Marathi govt jobs   »   Study Materials   »   Daily Dose: Marathi Grammar Guru
Top Performing

Daily Dose: Marathi Grammar Guru : दैनिक डोझ: मराठी व्याकरण गुरू : वाक्य व वाक्याचे प्रकार

दैनिक डोझ: मराठी व्याकरण गुरू : वाक्य व वाक्याचे प्रकार

वाक्य व त्याचे प्रकार

वाक्य व त्याचे प्रकार: प्रत्येक वाक्य शब्दाचे बनलेले असते. वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दाचा समूह होय. वाक्यात केवळ शब्दाची रचना करून चालत नाहीत तर, ती अर्थपूर्ण शब्दाची रचना असावयास पाहिजे तेव्हाच ते वाक्य होऊ शकते. वाक्याचा अर्थ स्पष्ट कळण्याकरीता वाक्यात आलेल्या प्रत्येक शब्दाचा (पदाचा) परस्परांशी संबंध काय हे कळणे महत्वाचे असते. प्रत्येक वाक्यात कर्ता व क्रियापद हे महत्वपूर्ण भाग मानले जातात.

वाक्याचे प्रकार: मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

  • अर्थावरून पडणारे प्रकार
  • स्वरूपावरुण पडणारे प्रकार

अर्थावरून पडणारे प्रकार:

विधांनार्थी वाक्य: ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते. त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. श्यामआंबा खातो.

प्रश्नार्थी वाक्य: ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. कोन आहे हा?

उद्गारार्थी वाक्य:  ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो. त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. अबब ! केवढा मोठा हा साप

होकारार्थी वाक्य:  ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किवा करणरूपी वाक्य म्हणतात . उदा. मी गाणे गातो.

नकारार्थी वाक्य: ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी क्रिकेट खेळत नाही.

स्वार्थी वाक्य: ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो अशा वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. त्याने चित्र लिहिले.

आज्ञार्थी वाक्य: ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थन ई. गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. सर्वांनी शांत बसावे.

विध्यर्थी वाक्य: जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य असे म्हणतात.  उदा. विद्यार्थ्याने नियमित अभ्यास करावा.

संकेतार्थी वाक्य: जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. जर चांगला अभ्यास केला असता तर पास झालो असतो.

स्वरूपावरुण पडणारे प्रकार 

केवल वाक्य: ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवळ वाक्य किवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. उदा. राम आंबा खातो.

संयुक्त वाक्य: जेव्हा वाक्यात दोन किवा अधिक केवळ वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदा. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली.

मिश्र वाक्य: जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किवा अधिक गौणवाक्य उभयान्वि अव्यानि जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. उदा. तो आजारी असल्यामुळे आज आला नाही.

आजचा प्रश्न 

Q.पुढे दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा- तो अयशस्वी झाला कारण त्याने प्रयत्न केले नाहीत.

  1. संकेतबोधक संयुक्त वाक्य
  2. स्वरूपबोधक संयुक्त वाक्य
  3. उद्देशबोधक संयुक्त वाक्य
  4. कारणबोधक संयुक्त वाक्य

तुमचे उत्तर कमेंट विभागात शेअर करा.

मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तरे PDF – जून 2024

Daily Dose: Marathi Grammar Guru : दैनिक डोझ: मराठी व्याकरण गुरू : वाक्य व वाक्याचे प्रकार_3.1   Daily Dose: Marathi Grammar Guru : दैनिक डोझ: मराठी व्याकरण गुरू : वाक्य व वाक्याचे प्रकार_4.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

Daily Dose: Marathi Grammar Guru : दैनिक डोझ: मराठी व्याकरण गुरू : वाक्य व वाक्याचे प्रकार_6.1