Marathi govt jobs   »   Study Materials   »   प्राण्यांचे वर्गीकरण - असमपृष्ठरज्जू प्राणी

प्राण्यांचे वर्गीकरण – असमपृष्ठरज्जू प्राणी : MPSC 2024 अभ्यास साहित्य

प्राण्यांचे वर्गीकरण – असमपृष्ठरज्जू प्राणी: प्राणी हा जीवांचा एक वैविध्यपूर्ण गट आहे जो आपल्या ग्रहाच्या प्रत्येक कोपऱ्यात, महासागरांच्या खोलीपासून उंच पर्वतशिखरांपर्यंत राहतो. ते विविध आकार, आणि वर्तनांमध्ये येतात, ज्यामुळे प्राण्यांच्या वर्गीकरणाचा अभ्यास आकर्षक आणि नैसर्गिक जग समजून घेण्यासाठी आवश्यक दोन्ही बनतो. आगामी काळातील MPSC 2024 स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा फार महत्वाचा घटक आहे. आज या लेखात आपण सामान्य विज्ञानातील जीवशास्त्र या विषयातील  प्राण्यांचे वर्गीकरण – असमपृष्ठरज्जू प्राणी  याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

प्राण्यांचे वर्गीकरण – असमपृष्ठरज्जू प्राणी: विहंगावलोकन

खालील तक्त्यात आम्ही विहंगावलोकन बद्दल दिले आहे.

प्राण्यांचे वर्गीकरण – असमपृष्ठरज्जू प्राणी : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC 2024
विषय सामान्य विज्ञान
टॉपिकचे नाव प्राण्यांचे वर्गीकरण – असमपृष्ठरज्जू प्राणी
लेखातील प्रमुख मुद्दे
  • प्राण्यांचे वर्गीकरण – असमपृष्ठरज्जू प्राणी या विषयी सविस्तर माहिती

प्राण्यांचे वर्गीकरण – असमपृष्ठरज्जू प्राणी

सभोवताली असणाऱ्या करोडो सजीवांचा एकत्रित अभ्यास करणे व तो लक्षात ठेवणे हे अत्यंत अवघड असते. यासाठी विविध शास्त्रज्ञांनी सजीवांचे वर्गीकरण करून त्यांचा अभ्यास केला. रॉबर्ट व्हिटाकर या अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ यांनी 1969 साली सजीवांची 5 गटांत विभागणी केली. त्यानुसार या लेखात आपण प्राण्यांचे वर्गीकरण – असमपृष्ठरज्जू प्राणी पाहणार आहोत.

प्राणी वर्गीकरणाचा इतिहास

अ‍ॅरिस्टॉटल – सर्वात पहिल्यांदा प्राणी वर्गीकरण केले. प्राण्यांच्या शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी अधिवास या मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण.

प्राणी वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धती:- अ‍ॅरिस्टॉटल, थेओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनिअस

उत्क्रांतीवादावर आधारित वर्गीकरण:-  डॉब्झन्स्की, मेयर, कार्ल वूज

प्राणी वर्गीकरणाची पारंपारिक पद्धती

  1. असमपृष्ठरज्जू प्राणी (Non-Chordates)
  • पृष्ठरज्जू (Notochord) नावाचा आधारक नसतो.
  • ग्रसनीमध्ये कल्लविदरे नसतात
  • चेतारज्जू (Nerve cord) असेल तर युग्मांगी, भरीव, आणि शरीराच्या अधीर बाजूस असते.
  • हृद्य असेल तर शरीराच्या पृष्ठ बाजूस असते.

2. समपृष्ठरज्जू प्राणी (Chordates)

  • शरीरामध्ये पृष्ठरज्जू (Notochord) नावाचा आधारक असतो.
  • श्वसनासाठी कल्लविदरे (Gill Slits) किंवा फुफ्फुसे असतात
  • एकच चेतारज्जू असतो
  • हृद्य शरीराच्या अधर बाजूस असते

वरील पद्धतीनुसार प्राणीसृष्टीचे वर्गीकरण;

प्राणीसृष्टीचे प्रचलित वर्गीकरण
प्राणीसृष्टीचे प्रचलित वर्गीकरण

रॉबर्ट व्हिटाकर यांच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार वर्गीकरणाचे आधारभूत मुद्दे

a) रचनात्मक संघटन (Grades of Organization)

  • एकपेशीय प्राण्यांच्या शरीराचे संघटन जीवनद्रव्य -स्तर (Protoplasmic grade) प्रकारचे असते. उदा.अमिबा
जीवनद्रव्य -स्तर संघटन
जीवनद्रव्य -स्तर संघटन (Protoplasmic grade)
  • बहुपेशीय पण ऊती नसलेल्या प्राण्यांचे शरीराचे संघटन पेशीस्तर (Cellular grade Organization) प्रकारचे असते. उदा. रंध्रीय प्राणी
पेशीस्तर (Cellular grade Organization)
पेशीस्तर (Cellular grade Organization)
  • पेशी एकत्र येऊन ऊती तयार झाल्या असल्यास पेशी-ऊती स्तर संघटन (Cell-Tissue grade Organization) असते. उदा. नीडारिया संघ
पेशी-ऊती स्तर संघटन (Cell-Tissue grade Organization)
पेशी-ऊती स्तर संघटन (Cell-Tissue grade Organization)
  • ऊती एकत्र येऊन अवयव तयार झाले असल्यास ऊती-अवयव स्तर संघटन (Tissue -Organ grade Organization) असते. उदा. चपट्या कृमी
ऊती-अवयव स्तर संघटन (Tissue -Organ grade Organization)
ऊती-अवयव स्तर संघटन (Tissue -Organ grade Organization)
  • अवयव एकत्र येऊन अवयव संस्था तयार झाल्यास (Organ System grade Organization) असते. उदा. मानव, कुत्रा इत्यादी
अवयव संस्था (Organ System grade Organization)
अवयव संस्था (Organ System grade Organization)

b) शारीरिक सममिती (Body Symmetry)

  • असममित शरीर (Asymmetrical body) – उदा. अमिबा, पॅरामेशियम, काही प्रकारचे स्पंज
  • अरिय सममिती (Radial Symmetry )- उदा. तारामासा
  • द्विपार्श्व सममिती (Bilateral symmetry) – उदा. मासे, बेडूक, पक्षी, मानव
शारीरिक सममितीचे प्रकार (Body Symmetry)
शारीरिक सममितीचे प्रकार (Body Symmetry)

c) आद्यस्तर/ जननस्तर (Germinal layers) 

  • द्वीस्तरीय (Diploblastic) – फक्त बहिर्जनस्तर (Ectoderm) आणि अंतर्जनस्तर (Endoderm) तयार होतात.
  • त्रिस्तरीय (triploblastic) – बहिर्जनस्तर (Ectoderm) आणि अंतर्जनस्तर (Endoderm) सोबत मध्यस्तर (Mesoderm) तयार होतात
द्‌विस्तरीय व त्रिस्तरीय
द्‌विस्तरीय व त्रिस्तरीय

d) देहगुहा (Body Cavity)

  • सत्य देहगुहा (Eucoelomate) – उदा. रंध्रीय प्राणी, निडारिया संघ
  • देहगुहाहीन (Acoelomate) – उदा. चपट्या कृमींचा संघ
  • खोटी / फसवी देहगुहा (Pseudocoelomate) – उदा. गोल कृमी संघ
देहगुहेवरून प्राणांचे प्रकार (Body Cavity)
देहगुहेवरून प्राणांचे प्रकार (Body Cavity)

e) खंडीभवन (Body Segmentation)

  • शरीर छोट्या-छोट्या समान भागांत विभागलेले असेल अशा शरीराला (खंडीभवीत शरीर (Segmented body) म्हणतात.
  • प्रत्येक छोट्या भागाला खंड (Segment) म्हणतात. उदा. वलयी प्राणीसंघातील गांडूळ
प्राणी सृष्टी (kingdom -Animalia)
प्राणी सृष्टी (kingdom -Animalia)

प्राण्यांचे आधुनिक वर्गीकरण

1. रंध्रीय प्राणीसंघ (Phylum – Porifera):

  • सर्वात साध्या प्रकारची शरीररचना (स्पंज)
  • शरीरावर असंख्य छिद्रे असतात. (ऑस्टीया-पाणी शरीरात घेणे आणि ऑस्कुला- पाणी शरीराबाहेर सोडणे)
  • जलवासी प्राणी
  • असममित शरीर
  • कॉलर पेशींच्या मदतीने शरीरात पाण्याचे वहन होते
  • प्रचलन करत नाही (स्थानबद्ध प्राणी)
  • शरीरास कंटीकांचा / शुकीकांचा / स्पॉंजिन चा आधार असतो
  • कंटीका कॅल्शियम कार्बोनेट / सिलीकाच्या असतात
  • प्रजनन अलैंगिक (मुकुलायन) / लैंगिक पद्धतीने
  • उदा. सायकॉन, यूस्पॉंजिया (आंघोळीचा स्पंज), हायलोनिमा इत्यादी.
रंध्रीय प्राणीसंघ (Phylum - Porifera)
रंध्रीय प्राणीसंघ (Phylum – Porifera)

2. सिलेंटराटा / निडारिया प्राणीसंघ (Phylum – Coelenterata / Cnidaria)

  • शरीराचा आकार दंडाकृती असेल तर – बहुशुंडक (Polyp) म्हणतात आणि छत्रीच्या आकाराचा असेल तर छत्रिक (Medusa) म्हणतात
  • बहुतेक समुद्रात आढळतात
  • शरीर – अरिय सममित व द्विस्तरीय
  • मुखाभोवती दंशपेशीयुक्त शुंडके (Tentacles) असतात – भक्ष पकडण्यासाठी उपयोग
  • उदा. जलव्याल (Hydra), सी-अ‍ॅनिमोन, पोर्तुगीज-मॅन-ऑफ-वॉर, प्रवाळ (Corals)
सिलेंटराटा / निडारिया प्राणीसंघ (Phylum - Coelenterata / Cnidaria)
सिलेंटराटा / निडारिया प्राणीसंघ (Phylum – Coelenterata / Cnidaria)

3. चपट्या कृमींचा प्राणीसंघ (Phylum – Platyhelminthes)

  • शरीर पातळ / पट्टी सारखे चपटी असते
  • बहुतेक प्राणी अंत:परजीवी असतात
  • देहगुहाहीन आणि द्वीपार्श्व सममित शरीर
  • त्रिस्तरीय असतात
  • प्राणी उभयलिंगी (Hermaphrodite) असतात
  • उदा. प्लॅनेरिया लिव्हरफ्लूक, पट्टकृमी इत्यादी
चपट्या कृमींचा प्राणीसंघ (Phylum - Platyhelminthes)
चपट्या कृमींचा प्राणीसंघ (Phylum – Platyhelminthes)

4. गोलकृमी प्राणीसंघ (Phylum – Aschelminthes)

  • लांबट, बारीक धाग्यासारखे / दंडगोलाकार शरीर
  • स्वतंत्र राहणारे / अंत:परजीवी असतात
  • जलीय / भूचर असतात
  • त्रिस्तरीय शरीर असते
  • आभासी देहगुहा
  • शरीर अखंडित असून त्याभोवती भक्कम उपचर्म असते
  • एकलिंगी असतात
  • उदा. पोटातील जंत, डोळ्यातील जंत, हत्ती पाय रोगाचे जंत इत्यादी
गोलकृमी प्राणीसंघ (Phylum - Aschelminthes)
गोलकृमी प्राणीसंघ (Phylum – Aschelminthes)

5. वलीय प्राणीसंघ (Phylum – Annelida)

  • लांबट, दंडाकृती शरीर
  • कायखंड खंडीभवन (Metameric Segmentation) आढळते
  • बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे असतात
  • काही प्राणी बाह्यपरजीवी असतात
  • प्राणी समुद्रीय / गोड्या पाण्यात किंवा भूचर असतात
  • त्रिस्तरीय, द्वीपार्श्व सममित आणि सत्य-देहगुहा असते
  • प्रचलन होण्यासाठी दृढरोम, परपाद किंवा चूषक यांसारखे अवयव असतात
  • सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म असते
  • उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात
  • उदा. गांडुळ, जळू, नेरीस इत्यादी
वलीय प्राणीसंघ (Phylum - Annelida)
वलीय प्राणीसंघ (Phylum – Annelida)

6. संधीपाद प्राणीसंघ (Phylum – Arthropoda)

  • छोट्या-छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात
  • संख्येने सर्वात मोठा आणि सर्व प्रकारे यशस्वी झालेला प्राणीसंघ
  • सर्व प्रकारच्या अधिवासात आढळतात
  • शरीर त्रिस्तरीय, सत्य-देहगुहा युक्त, द्वीपार्श्व सममित आणि खंडीभूत असते
  • शरीराभोवती कायटीन युक्त बाह्यकंकाल (Exoskeleton) असते
  • एकलिंगी प्राणी
  • उदा. खेकडा, कोळी, विंचू, झुरळ इत्यादी
संधीपाद प्राणीसंघ (Phylum - Arthropoda)
संधीपाद प्राणीसंघ (Phylum – Arthropoda)

7. मृदुकाय प्रणीसंघ (Phylum – Mollusca)

  • शरीर मऊ, बुळबुळीत असते
  • प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा संघ
  • जलचर किंवा भूचर असतात
  • शरीर त्रिस्तरीय, देहगुहायुक्त, अखंडित आणि मृदू असते
  • द्वीपार्श्व सममित शरीर (अपवाद – गोगलगाय)
  • शरीर डोके, पाय आणि आंतरांग संहती असे विभागले असते
  • आंतरांग संहती प्रावार या पटली संरचनेने आच्छादलेली असते
  • उदा. कालव, गोगलगाय, ऑक्टोपस, शिंपले इत्यादी
मृदुकाय प्रणीसंघ (Phylum - Mollusca)
मृदुकाय प्रणीसंघ (Phylum – Mollusca)

8. कंटकचर्मी प्राणीसंघ (Phylum – Echinodermata)

  • त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेट चे काटे असतात
  • फक्त समुद्रातच आढळतात
  • शरीर त्रिस्तरीय, देहगुहायुक्त असते.
  • प्रौढांमध्ये पंच-अरिय सममिती आढळते
  • नलिकापादच्या साहय्याने प्रचलन करणे आणि अन्न पकडणे
  • काही प्राणी स्थानबद्ध असतात
  • कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकिंचे किंवा पट्टीचे असते
  • चांगली पुनर्निनिर्मिती क्षमता
  • उदा. तारा मासा, सी-अर्चीन, ब्रीटलस्टार,सी-ककुंबर इत्यादी
कंटकचर्मी प्राणीसंघ (Phylum - Echinodermata)
कंटकचर्मी प्राणीसंघ (Phylum – Echinodermata)

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

प्राण्यांचे वर्गीकरण - असमपृष्ठरज्जू प्राणी याबद्दल माहिती मला कोठे मिळेल?

प्राण्यांचे वर्गीकरण - असमपृष्ठरज्जू प्राणी याबद्दल सर्व माहिती या लेखात दिली आहे.

तारा मासा याचा समावेश कोणत्या वर्गात होतो?

तारा मासा याचा समावेश कंटकचर्मी वर्गात होतो.