केंद्राने जाहीर केली 2020 साठीची स्मार्ट शहरे पुरस्कार विजेत्यांची यादी
केंद्राने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी पुरस्कारांच्या यादीत इंदोर (मध्यप्रदेश) आणि सुरत (गुजरात) त्यांच्या सर्वांगीण विकासाकारिता संयुक्तपणे पहिला क्रमांक मिळाला आहे. सर्वाधिक पुरस्कार जिंकलेल्या राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेश पहिल्या स्थानी असून त्यानंतर त्यानंतर मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांचा क्रमांक आहे. स्मार्ट सिटी पुरस्कार सामाजिक पैलू, शासन, संस्कृती, नागरी पर्यावरण, स्वच्छता, अर्थव्यवस्था, पाणी, शहरी गतिशीलता या श्रेणींसाठी देण्यात येतो.
विविध श्रेणी अंतर्गत स्मार्ट सिटी पुरस्कार जिंकणाऱ्या शहरांची यादी:
1.सामाजिक पैलू:
- तिरुपती: मनपा शाळांसाठी सर्वोत्तम आरोग्य सुविधा
- भुवनेश्वरः सामाजिकदृष्ट्या स्मार्ट भुवनेश्वर
- टूमकुर: डिजिटल लायब्ररी सोल्यूशन
2. प्रशासन:
- वडोदरा: जी.आय.एस.
- ठाणे: डिजी ठाणे
- भुवनेश्वरः एमई अॅप
3. संस्कृती:
- इंदोर: वारसा संरक्षण
- चंदीगड: राजधानी कॉम्प्लेक्स वारसा प्रकल्प
- ग्वाल्हेर: डिजिटल संग्रहालय
4. नागरी पर्यावरण:
- भोपाळ: स्वच्छ ऊर्जा
- चेन्नई: जलकुंभांचा जीर्णोद्धार
- तिरुपती: नूतनीकरणयोग्य ऊर्जा निर्मिती
5.स्वच्छता:
- तिरुपती: बायोरेमेडिएशन आणि बायो-माइनिंग
- इंदूर: महानगरपालिका कचरा व्यवस्थापन यंत्रणा
- सुरत: उपचारित सांडपाण्याद्वारे संवर्धन
6. अर्थव्यवस्था:
- इंदूरः कार्बन क्रेडिट फायनान्सिंग मॅकेनिझम
- तिरुपती: डिझाईन स्टुडिओद्वारे स्थानिक ओळख आणि अर्थव्यवस्थेला गती
- आग्रा: मायक्रो स्किल डेव्हलपमेंट सेंटर
7. अंगभूत गुणवत्ता:
- इंदूर: छप्पन दुकान
- सुरत: कालवा कॉरिडोर
8.पाणी:
- देहरादून: स्मार्ट वॉटर मीटरिंग वॉटर एटीएम
- वाराणसी: अस्सी नदीचे पर्यावरणीय – संवर्धन
- सुरत: एकात्मिक आणि शाश्वत पाणीपुरवठा यंत्रणा
9. शहरी गतिशीलता
- औरंगाबाद: माझी स्मार्ट बस
- सुरत: डायनॅमिक शेड्यूलिंग बसेस
- अहमदाबाद: मानवरहित पार्किंग सिस्टम आणि स्वयंचलित तिकिट वितरण मशीन एएमडीए पार्क
10. अभिनव कल्पना पुरस्कार
- इंदूरः कार्बन क्रेडिट फायनान्सिंग मॅकेनिझम
- चंदीगड: केंद्रशासित प्रदेशांसाठी
11. कोविड इनोव्हेशन अवॉर्ड
- कल्याण-डोंबिवली
- वाराणसी
इतर पुरस्कार:
- सूरत, इंदूर, अहमदाबाद, पुणे, विजयवाडा, राजकोट, विशाखापट्टनम, पिंपरी-चिंचवड आणि वडोदरा यांना क्लायमेट-स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्क अंतर्गत 4-स्टार रेटिंग देण्यात आले
- मंत्रालयाच्या माहितीनुसार अहमदाबादला ‘स्मार्ट सिटीज लीडरशिप अवॉर्ड’ मिळाला, त्यानंतर वाराणसी व रांची अनुक्रमे दुसर्या व तिसर्या क्रमांकावर आहेत.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा