Marathi govt jobs   »   Maharashtra Aroyga Vibhag Bharti 2023   »   आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप 2023

आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप 2023, गट क आणि गट ड पदाच्या परीक्षेचे स्वरूप तपासा

आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप 2023

आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप 2023: आरोग्य विभागाने गट क आणि गट ड संवर्गातील एकूण 10949 पदांच्या भरतीसाठी आरोग्य विभाग भरती जाहीर केली. आरोग्य विभागाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर आपल्याला आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 नुसारच परीक्षेची तयारी करावी लागेल. आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 आपल्याला कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारल्या जाणार आहे. कोणत्या विषयाची तयारी जास्त करावी लागणार आहे याबद्दल माहिती मिळते. या लेखात आपण आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 बद्दल तपशीलवार माहिती मिळवू शकता.

आरोग्य विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023

आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप 2023: विहंगावलोकन

आरोग्य विभाग भरती 2023 परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 माहिती असणे गरजेचे आहे. आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षेचा अभ्यासक्रम
विभाग आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव आरोग्य विभाग भरती 2023
पदांची नावे

गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे

एकूण रिक्त पदे 10949
लेखाचे नाव आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप 2023
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in

आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 (गट क)

आरोग्य विभाग भरती 2023 मधील गट क संवर्गाची परीक्षा एकूण 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. गट क पदाच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जाणार आहे. विभागाशी निगडीत तांत्रिक / व्यावसायिक संवर्गातील पदांसाठी 80 टक्के गुण हे पदाशी निगडीत तांत्रिक / शैक्षणिक अर्हतेशी संबंधित असतील आणि उर्वरित 20 टक्के गुण हे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व गणित यांच्याशी निगडीत असतील. ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता प्रश्नप्रत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमामध्ये असतील.

गट क संवर्गात गृहपाल नि वस्त्रपाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ/ क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, फार्मसी अधिकारी, ईसीजी तंत्रज्ञ, डेंटल मेकॅनिक, डायलिसिस टेक्निशियन, स्टाफ नर्स गव्हर्नमेंट, स्टाफ नर्स प्रायव्हेट, टेलिफोन ऑपरेटर, ड्रायव्हर, टेलर, प्लंबर, सुतार, नेत्ररोग अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सहाय्यक डॉक्टर, सहाय्यक डॉक्टर , गैर-वैद्यकीय सहाय्यक, वॉर्डन, रेकॉर्ड कीपर, पर्यवेक्षक, इलेक्ट्रीशियन (वाहतूक), कुशल कलाकार, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, HEMR तंत्रज्ञ, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR), दंत स्वच्छता, सांख्यिकी तपासनीस, फोरमन, सेवा अभियंता, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/सामाजिक अधीक्षक (वैद्यकीय), उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक, क्ष-किरण सहाय्यक, ईईजी तंत्रज्ञ, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, आरोग्य निरीक्षक, ग्रंथपाल, इलेक्ट्रीशियन, ऑपरेशन थिएटर सहाय्यक, मोल्डरूम तंत्रज्ञ/रेडिओग्राफी तंत्रज्ञ आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) या संवर्गातील पदाचा समावेश होतो. आरोग्य गट क परीक्षेचे स्वरूप खाली देण्यात आले आहे.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी 20 40 02 तास
2 इंग्रजी
3 सामान्य ज्ञान
4 बौद्धिक चाचणी
5 तांत्रिक / व्यावसायिक विषय 80 160
एकूण 100 200

 

टीप:

  • गट क संवर्गातील सर्व पदांच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • प्रत्येक योग्य उत्तरासाठी 2 गुण देण्यात येईल.
  • ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता प्रश्नप्रत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमामध्ये असतील.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
  • तांत्रिक / व्यावसायिक विषयावर एकूण 80 टक्के प्रश्न विचारल्या जातील.
  • नकारात्मक गुणांकन पद्धती बद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही.
  • परीक्षेच्या दर्जाबद्दल अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. जशी परीक्षेच्या दर्जाबद्दल माहिती उपलब्ध होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू.
  • गट क संवर्गातील लघुलेखक (उच्चश्रेणी व निम्नश्रेणी) आणि लघुटंकलेखक पदाच्या परीक्षेचे स्वरूप अद्याप जाहीर झाले नाही. तरीही यात मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयाचे प्रत्येकी 25 प्रश्न विचारल्या जाऊ शकतात.

वाहनचालक पदासाठी सूचना

  • वाहनचालक या पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयांवरील एकूण 20 प्रश्नांकरिता 40 गुणांची व विषयाधारीत 80 प्रश्नांकरिता 160 गुण अशी एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल व व्यावसायिक चाचणी घेऊन उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड केली जाईल.
  • उपसंचालक, आरोग्य सेवा (परिवहन) पुणे यांच्या आस्थापनेवरील पदांकरिता व्यावसायिक चाचणी परिक्षा देखील घेण्यात येईल.

आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 (गट ड व नियमित क्षेत्र कर्मचारी)

आरोग्य विभाग भरती 2023 मधील गट ड पदाच्या परीक्षेत एकूण 100 प्रश्न 200 गुणांकरिता विचारल्या जातील. गट ड व नियमित क्षेत्र कर्मचाऱ्यांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयासाठी प्रत्येकी 25 प्रश्न विचारल्या जाणार आहे. गट ड पदाच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जाणार आहे. गट ड प्रवर्गासाठी आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 खाली देण्यात आले आहे.

गट ड अतांत्रिक पदे

गट ड अतांत्रिक पदांमध्ये शिपाई, कक्षसेवक, बाह्य रुग्णसेवक, दंत सहाय्यक, क्ष-किरण परिचर, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, पार्ट टाईम परिचर, आरोग्य परिचर, स्त्री परिचर, पुरुष परिचर, अंधारखोली परिचर, दवाखाना परिचर, परिचर, दवाखाना सेवक, पुरुष सेवक, नर्सिंग ऑर्डरली, अपघात विभाग सेवक, पंप मॅकॅनिक, सहाय्यक गट ड, वाहन स्वच्छक, स्वच्छक, मजदूर, आया, मदतनीस, शिंपी, वेष्टक, संदेश वाहक, लेदर वर्कर, चतर्थश्रेणी कर्मचारी, सहा. शुश्रुषा प्रसविका, प्रयोगशाळा स्वच्छक या सर्व पदाचा समावेश होतो.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण परीक्षेचा दर्जा कालावधी
1 मराठी 25 50 दहावी 120 मिनिटे
2 इंग्रजी 25 50 दहावी
3 सामान्य ज्ञान 25 50 दहावी
4 बौद्धिक चाचणी 25 50 दहावी
एकूण 100 200  

टीप:

  • गट ड पदांच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • प्रत्येक योग्य उत्तरासाठी 2 गुण देण्यात येईल.
  • परीक्षेचा दर्जा हा दहावी परीक्षेएवढा असेल.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
  • नकारात्मक गुणांकन पद्धती बद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही.

गट ड (अकुशल कारागीर – परिवहन व एचईएमआर)

गट ड संवर्गातील अकुशल कारागीर (परिवहन व एचईएमआर) पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची होणार आहे. अकुशल कारागीर पदाच्या परीक्षेत मराठी, इंगजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी करिता करिता प्रत्येकी 5 प्रश्न याप्रमाणे व तांत्रिक ज्ञानावर आधारित 80 प्रश्न असे एकुण 100 प्रश्नांची 200 गुणांची ऑनलाईन परिक्षा राहील. अकुशल कारागीर पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण परीक्षेचा दर्जा कालावधी
1 मराठी 05 10 दहावी 120 मिनिटे
2 इंग्रजी 05 10 दहावी
3 सामान्य ज्ञान 05 10 दहावी
4 बौद्धिक चाचणी 05 10 दहावी
5 तांत्रिक ज्ञान 80 160 दहावी
एकूण 100 200  

टीप:

  • अकुशल कारागीर पदांच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • प्रत्येक योग्य उत्तरासाठी 2 गुण देण्यात येईल.
  • परीक्षेचा दर्जा हा दहावी परीक्षेएवढा असेल.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
  • अकुशल कारागीर पदाच्या परीक्षेत मराठी, इंगजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयात प्रत्येकी 5 प्रश्न विचारल्या जाणार आहे व तांत्रिक विषयावर 80 प्रश्न विचारल्या जातील.
  • नकारात्मक गुणांकन पद्धती बद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

आरोग्य विभाग भरती 2023 बद्दल इतर लेख

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप 2023, गट क आणि गट ड पदाच्या परीक्षेचे स्वरूप_4.1

FAQs

आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 जाहीर झाले आहे का?

होय, आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 जाहीर झाले आहे.

आरोग्य विभागाची परीक्षा किती गुणांची होणार आहे?

आरोग्य विभागाची परीक्षा एकूण 200 गुणांची होणार आहे.

आरोग्य विभाग गट क पदाच्या परीक्षेत तांत्रिक विषयाचे वेटेज किती आहे?

आरोग्य विभाग गट क पदाच्या परीक्षेत तांत्रिक विषयाचे वेटेज 80 टक्के आहे.

आरोग्य विभाग गट क पदाच्या परीक्षेत तांत्रिक विषय कोणत्या माध्यमात विचारल्या जाणार आहे?

आरोग्य विभाग गट क पदाच्या परीक्षेत ज्या पदांची शैक्षणिक पात्रता पदवी आहे त्या सर्व पदांच्या परीक्षेत तांत्रिक विषय इंग्लिश मध्ये विचारल्या जाणार आहे.