Table of Contents
आरोग्य विभाग भरती फेरपरीक्षा प्रवेशपत्र जाहीर 2021 | Arogya Vibhag Bharti Re-Exam Admit Card Out 2021: आरोग्य विभाग गट ‘क’ परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 महाराष्ट्रातील विविध जिल्हात झाली. पण काही तांत्रिक अडचणींमुळे काहीना पेपर मिळालेच नाही तर काही जणांना चुकीच्या संवर्गाचे पेपर मिळाले. विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून आरोग्य विभागाने आता ज्या उमेदवारांना चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळाल्या आहे त्यांची परीक्षा (Arogya Bharti Group C Re-Exam Date Declared) पुन्हा घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठीचे प्रवेशपत्र (Arogya Vibhag Bharti Re-Exam Admit Card Out 2021) उमेदवारांना डाउनलोड करण्यासाठी आता उपलब्ध झाले असून आज या लेखात आपण प्रवेशपत्र (Admit Card) कुठून व असे डाऊनलोड करायचे, प्रवेशपत्र डाऊनलोड करायची direct link याबद्दल माहिती पाहणार आहोत.
Arogya Vibhag Bharti Re-Exam Admit Card Out 2021 | आरोग्य विभाग भरती फेरपरीक्षा प्रवेशपत्र जाहीर 2021
Arogya Vibhag Bharti Re-Exam Admit Card Out 2021: आरोग्य विभाग भरती परीक्षा 2021 महाराष्ट्रतील विविध जिल्हात गट ‘क’ परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 पण काही तांत्रिक चुकीमुळे ज्या उमेदवारांना चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या त्यांची फेरपरीक्षा 28 नोव्हेंबर 2021 ला होणार आहे आरोग्य विभाग गट क चे प्रवेशपत्र दिनांक 25 नोव्हेंबर 2021 ला प्रसिद्ध झाले. आज या लेखात याबद्दल माहिती पाहणार आहोत.
आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ आणि गट ‘ड’ साठी अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Aarogya Vibhag Bharti 2021 Re-Exam Admit Card Important Dates | आरोग्य विभाग भरती फेरपरीक्षा 2021 परीक्षा प्रवेशपत्र महत्वाच्या तारखा
Aarogya Vibhag Bharti 2021 Important Dates: आरोग्य विभाग भरती 2021 चे admit card आलेले आहे. त्यासंबंधीच्या महत्वाच्या तारखा खालील प्रमाणे आहेत.
Aarogya Vibhag Re-Exam group ‘C’ : Admit Card Important Dates | |
Events | Date |
आरोग्य विभाग जाहिरात तारीख (Notification Date) | 1 सप्टेंबर 2021 |
आरोग्य विभाग ग्रुप C फेरपरीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड सुरु होण्याची तारीख (Start Date of Download admit card for group ‘C’ Re-Exam) | 25 नोव्हेंबर 2021 |
आरोग्य विभाग ग्रुप C फेरपरीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची शेवटची तारीख (End Date of Download admit card for group ‘C’ Re-Exam) | 28 नोव्हेंबर 2021 |
आरोग्य विभाग ग्रुप C फेरपरीक्षेची तारीख (Re-Exam date for Arogya Bharati Group C ) | 28 नोव्हेंबर 2021 |
Aarogya Vibhag Bharti Re-Exam Dates Out 2021 For Group C
Arogya Vibhag Bharati 2021 Where To Download Admit Card | आरोग्य विभाग भरती 2021 प्रवेशपत्र कुठे डाउनलोड करावे
Arogya Vibhag Bharati 2021 Where To Download Admit Card: आरोग्य भरतीच्या अधिकृत वेबसाइट वरून 28 नोव्हेंबर 2021 रोजी होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशप्रत्र आरोग्य विभागाने प्रकाशित केले आहे. त्याचप्रमाणे Adda247 मराठी या Website वर पण तुम्हाला Admit Card Download करण्यासाठी direct लिंक प्रदान करण्यात आली आहे.
आरोग्य विभाग भरती ग्रूप ‘C’ प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Arogya Vibhag Bharati 2021 How To Download Admit Card | आरोग्य विभाग भरती 2021 कसे डाउनलोड करावे
Arogya Vibhag Bharati 2021 How To Download Admit Card:आरोग्य विभागाकडून काही जणांना ई-मेल येत आहेत त्यावरूनही तुम्ही तुम्हचे Admit Card डाऊनलोड करू शकता. पण ज्यांना ई-मेल आला नाही त्यांनी घाबरून जाऊ नये. खालील स्टेप नुसार Admit Card डाऊनलोड करू शकता. आरोग्य विभाग भरती 2021 चे Admit Card कसे डाउनलोड करावे याची संपूर्ण माहिती आपण स्टेप नुसार बघणार आहोत.
- सर्वात पहिले आरोग्य भरती 2021 च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी किंवा वर दिलेल्या थेट लिंक वर Click करा.
- तेथे तुम्हाला डाउनलोड Admit Card असा ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करा.
- त्या नंतर फॉर्म भरतांना तुम्हाला Login Id टाका.
- आता नवे पेज उघडेल तेथे तुम्हाला Admit Card डाऊनलोड असा ऑप्शन दिसेल तेथे तुम्ही क्लिक करून Admit Card डाउनलोड करू शकता.
जिल्हा परिषद भरती मागील वर्षांच्या परीक्षेचे विश्लेषण पाहण्यसाठी येथे क्लिक करा.
Arogya Vibhag Bharati Updated Exam Timetable and Exam Pattern of Group C | आरोग्य विभाग भरती गट ‘क’ Updated परीक्षा वेळापत्रक व परीक्षेचे स्वरूप
Aarogya Vibhag Group ‘C’ & ‘D’ Updated Exam Pattern: आरोग्य विभाग गट ‘क’ ची परीक्षा 23 ओक्टोम्बर 2021 ला दोन सत्रात होणार असून सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या पदांची नावे आणि Updated परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे.
1.गट क प्रश्नपत्रिकेचे स्वरूप (सकाळ सत्र)
अ. क्र. | संवर्ग |
प्रश्नाची संख्या | एकूण | ||||
मराठी भाषा | इंग्लिश भाषा | बुद्धिमत्ता चाचणी | सामान्य ज्ञान | तांत्रिक प्रश्न | |||
1 | तांत्रिक पदे | 15 | 15 | 15 | 15 | 40 | 100 |
2 | अतांत्रिक पदे | 25 | 25 | 25 | 25 | 00 | 100 |
2. गट क प्रश्नपत्रिकेचे स्वरूप (दुपार सत्र)
अ. क्र. | संवर्ग |
प्रश्नाची संख्या | एकूण | ||||
मराठी भाषा | इंग्लिश भाषा | बुद्धिमत्ता चाचणी | सामान्य ज्ञान | तांत्रिक प्रश्न | |||
1 | तांत्रिक पदे | 15 | 15 | 15 | 15 | 40 | 100 |
2 | अतांत्रिक पदे | 25 | 25 | 25 | 25 | 00 | 100 |
Notice for Candidates | परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना
Notice for Candidates | परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : आरोग्य विभाग भरती 2021 साठी उमेदवारांना काही सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या खालीलप्रमाणे
- लांब पल्ल्यावरून प्रवास करणाऱ्या उमेदवारांनी अत्यंत काळजीपूर्वक प्रवासाचे नियोजन करावे. जेणेकरुन निर्धारित वेळेमध्ये परिक्षा केंद्रामध्ये पोहोचणे शक्य होईल.
- उमेदवारांनी रहदारीचा विचार करून प्रवासाचे नियोजन करावे.
- उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीने व स्वखर्चाने केंद्रावर परिक्षेसाठी निर्धारित वेळेत उपस्थित रहावे,
- फोटो असलेले पुरावा खालील पैकी एक मूळ ओळखपत्र, ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. (पॅन कार्ड, मूळ आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, फोटोसह राष्ट्रीयीकृत बँक पासबुक)
- आपल्या अर्जा संदर्भात परीक्षेची तारीख व वेळ नमूद करण्यात आली आहे कृपया आपल्या प्रवेश पत्रावर आपला फोटो चिटकवून घ्यावा, फोटो असलेले मूळ ओळखपत्र पुरावा म्हणून सोबत आणणे आवश्यक आहे.
- यापैकी एक मुळ फोटो ओळख पत्र व प्रवेश पत्र सादर न केल्यास परिक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल. कृपया लक्षात ठेवा- रेशन कार्ड, फोटो आयडीचे रंगीत झेरॉक्स, e-aadhar card आणि फोटो आयडीची सॉफ्ट कॉपी या परीक्षेत वैध फोटो ओळख पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही, आधार कार्डची रंगीत झेरॉक्स स्वीकारली जाणार नाही.
- प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या वेळेपूर्वी किमान एक तास आधी परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहणे परीक्षार्थीस अनिवार्य आहे.
- परिक्षा सुरु होण्याच्या निर्धारित वेळेच्या ३० मिनिट अगोदर परिक्षा केंद्रात प्रवेश बंद केला जाईल. उशीरा उपस्थित झाल्यामुळे प्रवेश नाकारल्यास उमेदवार स्वतः जबाबदार असतील उमेदवारांना परीक्षा समाप्त होईपर्यंत परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.
Study material for Arogya and ZP Bharti 2021 | आरोग्य व जि. प. भरती 2021 साठी अभ्यास साहित्य
Study material for Arogya and ZP Bharti 2021: आरोग्य व जिल्हा परिषद भरती 2021 मध्ये तांत्रिक विषयाला 40 % वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का अभ्यास असणे आवश्यक आहे. कारण हाच विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. आरोग्य व जिल्हा परिषद भरती 2021 परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda 247 मराठी तांत्रिक विषयातील सर्व टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आरोग्य भरतीच्या गट क च्या 24 ऑक्टोबर 2021 व गट ड च्या 31 ऑक्टोबर 2021 ला होणाऱ्या व आगामी जिल्हा परिषदेच्या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
तांत्रिक विषयातील टॉपिक
Latest Job Alert:
- MHADA भरती परीक्षेच्या तारखा जाहीर
- MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाइन नोंदणीची तारीख Extend झाली
- मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तर PDF- नोव्हेंबर
- महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2021 गट क कनिष्ठ लिपिक पेपर विश्लेषण
FAQs Arogya Vibhag Bharti Re-Exam Admit Card Out 2021
Q1. आरोग्य भरती 2021 गट क फेरपरीक्षेसाठी साठीचे प्रवेशपत्र निघाले आहे का?
Ans. होय, आरोग्य भरती 2021 गट क फेरपरीक्षेसाठी साठीचे प्रवेशपत्र निघाले आहे
Q2. आरोग्य भरती 2021 ग्रुप ‘C’ ची फेरपरीक्षा कधी आहे?
Ans. आरोग्य भरती 2021 ग्रुप ‘C’ ची फेरपरीक्षा 28 नोव्हेंबर 2021 ला आहे.
Q3. आरोग्य भरती 2021 परीक्षेचा कालावधी किती आहे?
Ans. आरोग्य भरती 2021 परीक्षेचा कालावधी 2 तास आहे.
Q4. आरोग्य भरती 2021 परीक्षेला जातांना कोणकोणते ओळखपत्र न्यावे लागेल?
Ans. आरोग्य भरती 2021 परीक्षेला जातांना आधार कार्ड, मतदान कार्ड किवा इतर कोणतेही सरकारने जारी केलेले ओळखपत्र न्यावे.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो