Table of Contents
Arogya Bharti Group C Re-Exam Date Declared: आरोग्य विभाग गट ‘क’ परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 महाराष्ट्रातील विविध जिल्हात झाली. पण काही तांत्रिक अडचणींमुळे काहीना पेपर मिळालेच नाही तर काही जणांना चुकीच्या संवर्गाचे पेपर मिळाले. विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून आरोग्य विभागाने आता ज्या उमेदवारांना चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळाल्या आहे त्यांची परीक्षा (Arogya Bharti Group C Re-Exam Date Declared) पुन्हा घेण्याचे ठरवले आहे. आज या लेखात आपण आरोग्य भरती 2021 गट क फेरपरीक्षा तारीख जाहीर | Arogya Bharti Group C Re-Exam Date Declared झाल्या त्याबद्दल माहिती पाहणार आहोत.
आरोग्य विभाग भरती 2021 परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे
Arogya Bharti Group C Re-Exam Date Declared | आरोग्य भरती 2021 गट क फेरपरीक्षा तारीख जाहीर
Arogya Bharti Group C Re-Exam Date Declared: सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गट-क संवर्गातील पदे भरण्यासाठीचे मे. न्यास कम्युनिकेशन प्रा.लि. यांचेमार्फत दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी लेखी परिक्षा घेण्यात आली. या परिक्षेदरम्यान काही उमेदवारांना चुकीचे प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचे निदर्शनास आल्यामुळे मे. न्यास कम्युनिकेशन यांनी उमेदवारांने दिलेला परिक्षेचा संवर्ग आणि प्रश्नपत्रिका क्रमांकानुसार चुकीची प्रश्नपत्रिका प्राप्त झालेल्या उमेदवारांची यादी सादर करण्याचे कळविण्यात आले होते. त्यानुसार मे.न्यास कम्युनिकेशन प्रा.लि. यांनी 12 संवर्गाचे एकूण 589 उमेदवारांची नावे कळविली आहेत. सदर उमेदवारांची लेखी परिक्षा दिनांक 28 नोव्हेंबर 2021 रोजी पुणे, नाशिक, लातूर व अकोला या जिल्हयात घेण्यात येणार आहे. या उमेदवारांची यादी आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे सोबतच खाली दिलेल्या लिंक वरून ती यादी PDF स्वरुपात डाउनलोड करू शकता. या उमेदवारांना त्यांचे नोंदणीकृत ईमेल आय. डी. आणि व्हॉटस-अप मोबाईलवर प्रवेश पत्र पाठवून देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
Arogya Bharti Group C Re-Exam उमेदवारांच्या नावांची यादी PDF
Arogya Bharti Group C Re-Exam Date Notice PDF
Study material for Arogya and ZP Bharti 2021 | आरोग्य व जि. प. भरती 2021 साठी अभ्यास साहित्य
Study material for Arogya and ZP Bharti 2021: आरोग्य व जिल्हा परिषद भरती 2021 मध्ये तांत्रिक विषयाला 40 % वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का अभ्यास असणे आवश्यक आहे. कारण हाच विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. आरोग्य व जिल्हा परिषद भरती 2021 परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda 247 मराठी तांत्रिक विषयातील सर्व टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आरोग्य भरतीच्या गट क च्या 24 ऑक्टोबर 2021 व गट ड च्या 31 ऑक्टोबर 2021 ला होणाऱ्या व आगामी जिल्हा परिषदेच्या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
तांत्रिक विषयातील टॉपिक
Latest Posts:
- MHADA भरती परीक्षेच्या तारखा जाहीर
- MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाइन नोंदणीची तारीख Extend झाली
- मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तर PDF- नोव्हेंबर
- महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2021 गट क कनिष्ठ लिपिक पेपर विश्लेषण
FAQS: Arogya Bharti Group C Re-Exam Date Declared
Q1. आरोग्य भरती गट क ची फेरपरीक्षा होणार आहे का?
Ans. होय, आरोग्य भरती गट क ची फेरपरीक्षा होणार आहे
Q2. आरोग्य भरती गट क ची फेरपरीक्षेची तारीख काय आहे?
Ans. आरोग्य भरती गट क ची फेरपरीक्षेची तारीख 28 नोव्हेंबर 2021 आहे.
Q3. आरोग्य भरती गट क ची फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र मला कुठे मिळेल?
Ans. आरोग्य भरती गट क ची फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारास मेल ने किवा What’s App वर मिळेल.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi