Table of Contents
DBATU भरती 2023
DBATU भरती 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड येथील लिपीक तथा टंकलेखक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि शिपाई या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी DBATU रायगड भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. DBATU भरती 2023 साठी इच्छूक व पात्र उमेदवार खाली दिलेल्या केंद्रावर उपस्थित राहायचे आहे. मुलाखत 08, 09, 11, 13 आणि 16 सप्टेंबर 2023 रोजी घेतल्या जाणार आहे. आपण या लेखात DBATU भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. ज्यात अधिसूचना, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता आणि मुलाखतीचा पता याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
DBATU भरती 2023: विहंगावलोकन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ भरती 2023 अंतर्गत एकूण 04 पदांची भरती होणार असून DBATU रायगड भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
DBATU भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विद्यापीठाचे नाव | डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU), लोणेरे, रायगड |
भरतीचे नाव | DBATU भरती 2023 |
पदांची नावे |
लिपीक तथा टंकलेखक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि शिपाई |
रिक्त पदांची संख्या | 04 |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
नोकरीचे स्थान | महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | www.dbatu.ac.in |
DBATU भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
DBATU भरती 2023 साठी मुलाखत 08, 09, 11, 13 आणि 16 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.
DBATU भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | दिनांक |
DBATU भरती 2023 अधिसूचना | 22 ऑगस्ट 2023 |
DBATU भरती 2023 साठी मुलाखत | 08, 09, 11, 13 आणि 16 सप्टेंबर 2023 |
DBATU भरती 2023 अधिसूचना
लिपीक तथा टंकलेखक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि शिपाई या संवर्गातील पदांच्या भरतीसाठी DBATU भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या केंद्रांवर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. DBATU भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
DBATU भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील
DBATU भरती 2023 अंतर्गत एकूण 04 पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
डेटा एंट्री ऑपरेटर | 02 |
लिपीक तथा टंकलेखक | 01 |
शिपाई | 01 |
एकूण | 04 |
DBATU भरती 2023 साठी लागणारे मुलाखत प्रक्रिया शुल्क
DBATU भरती 2023 साठी प्रवर्गानुसार आवश्यक मुलाखत प्रक्रिया शुल्क खाली देण्यात आले आहे.
- खुला प्रवर्ग: रु. 500
- मागास प्रवर्ग: रु. 250
- मुलाखतीच्या वेळेस मुलाखत प्रक्रिया शुल्क रोख भरावे लागेल.
DBATU भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
DBATU भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदानुसार खाली देण्यात आली आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डेटा एंट्री ऑपरेटर | बी.सी.ए/बी.सी.एस/डिप्लोमा (संगणक/ माहिती तंत्रज्ञान) / सी. एस. ई. |
लिपीक तथा टंकलेखक | कोणत्याही विद्याशाखेचा पदवी परिक्षा उर्त्तीण तसेच इंग्रजी टायपींग 40 श.प्र.मि व मराठी टायपींग 30 श.प्र.मि. तसेच संगणकाचे ज्ञान आवश्यक. (MSCIT) वाणिज्य शाखेचा पदवी धारकास प्रधान्य तसेच टॅली कोर्स. |
शिपाई | इयत्ता 10 वी पास, कामाचा अनुभव आवश्यक |
DBATU भरती 2023 मुलाखतीची तारीख
DBATU भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 08, 09, 11, 13 आणि 16 सप्टेंबर 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. केंद्रांवर मुलाखतीचे ठिकाण खाली देण्यात आले आहे.
केंद्र | दिनांक | मुलाखतीचा पत्ता |
पुणे | 08 सप्टेंबर 2023 | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एम.एच. आर. डी इमारत, पुणे |
औरंगाबाद | 09 सप्टेंबर 2023 | शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसर, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुर, औरंगाबाद |
जळगाव | 11 सप्टेंबर 2023 | उपकेंद्र, जळगाव गट क्र. 176, इमारत ‘अ’ सदनिका क्र. 102, बांभोरी, ता. धरणगांव. जि. जळगाव |
सोलापूर | 13 सप्टेंबर 2023 | अधिक्षक हाऊस मुलांच्या वसतीगृहाजवळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर |
नागपूर | 16 सप्टेंबर 2023 | एल. आय.टी कॅम्पस, भारत नगर गेट, अमरावती रोड, नागपूर |
DBATU भरती 2023 निवड प्रक्रिया
DBATU भरती 2023 अंतर्गत पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. तसेच कुठलेही कारण न देता एक किंवा अनेक पदांची जाहिरात रद्दबातल करण्याचा अधिकार विद्यापीठाकडे राखीव आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |