Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 7 August 2021

Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी: 07 ऑगस्ट 2021

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB,  अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला आपण आता 07 ऑगस्ट 2021 चे सर्व महत्वाचे Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) पाहुयात.

राष्ट्रीय बातम्या

 1. नियामक प्रशिक्षण देण्यासाठी ई-प्रमाणन कार्यक्रम

e-certification program to provide regulatory training | नियामक प्रशिक्षण देण्यासाठी ई-प्रमाणन कार्यक्रम
नियामक प्रशिक्षण देण्यासाठी ई-प्रमाणन कार्यक्रम
  • उर्जा मंत्री आर के सिंह यांनी नियामक प्रशिक्षण देण्यासाठी, ‘ऊर्जा क्षेत्रासाठी सुधारणा आणि नियामक ज्ञानाचा आधार’ हा ई-प्रमाणपत्र कार्यक्रम सुरू केला आहे.
  • आर के सिंह यांनी आयआयटी कानपूरने विकसित केलेले विदा डॅशबोर्डचे अनावरण केले ज्याद्वारे प्रत्येक राज्यातील वीज दर आणि वीज डिस्कॉम (वितरण कंपन्या) कामगिरीचे चे विश्लेषण दिले असेल.

राज्य बातम्या

 2. लडाखने ‘पानी माह’ अभियान सुरु केले

Ladakh launches ‘Pani Maah’ mission | लडाखने 'पानी माह' अभियान सुरु केले
लडाखने ‘पानी माह’ अभियान सुरु केले
  • लडाखमध्ये ग्रामस्थांना स्वच्छ पाण्याचे महत्त्व कळवण्यासाठी ‘पाणी माह’ किंवा पाणी महिना अभियान सुरू करण्यात आले.
  • लडाख सरकारने ‘हर घर जल’चा दर्जा प्राप्त करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील पहिल्या ब्लॉकसाठी 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
  • ‘पाणी माह’ मोहिमेमध्ये तिहेरी दृष्टिकोन स्वीकारला जाईल-पाणी गुणवत्ता चाचणी, पाणीपुरवठ्याचे नियोजन व धोरण आणि गावांमध्ये पाणी सभेच्या कामकाजावर लक्ष ठेवणे.
  • सरकारच्या आकडेवारीनुसार लडाखमधील फक्त 11.75 टक्के ग्रामीण घरांना नळावाटे पाणी उपलब्ध आहे. पाणी माह मोहिमेमुळे लडाखमध्ये जल जीवन मिशनची अंमलबजावणी वेगवान होण्याची अपेक्षा आहे.
  • या मोहिमेदरम्यान, समुदायाला पाण्याची गुणवत्ता तपासणी आणि देखरेखीसाठी प्रयोगशाळांमध्ये पाण्याचे नमुने पाठवण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. ‘पाणी माह’ च्या पहिल्या टप्प्यात, सर्व स्त्रोतांमधून पाण्याचे नमुने चाचणीसाठी गोळा केले जातील.
  • पहिल्या टप्प्यात जागरूकता आणि संवेदनशीलता मोहिमांचा समावेश असेल. जल जीवन मिशन अंतर्गत जल गुणवत्ता आणि सेवा वितरणावर प्रभावी देखरेखीसाठी पाणी सभा/ग्रामसभा/ब्लॉक स्तरावरील बैठका आणि घरोघरी भेटी आयोजित करण्यावर दुसऱ्या टप्प्यात भर देण्यात येईल.
  • ही जल शक्ती मंत्रालयाची योजना 2019 मध्ये सुरु करण्यात आली. 2024 पर्यंत देशातील प्रत्येक ग्रामीण घरात नळावाटे सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचवणे याचा उद्देश आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • लडाखचे नायब राज्यपाल: राधा कृष्ण माथूर

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 6 August 2021

 3. भारताची पहिली हार्ट फेल्युअर बायोबँक

ndia’s first Heart Failure Biobank | भारताची पहिली हार्ट फेल्युअर बायोबँक
भारताची पहिली हार्ट फेल्युअर बायोबँक
  • देशातील पहिली हृदय रुग्णांची जैवबँक केरळच्या श्री चित्र तिरुनाल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी (एससीटीआयएमएसटी) येथील नॅशनल सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्च अँड एक्सलन्स इन एचएफ (केअर-एचएफ) मध्ये सुरु करण्यात आली.
  • जैवबँक हृदयरोग असलेल्या रुग्णांमध्ये आरोग्य परिणामांचे अनुवांशिक, मेटाबोलॉमिक्स आणि प्रोटिओमिक मार्करचा अभ्यास करण्यासाठी उपयोगात येणार आहे.
  • जैवबँक्स उच्च-गुणवत्तेच्या जैविक नमुन्यांच्या संग्रहाचा एक महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे ज्याचा वापर आण्विक मार्ग समजून घेण्यासाठी आणि हृदय रोगाचे निदान आणि उपचारपद्धती सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो.
  • बायोस्पेसिमेन्समध्ये ओपन-हार्ट शस्त्रक्रियेदरम्यान मिळवलेले रक्त, सीरम आणि टिशूचे नमुने आणि पेरिफेरल ब्लड मोनोन्यूक्लियर सेल्स (पीबीएमसी) आणि हृदय रोग रुग्णांकडून गोळा केलेले जीनोमिक डीएनए यांचा समावेश आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • केरळचे मुख्यमंत्री: पिनाराई विजयन
  • केरळचे राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान

अर्थव्यवस्था बातम्या

 4. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने ‘आरोग्य आणि निरोगी बचत खाते’ सुरु केले

Suryoday Small Finance Bank opens ‘Health and Wellness Savings account | सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने ‘आरोग्य आणि निरोगी बचत खाते’ सुरु केले
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने ‘आरोग्य आणि निरोगी बचत खाते’

सूर्योदय स्मॉल फायनान्स बॅंकेने (एसएसएफबी) ग्राहकांना त्यांची संपत्ती वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोव्हीड -19 महामारी दरम्यान ‘सूर्योदय आरोग्य आणि निरोगी बचत खाते’ सुरू केले आहे. या 25 लाखांचा टॉप-अप आरोग्य विमा, वार्षिक आरोग्यसेवा पॅकेज आणि ऑन-कॉल आपत्कालीन रुग्णवाहिका वैद्यकीय सेवा या तीन प्रमुख लाभांसह देण्यात येणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे एमडी आणि सीईओ: बास्कर बाबू रामचंद्रन

करार बातम्या

 5. एसबीआय जनरल आणि साहीपे सामान्य विमा उत्पादने ऑफर करणार

SBI General and SahiPay to offer general insurance products | एसबीआय जनरल आणि साहीपे सामान्य विमा उत्पादने ऑफर करणार
एसबीआय जनरल आणि साहीपे सामान्य विमा उत्पादने ऑफर करणार
  • एसबीआय जनरल इन्शुरन्सने ग्रामीण भागातील विमा संरक्षण वाढवण्यासाठी मणिपाल बिझिनेस सोल्युशन्स सोबत करार केला आहे.
  • साहिपे, मणिपाल बिझनेस सोल्यूशन्सचा सर्वात वेगाने वाढणारा टेक-सक्षम आर्थिक समावेशन प्लॅटफॉर्म, निम-शहरी आणि ग्रामीण भारतातील ग्राहकांना डिजिटल आणि आर्थिक सेवा प्रदान करणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • एसबीआय जनरल इन्शुरन्स मुख्यालय: मुंबई
  • एसबीआय जनरल इन्शुरन्सची स्थापना: 2009
  • एसबीआय जनरल इन्शुरन्स सीईओ: प्रकाशचंद्र कंदपाल

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी | जुलै 2021

क्रीडा बातम्या

 6. लभांशु शर्मा: भारत केसरी कुस्ती दंगल विजेता

Labhanshu Sharma: wins Bharat Kesari Wrestling Dangal | लभांशु शर्मा: भारत केसरी कुस्ती दंगल विजेता
लभांशु शर्मा: भारत केसरी कुस्ती दंगल विजेता
  • भारतीय कुस्तीपटू उत्तराखंडचा लभांशु शर्मा यांनी तामिळनाडूमध्ये आयोजित भारत केसरी कुस्ती दंगल 2021 जिंकली.
  • उत्तराखंडच्या निर्मितीला 20 वर्षे झाल्यापासून पहिल्यांदा लभांशु शर्मा  यांनी राज्यासाठी भारत केसरी ही पदवी जिंकली.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती:

  • उत्तराखंडचे राज्यपाल: बेबी राणी मौर्य
  • उत्तराखंडचे मुख्यमंत्री: पुष्कर सिंह धामी

 7. बजरंग पुनियाने ऑलिम्पिक कुस्तीत कांस्यपदक जिंकले

Bajrang Punia wins Olympic wrestling bronze medal | बजरंग पुनियाने ऑलिम्पिक कुस्तीत कांस्यपदक जिंकले
बजरंग पुनियाने ऑलिम्पिक कुस्तीत कांस्यपदक जिंकले
  • भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने पुरुष फ्रीस्टाइल 65 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या दौलेट नियाजबेकोव्हवर 8-0 ने विजय मिळवल्यानंतर टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कुस्तीत कांस्यपदक जिंकले आहे.
  • केडी जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त, साक्षी मलिक आणि रवी कुमार दहिया यांच्यानंतर ऑलिम्पिक व्यासपीठावर स्थान मिळवणारा पुनिया सहावा भारतीय कुस्तीपटू ठरला.
  • 2012 च्या लंडन ऑलिम्पिकनंतर ही दुसरी घटना ठरली जेव्हा दोन भारतीय कुस्तीपटूंनी एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकली.

 8. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले

Neeraj Chopra wins Olympic gold medal in Javelin throw | नीरज चोप्राने भालाफेकमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले
नीरज चोप्राने भालाफेकमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले
  • नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटरच्या थ्रोने नीरजने स्पर्धेत आघाडी घेतली. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 87.58 मी लांब भाला फेकत सुवर्णपदक पक्के केले.
  • झेक प्रजासत्ताकचा विटेझालाव वेस्लेने 86.67 मीटर भालाफेक करत रौप्य पदक जिंकले. टोकियो 2020 मध्ये भारताचे हे 7 वे पदक आहे, जी ऑलिम्पिक खेळांच्या इतिहासात भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे.
  • हे सुवर्णपदक नेमबाजीतील अभिनव बिंद्रा नंतर ऑलिम्पिकमधील भारताचे दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले आहे.

नियुक्ती बातम्या

 9. जॉन अब्राहम: युरोस्पोर्ट इंडिया मोटोजीपीचे सदिछादूत

John Abraham: MotoGP Brand Ambassador of Eurosport India | जॉन अब्राहम: युरोस्पोर्ट इंडिया मोटोजीपीचे सदिछादूत
जॉन अब्राहम: युरोस्पोर्ट इंडिया मोटोजीपीचे सदिछादूत
  • युरोस्पोर्ट इंडियाने बॉलिवूड सुपरस्टार आणि मोटोजीपी उत्साही जॉन अब्राहम यांची त्यांच्या प्रमुख मोटरस्पोर्ट प्रॉपर्टी मोटोजीपी™ साठी भारतातील सदिछादूत म्हणून नियुक्ती केली आहे. जॉन “मोटोजीपी, रेस लगाते है” या उपक्रमाअंतर्गत कंपनीची जाहिरात करणार आहे.
  • युरोस्पोर्ट इंडिया सध्या भारतीय मोटरस्पोर्ट्सच्या चाहत्यांसाठी एफआयए फॉर्म्युला 2 चॅम्पियनशिप, डब्ल्यू सीरिज, नास्कर, इंडिकार सीरीज आणि बेनेट्स ब्रिटिश सुपरबाइक रेसिंग सारख्या प्रतिष्ठित स्पर्धांना प्रोत्साहन देत आहे.

संरक्षण बातम्या

 10. आयएनएस विक्रांतने पहिल्या समुद्री चाचण्यांची सुरुवात केली

INS Vikrant leaves port for maiden sea trials | आयएनएस विक्रांतने पहिल्या समुद्री चाचण्यांची सुरुवात केली
आयएनएस विक्रांतने पहिल्या समुद्री चाचण्यांची सुरुवात केली
  • भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका विक्रांतने आपली पहिली सागरी चाचणी सुरू केली. आयएनएस विक्रांतची रचना भारतीय नौदलाच्या नौदल डिझाइन संचालनालयाने (डीएनडी) केली होती आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल) येथे बांधली होती.
  • ही प्रगत युद्धनौका दोन संस्थांनी सुरुवातीपासून विमानवाहू युद्धनौका तयार करण्याचा पहिला प्रयत्न आहे.
  • आयएनएस विक्रांतमध्ये 75 टक्के स्वदेशी सामग्री आहे आणि ती पूर्व नौदल कमांडमध्ये सामील केली जाईल. ऑगस्ट 2022 पर्यंत ते भारतीय नौदलात दाखल होईल.

आयएनएस विक्रांतविषयी:

  • 262 मीटर लांब, 62 मीटर रुंद आणि 59 मीटर उंचीची आहे
  • यात 14 डेक आणि 2,300 डबे आहेत
  • तिचा सर्वोच्च वेग सुमारे 28 नॉट्स आहे
  • तिची रचना पूर्णपणे 3D मध्ये मॉडेल केलेली आहे

Current Affairs Daily Quiz In Marathi | 7 August 2021

पुरस्कार बातम्या

 11. भूतानमधील मांगदेछू जलविद्युत प्रकल्पाला ब्रुनेल पदक प्राप्त

Mangdechhu Hydroelectric Project in Bhutan gets Brunel Medal | भूतानमधील मांगदेछू जलविद्युत प्रकल्पाला ब्रुनेल पदक प्राप्त
भूतानमधील मांगदेछू जलविद्युत प्रकल्पाला ब्रुनेल पदक प्राप्त
  • भूतान आणि भारत यांचा संयुक्त मांगदेच्छू जलविद्युत प्रकल्पाला लंडनस्थित इन्स्टिट्यूशन ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स (आयसीई) द्वारे ब्रुनेल पदक प्रदान करण्यात आले आहे.
  • उद्योग क्षेत्रातील स्थापत्य अभियांत्रिकीमधील उत्कृष्टतेचा नमुना म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. भूतानमधील भारतीय राजदूत रुचिरा कांबोज यांनी मांगदेच्छू जलविद्युत प्रकल्प प्राधिकरणाचे अध्यक्ष लियोन्पो लोकनाथ शर्मा यांना ब्रुनेल पदक सुपूर्द केले.
  • हा प्रकल्प दरवर्षी 2.4 दशलक्ष टन हरितगृह वायू उत्सर्जन कमी करेल. भूतान आणि भारताने भूतानची जलविद्युत ऊर्जा क्षमता 12000 मेगावॅटपर्यंत वाढवण्यासाठी हा ऐतिहासिक भागीदारी प्रकल्प करार केला आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • भूतान राजधानी: थिंफु
  • भूतानचे पंतप्रधान: लोटे शेरिंग
  • भूतान चलन: भूतानी नगुलतरम 

बैठका आणि परिषद बातम्या

 12. रेंज तंत्रज्ञानावर दुसरी आयईईई आंतरराष्ट्रीय परिषद

Second IEEE International Conference on Range Technology | रेंज तंत्रज्ञानावर दुसरी आयईईई आंतरराष्ट्रीय परिषद
रेंज तंत्रज्ञानावर दुसरी आयईईई आंतरराष्ट्रीय परिषद
  • द्वितीय इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स (आयईईई) इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन रेंज टेक्नॉलॉजी (आयसीओआरटी-2021) [रेंज तंत्रज्ञानावर आंतरराष्ट्रीय परिषद] आभासी पद्धतीने आयोजित केली जात आहे.
  • संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेची (डीआरडीओ) प्रयोगशाळा एकात्मिक चाचणी केंद्र (आयटीआर) चंडीपूर यांनी या परिषदेचे आयोजन केले आहे.
  • याचे उद्घाटन संरक्षण, संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओ चे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी यांनी केले.

महत्त्वाचे दिवस

 13. 7 ऑगस्ट: राष्ट्रीय हातमाग दिन

7 August: National Handloom Day | 7 ऑगस्ट: राष्ट्रीय हातमाग दिन
7 ऑगस्ट: राष्ट्रीय हातमाग दिन
  • भारतीय हातमाग उद्योगाचा वारसा जतन करण्यासाठी भारताने दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन आयोजित केला आहे.
  • हा दिवस स्वदेशी चळवळीचे स्मरण करण्यासाठी आणि आपल्या देशातील समृद्ध कापड आणि  विणकाम संस्कृतीचे योगदान जपण्यासाठी पाळला जातो.
  • भारत सरकारने 2015 मध्ये प्रथम हा दिवस आयोजित केला होता.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

मिशन MPSC त्रिशूळ बॅच
मिशन MPSC त्रिशूळ बॅच

Sharing is caring!