Marathi govt jobs   »   Study Materials   »   भाऊ दाजी लाड व बाळशास्त्री जांभेकर

भाऊ दाजी लाड व बाळशास्त्री जांभेकर | Bhau Daji Lad and Balshastri Jambhekar : MPSC Gazetted Civil Services Exam 2024 अभ्यास साहित्य

भाऊ दाजी लाड व बाळशास्त्री जांभेकर

भाऊ दाजी लाड व बाळशास्त्री जांभेकर : MPSC Gazetted Civil Services Exam 2024 या परीक्षेत इतिहास विषयात महाराष्ट्रातील समाज सुधारकांवर (Social Reformers of Maharashtra) बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या घटकाचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. महाराष्ट्रातील समाज सुधारक (Social Reformers of Maharashtra) घटकाचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा आहे.

MPSC Gazetted Civil Services Exam 2024 : अभ्यास साहित्य प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Gazetted Civil Services Exam 2024 साठी मागील वर्षांचे प्रश्न स्पष्टीकरणासहित Quiz च्या स्वरूपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

भाऊ दाजी लाड व बाळशास्त्री जांभेकर : विहंगावलोकन

भाऊ दाजी लाड व बाळशास्त्री जांभेकर: विहंगावलोकन
श्रेणी अभ्या साहित्य
उपयोगिता MPSC Gazetted Civil Services Exam 2024 व इतर सर्व स्पर्धा परीक्षा
विषय महाराष्ट्राचा इतिहास
लेखाचे नाव भाऊ दाजी लाड व बाळशास्त्री जांभेकर
लेखातील मुख्य घटक

भाऊ दाजी लाड व बाळशास्त्री जांभेकर यांच्या विषयी सविस्तर माहिती

महाराष्ट्रातील समाजसुधारक – भाऊ दाजी लाड

MPSC Social Reformers of Maharashtra- Bhau Daji Lad: (1822 – 1874)  भाऊ दाजी लाड (Social Reformers of Maharashtra) हे महाराष्ट्रातील एक प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक व कुशल धन्वतंरी होते. त्यांचे पूर्ण नाव रामकृष्ण विठ्ठल लाड. त्यांच्या वडीलांना दाजी म्हणत व मित्र परिवारात ते भाऊ या नावाने परिचित होते. त्यामुळे पुढे भाऊ दाजी हे नाव रूढ झाले.

MPSC Social Reformers of Maharashtra- Bhau Daji Lad | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक - भाऊ दाजी लाड
भाऊ दाजी लाड
  • जन्म आजोळी गोव्यातील मांजरे (पेडणे तालुका) या गावी झाला.
  • वडील पार्से (गोवा) येथे शेती तसेच कारकुनीचे काम करीत.
  • व्यवसायानिमित्त लाड कुटुंब मुंबईला गेले (1832). तिथे विठ्ठलराव मातीच्या बाहुल्या करून विकत असत.
  • भाऊदाजींचे प्राथमिक शिक्षण नारायणशास्त्री पुराणिकांच्या मराठी शाळेत झाले.
  • पुढे एल्फिन्स्टन विद्यालय व कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले.
  • खाजगीरित्या त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले.
  • त्यांची एल्फिन्स्टन विद्यालयात अध्यापक म्हणून नियुक्ती झाली (1843). या सुमारास त्यांचा पार्वतीबाई या मुलीबरोबर विवाह झाला.
  • त्यांना विठ्ठल व व्दारकानाथ हे दोन मुलगे होते. व्दारकानाथ तारूण्यातच निधन पावला. वडीलांनी संन्यास घेऊन एलेफंटा (घारापुरी) येथे वास्तव्य केले.
  • भाऊंनी कच्छ, काठेवाड या गुजरातच्या विभागातील बालकन्या हत्येच्या प्रथेवर इंग्रजी व गुजराती अशा दोन्ही भाषांत एक निबंध लिहिला.
  • निबंधस्पर्धेत त्यांना 600 रूपयांचे पारितोषिक मिळाले आणि त्यांच्या चिकित्सक अभ्यासू संशोधनवृत्तीला चालना मिळाली. डॉ. जॉन विल्सन यांनी आपल्या ग्रंथात यातील मजकूर उद्‌धृत केला आहे.
  • मुंबईत 1845 मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. तेव्हा भाऊंनी शिक्षकाची नोकरी सोडून त्यात नाव घातले. फॅरिश शिष्यवृत्ती मिळविली आणि वैद्यकशास्त्रात पदवी घेतली (1851).
  • कॉलेजमध्ये असताना त्यांनी ग्रंथपालाचेही काम केले.
  • त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.
  • अचूक निदान व शस्त्रक्रियेतील हातोटी (कौशल्य) यांमुळे त्यांना लोकप्रियता लाभली व पैसाही मिळू लागला.
  • त्यांनी कुष्ठरोगावर खष्ठ नावाच्या वनस्पतीच्या बियांपासून तयार केलेले एक देशी औषध शोधून काढले.
  • खष्ठ (कवटी) म्हणजेच चौलमुग्रा हा सदापर्णी वृक्ष असावा. त्यांच्या बियांपासून तयार केलेले तेल कुष्ठरोगावर गुणकारी आहे.
  • बाँबे ॲसोसिएशनचे ते चिटणीस झाले.
  • पुढे दादाभाई नवरोजींनी इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया ॲसोसिएशन नावाची संस्था काढली. तिच्या मुंबई शाखेचे भाऊ अध्यक्ष झाले.
  • सामाजिक सुधारणांबरोबर त्यांनी औद्योगिक सुधारणांकडेही लक्ष दिले.
  • मुंबईत कागद व कापूस यांच्या गिरण्या काढण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
  • 1854 मध्ये ते वेस्टर्न इंडियन कॅनल अँड इरिगेशन या कंपनीचे संचालक झाले.
  • जुन्या रूढी व परंपरा यांना डावलून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अनेक वर्षे आर्थिक झीज सोसली.
  • स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेचे ते पहिले भारतीय अध्यक्ष होत (1863-73). या संस्थेतर्फे मुलींच्या तीन शाळा चालविल्या जात.
  • विधवाविवाहाच्या चळवळीलाही त्यांनी सक्रिय पाठींबा दिला.
  • लोहार चाळीतील कन्याशाळेला ते दरमहा आर्थिक साहाय्य देत. याच शाळेला पुढे ‘भाऊ दाजी गर्ल्स स्कूल’ हे नाव देण्यात आले.
  • जातीव्यवस्थेचे निर्मूलन करावे आणि अंधश्रध्देला फाटा द्यावा, या मताचे ते होते.
  • त्यांचे सार्वजनिक कार्य लक्षात घेऊन सरकारने त्यांची शेरीफ पदावर नियुक्ती केली (184-69).
  • वनस्पती व प्राचीन इतिहास यांच्या संशोधनात त्यांनी विशेष लक्ष घातले.
  • राणीचा बाग (जिजामाता बाग), ॲल्बर्ट म्यूझीयम, नेटिव्ह जनरल लायब्ररी, पेटीट इस्टिट्युट इ. संस्था स्थापन करण्यात ते अग्रेसर होते.
  • जिजामाता बागेत त्यांच्या स्मरणार्थ एक वस्तुसंग्रहालयही उभारले आहे.
  • भाऊंनी भारतभर दौरा करून हस्तलिखिते, शिलालेखांचे ठसे, दुर्मिळ चित्रे, नाणी, ताम्रपट, शस्त्रे इ. वस्तूंचा संग्रह केला. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते सदस्य होते व पुढे उपाध्यक्ष झाले.
  • वेगवेगळ्या परिषदांत त्यांनी त्यांनी प्राच्यविद्येच्या संदर्भात अनेक शोधनिबंध सादर केले.
  • मुकुंदराज, हेमाद्री, सायण, हेमचंद्र इ. व्यक्तींचे तसेच कालीदासाचा कालनिर्णय आणि शिलालेख व ताम्रपट यांवरील त्यांचे शोधनिबंध अभ्यासपूर्ण होते.
  • माक्स म्यूलर व रा. गो. भांडारकर यांनी या शोधनिबंधांविषयी गौरवोद्‌गार काढले आहेत.
  • कालीदासाचे कुमारसंभव व मेरूतुंगाचार्याचा प्रबंध चिंतामणि हे ग्रंथ त्यांनी संपादित केले. तथापि त्यांनी लिहिलेला एकही स्वतंत्र ग्रंथ नाही.
  • त्यांच्या मरणोत्तर रामचंद्र घोष यांनी द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या शीर्षकाने त्यांचे संशोधनात्मक शोधनिबंध प्रसिध्द केले.
  • तसेच रायटिंग्ज अँड स्पिचिस ऑफ डॉ. भाऊदाजी या शीर्षकाने त्र्यं. गो. माईणकर यांनी त्यांचे समग्र लेखन संपादित करून प्रसिध्द केले (1974).
  • त्यांच्यावर 1865 मध्ये आर्थिक संकट आले. त्यातून ते अखेरपर्यंत सावरले नाहीत. परिणामत: त्यांचे उर्वरित आयुष्य दु:ख, दैन्य व वैफल्य यांनी ग्रासले गेले. त्यातच पक्षाघाताने त्यांचा मुबईमध्ये अंत झाला. त्यांच्या स्मरणार्थ संस्कृत विषयात बी. ए. ला पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला भाऊ दाजी हे पारितोषिक देण्यात येते.

महाराष्ट्रातील समाज सुधारक – बाळशास्त्री जांभेकर

पत्रकारितेचे दीपस्तंभ दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर - Dainik Gandhawarta
बाळशास्त्री जांभेकर

MPSC Social Reformers of Maharashtra Balshastri Jambhekar: (1812-1846) : बाळशास्त्री जांभेकर (Social Reformers of Maharashtra) यांना मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक आणि पहिल्या आंग्लशिक्षित पिढीतील अग्रगण्य विद्वान म्हणून संबोधले जाते. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावी झाला.

  • गंगाधरशास्त्री ह्या व्युत्पन्न पित्याच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर मुंबईस येऊन सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांजकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले.
  • या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले.
  • अनेक भारतीय व परदेशी भाषांचा त्यांनी परिचय करून घेतला होता.
  • ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’चे ‘नेटिव्ह सेक्रेटरी’, अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक, एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये पहिले असिस्टंट प्रोफसर, शाळा तपासनीस, अध्यापनशाळेचे (नॉर्मल स्कूल) संचालक अशा अनेक मानाच्या जागांवर त्यांनी काम केले.
  • त्यांना ‘जस्टिस ऑफ द पीस’ ही करण्यात आले होते (1840).
  • दर्पण  हे वृत्तपत्र 1832 मध्ये काढून मराठी वृत्तपत्रव्यवसायाचा त्यांनी पाया घातला.
  • दिग्दर्शन  हे मराठीतील पहिले मासिक त्यांनीच 1840 मध्ये काढले.
  • लोकशिक्षण व ज्ञानप्रसार हेच हेतू या उपक्रमांमागे होते.
  • भूगोल, व्याकरण, गणित, इतिहासादी विषयांवर त्यांनी ग्रंथरचना केली.
  • काही पाठांतरे नोंदवून त्यांनी ज्ञानेश्वरीचे संपादन केले.
  • ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’च्या कार्यात भाग घेणारे ते पहिले एतद्देशीय विद्वान होत. या संस्थेच्या त्रैमासिकात भारतीय शिलालेख व ताम्रपट यांसंबंधी त्यांचे संशोधनात्मक निबंध येत असत.

त्यांचे विचार प्रगमनशील होते. ख्रिस्त्याच्या घरात राहिल्यामुळे वाळीत टाकल्या गेलेल्या एका हिंदू मुलास त्यांनी तत्कालीन सनातन्यांच्या विरोधास न जुमानता शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची व्यवस्था केली. अल्पावधीच्या आजारानंतर मुंबईत त्यांचे निधन झाले.

भाऊ दाजी लाड व बाळशास्त्री जांभेकर | Bhau Daji Lad and Balshastri Jambhekar : MPSC Gazetted Civil Services 2024 अभ्यास साहित्य_5.1

MPSC Gazetted Civil Services Exam 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान(GS) 
तारीख वेब लिंक  अँप लिंक 
31 डिसेंबर  2023 जालियनवाला बाग हत्याकांड जालियनवाला बाग हत्याकांड
1 जानेवारी  2024 गांधी युग गांधी युग
3 जानेवारी 2024 रक्ताभिसरण संस्था रक्ताभिसरण संस्था
5 जानेवारी 2024

 

प्राकृतिक महाराष्ट्र – कोकण किनारपट्टी   प्राकृतिक महाराष्ट्र – कोकण किनारपट्टी
  7 जानेवारी  2024 1857 चा उठाव 1857 चा उठाव
9 जानेवारी  2024  प्राण्यांचे वर्गीकरण -असमपृष्ठरज्जू प्राणी  प्राण्यांचे वर्गीकरण -असमपृष्ठरज्जू प्राणी
11 जानेवारी 2024 राज्यघटना निर्मिती राज्यघटना निर्मिती
13 जानेवारी 2024 अर्थसंकल्प अर्थसंकल्प
15 जानेवारी 2024 महाराष्ट्र – स्थान व विस्तार महाराष्ट्र – स्थान व विस्तार
17 जानेवारी 2024 भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व वाटचाल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व वाटचाल
19 जानेवारी 2024 मूलभूत हक्क मूलभूत हक्क
21 जानेवारी 2024 वैदिक काळ वैदिक काळ
23 जानेवारी 2024 सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी
25 जानेवारी 2024 शाश्वत विकास शाश्वत विकास
27 जानेवारी 2024 महर्षी कर्वे व त्यांचे कार्य महर्षी कर्वे व त्यांचे कार्य
29 जानेवारी 2024 1942 छोडो भारत चळवळ 1942 छोडो भारत चळवळ
31 जानेवारी 2024 भारतीय रिझर्व्ह बँक  भारतीय रिझर्व्ह बँक 

 

MPSC Gazetted Civil Services Exam 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान (GS)
तारीख वेब लिंक  अँप लिंक 
1 फेब्रुवारी 2024 भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे
2 फेब्रुवारी 2024 स्वातंत्र्यापूर्वीची भारतीय अर्थव्यवस्था स्वातंत्र्यापूर्वीची भारतीय अर्थव्यवस्था
3 फेब्रुवारी 2024 रौलेट कायदा 1919 रौलेट कायदा 1919
4 फेब्रुवारी 2024 गारो जमाती गारो जमाती
5 फेब्रुवारी 2024 लाला लजपत राय लाला लजपत राय
6 फेब्रुवारी 2024 भारतीय राज्यघटनेचे कलम 15 भारतीय राज्यघटनेचे कलम 15
7 फेब्रुवारी 2024 भारतातील हरित क्रांती भारतातील हरित क्रांती
8 फेब्रुवारी 2024 मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शक तत्वे
9 फेब्रुवारी 2024 गौतम बुद्ध : जीवन आणि शिकवण गौतम बुद्ध : जीवन आणि शिकवण
10 फेब्रुवारी 2024 भारतीय नियोजन आयोग आणि NITI आयोग भारतीय नियोजन आयोग आणि NITI आयोग
11 फेब्रुवारी 2024 भारतीय राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत भारतीय राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत
12 फेब्रुवारी 2024 महागाईचे प्रकार आणि कारणे महागाईचे प्रकार आणि कारणे
13 फेब्रुवारी 2024 श्वसन संस्था श्वसन संस्था
14 फेब्रुवारी 2024 अलैंगिक प्रजनन  अलैंगिक प्रजनन 
15 फेब्रुवारी 2024 सातवाहन कालखंड सातवाहन कालखंड
16 फेब्रुवारी 2024 बिरसा मुंडा बिरसा मुंडा
17 फेब्रुवारी 2024 पंचायतराज समित्या पंचायतराज समित्या
18 फेब्रुवारी 2024 कोळी,भिल्ल व रामोश्यांचे बंड कोळी,भिल्ल व रामोश्यांचे बंड
19 फेब्रुवारी 2024 1991 च्या आर्थिक सुधारणा 1991 च्या आर्थिक सुधारणा
20 फेब्रुवारी 2024 जगन्नाथ शंकरशेठ जगन्नाथ शंकरशेठ
21 फेब्रुवारी 2024 पंडिता रमाबाई पंडिता रमाबाई
22 फेब्रुवारी 2024 भारतीय राज्यघटनेचे कलम 370 भारतीय राज्यघटनेचे कलम 370
23 फेब्रुवारी 2024 शिक्षणविषयक आयोग व समित्या शिक्षणविषयक आयोग व समित्या
24 फेब्रुवारी 2024 आम्ल पर्जन्य आम्ल पर्जन्य
25 फेब्रुवारी 2024 73 वी घटना दुरुस्ती कायदा 73 वी घटना दुरुस्ती कायदा
26 फेब्रुवारी 2024 संयुक्त महाराष्ट्र चळवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळ
27 फेब्रुवारी 2024 गोदावरी नदी खोरे गोदावरी नदी खोरे
28 फेब्रुवारी 2024 सार्वजनिक वित्त सार्वजनिक वित्त
29 फेब्रुवारी 2024 राज्य लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग

 

MPSC Gazetted Civil Services Exam 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान (GS)
तारीख वेब लिंक  अँप लिंक 
1 मार्च 2024 केंद्र – राज्य संबंध केंद्र – राज्य संबंध
2 मार्च 2024 दिल्ली सल्तनत दिल्ली सल्तनत

भाऊ दाजी लाड व बाळशास्त्री जांभेकर | Bhau Daji Lad and Balshastri Jambhekar : MPSC Gazetted Civil Services 2024 अभ्यास साहित्य_6.1

MPSC Combine Group B & Group C (Pre + Mains) Exam Foundation 2024 | Marathi | Video Course By Adda247

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप 

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

भाऊ दाजी लाड व बाळशास्त्री जांभेकर | Bhau Daji Lad and Balshastri Jambhekar : MPSC Gazetted Civil Services 2024 अभ्यास साहित्य_9.1

FAQs

मराठी वृत्तपत्राचे जनक कोणाला म्हणतात?

बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हटले जाते.

बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणते मराठी वृत्तपत्र प्रकाशित केले?

बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू केले.

भाऊ दाजी लाड यांचा जन्म कुठे झाला?

भाऊ दाजी लाड यांचा जन्म गोव्यातील मांजरे (ता. पेडणे) या गावी झाला.