Table of Contents
आरोग्य विभाग भरती 2024 अपडेट
आरोग्य विभाग भरती 2024 अपडेट: आरोग्य विभागाने दिनांक 03 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्धीपत्रक जारी करून प्राप्त आक्षेप हरकतीबाबत माहिती जाहीर केली आहे. आरोग्य विभागाने दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी आरोग्य विभाग भरती उत्तरतालिका 2023 जाहीर केली होती. आरोग्य विभाग परीक्षा 2023 ही 12 डिसेंबर 2023 रोजी समाप्त झाली होती. या लेखात आपण आरोग्य विभाग भरती 2024 अपडेट बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
आरोग्य विभाग भरती 2024 अपडेट: विहंगावलोकन
आरोग्य विभाग भरती 2024 अपडेट दिनांक 03 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आली. आरोग्य विभाग भरती 2024 अपडेट चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकता.
आरोग्य विभाग अपडेट 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभाग | आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | आरोग्य विभाग भरती 2023 |
पदे | गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे |
एकूण रिक्त पदे | 10949 |
निकारीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
लेखाचे नाव | आरोग्य विभाग अपडेट 2024 |
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 29 ऑगस्ट 2023 |
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख | 22 सप्टेंबर 2023 |
आरोग्य विभाग उत्तरतालिका 2023 |
15 डिसेंबर 2023 |
अधिकृत संकेतस्थळ | www.arogya.maharashtra.gov.in |
आरोग्य विभाग अपडेट आणि इतर महत्वाच्या तारखा
आरोग्य विभागामार्फतआरोग्य विभाग उत्तरतालिका 2023 दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आली आहे. आरोग्य विभाग भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.
आरोग्य विभाग अपडेट 2024 व इतर महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
आरोग्य विभाग भरती 2023 ची अधिसूचना | 29 ऑगस्ट 2023 |
आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 29 ऑगस्ट 2023 |
आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 सप्टेंबर 2023 |
आरोग्य विभाग भरती परीक्षा 2023 | 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023 |
आरोग्य विभाग भरती निकाल 2023 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
आरोग्य विभाग भरती 2023 उत्तरतालिका | 15 डिसेंबर 2023 |
आरोग्य विभाग भरती अपडेट 2024 | 03 जानेवारी 2024 |
आरोग्य विभाग उत्तरतालिका 2023 प्राप्त आक्षेपांबद्दल प्रसिद्धीपत्रक
आरोग्य सेवा आयुक्तालय अतर्गत गट-क व ड संवर्गातील परीक्षा-2023 राज्यातील 29 जिल्हयामध्ये 108 परीक्षा केंद्रामध्ये दिनांक 30/11/2023 ते 07/12/2023 व दिनाक 12/12/2023 या तारखाना आयोजित करण्यात आलेली आहे. परिक्षा झाल्यानंतर मे. टि.सी.एस.आय.ओ.एन. यांचेकडून दि.15/12/2023 पासून संबंधित उमेदवाराच्या लॉगिन आय.डी. वर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तर पत्रिका (Answer Sheet) व उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यावर संबधित उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) च्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न, प्रश्नाचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप / हरकत असल्यास सवर आक्षेप नोंदविण्यासाठी दि.18-12-2023 ते दि. 20-12-2023 या कालावधीत टि.सी.एस. कडून उमेदवारांच्या लॉगिन अकाऊंट वरुन लिक उपलब्ध करून देण्यात आली होती. दरम्यानच्या काळात व त्यानंतर ईमेलव्दारे, लेखी अथवा अन्य मार्गाने प्राप्त झालेल्या / होणा-या आक्षेप/हरकतींचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांच्या केवळ लॉगिन अकाऊंट लिकवरुन प्राप्त झालेल्या आक्षेप / हरकतीची आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर प्राप्त आक्षेपांबाबत टीसीएस कंपनीच्या रामितीमार्फत कार्यवाही करणेत येऊन उमेदवारांना त्यांचे लॉग इन आयडीवर माहिती उपलब्ध करून देणेत येणार आहे. ज्या पदाच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप / हरकत समितीमार्फत स्विकृत झालेत त्या पदांच्या सुधारित (Answer Key) उत्तर तालिका संबंधित उमेदवारांच्या (Log in) लॉग इन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. यास्तव वर नमूद केलेप्रमाणे विहीत कालावधीमध्ये केलेल्या लॉगिन अकाऊंट वरील आक्षेप/हरकतीव्यतिरिक्त कोणतेही आक्षेप / हरकती विचारार्थ घेण्यात येणार नाही, याची सर्व सबधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.
प्राप्त माहितीनुसार आरोग्य विभाग परीक्षेसाठी एकूण 10763 आक्षेप प्राप्त झाले असून पदानुसार आक्षेप हरकतींची संख्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अधिकृत प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करा.
आरोग्य विभाग उत्तरतालिका 2023 प्राप्त आक्षेपांबद्दल प्रसिद्धीपत्रक PDF
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
आरोग्य विभाग भरती 2023 बद्दल इतर लेख
- आरोग्य विभाग भरती 2023 ची अधिसूचना
- आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 (गट क आणि गट ड)
- आरोग्य विभाग भरती 2023 मुदतवाढ नोटीस