Marathi govt jobs   »   Study Materials   »   COVID-19 Study material for arogya bharati

कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती | Covid-19 Important Information I Study Material for MHADA Exam 2021

Covid-19 Important Information I Study Material for MHADA Exam 2021: म्हाडा भरती 2021 व जिल्हा परिषद भरती 2021 या दोन्ही परीक्षेच्या दृष्टीने Covid-19 हा घटक महत्वाचा आहे. या परीक्षेत चालू घडामोडी व विज्ञान या दोन विषयांचे फार महत्त्व आहे. सध्या COVID-19 हा चालू घडामोडी व विज्ञान या दोन्ही मध्ये येणारा खूप महत्त्वाचा विषय आहे. आत्तापर्यंत झालेल्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये Covid-19 वर प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे आपल्याला Covid-19 बद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. MHADA भरतीच्या परीक्षेत Covid-19 शी संबंधित प्रश्न विचारू शकतात. तर चला आजच्या या लेखात आपण कोविड-19 | Covid-19 ची स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती जसे की, Covid-19 चा इतिहास, Covid-19 – भारत, Covid-19 संदर्भातील महत्वाचे मुद्दे, Covid-19 चाचण्यांचे प्रकार, Covid-19 प्रतिबंधात्मक भारतातील लसी इ. बाबत माहिती पाहणार आहोत.

Covid-19 Important Information | कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती

Covid-19 Important Information: MHADA भरतीत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 50 प्रश्न येणार आहेत. त्यामध्ये करंट अफेयर्स व विज्ञान या दोन विषयांचे फार महत्त्व आहे. सध्या COVID-19 हा विज्ञान व करंट अफेअर्स दोन्ही मध्ये येणारा खूप महत्त्वाचा विषय आहे त्याचप्रमाणे आगामी येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये COVID-19 यावर हमखास प्रश्न विचारले जातील. यावर्षी झालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत यावर तीन प्रश्न विचारण्यात आले होते. म्हणून आज आपण या article मध्ये COVID-19 बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जेणेकरून म्हाडा भरतीच्या पेपर मध्ये आपल्याला याचा उपयोग होईल.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या)

COVID-19 History | कोविड-19 इतिहास

COVID-19 History | कोविड-19 इतिहास: कोरोनाव्हायरस पहिल्यांदा 1930 च्या दशकात सापडले जेव्हा संसर्गजन्य ब्रॉन्कायटिस विषाणूमुळे (आयबीव्ही) पाळीव कोंबड्यांचा तीव्र श्वसन संसर्ग झाल्याचे दिसून आले. 1940 च्या दशकात माऊस हेपेटायटिस व्हायरस (एमएचव्ही) आणि ट्रान्समिसिसिबल गॅस्ट्रोएन्टेरिटिस व्हायरस (टीजीईव्ही) व आणखी दोन प्राणी कॉर्नोव्हायरसपासून अलग ठेवण्यात आले.

1960 च्या दशकात मानवी कोरोनाव्हायरस सापडले. सर्वात आधी अभ्यास केलेला सामान्य सर्दी असलेल्या मानवी रुग्णांद्वारे होता, ज्याला नंतर मानवी कोरोनाव्हायरस 229E आणि ह्यूमन कोरोनाव्हायरस ओसी 43 ओसी असे नाव देण्यात आले. माणसां मध्ये सार्स-सीओव्ही, 2003  मध्ये एचसीओव्ही एनएल 63 2004 मध्ये आणि 2019 मध्ये एसएआरएस-कोव्ह -2 (SARS-COV-2)  यासह इतर मानवी कोरोनव्हायरस ओळखले गेले. यापैकी बहुतेकांना श्वसनमार्गाच्या गंभीर आजाराचे संक्रमण होते.

2019 मध्ये कोरोना व्हायरसचा एक उपप्रकार चीनमधील वूहान शहरात आढळून आला. याला कोविड-19 असे नाव देण्यात आले. सुरुवातीस वुहान व आसपासच्या प्रदेशात पसरलेला हा विषाणू त्याच्या इतर उपप्रकारांपेक्षा अधिक तीव्रतेचा असून याने रोग्यांच्या मरण्याचे प्रमाण मोठे आहे. 

COVID-19 India | कोविड-19 भारत

COVID-19 India | कोविड-19 भारत: 30 जानेवारी 2020 रोजी भारताने केरळमधील त्रिशूर येथे कोविड -19 चे पहिले प्रकरण नोंदवले जे 3 फेब्रुवारी 2020 पर्यंत तीन प्रकरणांमध्ये वाढले; सर्व विद्यार्थी वुहानमधून परतले होते.  या व्यतिरिक्त, फेब्रुवारीमध्ये प्रसारणात कोणतीही लक्षणीय वाढ दिसून आली नाही. 4 मार्च रोजी इटालियन पर्यटक गटाच्या 14 संक्रमित सदस्यांसह 22 नवीन प्रकरणांची नोंद झाली.प्रभावित देशांतील प्रवासाचा इतिहास असलेले अनेक लोक आणि त्यांचे संपर्क सकारात्मक चाचणी केल्यानंतर महिन्याभरात प्रसारण वाढले. 12 मार्च रोजी, सौदी अरेबियाच्या प्रवासाचा इतिहास असलेला 76 वर्षीय माणूस भारताचा पहिला कोविड -19 मृत्यू झाला.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे

COVID-19  Important Points | कोविड-19  महत्वाचे मुद्दे 

COVID-19 – Important points | कोविड-19 – महत्वाचे मुद्दे: MHADA भरतीच्या दृष्टीने covid-19 याबद्दलचे मग काही महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.

  1. Covid-19 च्या संपर्कात येण्याची वेळ व लक्षणे सुरू होण्याच्या वेळेस साधारणतः पाच ते सहा दिवसांचा कालावधी असतो परंतु तो 1 ते 14 दिवसांचा असू शकतो
  2. अभ्यासातून असे दिसून आले की covid-19 विषाणू प्लास्टिक व स्टेनलेस स्टील वर 72 तासांपर्यंत तांब्याच्या धातूवर 4 तासांपर्यंत आणि पुठ्ठयावर 24 तासापेक्षा कमी काळ जिवंत राहू शकतो
  3. सामान्य घरगुती जंतुनाशक द्वारे सहजपणे पृष्ठभागातील करोना विषाणू नष्ट केला जाऊ शकतो.
  4. COVID-19 मुळे पाच  पैकी एक जण गंभीर आजारी पडतो आणि त्याला श्‍वास घ्यायचा त्रास होऊ शकतो
  5. वृद्ध लोक आणि उच्च रक्तदाब,  फुफ्फुसाच्या समस्या, मधुमेहा किंवा कर्करोग यासारख्या मूलभूत वैद्यकीय समस्या असणाऱ्याला  गंभीर आजार होण्याचा धोका जास्त असतो

Types of Testing of COVID-19 | कोविड-19 चाचण्याचे प्रकार 

COVID-19 Types of testing | कोविड-19 चाचण्याचे प्रकार: COVID-19 चाचण्या वेगवेगळ्या प्रकारे करता येतात त्या सर्व पद्धती खाली दिलेले आहे

प्रतिपिंड चाचणी (Antibody Test)

  • यालाच सेरॉलॉजिकल (serological) टेस्ट असे सुद्धा म्हणतात
  • या मध्ये रुग्णाच्या रक्तातील इम्युनोग्लोब्युलीन स्वरूपातील अँटीबॉडी तपासल्या जातात. यात IgG, IgM, lgE अशा अँटीबॉडी सापडणे महत्त्वाचे असते
  • IgG (Immunoglobulin G) अँटीबॉडीमुळे व्यक्तीला विषाणू संसर्ग आहे का हे स्पष्ट होते.
  • रोगप्रतिकारक शक्तीने तयार केलेल्या अँटीबॉडीजचे प्रमाण देखील शोधले जाते. ही चाचणी करण्याची अप्रत्यक्ष पद्धत आहे कारण ही चाचणी व्हायरस शोधू शकत नाही. .
  • संसर्ग सुरू झाल्यानंतर ९-२८ दिवसांच्या दरम्यान अँटीबॉडीज दिसून येऊ शकतात.

RT – PCR test

  • RT-PCR Reverse Transcription-Polymerase Chain Reaction
  • ही रुग्णाच्या नाक/ घशातील स्वॅब घेवून चाचणी करण्याची एक पद्धत आहे.
  • यामध्ये विषाणूचा अनुवांशिक घटक असलेला Ribonucleic Acid किंवा RNA काढला जातो. यामध्ये RNA चे DNA मध्ये रूपांतरण केले जाते.

Rapid Diagnostic Tests (RDT)

  • रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट (आरडीटी) एखाद्या व्यक्तीच्या श्वसनमार्गाच्या नमुन्यात कोविड -19 विषाणूद्वारे व्यक्त व्हायरल प्रथिने (प्रतिजन) ची उपस्थिती ओळखते.
  • जर नमुनामध्ये लक्ष्यित प्रतिजन पुरेसे एकाग्रतेमध्ये उपस्थित असेल, तर ते प्लास्टिकच्या आच्छादनामध्ये बंद केलेल्या कागदी पट्टीवर निश्चित केलेल्या विशिष्ट प्रतिपिंडांना बांधील आणि साधारणपणे 30 मिनिटांच्या आत दृश्य ओळखण्यायोग्य सिग्नल तयार करेल.

महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस

COVID-19 – Various Vaccines In India | कोविड-19 – भारतातील विविध लसी

COVID-19 – Various Vaccines In India | कोविड-19 – भारतातील विविध लसी: भारताने आपला लसीकरण कार्यक्रम 16 जानेवारी 2021 रोजी सुरू केला, सुरूवातीला 3,006 लसीकरण केंद्रे सुरू केली.  प्रत्येक लसीकरण केंद्र एकतर कोविशील्ड किंवा कोवाक्सिन देईल, परंतु दोन्ही नाही. उपलब्धतेच्या पहिल्या दिवशी 165,714 लोकांना लसीकरण करण्यात आले.

  • पहिल्या टप्प्यात पोलीस, निमलष्करी दल, स्वच्छता कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांसह आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कामगारांचा समावेश होता
  • दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील सर्व रहिवासी, 45 ते 60 वयोगटातील रहिवासी एक किंवा अधिक पात्रता असलेल्या कॉमोरबिडिटीजसह, आणि कोणत्याही आरोग्य सेवा किंवा फ्रंटलाइन कामगार ज्याला पहिल्या टप्प्यात डोस मिळाला नाही यांचा समावेश करण्यात आला.
  • तिसऱ्या टप्प्यात , 45 ते 60 वयोगटातील रहिवासी व पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लोकांचा समावेश करण्यात आला
  • शेवटच्या टप्प्यात सर्व नागरिकांचा समावेश करण्यात आला.

कोविड-19 च्या विविध लसींची नावे पुढीलप्रमाणे आहेत

कोविशिल्ड | Covishield

  • कोविशिल्ड ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने शोधून काढले.
  • या लसीची निर्मिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे
  • भारतात सर्वात पहिल्यांदा या लस्सी ला मान्यता मिळाली. ही लस इंजेक्शनद्वारे दिली जाते
  • यास 1 जानेवारी 2021 रोजी मान्यता मिळाली.

कोव्हॅक्सिन | Covaxin

  • संपूर्ण स्वदेशी बनावटीची ही लस हैद्राबाद स्थित भारत बायोटेक या संस्थेने निर्माण केली आहे. 
  • भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि राष्ट्रीय विषाणू संस्थेने (NIV) ही लस विकसित केली.
  • कोव्हॅक्सिन (Covaxin) ही भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीने तयार केलेली लस विकसित करण्यात डॉ. के. सुमती यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
  • यास 3 जानेवारी 2021 रोजी मान्यता मिळाली.

स्पुत्निक व्हीं | Sputnik V

  • ही जगातील नोंदणीकृत पाहिलस ठरली व भारतात तिला सप्टेंबर 2020 मध्ये मध्ये मान्यता मिळाली.
  • ही रशियाची लस आहे.
  • ही लस भारतात डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी मार्फत दिली जाणार आहे.

भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

जगातील इतर कोरोना लसी

अ क्र 

लसीचे नाव  भारतात मान्यता मिळाल्याचा दिनांक 
1           Moderna

29 जून  2021

2

Johnson & Johnson

7 ऑगस्ट  2021

3

ZyCoV-D

20 ऑगस्ट 2021

4

Corbevax

अजूनपर्यंत मान्यता नाही 

5 Covovax

अजूनपर्यंत मान्यता नाही 

Study material for MHADA Exam 2021 | MHADA भरती 2021 परीक्षेसाठी अभ्यास साहित्य

Study material for MHADA Exam 2021: म्हाडा भरती 2021 मध्ये सामान्य ज्ञान विषयाला चांगले वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का अभ्यास असणे आवश्यक आहे. हा विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. MHADA परीक्षेत सर्वसाधारण पदे (Non Technical Post) मध्ये प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत. त्याचा विचार करता सर्व विषय कव्हर करण्याचा प्रयत्न Adda 247 मराठी करणार आहे. त्या अनुषंगाने मराठी, इंग्लिश व सामान्य ज्ञान या विषयावर काही लेख (Study material for MHADA Exam 2021)  प्रसिद्ध केले आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आगामी होणाऱ्या म्हाडा (MHADA) व जिल्हा परिषदेच्या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

Union and Maharashtra State Council of Ministers महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे
महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली  मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Human Diseases
सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी
महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

National Health Mission (NHM): Study Material for Arogya Bharti 2021

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

 

FAQs COVID-19

Q1. कोविड -19 हा घटक कोणत्या विषयात येतो?

Ans. कोविड -19 हा घटक चालू घडामोडी व सामान्य विज्ञान या विषयात येतो.

Q2. भारतात कधी आणि कुठे पहिले कोविड -19 चे पहिले प्रकरण नोंदवले गेले?

Ans. 30 जानेवारी 2020 रोजी भारताने केरळमधील त्रिशूर येथे कोविड -19 चे पहिले प्रकरण नोंदवले गेले.

Q3. कोविड-19 चा  कोणत्या विषयात समावेश होतो?

Ans. कोविड-19 हा विषय विज्ञान व चालू घडामोडी यात येतो.

Q4.  MHADA भरतीचे  घटक मला कुठे पाहायला मिळतील?

Ans. Adda247 मराठीच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला यासंबंधी सर्व माहिती मिळणार आहे. 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

म्हाडा भरती 2021 विविध पदांसाठी Full Length Test Series
म्हाडा भरती 2021 विविध पदांसाठी Full Length Test Series

Sharing is caring!

Covid-19 Important Information I Study Material for Arogya Bharti and ZP Bharati 2021_4.1

FAQs

Will there be questions on COVID-19 in the health department exam?

Yes questions will be asked on COVID-19 in the health department exam

How many questions will be asked on Covid-19 in the health department exam?

2 to 3 questions will be asked on Kovid-19 in the examination of health department

What subject does Covid-19 belong to?

Covid-19 is a subject of science and current affairs.

Where I find content of MHADA Bharati?

On Adda247 Marathi's official website you get all content.