Table of Contents
आरोग्य विभाग परीक्षा विश्लेषण 2023
आरोग्य विभाग परीक्षा विश्लेषण 2023: आरोग्य विभाग 2023 भरती अंतर्गत दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी पहिल्या शिफ्टमध्ये स्टाफ नर्स, स्टोर कम लिनेन कीपर / लिनेन कीपर व कुशल कारागीर (वाहतूक) या पदासाठी परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली आहे. शिफ्ट 1 ची परीक्षा आता संपली असल्यामुळे या परीक्षेचे सविस्तर विश्लेषण आपणास या लेखात उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवाराच्या प्रतिसादानुसार स्टाफ नर्स, स्टोर कम लिनेन कीपर / लिनेन कीपर व कुशल कारागीर (वाहतूक) पदाची परीक्षा मध्यम स्वरुपाची होती. या लेखात 01 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या पहिल्या शिफ्टचे आरोग्य विभाग परीक्षा विश्लेषण 2023 देण्यात आले आहे. ज्यात विषयवार गुड अटेंम्ट (चांगले प्रयत्न), एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.
आरोग्य विभाग परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
आरोग्य विभाग परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते याबद्दल माहिती या लेखात देण्यात आली आहे. आरोग्य विभाग परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
आरोग्य विभाग परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | परीक्षा विश्लेषण |
विभाग | आरोग्य विभाग |
भरतीचे नाव | आरोग्य विभाग भरती 2023 |
पदाचे नाव | स्टाफ नर्स, स्टोर कम लिनेन कीपर / लिनेन कीपर व कुशल कारागीर (वाहतूक) |
लेखाचे नाव | आरोग्य विभाग परीक्षा विश्लेषण 2023 |
आरोग्य विभाग परीक्षा विश्लेषण 2023 | शिफ्ट 1, 01 डिसेंबर 2023 |
परीक्षेचा कालावधी | 02 तास |
एकूण गुण | 200 |
आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप 2023
आरोग्य विभाग भरती 2023 अंतर्गत स्टाफ नर्स, स्टोर कम लिनेन कीपर / लिनेन कीपर व कुशल कारागीर (वाहतूक) पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 5 याप्रमाणे 20 प्रश्न व तांत्रिक विषयातील 80 प्रश्न असे मिळून 100 प्रश्न विचारण्यात आले होते.
अ. क्र. | विषय | प्रश्नांची संख्या | गुण | कालावधी |
1 | मराठी भाषा | 05 | 10 | 02 तास |
2 | इंग्रजी भाषा | 05 | 10 | |
3 | सामान्य ज्ञान | 05 | 10 | |
4 | बौद्धिक चाचणी | 05 | 10 | |
5 | तांत्रिक प्रश्न | 80 | 160 | |
एकूण | 100 | 200 |
आरोग्य विभाग परीक्षा 2023: शिफ्टनुसार परीक्षेची वेळ
आरोग्य विभाग परीक्षा 2023 ही 01 डिसेंबर 2023 रोजी तीन शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे. आरोग्य विभाग पदाची शिफ्टनुसार परीक्षेची वेळ खाली देण्यात आली आहे.
शिफ्ट | परीक्षेची वेळ |
शिफ्ट 1 | सकाळी 09 ते 11.00 |
शिफ्ट 2 | दुपारी 01.00 ते 03.00 |
शिफ्ट 3 | संध्याकाळी 05.00. ते 07.00 |
आरोग्य विभाग परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 1)
आरोग्य विभाग भरती 2023 अंतर्गत स्टाफ नर्स, स्टोर कम लिनेन कीपर / लिनेन कीपर व कुशल कारागीर (वाहतूक) पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकाल. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.
अ. क्र | विषय | गुड अटेंम्ट | काठीण्य पातळी |
1 | मराठी भाषा | 3-4 | सोपी |
2 | इंग्रजी भाषा | 2-3 | मध्यम |
3 | सामान्य ज्ञान | 2-3 | मध्यम |
4 | बौद्धिक चाचणी | 2-3 | मध्यम |
5 | तांत्रिक प्रश्न | 70-73 | |
एकूण | 79-86 | मध्यम |
विषयानुरूप आरोग्य विभाग परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 1)
आरोग्य विभाग भरती 2023 अंतर्गत स्टाफ नर्स, स्टोर कम लिनेन कीपर / लिनेन कीपर व कुशल कारागीर (वाहतूक) पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 5 याप्रमाणे 20 प्रश्न व तांत्रिक विषयातील 80 प्रश्न असे मिळून 100 प्रश्न विचारण्यात आले होते. खाली आम्ही विषयानुसार विश्लेषण प्रदान केले आहे.
मराठी विषयाचे विश्लेषण
आरोग्य विभाग भरती 2023 अंतर्गत स्टाफ नर्स, स्टोर कम लिनेन कीपर / लिनेन कीपर व कुशल कारागीर (वाहतूक) पदाच्या परीक्षेत मराठी विषयावर एकूण 05 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने काळ, म्हणी इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते. परीक्षेत विचारण्यात आलेले सर्व विभागांची माहिती खाली दिली आहे.
- काळ- 1 प्रश्न
- म्हणी -1 प्रश्न
- लेखक व पुस्तके- 1 प्रश्न
- वाक्याचा प्रकार- 1 प्रश्न
- नामाचा प्रकार- 1 प्रश्न
इंग्रजी विषयाचे विश्लेषण
आरोग्य विभाग भरती 2023 अंतर्गत स्टाफ नर्स, स्टोर कम लिनेन कीपर / लिनेन कीपर व कुशल कारागीर (वाहतूक) पदाच्या परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Fill in the blanks, Phrases इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते.
- Phrases- 1Qtn
- Proverb-1 Qtn
- Fill in the blanks- 1 Qtn
- Error Detection- 1 Qtn
- One word Substitution- 1Qtn
सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण
- चालू घडामोडी वर प्रश्न: जास्त प्रश्न
- इतिहास 1 प्रश्न
- भूगोल
- राज्यघटना- 1प्रश्न
- स्टॅटिक जी.के.-1प्रश्न
- RTI- 1प्रश्न
परीक्षेत आलेले प्रश्न खाली दिले आहेत
- नवव्या शतकातील राजा मिहीर भोज कोणत्या घराण्याशी संबंधित आहे?
- RTI कायदा संपूर्ण भारतात लागू करण्याआधी कोणत्या राज्यात लागू झाला?
- भारताचा ऐरावत सुपर कम्प्युटर जगात कितव्या स्थानी आहे?
- संविधानावर एक प्रश्न
बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण
आरोग्य विभाग भरती 2023 अंतर्गत स्टाफ नर्स, स्टोर कम लिनेन कीपर / लिनेन कीपर व कुशल कारागीर (वाहतूक) पदाच्या परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 05 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने बैठक व्यवस्था, अक्षरमाला, पदावली इत्यादी घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.
- BODMAS (Simplification) – 1 प्रश्न
- Approximation – 1 प्रश्न
- अंक मालिका- 1 प्रश्न
- बैठक व्यवस्था – 1प्रश्न
तांत्रिक विषयाचे विश्लेषण
आरोग्य विभाग भरती 2023 अंतर्गत स्टाफ नर्स, स्टोर कम लिनेन कीपर / लिनेन कीपर व कुशल कारागीर (वाहतूक) पदाच्या परीक्षेत तांत्रिक विषयात एकूण 80 प्रश्न विचारण्यात आले होते. तांत्रिक विषयात अभ्यासक्रमाशी निगडीत प्रश्न विचारण्यात आले होते.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
आरोग्य विभाग भरती 2023 बद्दल इतर लेख