for All MPSC Exams | MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
Study Material for All MPSC Exams: MPSC च्या परीक्षा पास व्हायला मुलांना बरेच वर्ष लागतात कारण MPSC चा अभ्यासक्रम खूप आहे आणि प्रश्न नेमके कशातून येतात हे समजायला वेळ लागतो. तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा 2021 व तसेच आगामी MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
FAQs Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2022
Q1. पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या वर्षी व कुठे झाले?
Ans. पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1878 मध्ये पुण्यात झाले
Q2. पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
Ans. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
Q3. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या?
Ans. कुसुमावती देशपांडे या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या.
Q4. 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले?
Ans. 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे पार पडले.
Q5. 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
Ans. 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. भारत सासणे होते.
Adda247 Marathi Homepage | Click Here |
Adda247 Marathi Quiz for All Competitive Exam | Click Here |