Marathi govt jobs   »   Study Materials   »   RBI ची पतनियंत्रणाची साधने

RBI ची पतनियंत्रणाची साधने | Credit Control Methods of RBI : MPSC Gazetted Civil Services Exam 2024 अभ्यास साहित्य

 RBI ची पतनियंत्रणाची साधने | Credit Control Methods of RBI

Title Link  Link 
MPSC परीक्षा 2024 – अभ्यास योजना | MPSC Exam 2024 – Study Plan अँप लिंक वेब लिंक

RBI ची पतनियंत्रणाची साधने – RBI चे पतनियंत्रणाचे धोरण

Credit Control Methods of RBI- Policy of Credit Control: व्यापारी बँका पतचलननिर्मिती करतात. म्हणजेच बँका ठेवींतून कर्जे व पुन्हा कर्जांतून व्युत्पन्न ठेवी निर्माण करीत असतात. मात्र बँकांनी जर आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी प्रमाणावर पतचलननिर्मिती केली तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेवर होतात. त्यामुळे बँकांच्या पतनिर्मितीच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मध्यवर्ती बँक म्हणून RBI वर असते.

RBI पतनियंत्रण धोरणाचा अवलंब करून, अर्थव्यवस्थेत जर आवश्यकतेपेक्षा जास्त पतचलननिर्मिती झाली असेल तर ‘महाग पैशाच्या धोरणा’ चा (Dear Money Policy) अवलंब करून पतचलनसंकोच (Credit Contraction) घडवून आणते. याउलट कमी पतचलननिर्मिती होत असेल तर ‘स्वस्त पैशाच्या धोरणा’ (Cheap Money Policy) अवलंब करून पतचलनविस्तार (Credit Expansion) घडवून आणते. आवश्यकतेनुसार पतचलनसंकोच किंवा पतचलनविस्तार घडवून आणण्याच्या RBI च्या धोरणालाच पतचलननियंत्रण असे म्हणतात.

Credit Control Methods of RBI | RBI ची पतनियंत्रणाची साधने

RBI’s means of Credit control: पतचलननियंत्रण घडवून आणण्यासाठी RBI ज्या मागांचा/ साधनांचा वापर करते, त्यांना पतचलन नियंत्रणाची साधने असे म्हणतात. पतचलन नियंत्रणाची साधने पुढीलप्रमाणे:

संख्यात्मक साधने

  • बँक दर धोरण
  • रोख निधीचे बदलते प्रमाण i)रोख राखीव प्रमाण (CRR) ii) वैधानिक रोखता प्रमाण (SLR)
  • खुल्या बाजारातील रोख्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार (OMO)
  • रेपो व रिव्हर्स रेपो व्यवहार
  • मार्जिनल स्टैंडिंग फॅसिलिटी

गुणात्मक साधने

  • कर्ज रक्कम व तारण यातील गाळा ठरवणे
  • कर्जाचे रेशनिंग
  • नैतिक समजावणी
  • प्रसिद्धी
  • प्रत्यक्ष कारवाई.
  • आदेशाद्वारे नियंत्रण

संख्यात्मक व गुणात्मक साधने – फरक :

संख्यात्मक साधने (Quantitative Measures) गुणात्मक साधने (Qualitative Measures)
RBI च्या संख्यात्मक साधनांचा परिणाम प्रत्यक्ष पतचलनाच्या / पतपैशाच्या संख्येवर किंवा प्रमाणावर किंवा आकारमानावर (Volume of Credit) होत असतो. म्हणजेच त्या साधनांच्या वापरामुळे बँकांकडील व पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेतील रोख रकमेमध्ये वाढ किंवा घट होते व परिणामतः एकूण पतचलनाचे प्रमाण वाढते किंवा कमी होते. गुणात्मक साधनांचा हेतू  पतचलनाचे आकारमान निश्चित करणे हा नसतो. तर देशातील अर्थव्यवस्थेस हानीकारक ठरतील अशा क्षेत्राकडील (उदा. सट्टेबाजी, अनुत्पादक उपभोग, अनावश्यक वस्तूंचे उत्पादन इत्यादी) पतचलनाचा पुरवठा रोखणे व त्याचा ओघ अर्थव्यवस्थेतील विविध उत्पादक क्षेत्रांकडे (उदा. शेती, उद्योग, वाहतूक, दळणवळण, पायाभूत सोयी इ.) वळविणे हा असतो. म्हणूनच गुणात्मक साधनांना विभेदात्मक (discriminatory) किंवा निवडक / वेचक (selective) असेही म्हणतात.
संख्यात्मक साधने पतचलनाचे आकारमान (Volume of Credit) ठरवितात. गुणात्मक साधने ही पतचलनाची दिशा (Direction of Credit) ठरवितात.

RBI ची पतनियंत्रणाची साधने-संख्यात्मक साधने

Credit Control Methods of RBI- Quantitative Measures : पतचलन नियंत्रणाची संख्यात्मक  साधने पुढीलप्रमाणे:

बँक दर: म्हणजे असा प्रमाण दर की ज्या दराने RBI व्यापारी बँकांच्या हुंडया/ विनिमय पत्रे व इतर व्यापारी विपत्रांची पुनर्वटवणूक करते, म्हणून बँक दराला पुनर्वटावाचा दर (Re-discount Rate) असेही म्हणतात. म्हणजेच, RBI व्यापारी बँकांना ज्या दराने अल्पमुदतीचा कर्जपुरवठा करते त्या दराला बँक दर असे म्हणतात.

राखीव निधीचे बदलते प्रमाण: या साधनाचा वापर करून RBI बँकांच्या हातातील पैशाच्या प्रमाणावरच नियंत्रण प्राप्त करीत असते व त्याद्वारे त्यांच्या पतनिर्मिती करण्याच्या क्षमतेवर नियंत्रण प्राप्त करते. यामध्ये CRR आणि SLR या दोन प्रकारच्या निधींचा समावेश होतो. हे दोन्ही निधी बँकांवर कायद्याने बंधनकारक असल्याने त्यांना ‘वैधानिक राखीव निधी आवश्यकता’ (Statuary Reserve Requirements) असे संबोधले जाते.

i)रोख राखीव प्रमाण (Cash Reserve Ration- CRR): प्रत्येक व्यापारी बँकेला स्वत: जवळ जमा झालेल्या एकूण ठेवींपैकी (निव्वळ मागणी व मुदत देयतांपैकी) काही एकूण प्रमाणात ठेवी RBI कडे रोख पैशाच्या प्रमाणात ठेवाव्या  लागतात, त्या प्रमाणाला CRR असे म्हणतात. सर्व व्यापारी बँकांवर CRR चे बंधन टाकण्यात आले आहे. बिगर-अनुसूचीत बँका CRR चा निधी स्वतः कडेच ठेवू शकतात.

CRR चा पतनियंत्रणाचे साधन म्हणून वापर: RBI ने CRR वाढविल्यास बँकांना जास्त निधी RBI कडे ठेवावा लागतो. त्यामुळे त्यांच्याकडे कर्ज देण्याजोगी रक्कम कमी झाल्याने त्यांची पतनिर्मितीची क्षमता कमी होते. त्यामुळे पतसंकोच घडून येऊ शकतो. याउलट, RBI ने CRR कमी केल्यास बँकांकडील कर्ज देण्याजागी रक्कम वाढल्याने त्यांची पतनिर्मितीची क्षमता वाढते. त्यामुळे पतविस्तार घडून येऊ शकतो

ii)वैधानिक रोखता प्रमाण (Statutory Liquidity Ratio- SLR): प्रत्येक व्यापारी बँकेला स्वत: जवळ जमा झालेल्या एकूण ठेवीपैकी (निव्वळ मागणी व मुदत देयतांपैकी) काही प्रमाणात ठेवी स्वतःकडे रोख स्वरूपात किंवा सोन्याच्या स्वरूपात किंवा मान्यताप्राप्त सरकारी रोख्यांच्या स्वरूपात ठेवाव्या लागतात. त्या प्रमाणाला SLR असे म्हणतात. सर्व बँकांवर SLR चे बंधन टाकण्यात आले आहे.

SLR चा पतनियंत्रणाचे साधन म्हणून वापर: RBI ने SLR वाढविल्यास बँकांजवळील कर्ज देण्याजोगी रक्कम कमी होऊन पतसंकोच घडून येऊ शकतो.RBI ने SLR कमी केल्यास बँकांजवळील कर्ज देण्याजोगी रक्कम वाढून पतविस्तार घडून येऊ शकतो.

रेपो आणि रिव्हर्स रेपो व्यवहार (Repo and Reverse Repo transactions): RBI ने 1991-1992 पासून ओव्हरनाईट रेपी व रिवर्स रेपो व्यवहारांची सुरुवात केली. अलिकडे ऑक्टोबर 2016 पासून RBI ने टर्म रेपो व रिव्हर्स रेपो व्यवहारही सुरू केले आहेत. सध्या रेपो व रिव्हर्स रेपो व्यवहार हे RBI च्या मौद्रिक धोरणाचे सर्वात महत्वाची साधने असून ती दैनंदिन वापराची साधने म्हणून वापरली जातात.

  • RBI चे ओव्हरनाईट रेपो व्यवहारः रेपो व्यवहारांतर्गत रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांकडून सरकारी रोखे खरेदी करुन त्यांना कर्ज देते. ही कर्जे सध्या एक दिवसाची RBI चे टर्म रेपो व किंवा 24 तासांची (overnight) कर्ज असतात(विकएंडसाठी तीन दिवसांची) म्हणजेच दुसऱ्या दिवशी बँका रोख्यांची पुनखरेदी करुन रिझर्व्ह बँकेची कर्ज परत करतात. या व्यवहाराला रेपो व्यवहार व कर्जदराला रेपो दर असे म्हणतात.
  • RBI चे ओव्हरनाईट रिव्हर्स रेपो व्यवहारःरिव्हर्स रेपो व्यवहारांतर्गत व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेकडून सरकारी रोखे खरेदी करुन तिला कर्जे देतात. ही कर्जे सुद्धा एक दिवसाची  किंवा 24 तासांची (overnight) कर्जे असतात (विकएंडसाठी तीन दिवसांची) म्हणजेच दुसऱ्या दिवशी रिझर्व्ह बँक रोख्यांची पुनर्खरेदी करुन व्यापारी बँकांची कर्जे परत करते. या व्यवहाराला रिव्हर्स रेपो व्यवहार व कर्जदराला रिव्हर्स रेपो दर असे म्हणतात.
  • RBI चे टर्म रेपो व रिव्हर्स रेपो व्यवहार : RBI ने ऑक्टोबर 2013पासून टर्म रेपो व्यवहारांना सुरूवात केली आहे. त्यांचा कालावधी 7/14/28/56 दिवस इतका असतो. गरजेनुसार टर्म रिव्हर्स रेपो व्यवहारही करते. अशा टर्म रेपो व रिव्हर्स रेपो व्यवहारांचा दर बदलणारा (variable) असतो.

मार्जिनल स्टडिंग फैसिलिटी (Marginal Standing Facility: MSF): ज्या व्यापारी बँकांना अचानक रोखतेची तीव्र गरज निर्माण होते त्या बँका आपल्या निव्वळ देयतांच्या(Net Demand and Time Liabilities) 2 टक्क्यांपर्यंतच्या रकमेची कर्जे 24 तासासाठी (overnight) RBI कडून घेऊ शकतात. या कर्जावरील व्याज दर रेपो दरापेक्षा अधिक असतो. या कर्जासाठी बँकेला SLR च्या रोख्यांचा तारण म्हणून वापर करता येतो.

खुल्या बाजारातील रोख्यांच्या खरेदी-विक्री व्यवहार (Open Market Operations): मध्यवर्ती बँकेने केलेली सरकारी कर्ज रोख्यांची खरेदी विक्री म्हणजेच खुल्या बाजारातील व्यवहार होय. RBI केंद्र सरकार तसेच, राज्य सरकारांच्या कोणत्याही मुदतीच्या सरकारी रोख्यांची तसेच, मध्य संचालक मंडळाच्या शिफारशींनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रोख्यांची खरेदी-विक्री खुल्या बाजारात करू शकते. मात्र, सध्या RBI फक्त केंद्र सरकारच्याच सरकारी रोख्यांची खरेदी-विक्री करते. तसेच, या रोख्यांची संख्या व कालावधीबद्दल कोणतेही बंधन सध्या नाही. RBI अल्प, मध्यम व दीर्घ मुदतींच्या रोख्यांची खरेदी-विक्री करू शकते.

RBI ची पतनियंत्रणाची साधने- गुणात्मक साधने

Credit Control Methods of RBI- Qualitative Measures : पतचलन नियंत्रणाची संख्यात्मक  साधने पुढीलप्रमाणे:

तारण मूल्य व कर्ज रक्कम यांतील गाळा ठरविणे (Fixation of margin requirements): बँका योग्य प्रकारच्या तारणावरच कर्ज देतात, मात्र, तारणाच्या बाजारमूल्याच्या काही टक्केच कर्ज दिले जाते. तारणाचे बाजारमूल्य व कर्जाची रक्कम यांतील टक्केवारीतील फरक म्हणजेच तारणपत्राची मर्यादा किंवा गाळा होय.

कर्जाचे रेशनिंग (Rationing of Credit): या साधनाद्वारे RBI द्वारे विविध बँकांना मिळणाऱ्या कर्ज मर्यादा निश्चित केल्या जातात. म्हणजेच, RBI बँकांबँकांमध्ये कर्ज वापराच्या उद्दिष्टानुसार कर्ज वाटपाबाबतीत भेद करते. कृषी, लघू उद्योग निर्यात क्षेत्र इ. क्षेत्रांना कर्जे देण्यासाठी बँकांना RBI कडून कमी दराने कर्जे मिळतात. अग्रक्रम क्षेत्र कर्जपुरवठा हा कर्जाच्या रेशनिंगचाच प्रकार आहे.

नैतिक समजावणी (Moral Suasion): बँकांनी RBI च्या पतचलन धोरणाशी (Credit Policy) सुसंगत असे स्वत:चे धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करावी. यासाठी RBI स्वतःचा नैतिक प्रभाव पाडून बँकांचे मन वळविते. म्हणून RBI ही बँकांची मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक (Friend, Philosopher and guide) या भूमिकेतून कार्य करते. यासाठी बँकांशी चर्चा, पत्रव्यवहार इ. चा अवलंब करते.

प्रसिद्धी (Publicity): RBI विविध प्रकारची माहिती (उदा. सांख्यिकिय, धोरणात्मक, किंमतविषयक, परकीय चलन दरविषयक, कर्जे, व्यापार, उद्योग इ.) गोळा करून प्रसिद्ध करण्याचे कार्य करीत असते. त्या माहितीचा परिणाम बँकांवर होत असतो. त्यांना आपला कारभार RBI च्या धोरणानुसार चालविण्याची आवश्यकता भासते व ते आपले पतधोरण RBI च्या धोरणांशी सुसंगत असे बनवितात.

आदेशाद्वारे नियंत्रण (Control through directives): RBI सर्व बँकांना आदेश देऊ शकते व त्यांना हे आदेश पाळावे लागतात. उदा. कर्ज देण्यासंबंधी, सावधगिरीचा इशारा, व्याजदर बदल, शाखा विस्तार, भागधारकांची सभा बोलविणे कर्ज वसुली इत्यादींबाबत. RBI व्यापारी बँकांना आदेश/हुकूम देवून कोणत्या क्षेत्राला किती व कसे कर्ज द्यावे किंवा कर्ज देण्याचे बंद करावे हे सांगते. 1956 पूर्वी RBI आदेशांचा फारसा वापर करीत नव्हती. पण, बँकांचे पैसे सट्टेबाजीसाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येऊ लागल्याने RBI आदेशांचा वापर सुरु केला.

प्रत्यक्ष कारवाई (Direct Action): बँकानी RBI च्या सुचना / आदेश न पाळल्यास RBI प्रत्यक्ष आर्गदर्शक कारवाई करू शकते. उदा. हुंड्यांचे पुनर्वटण नाकारून कर्ज देण्यास नकार, पुनर्वटणासाठी दंडात्मक व्याजदर आकारणे, अवलंब नवीन शाखा काढण्यास परवाना नाकारणे, नाणे बाजारात हिस्सा घेण्यास नकार, बँकेचा परवाना रद्द करणे.

RBI ची पतनियंत्रणाची साधने- मौद्रिक धोरण

Credit Control Methods of RBI- Monetary Policy: RBI आपले मौद्रिक धोरण राबविण्यासाठी विविध धोरण दर ठरविते. त्याबद्दलचे सर्व निर्णय अंतिमतः RBI च्या गव्हर्नरमार्फत घेतले जातात. मात्र देशाच्या वाढ व स्थैर्यावर परिणाम करणाऱ्या दरांबाबत निर्णय अंतिमतः एका व्यक्तीने घेणे, या स्थितीमध्ये बदल करण्याचा गरज निर्माण झाली. अशी शिफारस ऊर्जित पटेल समितीने केली होती. या शिफारसीनुसार Monetary Policy Commitee (MPC) ला वैधानिक आधार देण्यासाठी ‘RBIAct, 1934’ मध्ये बदल करण्यात आले. केंद्र सरकारला अधिसूचनेद्वारे MPC निर्माण करण्याचा अधिकार देण्यात आला.

MPC ची स्थापना: MPC ही 6 सदस्यीय समिती असेल. तिचे पदसिद्ध अध्यक्ष RBI चे गव्हर्नर असतील 6 सदस्यापैकी 3 सदस्य RBI चे, तर 3 सदस्य भारत सरकार मार्फत नेमले जातील.

1.RBI च्या ३ सदस्यामध्ये पुढील व्यक्तींचा समावेश असेल.

i) RBI चे गव्हर्नर (अध्यक्ष),

ii) RBI चे एक डेप्युटी गव्हर्नर (मौद्रिक धोरणाचे इनचार्ज),

iii) RBI चे एक अधिकारी (मध्यवर्ती संचालक मंडळाने नेमलेले) यांचा समावेश असेल.

2. भारत सरकारमार्फत नेमायच्या 3 सदस्यांची निवड कॅबिनेट सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखालील एका ‘Search-cum-Selection Committee’ मार्फत केली जाईल. हे सदस्य अर्थशास्त्र / बँकिंग/ वित्त/ मौद्रिक धोरण इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती असतील. त्यांची नेमणूक महत्तम 4 वर्षांसाठी केली जाईल, मात्र ते पुनर्नेमणुकीसाठी पात्र नसतील.

MPC चे कार्य: चलनवाढीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक व्याजाचे दर ठरविणे, हे MPC चे प्राथमिक कार्य असेल. त्यासाठी MPC प्रत्येक वर्षी 4 वेळा सभा घेईल. सभेची गणसंख्या 4 सदस्य असेल. सभेचे निर्णय प्रसिद्ध केले जातील. निर्णय घेण्यासाठी MPC च्या प्रत्येक सदस्याला एक मत असेल. मतांच्या समसमानतेच्या स्थितीत गव्हर्नरला निर्णायक मत देता येईल.

MPSC Gazetted Civil Services Exam 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान(GS) 
तारीख वेब लिंक  अँप लिंक 
31 डिसेंबर  2023 जालियनवाला बाग हत्याकांड जालियनवाला बाग हत्याकांड
1 जानेवारी  2024 गांधी युग गांधी युग
3 जानेवारी 2024 रक्ताभिसरण संस्था रक्ताभिसरण संस्था
5 जानेवारी 2024

 

प्राकृतिक महाराष्ट्र – कोकण किनारपट्टी   प्राकृतिक महाराष्ट्र – कोकण किनारपट्टी
  7 जानेवारी  2024 1857 चा उठाव 1857 चा उठाव
9 जानेवारी  2024  प्राण्यांचे वर्गीकरण -असमपृष्ठरज्जू प्राणी  प्राण्यांचे वर्गीकरण -असमपृष्ठरज्जू प्राणी
11 जानेवारी 2024 राज्यघटना निर्मिती राज्यघटना निर्मिती
13 जानेवारी 2024 अर्थसंकल्प अर्थसंकल्प
15 जानेवारी 2024 महाराष्ट्र – स्थान व विस्तार महाराष्ट्र – स्थान व विस्तार
17 जानेवारी 2024 भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व वाटचाल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व वाटचाल
19 जानेवारी 2024 मूलभूत हक्क मूलभूत हक्क
21 जानेवारी 2024 वैदिक काळ वैदिक काळ
23 जानेवारी 2024 सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी
25 जानेवारी 2024 शाश्वत विकास शाश्वत विकास
27 जानेवारी 2024 महर्षी कर्वे व त्यांचे कार्य महर्षी कर्वे व त्यांचे कार्य
29 जानेवारी 2024 1942 छोडो भारत चळवळ 1942 छोडो भारत चळवळ
31 जानेवारी 2024 भारतीय रिझर्व्ह बँक  भारतीय रिझर्व्ह बँक 

 

MPSC Gazetted Civil Services Exam 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान (GS)
तारीख वेब लिंक  अँप लिंक 
1 फेब्रुवारी 2024 भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे
2 फेब्रुवारी 2024 स्वातंत्र्यापूर्वीची भारतीय अर्थव्यवस्था स्वातंत्र्यापूर्वीची भारतीय अर्थव्यवस्था
3 फेब्रुवारी 2024 रौलेट कायदा 1919 रौलेट कायदा 1919
4 फेब्रुवारी 2024 गारो जमाती गारो जमाती
5 फेब्रुवारी 2024 लाला लजपत राय लाला लजपत राय
6 फेब्रुवारी 2024 भारतीय राज्यघटनेचे कलम 15 भारतीय राज्यघटनेचे कलम 15
7 फेब्रुवारी 2024 भारतातील हरित क्रांती भारतातील हरित क्रांती
8 फेब्रुवारी 2024 मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शक तत्वे
9 फेब्रुवारी 2024 गौतम बुद्ध : जीवन आणि शिकवण गौतम बुद्ध : जीवन आणि शिकवण
10 फेब्रुवारी 2024 भारतीय नियोजन आयोग आणि NITI आयोग भारतीय नियोजन आयोग आणि NITI आयोग
11 फेब्रुवारी 2024 भारतीय राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत भारतीय राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत
12 फेब्रुवारी 2024 महागाईचे प्रकार आणि कारणे महागाईचे प्रकार आणि कारणे
13 फेब्रुवारी 2024 श्वसन संस्था श्वसन संस्था
14 फेब्रुवारी 2024 अलैंगिक प्रजनन  अलैंगिक प्रजनन 
15 फेब्रुवारी 2024 सातवाहन कालखंड सातवाहन कालखंड
16 फेब्रुवारी 2024 बिरसा मुंडा बिरसा मुंडा
17 फेब्रुवारी 2024 पंचायतराज समित्या पंचायतराज समित्या
18 फेब्रुवारी 2024 कोळी,भिल्ल व रामोश्यांचे बंड कोळी,भिल्ल व रामोश्यांचे बंड
19 फेब्रुवारी 2024 1991 च्या आर्थिक सुधारणा 1991 च्या आर्थिक सुधारणा
20 फेब्रुवारी 2024 जगन्नाथ शंकरशेठ जगन्नाथ शंकरशेठ
21 फेब्रुवारी 2024 पंडिता रमाबाई पंडिता रमाबाई
22 फेब्रुवारी 2024 भारतीय राज्यघटनेचे कलम 370 भारतीय राज्यघटनेचे कलम 370
23 फेब्रुवारी 2024 शिक्षणविषयक आयोग व समित्या शिक्षणविषयक आयोग व समित्या
24 फेब्रुवारी 2024 आम्ल पर्जन्य आम्ल पर्जन्य
25 फेब्रुवारी 2024 73 वी घटना दुरुस्ती कायदा 73 वी घटना दुरुस्ती कायदा
26 फेब्रुवारी 2024 संयुक्त महाराष्ट्र चळवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळ
27 फेब्रुवारी 2024 गोदावरी नदी खोरे गोदावरी नदी खोरे
28 फेब्रुवारी 2024 सार्वजनिक वित्त सार्वजनिक वित्त
29 फेब्रुवारी 2024 राज्य लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग

 

MPSC Gazetted Civil Services Exam 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान (GS)
तारीख वेब लिंक  अँप लिंक 
1 मार्च 2024 केंद्र – राज्य संबंध केंद्र – राज्य संबंध
2 मार्च 2024 दिल्ली सल्तनत दिल्ली सल्तनत
3 मार्च 2024 राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न
4 मार्च 2024
भाऊ दाजी लाड व बाळशास्त्री जांभेकर भाऊ दाजी लाड व बाळशास्त्री जांभेकर
5 मार्च 2024
भारतातील सहकारी संस्था भारतातील सहकारी संस्था
6 मार्च 2024 बंगालची फाळणी बंगालची फाळणी
7 मार्च 2024 डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर
8 मार्च 2024 मोपला बंड मोपला बंड
9 मार्च 2024 42 वी घटना दुरुस्ती कायदा 1976 42 वी घटना दुरुस्ती कायदा 1976
10 मार्च 2024
भारतातील खनिज संसाधने भारतातील खनिज संसाधने
11 मार्च 2024
गोपाळ हरी देशमुख व महादेव गोविंद रानडे गोपाळ हरी देशमुख व महादेव गोविंद रानडे
12 मार्च 2024
मानवी शरीर : अस्थिसंस्था मानवी शरीर : अस्थिसंस्था
13 मार्च 2024 मॉन्टेगु-चेम्सफोर्ड सुधारणा 1919 मॉन्टेगु-चेम्सफोर्ड सुधारणा 1919
14 मार्च 2024 वित्त आयोग वित्त आयोग
15 मार्च 2024
भारतातील राष्ट्रीय आणीबाणी 1975 ते 1977 भारतातील राष्ट्रीय आणीबाणी 1975 ते 1977
16 मार्च 2024 भारतातील प्रमुख उद्योग भारतातील प्रमुख उद्योग
17 मार्च 2024 मुस्लिम लीग (1906) मुस्लिम लीग (1906)
18 मार्च 2024 मानवी मेंदू : रचना व कार्य मानवी मेंदू : रचना व कार्य
19 मार्च 2024 चौरीचौरा घटना 1922 चौरीचौरा घटना 1922
20 मार्च 2024 महाराष्ट्रातील धरणे महाराष्ट्रातील धरणे
21 मार्च 2024 महर्षी वि.रा.शिंदे महर्षी वि.रा.शिंदे
22 मार्च 2024 मानवी दातांचे प्रकार आणि त्यांची कार्ये मानवी दातांचे प्रकार आणि त्यांची कार्ये
23 मार्च 2024 भारत सरकार कायदा 1935 भारत सरकार कायदा 1935
24 मार्च 2024 पेशी : रचना व कार्य पेशी : रचना व कार्य
25 मार्च 2024 विशेष तरतूद कायदा 1991, कलम 371 (A ते J) विशेष तरतूद कायदा 1991, कलम 371 (A ते J)
26 मार्च 2024 पर्यावरणीय पिरॅमिड पर्यावरणीय पिरॅमिड
27 मार्च 2024 वातावरणाचे स्तर आणि त्याची रचना वातावरणाचे स्तर आणि त्याची रचना
28 मार्च 2024 भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक
29 मार्च 2024 राज्य मानवी हक्क आयोग राज्य मानवी हक्क आयोग
30 मार्च 2024
सनदी कायदे – 1793,1813 आणि 1833 सनदी कायदे – 1793,1813 आणि 1833
31 मार्च 2024 राजा हर्षवर्धन राजा हर्षवर्धन

 

MPSC Gazetted Civil Services Exam 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान (GS)
तारीख वेब लिंक  अँप लिंक 
1 एप्रिल 2024 इंद्रा साहनी विरुद्ध भारत सरकार खटला इंद्रा साहनी विरुद्ध भारत सरकार खटला
2 एप्रिल 2024   विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ)
3 एप्रिल 2024 जेट स्ट्रीम्स जेट स्ट्रीम्स
4 एप्रिल 2024 क्रयशक्ती समानता सिद्धांत क्रयशक्ती समानता सिद्धांत
5 एप्रिल 2024 पंचसृष्टि वर्गीकरण पंचसृष्टि वर्गीकरण
6 एप्रिल 2024 पश्चिम घाट पश्चिम घाट
7 एप्रिल 2024 राज्य पुनर्रचना – कायदा व आयोग राज्य पुनर्रचना – कायदा व आयोग
8 एप्रिल 2024 धन विधेयक धन विधेयक
9 एप्रिल 2024 सिंग सभा आंदोलन व अकाली चळवळ सिंग सभा आंदोलन व अकाली चळवळ
10 एप्रिल 2024 सरकारिया आयोग सरकारिया आयोग
11 एप्रिल 2024 भारतातील महत्त्वाचे पर्वतीय मार्ग भारतातील महत्त्वाचे पर्वतीय मार्ग
12 एप्रिल 2024 द्विराष्ट्र सिद्धांत द्विराष्ट्र सिद्धांत
13 एप्रिल 2024 किण्वन प्रक्रिया किण्वन प्रक्रिया
14 एप्रिल 2024 पल्लव राजवंश पल्लव राजवंश
15 एप्रिल 2024 वन संवर्धन कायदा 1980 वन संवर्धन कायदा 1980
16 एप्रिल 2024 स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट
17 एप्रिल 2024 लोकसभेचे प्रो-टेम स्पीकर लोकसभेचे प्रो-टेम स्पीकर
18 एप्रिल 2024 वाळवंटीकरण वाळवंटीकरण
19 एप्रिल 2024 संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP)
20 एप्रिल 2024 भारत सेवक समाज भारत सेवक समाज
22 एप्रिल 2024 वहाबी व अलिगढ चळवळ वहाबी व अलिगढ चळवळ
23 एप्रिल 2024 सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू
24 एप्रिल 2024 संसदेतील शून्य तास संसदेतील शून्य तास
25 एप्रिल 2024 ब्रिटिश भारतातील शिक्षण प्रणाली ब्रिटिश भारतातील शिक्षण प्रणाली
26 एप्रिल 2024 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग
27 एप्रिल 2024 वुडचा खलिता वुडचा खलिता
28 एप्रिल 2024 वस्तू आणि सेवा कर (GST) वस्तू आणि सेवा कर (GST)
29 एप्रिल 2024 सातपुडा व्याघ्र प्रकल्प सातपुडा व्याघ्र प्रकल्प
30 एप्रिल 2024 शहरी स्थानिक संस्था प्रशासन तुलनात्मक अभ्यास शहरी स्थानिक संस्था प्रशासन तुलनात्मक अभ्यास

 

MPSC Gazetted Civil Services Exam 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान (GS)
तारीख वेब लिंक  अँप लिंक 
2 मे 2024  पहिले इंग्रज-मराठा युद्ध पहिले इंग्रज-मराठा युद्ध
3 मे 2024 आधुनिक भारताचा इतिहास वनलायनर्स आधुनिक भारताचा इतिहास वनलायनर्स
4 मे 2024 भारताचे सरकारी खाते  भारताचे सरकारी खाते 
6 मे 2024 सिंधू संस्कृती : महत्वाचे वन-लाइनर सिंधू संस्कृती : महत्वाचे वन-लाइनर
7 मे 2024 भारतातील सर्वात उंच आणि सर्वात लांब – वन लाइनर्स भारतातील सर्वात उंच आणि सर्वात लांब – वन लाइनर्
8 मे 2024 भारतीय राष्ट्रीय चळवळीतील प्रसिद्ध घोषणा भारतीय राष्ट्रीय चळवळीतील प्रसिद्ध घोषणा
9 मे 2024 राष्ट्रपती राजवट – कलम 356 राष्ट्रपती राजवट – कलम 356
10 मे 2024 कुतुब-उद्दीन ऐबक कुतुब-उद्दीन ऐबक
11 मे 2024 महाराष्ट्रातील पर्वतरांगा महाराष्ट्रातील पर्वतरांगा
12 मे 2024 नद्या आणि त्यांच्या उपनद्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या
13 मे 2024 भारतीय राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारी घटना भारतीय राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारी घटना
14 मे 2024 भारतातील मृदा : वर्गीकरण आणि वैशिष्ट्ये भारतातील मृदा : वर्गीकरण आणि वैशिष्ट्ये
15 मे 2024 जमीन महसूल प्रणाली : रयतवारी प्रणाली
जमीन महसूल प्रणाली : रयतवारी प्रणाली
16 मे 2024 भारताच्या क्षेपणास्त्रांची यादी भारताच्या क्षेपणास्त्रांची यादी
17 मे 2024 घटना दुरुस्ती कायद्यांची यादी : एका दृष्टीक्षेपात घटना दुरुस्ती कायद्यांची यादी : एका दृष्टीक्षेपात
18 मे 2024 विविध क्षेत्रांसाठी भारतातील महत्त्वाच्या पुरस्कारांची यादी विविध क्षेत्रांसाठी भारतातील महत्त्वाच्या पुरस्कारांची यादी
20 मे 2024 कोयना धरण 
कोयना धरण 
21 मे 2024 महत्वाचे संप्रेरक आणि त्यांची कार्ये महत्वाचे संप्रेरक आणि त्यांची कार्ये
22 मे 2024 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सत्रांची यादी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सत्रांची यादी
23 मे 2024 भारतातील अणुऊर्जा प्रकल्प
भारतातील अणुऊर्जा प्रकल्प
24 मे 2024 भारतातील प्रसिद्ध सणांची यादी भारतातील प्रसिद्ध सणांची यादी
25 मे 2024 भारतातील बायोस्फीअर रिझर्व्ह भारतातील बायोस्फीअर रिझर्व्ह
27 मे 2024 103 वी घटना दुरुस्ती कायदा 103 वी घटना दुरुस्ती कायदा
28 मे 2024 देशभरातील भारतीय शहरांची टोपणनावे देशभरातील भारतीय शहरांची टोपणनावे
29 मे 2024 आपला महाराष्ट्र – एका दृष्टीक्षेपात आपला महाराष्ट्र – एका दृष्टीक्षेपात
30 मे 2024 भारताच्या सरन्यायाधीशांची यादी भारताच्या सरन्यायाधीशांची यादी
31 मे 2024 प्राचीन भारतातील प्रसिद्ध पुस्तके आणि लेखकांची यादी प्राचीन भारतातील प्रसिद्ध पुस्तके आणि लेखकांची यादी
1 जून 2024 महाराष्ट्राची भू-शास्त्रीय रचना महाराष्ट्राची भू-शास्त्रीय रचना
3 जून 2024 भारतातील राष्ट्रीय उद्याने भारतातील राष्ट्रीय उद्याने
4 जून 2024 महाराष्ट्र राज्याची पार्श्वभूमी महाराष्ट्र राज्याची पार्श्वभूमी
6 जून 2024 भारतीय इतिहासातील महत्त्वाच्या लढाया भारतीय इतिहासातील महत्त्वाच्या लढाया

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

सध्याचा रेपो रेट किती आहे?

8 फेब्रुवारी 2024 रोजी सरकारने केलेल्या घोषणेनुसार भारतातील सध्याचा रेपो दर 6.50% वर निश्चित करण्यात आला आहे.

अर्थशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

अर्थशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

TOPICS: