Marathi govt jobs   »   Study Materials   »   Shivaji Maharaj- Birth, History, Establishment of...
Top Performing

Chatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: History, Establishment of Swarajya and other Facts, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास- जन्म, स्वराज्याची स्थापना आणि इतर तथ्ये

Shivaji Maharaj: Today, On 19th February Chhatrapati Shivaji Maharaj’s birth anniversary is being celebrated with enthusiasm throughout Maharashtra. Chhatrapati Shivaji Maharaj was a great Indian king and strategist. who founded the Maratha Empire in Western India in 1674. For that, Maharaja had to fight with Aurangzeb, the king of the Mughal Empire. Only this much or else had to fight with Adil Shah of Bijapur and also the British. In 1674, the Maharaja was crowned at Raigad and became the Chhatrapati of the Maratha Empire. In this article, you will get detailed information about Chhatrapati Shivaji Maharaj/s History, Establishment of Swarajya, and other Facts

Chhatrapati Shivaji Maharaj
Empire Name Maratha Empire
State of Origin Dakhkhan (Today’s Maharashtra)
Article Name Chatrapati Shivaji Maharaj History
Useful for All Competitive Exams
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti (Bith Date) 19 February 1630

Chatrapati Shivaji Maharaj History

Chatrapati Shivaji Maharaj History- Birth, Establishment of Swarajya and other Facts: आज छत्रपती शिवाजी महारांची जयंती संपूर्ण महाराष्ट्र उत्साहात साजरी करत आहे. शिवाजी महाराज महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे आदर्श आहेत. भारत देशाने आपल्या हृदयात अनेक विरपुत्रांच्या यशोगाथा कित्येक शतकांपासुन जतन केलेल्या आहेत हे विरपुत्र आपल्या पावन भुमीत जन्माला आले हे आपले केवढे सौभाग्य! या महान विभुतींच्या विरगाथा ऐकतांना अंगावर रोमांच उभे राहातात आणि त्यांच्या काळात आपण जन्माला आलो असतो आणि त्यांच कर्तृत्व जर डोळयांनी पाहाता आले असते तर, असा विचार मनाला स्पर्शुन जातो. आपल्या महाराष्ट्रात असाच एक शक्तीशाली, निष्ठावान, पराक्रमी राजा होउन गेले. त्यांच्या जन्माला येण्यानं आणि त्याच्या जाज्वल्य पराक्रमानं इतिहास घडवला आणि त्याचे नाव त्या पानांमधे सुवर्णाक्षरांनी कोरले गेले ते आज पर्यंत तसेच आहे आणि येणा.या काळात देखील तसेच जीवंत राहाणार आहे. ते आहेत,

प्रौढ प्रताप पुरंदर

क्षत्रीय कुलावंतस्  सिंहासनाधिश्वर

महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज!!!

आज आपण या लेखात छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) जन्म, इतिहास, स्वराज्याची स्थापना आणि इतर तथ्ये (Shivaji Maharaj- Birth, History, Establishment of Swarajya and other Facts) पाहणार आहोत.

Chatrapati Shivaji Maharaj History  | छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास

Chatrapati Shivaji Maharaj History: इ.सन 1627 दरम्यान संपुर्ण भारतावर मुगलाचे अधिपत्य होते. उत्तरेला शहाजहान, विजापुर ला मोहम्मद आदिल शहा आणि गोलकोंडयाला सुलतान अब्दुल्ला कुतुब शहा यांचे शासन होते. समुद्र किनारे पोर्तृगिजांच्या ताब्यात होते. आदिलशहाच्या सेनेत शहाजीराजे भोसले उच्च पदावर कार्यरत होते. शिवाजी महाराजांच्या जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला जुन्नर जवळ शिवनेरी गडावर जिजाबाईंच्या पोटी महाराज जन्माला आले, शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे ’’शिवाजी’’ असे नामकरण करण्यात आले.

Shivaji Maharaj
शिवाजी महाराज

महाराजांना राज्यशासनाचे आणि युद्ध कौशल्याचे धडे राजमाता जिजाऊंकडून मिळाले. अगदी लहानपणापासून राम आणि कृष्णाच्या कथा ऐकून अन्याय आणि अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध त्यांच्या मनात चीड निर्माण झाली आणि रयतेच्या कल्याणासाठी त्यांनी स्वराज्य स्थापन केले.

Information about Shivaji Maharaj | शिवाजी महाराजांबद्दल माहिती

Information about Shivaji Maharaj: शिवाजी महाराजांबद्दल (Shivaji Maharaj) थोडक्यात पण महत्वाची माहिती खालील तक्यात दिली आहे.

नाव (Name) शिवाजी शहाजी भोसले (Shivaji Maharaj)
जन्म (Birthday) 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी (Shiv Jayanti)
जन्मस्थळ (Birth Place) शिवनेरी किल्ला (पुणे) (Shivneri Fort, Pune)
राज्याभिषेक (Rajyabhishek) 6 जुन 1674 रायगड
वडीलांचे नाव (Father Name) शहाजीराजे मालोजी भोसले
आईचे नाव (Mother Name) जिजाबाई शहाजी भोसले
मुलांची नावे (Children Name) संभाजी, राजाराम,सखुबाई,
रानुबाई, राजकुंवरबाई, दिपाबाई,
कमलाबाई, अंबिकाबाई.
तलवारीचे नाव (Shivaji Maharaj Talwar) भवानी तलवार (Bhavani Sword)
घोड्याचे नाव (Name of Horse) मोती, इंद्रायणी, विश्वास, रणबीर, गजरा, तुरंगी आणि कृष्णा
धार्मिक गुरु (Religious Teacher) समर्थ रामदास स्वामी (Samarth Ramdas Swami)
मृत्यु (Death) 3 एप्रिल 1680 (वयाच्या 50 व्या वर्षी ) (3rd April 1680)
मृत्यूस्थळ (Death Place) किल्ले रायगड (Raigad Fort)

History of Shivaji Maharaj | शिवाजी महाराजांचा इतिहास

History of Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) हे एक महान भारतीय राजा आणि रणनितीकार होते. ज्यांनी 1674 मध्ये पश्चिम भारता मध्ये मराठा साम्राज्याचा पाया घातला. त्यासाठी महाराजांना मोगल साम्राज्याचा राजा औरंगजेब याच्याशी युद्ध करावे लागले. फक्त एतकच नाहीतर विजापूरचा आदिलशहा आणि इंग्रज यांच्याशी देखील युद्ध करावे लागले. 1674 मध्ये महाराजांवर रायगड येथे राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती बनले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) त्यांच्या शिस्तबद्ध सुव्यवस्थित प्रशासकीय तुकड्यांच्या मदतीने एक कार्यक्षम पुरोगामी प्रशासन प्रधान केले. त्यांनी युद्ध विज्ञानात अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी केल्या आणि आणि गनिमी युद्धांची एक नवीन शैली म्हणजेच शिवसूत्र विकसित केली. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय पद्धती आणि कोर्टाचे शिष्टाचार पुनरुज्जीवित केले.

Where was Shivaji Maharaj born? | शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला

Where was Shivaji Maharaj born?: छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) भारताला लाभलेले महान शूरवीर होते. तसेच मराठा साम्राज्याचे ते राजे होते. महाराजांचा जन्म (Shivaji Maharaj Born) 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराजांचे वडील म्हणजेच शहाजी भोसले विजापूरचा सुलतान आदिलशाह सेनेचे सेनापती होते आणि महाराजांची आई जिजाबाई ह्या जाधव कुळात जन्माला आलेल्या एक हुशार, प्रतिभाशाली महिला होत्या.

shivaji maharaj birth
शिवाजी महाराजांचा जन्म

असं म्हणतात जिजाबाई यांनी शिवाई देवीला आपल्याला एक बलवान पुत्र व्हावा अशी इच्छा मागितली होती. त्यामुळे शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी ठेवले गेले. शिवाजी महाराजांचे चरित्र त्यांच्या आई-वडिलांच्या विचारासोबत जास्त मिळतंजुळतं होतं. महाराजांच्या चरित्रावर त्यांच्या आई-वडिलांचा खूप जास्त प्रभाव होता.

त्यांचे बालपण त्यांच्या आईच्या मार्गदर्शनाखाली गेलं. त्यांच्या आईनी म्हणजेच जिजाबाईंनी महाराजांना राजनीती आणि युद्धाचं प्रशिक्षण दिले तसेच परकिय सत्तेविरुद्ध आक्रमन करण्यासाठी लागणाऱ्या शिस्तीचं प्रशिक्षण दिले. महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना युद्धकला शिकवली. इतक्या लहान वयात देखील महाराज सगळ्या घटना समजायला लागले होते.

Maratha Empire

Establishment of Swarajya | स्वराज्याची स्थापना 

Establishment of Swarajya: Shivaji Maharaj लहानाचे मोठे शिवनेरीत झाले. शिवनेरी सोबतच माहुली व पुणे येथे देखील त्यांचे बालपण गेल्याचे दिसते. शहाजी महाराजांनी शिवाजी आणि जिजाबाई यांच्या हाती संपूर्ण महाराष्ट्राच्या जहागिरीची व्यवस्था सोपवली आणि त्यांना पुण्याला पाठवून दिले. जहागिरीची व्यवस्था प्रत्यक्ष दादाजी कोंडदेव आणि शहाजी राजांनी नेमलेले काही विश्वासू सरदार बघायचे.

जिजाबाई सारखच शिवाजी महाराजांमध्ये कणखरपणा, देशासाठी असलेलं प्रेम आणि कठीण प्रसंगातून बाहेर येण्याचे ध्येय होत. अशा गुणांमुळे शिवाजी महाराज तयार झाले. आई कडून मिळालेल्या शिकवण आणि प्रेरणेतून शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्याची ओढ निर्माण झाली. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य महाराजांना (Shivaji Maharaj) वाटू लागलं जर आपल्याला आपल्या स्वराज्याचं रक्षण करायचं असेल तर त्यासाठी गड किल्ले आपल्या ताब्यात पाहिजेत.

oath
स्वराज्य स्थ्पानेची शपथ

ही जाणीव त्यांना लहानपणातच झाली होती. दादोजी कोंडदेव यांच्या निधनानंतर आता सर्व महाराष्ट्राची जबाबदारी शिवाजी महाराजांवर आली होती. त्यांनी हळूहळू गड किल्ले ताब्यात घेण्यासाठी अनेक मोहिमा आखून त्या यशस्वीरित्या पार देखिल पाडल्या आपल्याच वयाचे धाडसी असे युवा त्यांनी जमवले आणि त्या सोबतच त्यांनी देशपांडे, देशमुख इत्यादींशी वेगळ्या प्रकारे संबंध देखील साधले, महाराजांनी (Shivaji Maharaj) पुण्याच्या परिसरातील काही पडके किल्ले, टेकड्या हळूहळू आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली.

छत्रपती शिवाजी महाराज- लढाया, स्वराज्य विस्तार, राज्याभिषेक, कारभार

How Shivaji Maharaj Started the Struggle for ‘Swarajya’ | शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संघर्ष कसा सुरू केला

How Shivaji Maharaj Started the Struggle for ‘Swaraj’: सतराव्या शतकात साधारणता ज्याच्या हातात किल्ला तोच प्रांतावर देखे राज्य करणार असं मानलं जायचं. या वस्तूस्थितीमुळे शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) आपल्या प्रदेशातील अनेक किल्ले परत मिळवले आणि काही नवीन किल्ले देखिल बांधले. प्रचंडगड सुद्धा शिवाजी महाराजांनी परत आणला आणि त्याचे नाव तोरणा असे ठेवले.

वयाच्या सोळाव्या वर्षात मध्ये शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्यासाठी महाराजांना जास्तीत जास्त किल्ले त्यांच्या हाताखाली हवे होते म्हणूनच महाराजांनी (Shivaji Maharaj) पहिले तोरणा किल्ला ताब्यात घ्यायचं ठरवलं. त्यावेळी तोरणा किल्ला विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता.

महाराजांनी (Shivaji Maharaj) 1645 मध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यानंतर 1647 मध्ये कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सूर्याजी काकडे, येसाजी कंक, बापूजी मुदगल, सोनोपंत डबीर या काही मुख्य मावळ्यांच्या साथीने तोरणा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. आणि त्यांनी (Shivaji Maharaj) प्रचंडगड किल्ल्याचे नाव तोरणा असे ठेवले.

त्याच दरम्यान शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) कोंढाणा म्हणजे सिंहगड आणि पुरंदर असे किल्ले देखील आदिलशाहाच्या ताब्यातून मिळवले आणि पुणे प्रांतावर पूर्णपणे आपले वर्चस्व सिद्ध केले. इतकंच नव्हे तर तोरणा किल्ला समोर असणारा मुरुंबदेवाचा डोंगर देखील महाराजांनी आपल्या ताब्यात घेऊन त्याला दुरुस्त करून त्याचं नाव राजगड असे ठेवले. आणि हे सगळे शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) फक्त वयाच्या सतराव्या वर्षी केलं.

Maratha Empire
Adda247 Marathi App

Shivaji Maharaj – Other Facts | शिवाजी महाराज – इतर तथ्य

Shivaji Maharaj – Other Facts: शिवाजी महाराजांबद्दल परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण तथ्य खालीलप्रमाणे आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू – Shivaji Maharaj Brother Name

  1. राजे संभाजी शहाजी भोसले (सख्खे) (जिजाबाई)
  2. राजे व्यंकोजी (एकोजी) शहाजी भोसले (सावत्र) (तुकाबाई)
  3. संताजी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी – Shivaji Maharaj Wife Name

  1. सईबाई : संभाजी महाराज, राणूबाई, सखुबाई, अंबिकाबाई
  2. सोयराबाई : राजाराम महाराज आणि दीपाबाई
  3. पुतळाबाई
  4. सकवारबाई : कमलाबाई
  5. काशीबाई
  6. सगुणाबाई : राजकुवरबाई
  7. लक्ष्मीबाई
  8. गुणवंताबाई

शिवाजी महाराजांचे मुले/मुली:

  1. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे – सईबाई पासून झालेला शिवाजी महराजांचा मुलगा.
  2. छत्रपती राजाराम –  सोयराबाई पासून झालेला शिवाजी महराजांचा मुलगा .
  3. सखुबाई, राणूबाई, अंबिकाबाई – शिवाजी महाराज व सईबाई यांच्या ३ मुली.
  4. दीपाबाई – सोयराबाई व शिवाजी महाराजांची मुलगी.
  5. राजकुंवरबाई – सगुणाबाई व शिवाजी महाराजांची मुलगी.
  6. कमलाबाई – सकवार बाई व शिवाजी महाराजांची मुलगी.

शिवाजी महाराजांचे धार्मिक गुरु – रामदास स्वामी

महाराजांचे धार्मिक गुरु म्हणून समर्थ रामदास स्वामी यांचा इतिहासात उल्लेख केलेला दिसतो.  स्वामींनी केलेले उपदेश महाराजांसाठी अमूल्य ठरले.

  • शत्रू आणि मित्र ओळखण्यासाठी पुरेसा वेळ घ्यावा.
  • सर्वांचे ऐकून एकांतात आणि शांतचित्ताने विचारपूर्वक निर्णय घ्यावा.
  • यशासाठी सतत प्रयत्न करावे.
  • पूर्वीच्या योद्ध्यांना अनेक प्रतिकूल परिस्थितींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे अशा परिस्थितींना न घाबरता सामोरे जावे.
  • सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे.
Maratha Empire
Adda247 Marathi Telegram

See Also

Article Name Web Link App Link
List of Indian Cities on Rivers Banks Click here to View on Website  Click here to View on App
List of First-Ranked States in Mineral Production Click here to View on Website  Click here to View on App
Periodic Table of Elements Click here to View on Website  Click here to View on App
Forests in Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Important Days in December 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Anti-Defection Law Click here to View on Website  Click here to View on App
Important Boundary Lines Click here to View on Website  Click here to View on App
Quantitative Aptitude Formulas Click here to View on Website  Click here to View on App
Mensuration Formula For 2D And 3D Shapes Click here to View on Website  Click here to View on App
List Of Best Intelligence Agencies Of The World 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Various Corporation In Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Nationalized Banks List 2022 Click here to View on Website  Click here to View on App
The World’s 10 Smallest Countries 2022 Click here to View on Website  Click here to View on App
State Wise List Of Highest Mountain Peaks In India Click here to View on Website  Click here to View on App
Parliament Of India: Lok sabha Click here to View on Website  Click here to View on App
Supreme Court Click here to View on Website  Click here to View on App
Country And Currency List 2022 Click here to View on Website  Click here to View on App
AMRUT Mission Click here to View on Website  Click here to View on App
National Animal of India Click here to View on Website  Click here to View on App
Bird Sanctuary In India 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Important Rivers in Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
States And Their Capitals, 28 States And 8 Union Territories In India 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Types Of Winds Click here to View on Website  Click here to View on App
President’s Rule In A State Click here to View on Website  Click here to View on App
Mahatma Jyotirao Phule Death Anniversary 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Satavahana Dynasty: History, Ruler, And Other Important Facts Click here to View on Website  Click here to View on App
Important Boundary Lines Click here to View on Website  Click here to View on App
Indian Constitution: Framing, Sources, Parts, Articles, And Schedules Click here to View on Website  Click here to View on App
Importance of Plant Nutrients Click here to View on Website  Click here to View on App
Hill Stations In Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Important Events Of the Indian Freedom Struggle Click here to View on Website  Click here to View on App
Revolt Of 1857 In India And Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Dams In Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Profit And Loss Formula, Sample Questions Click here to View on Website  Click here to View on App
Jnanpith Awards 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Chief Minister of Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Computer Awareness Click here to View on Website  Click here to View on App
River System in Konkan Region of Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Fundamental Duties: Article 51A Click here to View on Website  Click here to View on App

 

.Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: History, Establishment of Swarajya and other Facts_9.1

FAQs

Where was Shivaji Maharaj born?

Shivaji Maharaj was born on Shivneri fort.

What was the name of Shivaji Maharaj's sword?

Shivaji Maharaj's sword was named Bhavani

When did Shivaji Maharaj take the oath of Swarajya?

Shivaji Maharaj took the oath of Swarajya in 1645

Where was the crowned of Shivaji Maharaj?

Shivaraya was crowned at Raigad.