Table of Contents
Daily Dose: Marathi Grammar Guru : दैनिक डोझ: मराठी व्याकरण गुरू : व्दंव्द समास
ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात. त्यास ‘व्दंव्द समास’ असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.
व्दंव्द समासाचे 3 प्रकार पडतात.
a) इतरेतर व्दंव्द समास
ज्या समासाचा विग्रह करतांना आणि, व, ही, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. त्यास इतरेतर व्दंव्द समास असे म्हणतात.
b) वैकल्पिक व्दंव्द समास
ज्या समासाचा विग्रह करतांना किंवा, अथवा, वा ही विकल्प बोधक उभयन्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यासवैकल्पिक व्दंव्द समास असे म्हणतात.
c) समाहार व्दंव्द समास
ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात.
आजचा प्रश्नQ.खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? (a) नास्तिक (b) नवरात्र (c) मीठभाकर (d) पीतांबर तुमचे उत्तर कमेंट विभागात शेअर करा. |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
महाराष्ट्र महापॅक