Table of Contents
सहायक प्राध्यापक भरती 2023
सहायक प्राध्यापक भरती 2023: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 2000 सहायक प्राध्यापक पदांची भरती करण्याची मान्यता दिली आहे. लवकरच सहायक प्राध्यापक भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना जाहीर होणार आहे. प्राप्त माहितीनुसार सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील उच्च स्तरीय सचिव समितीने मंजूर केल्याल्या 3580 पदांपैकी भरलेली 1492 पदे वजा करून उर्वरित 2088 पदांच्या पदभरतीस मान्यता मिळाली आहे. आज या लेखात आपण याच सहायक प्राध्यापक भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
सहायक प्राध्यापक भरती 2023: विहंगावलोकन
सहायक प्राध्यापक भरती 2023 लवकरच जाहीर होणार असून सहायक प्राध्यापक भरती 2023 बद्दल संक्षिप्त आढावा खालील तक्त्यात देण्यात आला आहे.
सहायक प्राध्यापक भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | उच्च व तंत्र शिक्षण विभाग |
भरतीचे नाव | सहायक प्राध्यापक भरती 2023 |
पदाचे नाव |
सहायक प्राध्यापक |
एकूण रिक्त पदे | 2088 (अपेक्षित) |
सहायक प्राध्यापक भरती 2023 अधिसूचना | लवकरच जाहीर होईल |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ |
https://techedu.maharashtra.gov.in/
|
सहायक प्राध्यापक भरती 2023 बद्दल अद्ययावत माहिती
सहायक प्राध्यापक भरती 2023: शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक व धोरण 2020 लागू करण्यात आले आहे. या धोरणामुळे अभ्यासक्रमात रचनात्मक बदल होत अंमलबजावणीसाठी कौशल्येपूर्ण प्राध्यापकांची गरज आहे. त्यासाठी सहायक प्राध्यापक संवर्गातील 2088 पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आली आहे. उच्च शिक्षण विभागाने याबाबत 24 जुलै 2023 रोजी शासन निर्णय काढला आहे.
उच्च शिक्षण संचालयाने दिलेल्या प्रस्तावानुसार 2088 पदांपैकी उर्वरित पदे स्वायत्त महाविद्यालयांना वाटप करायची असल्याने प्रत्येक महाविद्यालयास 71.20 टक्के भरता येतील. तसेच अकृषी विद्यापीठाशी संलग्न अशासकीय अनुदानित 66 स्वायत्त महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापकांची 451 पदे भरली जाणार आहेत. वृत्तपत्रातील सहायक प्राध्यापक भरती 2023 बद्दल माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
सहायक प्राध्यापक भरती 2023 ची बातमी (29 जुलै 2023)
सहायक प्राध्यापक भरती 2023 चा शासन निर्णय
सहायक प्राध्यापक भरती 2023 चा शासन निर्णय: महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिनांक 24 जुलै 2023 रोजी सहायक प्राध्यापक भरती 2023 चा शासन निर्णय निर्गमित केला. या शासन निर्णयातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहे.
- संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार 2088 पदांपैकी उर्वरित पदे स्वायत्त महाविद्यालयांना वाटप करावयाचे असल्यास प्रत्येक महाविद्यालयास 71.20% भरता येतील. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिनस्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयात स्वायत्त दर्जा प्राप्त असणारी एकूण 84 महाविद्यालये आहेत.
- सदर महाविद्यालयांपैकी 18 महाविद्यालयांमध्ये 71.20% पदे भरलेली आहेत. उर्वरित 66 महाविद्यालयांना दि. 01 ऑक्टोबर 2017 रोजीच्या विद्यार्थी संख्येवर आधारीत अनुज्ञेय पदांच्या मर्यादेत 2088 पैकी शिल्लक असलेल्या पदांचे वाटप समप्रमाणात म्हणजे प्रत्येक महाविद्यालयातील 71.20% भरले जातील.
- प्रथमतः अतिरिक्त ठरलेल्या सहायक प्राध्यापक यांचे रिक्त पदांवर तातडीने समायोजित करण्यात यावे. संबंधीत विषयाकरीता सहायक प्राध्यापक पद अतिरिक्त नसल्याचे विभागीय सहसंचालकांनी प्रमाणित केल्यानंतरच संबंधीतांना पदभरतीची जाहिरात देता येईल.
- शासनाने मंजूर केलेल्या पदसंख्येच्या मर्यादेत पदभरती केली जावी. मात्र, मान्य असलेल्या रिक्त पदांपैकी कोणते विषयाची पदे प्रथम भरावी हा निर्णय संबंधीत महाविद्यालयाचा असेल. त्या व्यतिरिक्त पदांवरील पदभरती केल्यास अशा उमेदवारांच्या वेतनाची जबाबदारी ही संबंधीत संस्थेची असेल.
- राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर पदांचा आकृतिबंध निश्चित करण्याच्या अनुषंगाने उच्चस्तरीय सचिव समितीने काही बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश दिलेले असल्याने, अद्याप आकृतिबंध निश्चित झालेला नाही. त्यामुळे पदभरतीवरील निर्बंध शिथील करुन उपरोक्त प्रमाणे पद भरतीस मान्यता देतांना दिनांक 01 ऑक्टोबर 2017 च्या विद्यार्थी संख्येवर अनुज्ञेय होणारी रिक्त पदे ही आधारभूत मानून अनुज्ञेय करण्यात आलेली आहेत. तथापि, आकृतिबंध अंतिम झालेला नसल्याने, आकृतिबंधास वित्त विभागाची अंतिम मंजुरी मिळेपर्यंत सदरची पदे अंतिम समजण्यात येऊ नयेत.
- अकृषि विद्यापीठ संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील अनुज्ञेय पदभरती करताना विद्यापीठ अधिनियमातील विहीत तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच विहीत प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतरच नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात यावेत.
24 जुलै 2023 रोजी जाहीर झालेला सहायक प्राध्यापक भरती 2023 चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
सहायक प्राध्यापक भरती 2023 शासन निर्णय (24 जुलै 2023)
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप