Table of Contents
महाराष्ट्र राज्याची पार्श्वभूमी
Title | Link | Link |
MPSC परीक्षा 2024 – अभ्यास योजना | MPSC Exam 2024 – Study Plan | अँप लिंक | वेब लिंक |
मुंबई इलाखा (1618-1937) :-
मुंबई इलाखा एकूण जिल्हे : 25
प्रादेशिक विभाग : 4 (अहमदाबाद, पुणे, बेळगांव, कराची)
बॉम्बे प्रांत (1937-47) :-
1935 च्या कायद्यानुसार 1937 मध्ये स्थापना यामध्ये संस्थानांचे 2 गट व ब्रिटिश जिल्हे असे या प्रांताचे विभाजन.
मुंबई राज्य (1947-56) :-
भारत स्वातंत्र्याच्या वेळी मुंबई प्रांताचे तीन राज्यामध्ये विभाजन. 1. सौराष्ट्र, 2. मुंबई 3. कच्छ
द्विभाषिक मुंबई राज्य (1956-60) :-
कच्छ व सौराष्ट्र या प्रांताचे विलिनिकरण मुंबई राज्यात करून 1956 साली फाजल अली कमिशनच्या शिफारशीनुसार या राज्याची स्थापना.
महाराष्ट्र राज्य (1 मे 1960) :-
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनानंतर 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्य स्थापन झाले.
(१ मे : महाराष्ट्र दिन)
महाराष्ट्र राज्यात या कालावधीत 26 जिल्ह्यांचा समावेश होता
- पुर्वीच्या मुंबई राज्याचे 13 जिल्हे महाराष्ट्रात समाविष्ट झाले.
- हैद्राबाद राज्यातील 5 जिल्हे महाराष्ट्रात समाविष्ट झाले. (औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, उस्मनाबाद)
- मध्यप्रांतातील विदर्भाचे 8 जिल्हे महाराष्ट्रात समाविष्ट झाले. (नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, बुलढाणा, अकोला)
त्याच प्रमाणे खालील चार विभागाचा समावेश होता
1.मुंबई विभाग (7) : बृहन्मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव
2.पुणे विभाग (6) : पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.
3.नागपूर विभाग (8) : नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा,यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला.
4.औरंगाबाद विभाग (5) : औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद
१ मे १९६० रोजी महाराष्ट्रात चार विभाग, २६ जिल्हे, २५३ तालुके, २८९ शहरे व ३५५७ खेडी अस्तीत्वात होती.
१९८१ साली पुणे व मुंबई विभाग यांची पुर्नरचना होऊन नाशिक हा नवीन प्रशासकीय व महसूल विभाग तयार झाला. तसेच नागपूर विभागाची पुर्नरचना होऊन अमरावती हा प्रशासकीय विभाग तयार झाला.
महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळची स्थिती |
महाराष्ट्राची सध्याची स्थिती |
प्रशासकीय विभाग : 06 (कोकण, पुणे, औरंगाबाद, नागपूर) जिल्हे : 26 तालुके : 235 लोकसंख्या : 04 कोटी |
प्रशासकीय विभाग : 06 (औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, कोकण – क्षेत्रफळानुसार उतरता क्रम) जिल्हे : 36 (पालघर-36 वा 2014) तालुके : 358 (सर्वाधिक औरंगाबाद विभागात – 76) लोकसंख्या : 11.23 कोटी |
सद्यस्थितीत ६ प्रशासकीय विभागाअंतर्गत महाराष्ट्रात ३६ जिल्हे अस्तित्वात आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.