Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
कोव्हीहोम: आयआयटी हैदराबाद ची कोव्हीड टेस्ट किट
“कोव्हीहोम” नावाची भारतातील पहिली जलद इलेक्ट्रॉनिक कोविड -19 आरएनए चाचणी किट भारतीय तंत्रज्ञान संस्था हैदराबाद येथील एका संशोधन गटाने विकसित केली आहे. सेल्युलर आणि मॉलीक्युलर जीवशास्त्र केंद्राद्वारे किटचे प्रमाणीकरण केले गेले आहे आणि कोविड-19 शोधण्यासाठी या किटचा घरी आरामात उपयोग केला जाऊ शकतो. या चाचणी किटचा मुख्य फायदा असा आहे की त्याला आरटी-पीसीआरची (रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शन) आवश्यक नाही. ही चाचणी लक्षणे असणाऱ्या आणि लक्षणे नसलेल्या दोन्ही रुग्णांसाठी 30 मिनिटांच्या आत निकाल देऊ शकते.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो