Table of Contents
BMC Recruitment (Bharti) 2021: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत बा. ए.एल. नायर धर्मा रुग्णालय येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत ते ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात BMC Recruitment 2021 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, BMC Recruitment 2021 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.
BMC Recruitment 2021 | BMC भरती 2021
BMC Recruitment 2021: बा. य. ल. नायर रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात HMIS प्रणालीसाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) या संवर्गाची पदे कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी अधिसूचना जाहीर झाली असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे. अर्ज सदर करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 असून या लेखात BMC Recruitment 2021 संपूर्ण माहिती दिली आहे.
BMC Bharti 2021 Notification | BMC भरती 2021
BMC Bharti 2021 Notification: BMC Recruitment 2021 अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) संवर्गातील रिक्त असलेल्या एकुण 15 रिक्त पदांची अधिसूचना 01 डिसेंबर 2021 रोजी जाहीर झाली. ही पदभरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे. BMC Recruitment 2021 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंक क्लिक करून पाहता येईल.
BMC Recruitment 2021 pdf डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
BMC Bharti 2021 Notification- Important Dates | BMC भरती 2021 Notification 2021- महत्वाच्या तारखा
BMC Bharti 2021- Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये BMC Recruitment 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.
BMC Recruitment 2021 Notificatio- Important Dates | |
Events | Dates |
BMC Recruitment 2021 Notification- अधिसूचना | 01 डिसेंबर 2021 |
अर्ज स्वीकारण्याची सुरवातीची तारीख | 01 डिसेंबर 2021 |
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख | 30 डिसेंबर 2021 |
मुलाखतीची तारीख | लवकरच जाहीर करण्यात येईल |
BMC Recruitment 2021 2021- Vacancies | BMC भरती 2021- रिक्त जागांचा तपशील
BMC Recruitment 2021- Vacancies: बा. य. ल. नायर रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात HMIS प्रणालीसाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) या संवर्गाची एकूण 15 पदे आहेत.
BMC Recruitment 2021- Eligibility Criteria | BMC भरती 2021- पात्रता निकष
BMC Recruitment 2021- Eligibility Criteria: BMC Recruitment 2021 अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा व तत्सम परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
- संगणकाचे ज्ञान – इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग आवश्यक (MSCIT प्राधान्य)
- HMIS प्रणालीच्या कामकाजाचा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा
- उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 33 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये.
BMC Bharti 2021 | BMC भरती 2021- महिन्याचे मानधन
BMC Bharti 2021- Monthly Salary: BMC Recruitment 2021 अंतर्गत होणाऱ्या डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) पदासाठी महिन्याचे निश्चित वेतन दरमहा 15000 असेल.
BMC Recruitment 2021- Application Fee | BMC भरती 2021- अर्ज शुल्क
BMC Recruitment 2021- Application Fee: BMC Recruitment 2021 अंतर्गत होणाऱ्या डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही आहे.
BMC Bharti 2021- Application Address | BMC भरती 2021- अर्ज पाठवायचा पत्ता
BMC Bharti 2021- Application Address: BMC Recruitment 2021 अंतर्गत पदभरती मध्ये इच्छुक उमेदवारास ऑफलाईन पद्धतीने अर्ज सदर करायचा आहे. अर्ज हा पोस्टाने शेवटच्या दिनांकास पोहचेल अश्या हिशोबाने पाठवावा.
आज पाठवायचा पत्ता: बा.य.ल. नायर धर्मा रुग्णालय, डॉ. ए.एल. नारायण रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई -400008
BMC Recruitment 2021- Terms and Condition | BMC भरती 2021- अटी व शर्ती
BMC Recruitment 2021- Terms and Condition: BMC Recruitment 2021 ऑफलाईन अर्ज सादर करावयाच्या काही अटी व शर्ती आहेत. ज्याचे पालन प्रत्येक आवेदन करण्याऱ्या उमेदवारास करायचे आहे. त्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहे.
- पत्रव्यवहाराचा पत्ता सुस्पष्ट व व्यवस्थित असावा.
- उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक अर्हता/व्यावसायिक अर्हता / संबंधित गुणपत्रिका सांक्षांकित छायाप्रत जोडावी.
- निवड झालेल्या उमेदवाराने रुपये 100/- च्या मुद्रांक शुल्कावर बंधपत्र नियुक्तीच्या अगोदर देणे आवश्यक आहे.
- कंत्राटी पध्दतीने नियुक्त कर्मचा-यांना नियमित पदांकरीता असणारे कुठलेही फायदे मिळणार नाहीत. तसेच आवश्यकता नसल्यास त्यांची नियुक्ती कोणत्याही क्षणी संपुष्टात येईल.
- पोस्टाच्या विलंबामुळे कोणतीही माहिती प्राप्त होण्यास किंवा कळविण्यास विलंब झाला तर त्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेवर राहणार नाही.
- उमेदवारांना मुलाखतीसाठी नियोजित स्थळी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
- निवड प्रक्रियेच्या कालावधीत अथवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने चुकीची माहिती/ प्रमाणपत्रे / कागदपत्रे सादर केल्याचे किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची उमेदवारी रद्दबातल करण्यात येईल. तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती समाप्त करण्यात येईल.
- प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव निवड प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार अधिष्ठाता, वा. य. ल. नायर रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय यांना आहेत.
- निवड झालेल्या उमेदवारांना तिनही पाळीत (Shift) काम करणे बंधनकारक आहे.
- उमेदवाराने अर्ज बा. य. ल. नायर धर्मा रुग्णालय, डॉ. ए. एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई 400008 यांच्या कार्यालयात दि.22.12.2021 पर्यंत अथवा तत्पूर्वी दुपार ठिक 4:00 वा. सर्व शनिवार, रविवार आणि सर्व सार्वजनिक सुट्टया वगळून सादर करावेत. अर्जावर अलिकडेच काढलेल्या पासपोर्ट आकाराचे छायाचित्र चिकटवावे. अर्जावर संपूर्ण माहिती न भरल्यास तसेच संबंधित प्रमाणपत्र अर्जासोबत न जोडल्यास अशा अर्जांचा निवड यादीत समावेश केला जाणार नाही.
Latest Update
- BSNL भरती 2021
- PCMC Recruitment 2021
- भूमी अभिलेख विभाग भरती 2021
- Bhumi Abhilekh Bharti Syllabus And Exam Pattern 2021
- MHADA Exam Update 2021
FAQs BMC Recruitment 2021
Q1. BMC Recruitment 2021 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय आहे?
Ans. BMC Recruitment 2021 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख 01 डिसेंबर 2021 आहे
Q2. BMC Recruitment 2021 ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख काय आहे?
Ans. BMC Recruitment 2021 ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 आहे
Q3. BMC Recruitment 2021 अधिसूचनेनुसार किती रिक्त जागा जाहीर केल्या आहेत?
Ans. BMC Recruitment 2021 अधिसूचनेनुसार 15 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.
Q4. BMC Recruitment 2021 अर्ज करण्याची फी किती आहे?
Ans. BMC Recruitment 2021 अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही आहे.