Marathi govt jobs   »   Study Materials   »   मराठीतील आलंकारिक शब्द

आलंकारिक शब्द, जिल्हा परिषद भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

मराठीतील आलंकारिक शब्द

आलंकारिक शब्द: कोणताही प्रसंग किंवा गोष्ट सांगण्यासाठी एक विशिष्ट शब्दरचना वापरली जाते आणि त्याद्वारेच ती गोष्ट सूचित केली जाते, अश्या विशिष्ट शब्द समूहाला आलंकारिक शब्द असे म्हणतात. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेत मराठी विषयास अनन्यसाधारण महत्व आहे. सरळसेवा भरती जसे कि, जिल्हा परिषद भरती 2023, आरोग्य भरती 2023, नगर परिषद भरती 2023, MIDC भरती 2023 व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणावर प्रश्न विचारल्या जातात. मराठी व्याकरणाचा चांगला अभ्यास केला तर आपल्याला कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येतात. आज या लेखात आपण मराठीतील आलंकारिक शब्द या घटकावर सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आलंकारिक शब्द: विहंगावलोकन

आलंकारिक शब्दाचा दैनंदिन व्यवहारात वापर तर होतोच त्याचबरोबर साहित्य लेखनामध्येही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या शब्दावर आधारित अनेक प्रश्न सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षामध्ये विचारले जातात. हे शब्द व अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. या लेखात आलंकारिक शब्द याबद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.

मराठीतील आलंकारिक शब्द: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता जिल्हा परिषद भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
विषय मराठी व्याकरण
लेखाचे नाव मराठीतील आलंकारिक शब्द
लेखातील प्रमुख मुद्दे
  • आलंकारिक शब्द म्हणजे काय?
  • मराठीतील आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

आलंकारिक शब्द म्हणजे काय?

ज्याप्रमाणे अलंकार, पोशाख, केशरचना या मानवाच्या सौंदर्यात भर घालतात; तसेच म्हणी, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द भाषेचे सौंदर्य वाढवतात. सर्व भाषामध्ये यांचा वापर केला जातो. कमी शब्दामध्ये व्यापक अर्थ अलंकारिक शब्दातून सांगितला जातो. आलंकारिक शब्दाचा शाब्दिक अर्थ लक्षात न घेता त्यामागील भावार्थ समजून घेणे आवश्यक असते. म्हणून आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ माहीत असणे आवश्यक आहे. आलंकारिक शब्दांचा अर्थ माहित नसेल तर त्यातून चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. या लेखात मराठीमध्ये वापरल्या जाणाऱ्या अशाच काही अलंकारिक शब्द व त्यांचा अर्थ जाणून घेऊयात.

मराठीतील आलंकारिक शब्द

मराठी भाषेतील परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आलंकारिक शब्द  पुढीलप्रमाणे आहेत.

आलंकारिक शब्द  अर्थ 
अष्टपैलू सर्व गुणसंपन्न
अकलेचा कांदा मूर्ख.
अरण्य पंडित मूर्ख मनुष्य
अकरावा रुद्र अतिशय तापट माणूस
अळवावरचे पाणी फार काळ न टिकणारी वस्तू
अकलेचा खंदक अत्यंत मूर्ख माणूस
उंटावरचा शहाणा
मूर्खपणाचा सल्ला देणारा
उंबराचे फूल अत्यंत दुर्मिळ वस्तू
कर्णाचा अवतार दानशूर, उदार माणूस
कळसूत्री बाहुली दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
कळीचा नारद भांडण लावून देणारा.
कुंभकर्ण झोपाळू माणूस
कूपमंडूक संकुचित वृत्तीचा मनुष्य
खडाजंगी जोरदार मोठे भांडण
काडी पहिलवान हाडकुळा मनुष्य
खुशाल चेंडू चैनीखोर मनुष्य
खेटराची पूजा अपशब्दाने खरडपट्टी काढणे
गर्भ श्रीमंत जन्मापासून श्रीमंत
गंगा यमुना अश्रू
गंडांतर भीती दायक संकट
गाजर पारखी कसलीही पारख नसलेला
गुरुकिल्ली मर्म, रहस्य
गुळाचा गणपती मंदबुद्धीचा
गोगलगाय गरीब निरुपद्रवी मनुष्य
घर कोंबडा घराबाहेर न पडणारा
घोरपड चिकाटी धरणारा
चर्पटपंजरी निरर्थक बडबड
चौदावे रत्न मार
छत्तीसचा आकडा शत्रुत्व
जमदग्नीचा अवतार रागीट
टोळभैरव नासाडी करणारे लोक
ताटाखालचे मांजर दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा
त्रिशंकू धड ना इकडे, ना तिकडे
दगडावरची रेघ कधीही न बदलणारे
देव माणूस चांगला सज्जन माणूस
धोपट मार्ग सरळ, अचूक मार्ग
नवकोट नारायण खूप श्रीमंत
नंदीबैल हो ला हो म्हणणारा
पर्वणी अतिशय दुर्मिळ योग
पाताळयंत्री कारस्थान करणारा
पांढरा कावळा                  निसर्गात नसलेली वस्तू
पांढरा परीस                    लबाड माणूस
पिकले पान                     म्हातारा मनुष्य
पोपटपंची                        अर्थ न समजता पाठांतर करणे
बृहस्पती                           बुद्धिमान मनुष्य
बिन भाड्याचे घर         तुरुंग
बोके संन्यासी               ढोंगी मनुष्य
बोलाचीच कढी                केवळ शाब्दिक वचन
भगीरथ प्रयत्न                   अटोकाट प्रयत्न
भाकड कथा                   बाष्कळ गोष्टी
भीष्मपतिज्ञा                    कठीण प्रतिज्ञा
मंथरा                                दुष्ट स्त्री
मायेचा पूत                      मायाळू माणूस
मारुतीचे शेपूट                   लांबत जाणारे काम
मृगजळ                            केवळ आभास
मेषपात्र                             बावळट मनुष्य
रामबाण औषध                 अचूक गुणकारी
लंकेची पार्वती                     अत्यंत गरीब स्त्री
लंबकर्ण                               बेअकली मनुष्य
वाटाण्याच्या अक्षता              नकार
वामन मूर्ती                     बुटका माणूस
वाहती गंगा                           आलेली संधी
शकूनी मामा                          कपटी मनुष्य
श्रीगणेशा                              आरंभ करणे
स्मशान वैराग्य                      तात्कालिक वैराग्य
सांभाचा अवतार                   अत्यंत भोळा मनुष्य
सुळावरची पोळी                   जीव धोक्यात घालणारे काम
शेजारधर्म                             शेजाऱ्यांची चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत
शेंदाड शिपाई                       भित्रा मनुष्य

 

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

मराठी व्याकरण या विषयावर इतर महत्वाचे लेख

महाराष्ट्रातील सर्व सरळ सेवा भरती साठी मराठी व्याकरणावर अड्डा247 ने एक लेखमालिका सुरु केली आहे. दररोज यात नवनवीन घटकांची भर पडत आहे. मराठी व्याकरणाचे इतर महत्वाचे लेख पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

घटक लिंक
मराठी शब्दसंपदा येथे क्लिक करा
मराठी व्याकरणाची ओळख येथे क्लिक करा
संधी येथे क्लिक करा
नाम येथे क्लिक करा
सर्वनाम येथे क्लिक करा
विशेषण येथे क्लिक करा
क्रियापद येथे क्लिक करा
काळ येथे क्लिक करा
क्रियापदाचे अर्थ येथे क्लिक करा
क्रियाविशेषण अव्यय येथे क्लिक करा
शब्दयोगी अव्यय येथे क्लिक करा
उभयान्वयी अव्यय येथे क्लिक करा
केवलप्रयोगी अव्यय येथे क्लिक करा
प्रयोग येथे क्लिक करा
समास येथे क्लिक करा
वाक्याचे प्रकार येथे क्लिक करा
शब्दसिद्धी येथे क्लिक करा
आलंकारिक शब्द  येथे क्लिक करा 

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

आलंकारिक शब्द म्हणजे काय?

कोणताही प्रसंग किंवा गोष्ट सांगण्यासाठी एक विशिष्ट शब्दरचना वापरली जाते आणि त्यादवरेच ती गोष्ट सूचित केली जाते, अश्या विशिष्ट शब्द समूहाला आलंकारिक शब्द असे म्हणतात.

कूपमंडूक या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय?

कूपमंडूक या आलंकारिक शब्दाचा अर्थ संकुचित वृत्तीचा मनुष्य असा होतो.

अटोकाट प्रयत्न याचा आलंकारिक शब्द काय आहे?

अटोकाट प्रयत्न याचा आलंकारिक शब्द भगीरथ प्रयत्न आहे.