Table of Contents
घटना निर्मिती
घटना निर्मिती: भारतीय घटना निर्मितीचा पाया 1946 साली भारतात आलेल्या कॅबिनेट मिशन मुळे घातला गेला. भारतीय राज्यघटना हा आगामी काळातील सरळसेवा भरती जसे कि, जिल्हा परिषद भरती 2023, कृषी विभाग भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, आरोग्य भरती 2023, नगर परिषद भरती 2023, MIDC भरती 2023 आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असून त्यावर परीक्षेत हमखास प्रश्न विचारले जातात. या लेखात आपण घटना निर्मिती, घटना निर्मितीची पार्श्व भूमी, घटना समित्या इ. बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
घटना निर्मिती: विहंगावलोकन
भारतीय राज्यघटनेच्या संबंधित लेखाचे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.
घटना निर्मिती: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | जिल्हा परिषद आणि सर्व स्पर्धा परीक्षा |
विषय | भारतीय राज्यघटना |
लेखाचे नाव | घटना निर्मिती |
घटना निर्मिती: पार्श्वभूमी
सन 1946 मध्ये तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान क्लेमेंट ऍटली यांनी भारतात कॅबिनेट मिशन पाठवले होते. या मिशनचे उद्देश्य भारतीय नेत्यांकडे सुरळीत पणे सत्तेचे हस्तांतरण करणे हे होते. या मिशनने संविधान समिती साठी निवडणुका घ्याव्यात अशी शिफारस केली. त्या शिफारशी नुसार तत्कालीन घटना सभेत एकूण 389 सदस्य होते त्यापैकी 296 सदस्य हे ब्रिटीश भारतासाठी तर 93 संस्थानिकांसाठी होते. घटना समितीमध्ये संस्थानिकांनी भाग घेण्याचे न ठरविल्यामुळे त्यांच्या 93 जागा भरण्यात आल्या नाहीत.
घटना समितीतील 296 जागांसाठी जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये देशभरात निवडणुका घेण्यात आल्या. त्या पैकी सर्वाधिक 208 जागी राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले तर मुस्लीम लीगचे 73 व अपक्षांचे 15 उमेदवार निवडून आले. मुस्लीम लीगचे उमेदवार भारत-पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानात निघून गेल्यामुळे घटना समितीची मुळची 389 ही संख्या कमी झाली.
भारतीय स्वातंत्र्याचा कायदा दिनांक 18 जुलै 1947 रोजी संमत झाल्यानंतर या कायद्यानुसार घटना समितीची संख्या 299 इतकी ठरविण्यात आली. त्यापैकी 229 सदस्य हे प्रांताचे तर 70 सदस्य हे संस्थानिकांचे प्रतिनिधी होते.
घटना समितीचे अध्यक्ष व सदस्य
भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी घटना समितीची स्थापना करण्यात आली होती. घटना समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य या बद्दल सविस्तर माहिती खाली दिलील्या तक्त्यात दिली आहे.
घटना समितीचे अध्यक्ष व सदस्य | |
पद | व्यक्तीचे नाव |
घटना समितीचे अध्यक्ष | डॉ. राजेंद्र प्रसाद |
घटना समितीचे उपाध्यक्ष | हरेंद्र कुमार(एच. सी.) मुखर्जी |
घटना समितीचे सल्लागार | बी. एन. राव |
घटना समितीचे प्रमुख पुरुष सदस्य | पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, गोविंद वल्लभ पंत, श्यामा प्रसाद मुखर्जी, सी. राजगोपालाचारी |
घटना समितीचे प्रमुख स्त्री सदस्या | सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी, राजकुमारी अमृता कौर, अम्मू स्वामिनाथन, कमला चौधरी, हंसाबेन मेहता, विजयालक्ष्मी पंडित, एनी मास्केरेन, मालती चौधरी |
घटना निर्मिती: कालानुक्रम
भारतीय घटनेच्या निर्मिती साठी घटना समितीचे कामकाज एकूण 2 वर्षे, 11 महिने, 18 दिवस म्हणजेच 1082 दिवस चालले. भारतीय घटनेच्या निर्मितीचा कालानुक्रम खाली सविस्तरपणे दिलेला आहे.
- 6 डिसेंबर 1946: कॅबिनेट मिशनच्या शिफारशी नुसार संविधान सभेची स्थापना
- 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946: घटना समितीचे पहिले अधिवेशन या काळात झाले. हे अधिवेशन दिल्ली येथे झाले. डॉ. सच्चिदानंद सिन्हा हे या अधिवेशनाचे हंगामी अध्यक्ष होते. मुस्लीम लीगने बॅरिस्टर जीनांच्या नेतृत्वाखाली या अधिवेशनावर बहिष्कार टाकला.
- 11 डिसेंबर 1946: घटना समितीच्या अध्यक्ष पदी डॉ.राजेंद्र प्रसाद तर उपाध्यक्ष पदी हरेंद्रकुमार मुखर्जी यांची निवड करण्यात आली व घटनात्मक कायदेशीर सल्लागार पदी बी.एन. राव यांना नियुक्त केले.
- 13 डिसेंबर 1946: घटना समितीचे वरिष्ठ सदस्य व संघराज्य घटना व अधिकार समितीचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणाऱ्या पं. जवाहरलाल नेहरूंनी ‘राज्यघटनेच्या उद्दिष्टांचा ठराव’ सादर केला. याच ठरावावर भारतीय राज्य घटनेचा ‘सरनामा’ आधारित आहे.
- 22 जानेवारी 1947: पं. जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला ठराव मंजूर करण्यात आला.
- 22 जुलै 1947: पिंगाली वेंकय्या यांनी तयार केलेला नवा राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात आला.
- 15 ऑगस्ट 1947: स्वातंत्र्य प्राप्त झाले. भारत भारताचे वर्चस्व आणि पाकिस्तानचे वर्चस्व असे विभागले गेले.
- 29 ऑगस्ट 1947: घटना समितीची सर्वात महत्वाची उपसमिती मसुदा समितीच्या अध्यक्ष पदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली. 29 ऑगस्ट 1947 ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात मसुदा समितीचे कामकाज चालले.
- 26 नोव्हेंबर 1949: घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला व घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यावर सही केली. 299 पैकी 284 सदस्यांनी संविधानाच्या मसुद्यावर सह्या केल्या.
- 24 जानेवारी 1950: घटना समितीची विशेष व शेवटची बैठक संपन्न
- 26 जानेवारी 1950: भारतीय राज्य घटना अंमलात आली.
भारतीय संविधानाचे स्वरूप
26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना जेव्हा अंमलात आली तेव्हा त्यात एकूण 22 भाग, 8 अनुसूची व 395 कलमे होती. काळानुसार राज्यघटनेत अनेक बदल झाले व त्यातील काही कलमे रद्द झाली तसेच काही कलमे नव्याने जोडण्यात आली. सध्या भारतीय राज्यघटनेत 25 भाग, 12 अनुसूची व 448 कलमे आहेत.
भारतीय संविधानाचा हेतू
घटना कर्त्यांनी घटना निर्मिती करताना ‘भारत देशात लोकशाही पद्धतीने कायद्यांवर आधारलेले शासन निर्माण करणे‘ हा हेतू समोर ठेवला होता.
जिल्हा परिषद भरती 2023 साठी अभ्यास साहित्य
सरळ सेवा जसे की, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.
लेखाचे नाव | लिंक |
महाराष्ट्राची लोकसंख्या | |
जगातील 7 खंड | |
भारताची जनगणना: भारताची जनगणना 2011 | |
आम्ल आणि आम्लारी | |
भारतातील खनिज संपत्ती | |
प्रकाशाचे गुणधर्म | |
महाराष्ट्राची मानचिन्हे | |
भारतातील शेती | |
भौतिक राशी आणि त्यांचे एकके | |
राष्ट्रीय आणीबाणी कलम 352: व्याख्या, परिचय, प्रकार, कालावधी आणि परिणाम | |
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP) | |
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग | |
भारतातल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळी | |
राष्ट्रीय आरोग्य अभियान | |
महाराष्ट्रातील लोकजीवन | |
भारतीय संविधानाची उद्देशिका | |
मराठा साम्राज्य – इतिहास, शासक, राज्य विस्तार आणि प्रशासन | |
2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला | |
जालियनवाला बाग हत्याकांड – पार्श्वभूमी, कारणे आणि परिणाम | |
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023) | |
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे | |
चंद्रयान 3 | |
भारताची जणगणना 2011 | |
लोकपाल आणि लोकायुक्त | |
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग | |
कार्य आणि उर्जा | |
गांधी युग
|
|
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
|
|
भारताचे नागरिकत्व
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतीय संविधानाची उद्देशिका
|
|
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्राचे हवामान | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
सिंधू संस्कृती | |
जगातील 07 खंड | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
|
|
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
|
|
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
गती व गतीचे प्रकार | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
आम्ल व आम्लारी | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतातील सर्वात लांब पूल 2023
|
|
रोग व रोगांचे प्रकार | |
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
|
|
महाराष्ट्रातील लोकजीवन
|
|
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
|
|
वनस्पतीची रचना आणि कार्ये
|
|
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
|
|
लोकपाल आणि लोकायुक्त
|
|
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
|
|
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
|
|
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
|
|
पृथ्वीवरील महासागर
|
|
महाराष्ट्राचे हवामान | |
भारताची क्षेपणास्त्रे | |
महाराष्ट्रातील शहरांची यादी
|
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |