Table of Contents
रासायनिक बदल व रासायनिक बंध
रासायनिक बदल व रासायनिक बंध: कोणताही रासायनिक बदल होताना मूळ पदार्थाचे संघटन बदलते व त्याच्यापासून वेगळे संघटन असलेला, वेगळे गुणधर्म असलेला नवीन पदार्थमिळतो. जसे कैरीचा आंबा होणे, बर्फ वितळणे, पाणी उकळणे, पिकल्यावर सुगंध येणे, बटाटा चिरून ठेवल्यावर काळा पडणे इत्यादी. आगामी काळातील सरळसेवा भरती जसे कि, आगामी काळातील जिल्हा परिषद भरती 2023, आरोग्य भरती 2023, नगर परिषद भरती 2023, MIDC भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने रासायनिक बदल (Chemical Change) व रासायनिक बंध (Chemical Bond) हा घटक फार महत्वाचा आहे. आज या लेखात आपण रासायनिक बदल व रासायनिक बंध याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
रासायनिक बदल व रासायनिक बंध: विहंगावलोकन
रासायनिक बदल व रासायनिक बंध या लेखात रासायनिक बदल व रासायनिक बंधाचे प्रकार, उदाहरणे व रासायनिक सूत्रे याबद्दल माहिती देण्यात आली आहे. रासायनिक बदल व रासायनिक बंध याबद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात तपासा.
रासायनिक बदल व रासायनिक बंध: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | सर्व स्पर्धा परीक्षा |
विषय | सामान्य विज्ञान (रसायनशास्त्र) |
लेखाचे नाव | रासायनिक बदल व रासायनिक बंध |
हा लेख तुम्हाला काय प्रदान करतो? |
|
रासायनिक बदल व रासायनिक बंध: रासायनिक बदलाबद्दल माहिती
रासायनिक बदल घडताना मूळच्या द्रव्याचे रासायनिक संघटन बदलून, वेगळे रासायनिक संघटन असलेले वेगळ्या गुणधर्माचे नवीन पदार्थ तयार होतात. रासायनिक संघटनातील बदल नेमकेपणाने माहित असल्यास रासायनिक बदलासाठी रासायनिक अभिक्रिया लिहीता येते. रासायनिक अभिक्रिया लिहीताना मूळच्या द्रव्यातील रासायनिक पदार्थाचे नाव व रासायनिक सूत्र, तसेच तयार झालेल्या नवीन पदार्थाचे नाव व रासायनिक सूत्र यांचा उपयोग करतात. उदाहरणार्थ, लिंबूरसात खाण्याचा सोडा मिसळल्यास घडून येणारा रासायनिक बदल हा लिंबूरसामधील सायट्रिक आम्लामध्ये होतो व तयार होणारा वायू कार्बन डायऑक्साइड असतो. या रासायनिक अभिक्रियेसाठी पुढीलप्रमाणे शाब्दिक समीकरण लिहिता येते.
सायट्रिक आम्ल + सोडिअम बायकार्बोनेट → कार्बन डायऑक्साइड + सोडिअम सायट्रेट आम्ल
(आम्ल + आम्लारी → CO2 + क्षार)
एखादी रासायनिक अभिक्रिया लिहिण्याची पहिली पायरी म्हणजे संबंधित पदार्थांची नावे वापरून शाब्दिक
समीकरण लिहिणे ही होय. ह्यात प्रत्येक नावाऐवजी त्या पदार्थाचे रासायनिक सूत्र लिहिले की ते रासायनिक समीकरण होते. रासायनिक अभिक्रिया लिहिताना मूळचे पदार्थ डाव्या बाजूला तर तयार झालेले नवीन पदार्थ उजव्या बाजूला लिहितात व मध्ये बाण काढतात. या बाणाचे टोक तयार झालेल्या पदार्थांच्या दिशेला असते. हा अभिक्रियेची दिशा दर्शवणारा बाण आहे. बाणाच्या डाव्या बाजूला लिहिलेले मूळचे पदार्थम्हणजेच अभिक्रियेत भाग घेणारे पदार्थ होत. त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक (Reactants) म्हणतात. अभिक्रीयेमुळे तयार होणाऱ्या नवीन पदार्थांना उत्पादित (Products) म्हणतात. अभिक्रियेतील उत्पादितांची जागा बाणाच्या उजव्या बाजूला असते.
रासायनिक बदल व रासायनिक बंध: रासायनिक बदलाचे प्रकार
रासायनिक बदलाचे दोन प्रमुख प्रकार पडतात. एक म्हणजे नैसर्गिक रासायनिक बदल आणि दुसरा मानवनिर्मित रासायनिक बदल. या दोन्ही बदलाबद्दल थोडक्यात माहिती खाली देण्यात आली आहे.
नैसर्गिक रासायनिक बदल: जे बदल निसर्गतः होतात त्यास नैसर्गिक रासायनिक बदल म्हणतात.
श्वसन: श्वसन ही आपल्या जीवनात सतत चालू असणारी जैविक प्रक्रिया आहे. ह्या क्रियेमध्ये आपण श्वासावाटे हवा आत घेतो व उच्छ्वासावाटे कार्बन डायऑक्साइड वायू व पाण्याची वाफ बाहेर पडतात. सखोल अभ्यासानंतर समजते की श्वासावाटे घेतलेल्या हवेतील ऑक्सिजनची पेशींमधील ग्लुकोजबरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड व पाणी हे तयार होतात. या रासायनिक अभिक्रियेचे शाब्दिक व रासायनिक समीकरण पुढीलप्रमाणे आहे.
प्रकाशसंश्लेषण: सूर्यप्रकाशात हिरव्या वनस्पती प्रकाशसंश्लेषण करतात. ह्या नैसर्गिक रासायनिक बदलासाठी शाब्दिक समीकरण व रासायनिक समीकरण (असंतुलित) पुढीलप्रमाणे लिहिता येते.
मानवनिर्मित रासायनिक बदल: आपण दैनंदिन जीवनात आपल्या उपयोगासाठी अनेक रासायनिक बदल घडवून आणतो. त्यातील काही रासायनिक बदल आता पाहू. पहिल्या कृतीमध्ये जो रासायनिक बदल पाहिला त्याचा उपयोग ‘सोडा-लिंबू’ ह्या शीतपेयात करतात, म्हणजेच हा एक उपयुक्त मानवनिर्मित रासायनिक बदल आहे का नाही ते तुम्हीच ठरवा. कारण ‘सोडा-लिंबू’ या पेयात कार्बन डायऑक्साइड व सायट्रिक आम्ल हे दोघेही आम्लधर्मीच आहेत. त्यामुळे जठररसाची आम्लता वाढते. काही प्रमुख मानवनिर्मित रासायनिक बदल खालीलप्रमाणे आहेत.
इंधनाचे ज्वलन: इंधनाचे ज्वलन ऊर्जामिळवण्यासाठी लाकूड, कोळसा, पेट्रोल किंवा स्वयंपाकाचा गॅस जाळतात. या सर्व इंधनामध्ये ज्वलन होणारा एक सामाईक पदार्थ ‘कार्बन’ हा आहे. ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचा संयोग हवेतील ऑक्सिजनबरोबर होतो व कार्बन डायऑक्साइड हे उत्पादित तयार होते. इंधनाचे ज्वलन हा जलद व अपरिवर्तनीय असा रासायनिक बदल आहे.
विरल हायड्रोक्लोरिक आम्लाने शहाबादी फरशी स्वच्छ करणे: येथे शहाबादी फरशीचे रासायनिक संघटन मुख्यत्वे कॅल्शिअम कार्बोनेट असे आहे. फरशी हायड्रोक्लोरिक आम्लाने स्वच्छ करताना फरशीच्या वरच्या थराची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया होते व तीन उत्पादिते तयार होतात. त्यांपैकी एक कॅल्शिअम क्लोराइड; हे पाण्यात द्रावणीय असल्याने पाण्याने धुतल्यावर निघून जाते. दुसरे उत्पादित म्हणजे कार्बन डायऑक्साइड, ह्याचे बुडबुडे हवेत मिसळून जातात. तिसरे उत्पादित पाणी, जे पाण्यात मिसळून जाते.
दुष्फेन पाणी सुफेन बनवणे: काही विहिरींचे किंवा कुपनलिकांचे पाणी दुष्फेन असते. ते चवीला मचूळ लागते व त्यात साबणाचा फेस होत नाही. याचे कारण दुष्फेन पाण्यात कॅल्शिअम व मॅग्नेशिअमचे क्लोराइड व सल्फेट हे क्षार विरघळलेले असतात. हे दुष्फेन पाणी सुफेन करण्यासाठी त्यात धुण्याच्या सोड्याचे द्रावण घालतात. त्यामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन कॅल्शिअम व मॅग्नेशिअमच्या अद्रावणीय कार्बोनेट क्षारांचा अवक्षेप तयार होऊन तो बाहेर पडतो. पाण्यातील विरघळलेले कॅल्शिअम व मॅग्नेशिअमचे क्षार कार्बोनेट क्षारांच्या अवक्षेपाच्या रूपात बाहेर पडल्याने पाणी सुफेन होते.
रासायनिक बदल व रासायनिक बंध: रासायनिक बंधाबद्दल थोडक्यात माहिती
रासायनिक बंध: रासायनिक बदल होताना द्रव्याचे रासायनिक संघटन बदलते व मूळच्या पदार्थांची, अभिकारकांची, रासायनिक अभिक्रिया होऊन वेगळ्या गुणधर्माचे नवीन पदार्थ, उत्पादिते, तयार होतात हे आपण पाहिले. हे होताना अभिकारकांमधील काही रासायनिक बंध तुटतात व अभिक्रियेमध्ये नवीन रासायनिक बंध तयार होऊन नवीन पदार्थ, म्हणजेच उत्पादिते तयार होतात.
रासायनिक बंध (Chemical Bond): मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण व मूलद्रव्याची संयुजा यांतील संबंध असतो. राजवायू (Nobel Gas) रासायनिक बंध तयार करत नाहीत व त्यांचे इलेक्ट्रॉन अष्टक / द्विक पूर्ण असते. याउलट इलेक्ट्रॉन अष्टक / द्विक पूर्ण नसलेले अणू रासायनिक बंध तयार करतात. यामागचे कारण असे आहे की रासायनिक बंध तयार करताना अणू त्यांच्या संयुजा इलेक्टॉनांचा उपयोग करतात. तसेच संयुजेच्या संख्येइतके रासायनिक बंध तयार केल्यावर अणूला इलेक्ट्रॉन अष्टकाचे / द्विकांचे संरूपण प्राप्त होते.
1.आयनिक बंध (Ionic Bond): प्रथम सोडिअम व क्लोरिन या मूलद्रव्यांच्या अणूंपासून सोडिअम क्लोराइड हे संयुग तयार होते. सोडिअमच्या संयुजा कवचात एक इलेक्ट्रॉन असल्याने त्याची संयुजा एक व क्लोरीनच्या संयुजा कवचात सात इलेक्ट्रॉन म्हणजे अष्टकाला एक कमी म्हणून क्लोरिनची संयुजा सुद्धा एक हा संबंध आपण पाहिला. सोडिअमचा अणू त्याच्या ‘M’ ह्या कवचातील एकमेव संयुजा इलेक्ट्रॉन गमावतो तेव्हा त्याचे उपांत्य कवच ‘L’ हे बाह्यतम कवच होते. त्यामध्ये आठ इलेक्ट्रॉन आहेत. परिणामतः आता सोडिअमला इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती प्राप्त होते, मात्र आता इलेक्ट्रॉनांची संख्या 10 झाल्यामुळे सोडिअमच्या केंद्रकावरील +11 ह्या धनप्रभाराचे संतुलन होत नाही व निव्वळ +1 इतका धनप्रभार असलेला Na+ हा धनआयन तयार होतो. याउलट क्लोरिनच्या संयुजा कवचात अष्टक स्थितीपेक्षा एक इलेक्ट्रॉन कमी आहे. बाहेरून एक इलेक्ट्रॉन घेतल्यावर क्लोरिनचे इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण होते, मात्र उदासीन क्लोरीन अणूवर एका इलेक्ट्रॉनची भर पडल्यामुळे प्रभार संतुलन बिघडते व निव्वळ -1 इतका ॠणप्रभार असलेला Cl- हा ॠण आयन तयार होतो.
- संयुज बंध (Electrovalent Bond): परस्परविरुद्ध प्रभार असलेल्या धन आयन व ॠण आयन यांच्यामधील स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला आयनिक बंध किंवा विद्युत संयुज बंध म्हणतात.
- आयनिक संयुग (Ionic Compound): एक किंवा अधिक आयनिक बंधांमुळे तयार होणाऱ्या संयुगाला आयनिक संयुग म्हणतात.
2. सहसंयुज बंध (Covalent Bond): जेव्हा सारखे गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांच्या अणूंचा संयोग होतो तेव्हा साधारणपणे सहसंयुज बंध तयार होतो. अशा अणूंमध्ये इलेक्ट्रॉनांचे आदान-प्रदान (देवाण-घेवाण) होऊ शकत नाही. त्याऐवजी अशा अणूंमध्ये इलेक्ट्रॉनांचे संदान (sharing) होते. संदान केलेले इलेक्ट्रॉन दोेन्ही अणूंची सामाईक मालमत्ता झाल्यामुळे दोन्ही अणूंचे इलेक्ट्रॉन अष्टक / द्विक पूर्ण होते.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
जिल्हा परिषद परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य
सरळ सेवा जसे की, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.
लेखाचे नाव | लिंक |
भारतातील जागतिक वारसा स्थळे 2023 | |
भारताची जनगणना: भारताची जनगणना 2011 | |
आम्ल आणि आम्लारी | |
भारतातील खनिज संपत्ती | |
प्रकाशाचे गुणधर्म | |
महाराष्ट्राची मानचिन्हे | |
भारतातील शेती | |
भौतिक राशी आणि त्यांचे एकके | |
राष्ट्रीय आणीबाणी कलम 352: व्याख्या, परिचय, प्रकार, कालावधी आणि परिणाम | |
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP) | |
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग | |
भारतातल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळी | |
राष्ट्रीय आरोग्य अभियान | |
महाराष्ट्रातील लोकजीवन | |
भारतीय संविधानाची उद्देशिका | |
मराठा साम्राज्य – इतिहास, शासक, राज्य विस्तार आणि प्रशासन | |
2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला | |
जालियनवाला बाग हत्याकांड – पार्श्वभूमी, कारणे आणि परिणाम | |
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023) | |
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे | |
चंद्रयान 3 | |
भारताची जणगणना 2011 | |
लोकपाल आणि लोकायुक्त | |
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग | |
कार्य आणि उर्जा | |
गांधी युग
|
|
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
|
|
भारताचे नागरिकत्व
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतीय संविधानाची उद्देशिका
|
|
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्राचे हवामान | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
सिंधू संस्कृती | |
जगातील 07 खंड | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
|
|
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
|
|
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
गती व गतीचे प्रकार | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
आम्ल व आम्लारी | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतातील सर्वात लांब पूल 2023
|
|
रोग व रोगांचे प्रकार | |
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
|
|
महाराष्ट्रातील लोकजीवन
|
|
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
|
|
वनस्पतीची रचना आणि कार्ये
|
|
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
|
|
लोकपाल आणि लोकायुक्त
|
|
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
|
|
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
|
|
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
|
|
पृथ्वीवरील महासागर
|
|
महाराष्ट्राचे हवामान | |
भारताची क्षेपणास्त्रे | |
महाराष्ट्रातील शहरांची यादी
|
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |