Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Daily Current Affairs in Marathi, 21-January-2022
Top Performing

चालू घडामोडी (Daily Current Affairs) 2022 | 21-January-2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we can see the important Daily Current affairs in Marathi. Daily Current Affairs in Marathi are useful for Competitive exams like MPSC Rajyaseva, MPSC Group B and C, and other Saral Seva Bharti in Maharashtra.

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB,  अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी: 21 जानेवारी 2022

येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला आपण आता चालू घडामोडी (Daily Current Affairs) 2021 | 21-January-2022 पाहुयात.

 

कराराच्या बातम्या (MPSC daily current affairs)

  1. मायक्रोसॉफ्ट व्हिडिओ गेमिंग कंपनी Activision Blizzard ताब्यात घेणार आहे
Microsoft to acquire video gaming company Activision Blizzard_40.1
Microsoft to acquire video gaming company Activision Blizzard_40.1
  • हा करार $68.7 अब्ज डॉलर्सला होणार आहे. Activision Blizzard Inc जी कॅंडी क्रश आणि कॉल ऑफ ड्यूटी, Xbox चे निर्माता म्हणून प्रसिद्ध आहे.
  • या संपादनामुळे मोबाइल, पीसी, कन्सोल आणि क्लाउडवर मोबाइल गेमिंग व्यवसाय आणि आभासी-वास्तविक तंत्रज्ञानामध्ये मायक्रोसॉफ्टची स्पर्धात्मकता वाढेल.
  • आता मायक्रोसॉफ्ट टेन्सेंट आणि सोनीच्या मागे, कमाईनुसार जगातील तिसरी सर्वात मोठी गेमिंग कंपनी बनेल. मायक्रोसॉफ्टचा त्याचप्रमाणे गेमिंग उद्योगाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा करार आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी म्हत्वाचे मुद्दे

  • मायक्रोसॉफ्टचे CEO आणि Chairman: Satya Nadella;
  • मायक्रोसॉफ्ट मुख्यालय: रेडमंड, वॉशिंग्टन, युनायटेड स्टेट्स.

2. IIMK LIVE आणि इंडियन बँकेने स्टार्टअप्ससाठी 50 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज वाटप करण्यासाठी सामंजस्य करार केला

IIMK LIVE and Indian Bank ink MoU to disburse loans upto Rs 50 Crore for Startups_40.1

  • लॅबोरेटरी फॉर इनोव्हेशन व्हेंचरिंग अँड एंटरप्रेन्युअरशिप (LIVE) ने सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्सना आर्थिक मदत करण्यासाठी इंडियन बँकेसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
स्पर्धा परीक्षांसाठी म्हत्वाचे मुद्दे
  • इंडियन बँकेचे मुख्यालय: चेन्नई;
  • इंडियन बँक सीईओ: श्री शांतीलाल जैन;
  • इंडियन बँकेची स्थापना: 15 ऑगस्ट 1907.

नियुक्ती बातम्या (MPSC daily current affairs)

3. केंद्राने विक्रम देव दत्त यांची एअर इंडियाचे नवीन सीएमडी म्हणून नियुक्ती केली

Centre appoints Vikram Dev Dutt as new CMD of Air India_40.1
केंद्राने विक्रम देव दत्त यांची एअर इंडियाचे नवीन सीएमडी म्हणून नियुक्ती केली
  • वरिष्ठ नोकरशहा विक्रम देव दत्त यांची Air India Ltd चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • दत्त हे AGMUT (अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश) कॅडरचे 1993-बॅचचे IAS अधिकारी आहेत.

स्पर्धा परीक्षांसाठी म्हत्वाचे मुद्दे

  • एअर इंडिया लिमिटेड स्थापना: 1932, मुंबई;
  • एअर इंडिया लिमिटेड मुख्यालय: नवी दिल्ली.

4. दिलीप संघानी यांची IFFCO चे नवे चेअरमन म्हणून नियुक्ती

IFFCO 2022 : Dileep Sanghani named as new Chairman of IFFCO_40.1
दिलीप संघानी यांची IFFCO चे नवे चेअरमन म्हणून नियुक्ती
  • इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह (IFFCO) च्या संचालक मंडळाने दिलीप संघानी यांची सहकारी संस्थेचे 17 वे चेअरमन म्हणून एकमताने निवड केली आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी म्हत्वाचे मुद्दे:

  • IFFCO मुख्यालय: नवी दिल्ली;
  • IFFCO ची स्थापना: 3 नोव्हेंबर 1967, नवी दिल्ली.

5. विजय शेखर शर्मा यांची भाषा UASG वरील इंटरनेट पॅनेलचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

Vijay Shekhar Sharma named as ambassador of Internet panel on languages UASG_40.1
विजय शेखर शर्मा यांची भाषा UASG वरील इंटरनेट पॅनेलचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
  • पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना युनिव्हर्सल अ‍ॅक्सेप्टन्स स्टीयरिंग ग्रुप (UASG), जागतिक इंटरनेट संस्था ICANN द्वारे समर्थित उद्योग नेत्यांच्या समुदाय-आधारित संघाचे राजदूत (Ambassador) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  • इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाइन्ड नेम्स अँड नंबर्स (ICANN) चे उद्दिष्ट एक स्थिर, सुरक्षित आणि एकत्रित जागतिक इंटरनेट सुनिश्चित करण्यात मदत करणे आहे. याचे मुख्यालय कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स येथे आहे.

6. NHIDCL चे नवीन MD म्हणून चंचल कुमार यांची नियुक्ती

Chanchal Kumar named as new MD of NHIDCL_40.1
NHIDCL चे नवीन MD म्हणून चंचल कुमार यांची नियुक्ती
  • चंचल कुमार यांची नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NHIDCL) चे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • ते बिहार केडरचे 1992 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.

स्पर्धा परीक्षांसाठी म्हत्वाचे मुद्दे:

  • NHIDCL स्थापना: 2014;
  • NHIDCL मुख्यालय: नवी दिल्ली.

7. पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझमची ICC पुरुष T20I संघाचा कर्णधार म्हणून निवड

ICC Men's T20: Pak. Skipper Babar Azam Named Captain of ICC Men's T20I Team of the Year_40.1
पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझमची ICC पुरुष T20I संघाचा कर्णधार म्हणून निवड
  • ICC टीम ऑफ द इयर पुरुष क्रिकेटमधील 11 सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड करते ज्यांनी एका कॅलेंडर वर्षात बॅट, बॉल किंवा त्यांच्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे.
  • तथापि, 2021 च्या ICC महिला T20I टीम ऑफ द इयरमध्ये, स्मृती मानधना ही एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे ज्याचे नाव 11 सदस्यीय संघात आहे.
  • इंग्लंडच्या नॅट सायव्हरला 2021 साठी ICC महिला T20I टीम ऑफ द इयरची कर्णधार बनवण्यात आले आहे.

अर्थव्यवस्था बातम्या (MPSC daily current affairs)

8. RBI ने सप्टेंबर 2021 साठी डिजिटल पेमेंट इंडेक्स जाहीर केला

RBI announces Digital Payments Index for September 2021_40.1
RBI ने सप्टेंबर 2021 साठी डिजिटल पेमेंट इंडेक्स जाहीर केला
  • RBI चा डिजिटल पेमेंट इंडेक्स, जो भारतातील डिजिटल पद्धतींद्वारे पेमेंट्सचा सखोलता दर्शवितो, सप्टेंबर 2021 मध्ये 39.64 टक्क्यांनी वाढून 304.06 वर पोहोचला आहे, जो मागील वर्षीच्या महिन्यात 217.74 होता.
  • RBI-DPI निर्देशांकाने देशभरात डिजिटल पेमेंटचा अवलंब आणि सखोलता यांमध्ये लक्षणीय वाढ दर्शवली आहे.
  • RBI ने जानेवारी 2021 मध्ये डिजीटल पेमेंट इंडेक्स सादर केला आहे ज्यात मार्च 2018 हे बेस वर्ष म्हणून देशभरातील पेमेंटचे डिजिटायझेशन किती प्रमाणात आहे हे जाणून घेतले आहे. याचा अर्थ मार्च 2018 साठी DPI स्कोअर 100 वर सेट केला आहे.
स्पर्धा परीक्षांसाठी म्हत्वाचे मुद्दे:
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना: 1 एप्रिल 1935;
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र;
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर: शक्तिकांत दास.

9. Ind-Ra ने FY23 साठी भारताचा GDP वाढीचा दर 7.6% इतका अंदाज केला

Ind-Ra Projects India's GDP Growth Rate at 7.6% in FY23_40.1
Ind-Ra ने FY23 साठी भारताचा GDP वाढीचा दर 7.6% इतका अंदाज केला
  • Ind-Ra ही फिच ग्रुपची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.

समिट आसि कॉन्फरन्स बातम्या (Daily Current Affairs)

10. 2022 ची पहिली BRICS Sherpas बैठक चीनच्या अध्यक्षतेखाली झाली

1st BRICS Sherpas meeting of 2022 held under Chinese chairship_40.1
2022 ची पहिली BRICS Sherpas बैठक चीनच्या अध्यक्षतेखाली झाली
  • 18-19 जानेवारी 2022दरम्यान आभासी बैठक आयोजित करण्यात आली.
  • BRICS हा पाच प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा समूह आहे – ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका.

विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या (Daily Current Affairs in Marathi)

11. प्रतिष्ठित नासाचा कार्यक्रम पूर्ण करणारी जान्हवी डांगेटी ही पहिली भारतीय ठरली आहे

Jahnavi Dangeti becomes first Indian to complete prestigious Nasa programme_40.1
प्रतिष्ठित नासाचा कार्यक्रम पूर्ण करणारी जान्हवी डांगेटी ही पहिली भारतीय ठरली आहे
  • आंध्र प्रदेशातील जान्हवी दांगेटी या तरुणीने नुकतेच अमेरिकेतील अलाबामा येथील केनेडी स्पेस सेंटरमध्ये NASA चा इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम (IASP) पूर्ण केला असून, ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय बनली आहे.
  • ती जगभरातील 20 विद्यार्थ्यांच्या काळजीपूर्वक निवडलेल्या गटाचा भाग आहे.
  • ती इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ एस्पायरिंग अॅस्ट्रोनॉट्स (IOAA) ची सदस्य आहे. तिने नासा, इस्रो आणि इतर अंतराळ संस्थांच्या अनेक कार्यक्रम आणि कार्यशाळांमध्ये भाग घेतला आहे

अहवाल व निर्देशांक बातम्या (MPSC daily current affairs)

12. ILO अहवाल: 2022 मध्ये जागतिक बेरोजगारीची पातळी 207 दशलक्ष असल्याचा अंदाज आहे

ILO Report: Global unemployment level in 2022 projected at 207 million_40.1
ILO अहवाल: 2022 मध्ये जागतिक बेरोजगारीची पातळी 207 दशलक्ष असल्याचा अंदाज आहे
  • इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) ने त्यांचा जागतिक रोजगार आणि सामाजिक दृष्टीकोन – ट्रेंड्स 2022 (WESO Trends) अहवाल प्रसिद्ध केला आहे.

अहवालातील प्रमुख मुद्दे:

  • 2019 मध्ये 186 दशलक्षच्या तुलनेत 2022 मध्ये जागतिक बेरोजगारीची पातळी 207 दशलक्ष असल्याचा अंदाज आहे.
  • 2022 मध्ये जागतिक स्तरावर एकूण कामाचे तास पूर्व-महामारी पातळीपेक्षा 2% खाली असण्याचा अंदाज आहे आणि ते 52 दशलक्ष पूर्ण-वेळ नोकऱ्यांच्या नुकसानाएवढे आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी म्हत्वाचे मुद्दे: 

  • आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड;
  • आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे Director-General: गाय रायडर;
  • आंतरराष्ट्रीय कामगार संघटना संस्थापक: पॅरिस शांतता परिषद;
  • आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना: 1919.

पुरस्कार बातम्या (Daily Current Affairs in Marathi)

13. फायझरचे सीईओ अल्बर्ट बोरला यांनी कोविड-19 लसीसाठी $1 दशलक्ष जेनेसिस पारितोषिक जिंकले

Pfizer CEO Albert Bourla wins $1 million Genesis Prize for COVID-19 vaccine_40.1
फायझरचे सीईओ अल्बर्ट बोरला यांनी कोविड-19 लसीसाठी $1 दशलक्ष जेनेसिस पारितोषिक जिंकले
  • कोविड-19 लस (फायझर-बायोटेक कोविड-19 लस) विकसित करण्यात अग्रेसर केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
  • पुरस्कार $1 दशलक्ष रोख पारितोषिकासह येतो.

निधन बातम्या (Daily Current Affairs in Marathi)

14. जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती, सॅटर्निनो दे ला फुएन्टे यांचे 112 व्या वर्षी निधन झाले

World's oldest living man, Saturnino de la Fuente, passes away at 112_40.1
जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती, सॅटर्निनो दे ला फुएन्टे यांचे ११२ व्या वर्षी निधन झाले
  • सर्वात वृद्ध व्यक्ती (पुरुष) साठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक, सॅटर्निनो दे ला फुएन्टे गार्सिया (स्पेन) यांचे वयाच्या 112 वर्षे आणि 341 दिवसांनी निधन झाले.
  • त्यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1909 रोजी स्पेनमधील लिओनच्या पुएंते कॅस्ट्रो परिसरात झाला.

विविध बातम्या Daily Current Affairs in Marathi)

15. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 2021 चा चिल्ड्रन वर्ड ऑफ द इयर म्हणून ‘Anxiety’ हा शब्द घोषित केले

Oxford University Press declares 'Anxiety' as Children's Word of the Year 2021_40.1
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 2021 चा चिल्ड्रन वर्ड ऑफ द इयर म्हणून ‘Anxiety’ हा शब्द घोषित केले
  • “anxiety” (21%), याशिवाय “Challenging” (19%), “isolate” (14%), “Wellbeing” (13%) आणि “resilience” (12%) मुलांचे हे प्रमुख पाच शब्द होते.
  • 2020 मध्ये, OUP द्वारे कोरोनाव्हायरस हा चिल्ड्रन्स वर्ड ऑफ द इयर होता.

Importance of Daily Current Affairs in Marathi

Importance of Daily Current Affairs in Marathi: Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)
MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)

Sharing is caring!

Daily Current Affairs in Marathi, 21-January-2022, See the Important Daily Current Affairs in Marathi_19.1