Table of Contents
आरोग्य विभाग परीक्षा 2023 अपडेट
आरोग्य विभाग परीक्षा 2023 अपडेट: आरोग्य विभागाने दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी गट ड च्या परीक्षा कालावधीबाबत अद्ययावत माहिती जाहीर केली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी विविध गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदांच्या भरती साठी आरोग्य विभाग भरती 2023 जाहीर केली होती. आरोग्य विभाग भरती 2023 अंतर्गत गट क आणि ड संवर्गातील एकूण 10949 पदांची भरती होणार आहे. आज या लेखात आपण आरोग्य विभाग परीक्षा 2023 अपडेट बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात गट ड च्या परीक्षा कालावधीबाबत अद्ययावत माहितीचा समावेश आहे.
आरोग्य विभाग परीक्षा 2023 अपडेट: विहंगावलोकन
आरोग्य विभाग परीक्षा 2023 अपडेट जाहीर झाले आहे. आरोग्य विभाग परीक्षा 2023 अपडेटचे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.
आरोग्य विभाग परीक्षा 2023 अपडेट: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभाग | आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | आरोग्य विभाग भरती 2023 |
पदे | गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे |
एकूण रिक्त पदे | 10949 |
निकारीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
लेखाचे नाव | आरोग्य विभाग परीक्षा 2023 अपडेट |
आरोग्य विभाग भरती परीक्षा 2023 |
30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023 |
अधिकृत संकेतस्थळ | www.arogya.maharashtra.gov.in |
आरोग्य विभाग परीक्षा 2023 अपडेट अधिकृत सूचना
आरोग्य विभागाने दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी गट ड च्या परीक्षा कालावधीबाबत अद्ययावत माहिती जाहीर केली आहे. ज्यानुसार अकुशल कारागीर (HEMR), अकुशल कारागीर (वाहतूक), नियमित क्षेत्र कामगार (फवारणी कामगार) आणि नियमित क्षेत्र कामगार (इतर) या पदांची ऑनलाईन परीक्षा ही जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे 120 मिनिटाची (2 तास) घेण्यात येणार आहे. याआधी 20 नोव्हेंबर 2023 रोजी आरोग्य विभागाने अद्यायवत वेळापत्रक जाहीर केले होते ज्यानुसार गट ड च्या पदांच्या परीक्षेचा कालावधी हा 90 मिनिटे करण्यात आला होता परंतु आता तो पुन्हा बदलून 120 मिनिटे करण्यात आला आहे.
आरोग्य विभाग परीक्षा 2023 अपडेट अधिकृत सूचना PDF
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
-
आरोग्य विभाग भरती 2023 बद्दल इतर लेख
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप