Marathi govt jobs   »   Study Materials   »   कॉम्प्युटर नेटवर्क

कॉम्प्युटर नेटवर्क | जिल्हा न्यायालय भरतीसाठी अभ्यास साहित्य

कॉम्प्युटर नेटवर्क

कॉम्प्युटर नेटवर्क: एका संगणकाला दुसऱ्या एक किंवा अनेक संगणकांशी संपर्क करण्यासाठी कॉम्प्युटर नेटवर्कची गरज असते. दैनंदिन जीवनात आपण देखील कॉम्प्युटर नेटवर्कचा वापर करत असतो. आगामी काळातील जिल्हा न्यायालय भरती परीक्षेत संगणकावरील ज्ञान या विषयावर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे आज या लेखात आपण कॉम्प्युटर नेटवर्क व त्याचे प्रकार या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

कॉम्प्युटर नेटवर्क: विहंगावलोकन

कॉम्प्युटर नेटवर्क: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
विषय संगणक
उपयोगिता जिल्हा न्यायालय भरती परीक्षा
लेखाचे नाव कॉम्प्युटर नेटवर्क
लेख तुम्हाला काय प्रदान करतो?
  • कॉम्प्युटर नेटवर्कची ओळख
  • कॉम्प्युटर नेटवर्कचे प्रकार

कॉम्प्युटर नेटवर्कची ओळख

इन्टरनेट विषयी जाणून घेण्याआधी नेटवर्क या विषयाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. एका संगणकाला दुसऱ्या एक किंवा अनेक संगणकांशी संपर्क करण्यासाठी कॉम्प्युटर नेटवर्कची गरज असते. कॉम्प्युटर नेटवर्किंगचा जन्म 1965 मध्ये जन्म झाला. अतिशय कमी काळातच Networking, हो computer activity चा महत्वाचा भाग बनला. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये मध्ये नेटवर्किंगसाठी उपग्रह व फायबर ऑप्टिक केबलचा वापर केला जातो. कॉम्प्युटर नेटवर्क मध्ये मुख्य संगणक ज्या पासून इतर संगणकांना नेटवर्किंगच्या सुविधा पुरवल्या जातात त्याला “सर्व्हर” असे म्हणतात व जे संगणक सुविधा उपभोगतात त्यांना “क्लाएंट” असे म्हणतात.

कॉम्प्युटर नेटवर्कचे प्रकार 

1) LAN (Local Area Network) – Local Area Network (LAN) या प्रकारात संगणकाचे नेटवर्क एकाच खोलीत किंवा इमारतीत असतात. यात केबलच्या सहाय्याने संगणक एकमेकांना जोडले जातात.

कॉम्प्युटर नेटवर्क | जिल्हा न्यायालय भरतीसाठी अभ्यास साहित्य_3.1
LAN

2) MAN (Metropolitan Area Network) – MAN हे LANचे खूप मोठे स्वरूप आहे. या मध्ये संपूर्ण शहर कॉम्प्युटर नेटवर्क द्वारे जोडले जाते. याचा वापर साधारण पणे 10 ते 100 कि.मी. पर्यंत केला जातो.

3) WAN (Wide Area Network) – WAN (Wide Area Network) चा वापर दोन किंवा अधिक शहरातील संगणक एकमेकांशी जोडण्यासाठी केला जातो. हे MAN पेक्षाही अधिक मोठे आहे. यात संगणक जोडण्यासाठी उपग्रहांचा वापर केला जातो.

WAN
WAN

टोपोलॉजी

कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये संगणक एकमेकांना कशा प्रकारे जोडले गेले आहेत, त्यांचे डिझाईन लेआऊट कशे आहे यालाच “टोपोलॉजी” असे म्हणतात. टोपोलॉजीचे खालील तीन प्रकार पडतात.

  • बस टोपोलॉजी
  • रिंग टोपोलॉजी
  • स्टार टोपोलॉजी

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा-महापॅक
महाराष्ट्राचा-महापॅक

Sharing is caring!

FAQs

कॉम्प्युटर नेटवर्कची गरज का असते?

एका संगणकाला दुसऱ्या एक किंवा अनेक संगणकांशी संपर्क करण्यासाठी कॉम्प्युटर नेटवर्कची गरज असते.

कॉम्प्युटर नेटवर्कचे किती प्रकार आहेत?

कॉम्प्युटर नेटवर्कचे 03 प्रकार आहेत.

कॉम्प्युटर नेटवर्कबद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

कॉम्प्युटर नेटवर्कबद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.