Table of Contents
DES भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी ऑनलाईन अर्ज लिंक 2023 अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 15 जुलै 2023 रोजी सक्रीय करण्यात आली होती. अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई ने विविध पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अधिसूचना जाहीर केली होती ज्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 5 ऑगस्ट 2023 पर्यंत चालू राहणार आहे. या लेखात आम्ही DES भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे जसे की DES भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, अर्ज करायच्या स्टेप्स आणि इतर तपशील.
DES भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन
अर्थ व सांख्यिकी संचालनालय (DES), मुंबई मध्ये विविध पदांच्या भरती साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. DES भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.
DES भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संस्थेचे नाव | अर्थ व सांख्यिकी संचालनालय (DES), नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, भारत |
भरतीचे नाव | महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 |
पदाचे नाव |
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, आणि अन्वेषक गट क |
एकूण रिक्त पदे | 260 |
आवेदन करण्याची पद्धत | ऑनलाईन |
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया |
15 जुलै 2023 ते 05 ऑगस्ट 2023 |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahades.maharashtra.gov.in/ |
DES भरती ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा
DES भरती ऑनलाईन अर्ज 2023: महाराष्ट्र DES भरती 2023 अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 05 ऑगस्ट 2023 आहे. या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.
DES भरती ऑनलाईन अर्ज 2023 – महत्वाच्या तारखा | |
महाराष्ट्र DES भरती 2023 अधिसूचना | 13 जुलै 2023 |
महाराष्ट्र DES भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 15 जुलै 2023 |
महाराष्ट्र DES भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 05 ऑगस्ट 2023 |
महाराष्ट्र DES भरती 2023 प्रवेशपत्र | परीक्षेपूर्वी 7 ते 10 दिवस |
महाराष्ट्र DES भरती 2023 ऑनलाईन परीक्षेची तारीख | सप्टेंबर 2023 |
DES भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक
आवश्यक पात्रता असलेले सर्व उमेदवार 15 जुलै 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 05 ऑगस्ट 2023 आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून थेट अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अर्ज लिंक (सक्रीय)
DES भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय झाली असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.
- उमेदवाराने प्रथम संचालनालयाच्या http://mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘APPLY ONLINE लिंक वर क्लिक केल्यावर ऑनलाईन अर्ज स्क्रिनवर दिसेल.
- अर्ज नोंदणी करण्याकरीता “Click here for New Registration” हा टॅब निवडून त्यामध्ये नाव, संपर्काची माहिती व ई-मेल आयडी नमूद करावा. त्यानंतर तात्पुरता रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड स्क्रीनवर दिसेल. अर्जदाराने सदर तात्पुरता रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड स्वत:कडे लिहून ठेवावा. सदर तात्पुरता रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांना ई-मेल व एसएमएसद्वारे पाठविण्यात येईल. उमेदवाराला अर्जात काही दुरुस्ती करावयाची असल्यास तात्पुरत्या रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्डचा उपयोग करुन दुरुस्त्या करता येतील.
- जर उमेदवार एकाच वेळी अर्ज पूर्णपणे भरु शकला नाही तर भरलेली माहिती “SAVE AND NEXT” या टॅबचा वापर करुन SAVE करता येईल. ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवाराने “SAVE AND NEXT” या सुविधेचा वापर करुन भरलेली माहिती तपासून पहावी व आवश्यकतेनुसार त्यामध्ये दुरुस्ती करावी. दृष्टीने अधू असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिम सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करावी.
- COMPLETE REGISTRATION BUTTON’ वर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे उमेदवारानी ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करावी.
- उमेदवाराने स्वतःचे / वडिलांचे / पतीचे नाव तसेच नावांचे स्पेलिंग योग्यरित्या योग्य त्या | ठिकाणी प्रमाणपत्रे / गुणपत्रिका / ओळख प्रमाणपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे भरणे आवश्यक आहे. सदरची माहिती योग्य पद्धतीने न भरल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
- उमेदवाराने भरलेली माहिती तपासण्यासाठी व Save करण्यासाठी “Validate your details” and “Save and Next” या बटनांचा वापर करावा.
- उमेदवाराने छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्त लिखित घोषणापत्र (hand written declaration) स्कॅन व अपलोड करावे.
- COMPLETE REGISTRATION करण्यापूर्वी Preview टॅबवर क्लिक करुन संपूर्ण अर्ज तपासून पहावा.
- आवश्यकतेनुसार ऑनलाईन अर्जातील माहितीमध्ये सुधारणा करुन, तसेच छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्त लिखित घोषणापत्र (hand written declaration) अपलोड झाल्याची व इतर माहिती अचूक असल्याची खात्री करुन “COMPLETE REGISTRATION” बटनावर क्लिक करावे.
- Payment” बटनावर क्लिक करुन परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.
- त्यानंतर “Submit” बटनावर क्लिक करावे.
- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरतांना काळजी घ्यावी. उमेदवाराने सदर अर्जात स्वतःबाबतची माहिती अचूक भरावी. तसेच विहित आकारातील स्वतःचे छायाचित्र व स्वाक्षरी योग्य त्या ठिकाणी अपलोड करावी. आपण भरलेली माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर. छायाचित्र व स्वाक्षरी योग्य त्या ठिकाणी अपलोड केल्यानंतर व आवश्यक ते शुल्क योग्य पद्धतीने भरल्यानंतरच “Submit” बटन प्रेस करावे. एकदा सबमिट बटनावर क्लिक केल्यावर भरलेल्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणे शक्य होणार नाही व त्याबाबतच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही. सदरची माहिती योग्य पद्धतीने न भरल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
- अर्ज सादर करण्याची संपूर्ण कार्यवाही संचालनालयाने विहीत केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे असे न केलेले ऑनलाईन अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शुल्क भरणे आवश्यक राहील.
DES भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क
DES भरती 2023 अंतर्गत प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
- सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
- मागासप्रवर्ग: रु. 900
- परीक्षा शुल्क ना – परतावा (Non refundable) आहे.
DES भरती 2023 साठी आवश्यक कागदपत्रे
DES भरती 2023 साठी आवश्यक कागदपत्रे: उमेदवारांना खालील कागदपत्रे आवश्यक आकारात JPEG स्वरूपात DES भरती 2023 अर्ज ऑनलाईन फॉर्ममध्ये अपलोड करावी लागतील.
Documents | Dimensions | File Size |
Passport Size Photograph | 200 x 230 Pixels | 20 – 50 KBs |
Signature | 140 x 60 Pixels | 10 – 20 KBs |
Left Thumb Impression | 240 x 240 Pixels | 20 – 50 KBs |
Hand Written Declaration | 800 x 400 Pixels | 50 – 100 KBs |
हस्तलिखित घोषणा:
“I, _______ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true, and valid. I will present the supporting documents as and when required.”
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप