Marathi govt jobs   »   Study Materials   »   Clouds and Types of Clouds

ढग व ढगांचे प्रकार, व्याख्या, आणि ढगांचे प्रकार, स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे

ढग व ढगांचे प्रकार

ढग हे पृथ्वीच्या वातावरणाचे एक आकर्षक आणि सदैव उपस्थित असलेले वैशिष्ट्य आहे. ते लहान पाण्याचे थेंब किंवा हवेत लटकलेल्या बर्फाच्या स्फटिकांनी बनलेले असतात आणि ते आपले हवामान, हवामान आणि एकूण वातावरणीय परिस्थितीला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ढगांचे निरीक्षण केल्याने येऊ घातलेल्या हवामानातील बदल आणि वातावरणातील गतिशीलता याविषयी अंतर्दृष्टी मिळू शकते. ढग विविध प्रकारात येतात, प्रत्येकामध्ये त्यांची निर्मिती, स्वरूप आणि प्रभाव प्रतिबिंबित करणारी वेगळी वैशिष्ट्ये असतात. या लेखात ढग कसे तयार होतात तसेच ढग व ढगांचे प्रकारांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन

सांद्रीभवन आणि घनीभवन म्हणजे काय?

  • वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरुपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन म्हटले जाते. तसेच वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन म्हटले जाते.
  • हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते. त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते. सांद्रीभवनसाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात.
  • दव, दहिवर, धुके ही जमिनीलगत, तर ढग हे जमिनीपासून उंचावर आढळणारी सांद्रीभवनाची रूपे आहेत.

Read More: नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी

List of National Highways in India (Updated)

Adda247 App

ढग व ढगांचे प्रकार

ढग व ढगांचे प्रकार: ढग हा वातावणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार आहे. सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहित अवस्थेत असतात. त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात (उर्ध्वगामी प्रवाहामुळे). दवबिंदू तापमान पातळीदेखील उंची व बाष्प यांच्या प्रमाणावर ठरते.

ढगांमध्ये बाष्पीभवनाची व सांद्रीभवनाची क्रिया एकापाठोपाठ घडत असते. बाष्पाचे प्रमाण जमिनीलगत अधिक असते. समुद्रसपाटीपासून उंचीनुसार बाष्पाचे प्रमाण कमी होत जाते यामुळे कमी उंचीवरील ढग आकाराने मोठे असतात, तर जास्त उंचीवरील ढग आकाराने लहान असतात.

Types of Clouds
Types of clouds | ढगांचे प्रकार

ढगांचे प्रकार

ढगांचे निरीक्षण केल्यावर उंचीनुसार त्यांचे तीन मुख्य प्रकार करता येतात. 

1) अतिउंचीवरील ढग : ढगांची उंची सुमारे 7000 ते 14000 मी. दरम्यान

2) मध्यम उंचीचे ढग:  उंची सुमारे 2000 ते 7000 मी. दरम्यान.

3) कमी उंचीचे ढग : 2000 मी. पेक्षा कमी उंची.

 

1) जास्त उंचीवरील ढग :

हे ढग मुख्यतः हिमस्फटिकांचे बनलेले असतात. यांचे वर्गीकरण सिरस (Cirrus), सिरोक्युम्युलस (Cirrocumulus) आणि सिरोस्ट्रेटस (Cirrostratus) या प्रकारामध्ये केले जाते.

  • सिरस (Cirrus) : हे मुख्यतः तंतुमय असतात.
  • सिरोक्युम्युलस (Cirrocumulus) : या ढगांचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायांसारखे दिसते.
  • सिरोस्ट्रेटस (Cirrostratus) : हे वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात. – यांच्याभोवती बरेचदा तेजोमंडल असते.

 

2) मध्यम उंचीवरील ढग :

यात अल्टोक्युम्युलस (Altocumulus)अल्टोस्ट्रेटस (Altostratus) या ढगांचा समावेश होतो.

  • अल्टोक्युम्युलस (Altocumulus): हे स्तरांच्या स्वरुपात असून तरंगासारखी रचना असते, बहुधा हे पांढऱ्या रंगाचे असून त्यात करड्या रंगाच्या छटा असतात.
  • अल्टोस्ट्रेटस (Altostratus) : यात कमी जाडीचे थर असतात. यातून सूर्यदर्शन होऊ शकते, मात्र सूर्यदर्शन हे दुधी काचेतून पाहिल्यासारखे दिसते.

Read More: भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

States and their Capitals

3) कमी उंचीवरील ढग :

यात पाच वेगवेगळे प्रकार केले जातात.

  • स्टॅटोक्युम्युलस (Stratocumulus): त्यांचा रंग पांढरा ते धुरकट असतो. यात ढगांचे अनेक गोलाकार पुंजके असतात.
  • स्ट्रेटस् (Stratus): या ढगात देखील थर असतात. यांचा रंग राखाडी असतो व तळाकडील भाग एकसमान असतो.
  • निम्बोस्ट्रेटस (Nimbostratus): गडद राखाडी रंगाचे असून यापासून रिमझिम पाऊस तसेच हिमवर्षाव होऊ शकतो. हे ढग जाड थरांचे असतात
  • क्युम्युलस ढग (Cumulus): – भूपृष्ठापासून 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. घुमटाकार व अवाढव्य असतात. हे ढग आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढलो की त्यांचे क्युम्युलोनिम्बस ढगांमध्ये रुपांतर होते.
  • क्युम्युलोनिम्बस ढग (Cumulonimbus): हे ढग वादळाचे निदर्शक आहेत. हे ढग काळ्या रंगाचे व घनदाट असून ते पर्वतकाय दिसतात. या ढगात गडगडाट होतो, तसेच विजाही चमकतात. वादळी पावसांसह कधीकधी गारपीटही होते, पण हा पाऊस फार काळ टिकत नाही. इतर ढगांपेक्षा या ढगातून पडणारे पावसाचे थेंब मोठे असतात. जेव्हा ढगातील हवा फार थंड असते, तेव्हा हे थेंब गोठतात व गारा स्वरुपात जमिनीवर येतात.

ढगांचे प्रकार

साधारण उंची (मी.)

सिरस (Cirrus)

सिरोस्ट्रॅंटस (Cirro-Stratus)

सिरोक्युम्युलस (Cirro-cumulus)

7000 ते 14000

अल्टो स्ट्रॅटस (Alto-stratus)

अल्टो क्युमुलस (Alto-Cumulus)

2000 ते 7000

स्ट्रॅटोक्युमुलस (Strato-cumulus)

स्ट्रॅटस् (Strutus)

निम्बोस्ट्रॅटस (Nimbostratus)

2000 पेक्षा कमी

क्युम्युलस (Cumulus)

क्युम्युलोनिम्बस (Cumulonimbus)

विस्तार कमी जास्त असतो

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विध्यर्थ्यांच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

लेखाचे नाव लिंक
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे
चंद्रयान 3
भारताची जणगणना 2011
लोकपाल आणि लोकायुक्त
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
कार्य आणि उर्जा
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे)
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या
ढग व ढगांचे प्रकार
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

 

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!