अॅमेझॉन च्या एडब्ल्यूएसने एनक्रिप्टेड संदेशवहन अॅप ‘विकर्र’ चे अधिग्रहण केले
कोव्हीड -19 च्या साथीमुळे मिश्र वातावरणात काम करायला लागणाऱ्या व्यापारी, सरकारी संस्था आणि खासगी व्यक्ती यांच्याकरिता अधिक सुरक्षित आणि त्वरित संदेश पोहोचविणाऱ्या “विकर्र” हे अॅप अॅमेझॉन च्या एडब्ल्यूएसने विकत घेतले.
विकर्र अॅप विषयी:
- हे अॅप सर्वात सुरक्षित आणि एंड टू एंड एनक्रिप्टेड (कूटबद्ध) दळणवळण तंत्रज्ञान आहे जे इतर सामान्य संदेशवहन अॅप द्वारे उपलब्ध होत नाही.
- हे अॅप अॅमेझॉन च्या क्लाऊड कंप्यूटिंग युनिट अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस) विकत घेतले आहे.
- विकर्र ची स्थापना 2012 ला झाली असून याचा उपयोग प्रामुख्याने अमेरिकी सरकारी संस्था करतात.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:
- अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी: जेफ बेझोस
- अॅमेझॉनची स्थापना: 5 जुलै 1994