Table of Contents
DFCCIL भरती 2023
DFCCIL भरती 2023: डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) ने एकूण 535 एक्झिक्युटिव्ह आणि नॉन एक्झिक्युटिव्ह पदाच्या भरतीसाठी DFCCIL भरती 2023 जाहीर केली. यासाठी ऑनलाईन अर्ज लिंक 20 मे 2023 रोजी सक्रीय झाली होती. DFCCIL भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 होती. लेखात आपण DFCCIL भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्ज लिंक व इतर महत्वाच्या बाबींचा समावेश आहे.
DFCCIL भरती 2023: विहंगावलोकन
DFCCIL ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर विविध ब्रांचमधील एक्झिक्युटिव्ह आणि नॉन एक्झिक्युटिव्ह पदाच्या 535 पदांची घोषणा केली आहे. खालील तक्त्यामध्ये दिलेली DFCCIL भरती 2023 शी संबंधित महत्त्वाची माहिती तपासा.
DFCCIL भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
प्राधिकरणाचे नाव | डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) |
भरतीचे नाव | DFCCIL भरती 2023 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे | 535 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलईन |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
DFCCIL चे अधिकृत संकेतस्थळ | www.dfccil.com |
DFCCIL भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
DFCCIL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 असून DFCCIL भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
DFCCIL भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
DFCCIL भरती 2023 ची शोर्ट नोटीस | 17 मे 2023 |
DFCCIL भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 20 मे 2023 |
DFCCIL भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 19 जून 2023 |
DFCCIL CBT 1 परीक्षा 2023 | 23, 24 आणि 25 ऑगस्ट 2023 (एकाधिक शिफ्ट) |
DFCCIL CBT 1 परीक्षा 2023 | डिसेंबर 2023 |
DFCCIL CBAT परीक्षा 2023 | मार्च 2024 |
DFCCIL भरती 2023 ची अधिसूचना
DFCCIL भरती 2023 अंतर्गत एकूण 535 एक्झिक्युटिव्ह आणि नॉन एक्झिक्युटिव्ह संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. 17 मे 2023 रोजी DFCCIL भरती 2023 ची शोर्ट नोटीस जाहीर करण्यात आली होती. आता DFCCIL भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. DFCCIL भरती 2023 चो शोर्ट नोटीस डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
DFCCIL भरती 2023 मधील रिक्त पदाचा तपशील
DFCCIL भरती 2023 अंतर्गत एक्झिक्युटिव्ह आणि नॉन एक्झिक्युटिव्ह संवर्गातील रिक्त पदांचा तपशील खाली प्रदान केला आहे
पदाचे नाव | रिक्त पदे |
एक्झिक्युटिव्ह (सिव्हिल) | 50 |
एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रिकल) | 30 |
एक्झिक्युटिव्ह (ओपी अँड बीडी) | 235 |
एक्झिक्युटिव्ह (वित्त) | 14 |
एक्झिक्युटिव्ह (एचआर) | 19 |
एक्झिक्युटिव्ह (आयटी) | 6 |
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रिकल) | 24 |
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (सिग्नल आणि टेलिकॉम) | 148 |
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (मेकॅनिकल) | 9 |
एकूण | 535 |
DFCCIL भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष
- उमेदवाराचे संबंधित ट्रेड/विषयामध्ये ITI/डिप्लोमा/पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
- DFCCIL भरती 2023 साठी उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावी.
DFCCIL भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क
DFCCIL भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खाली प्रदान करण्यात आले आहे.
- जनरल / ओ.बी.सी. / ई.डब्लू.एस.: रु. 1000
- एस.सी / एस.टी. / दिव्यांग / माजी सैनिक / तृतीयपंथी उमेदवार: अर्ज शुल्क लागू नाही
DFCCIL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक
DFCCIL भरती 2023 ऑनलाइन अर्जाची लिंक 20 मे 2023 पासून दुपारी 4 वाजेपासून सक्रिय होती. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 जून 2023 होती. आम्ही येथे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी DFCCIL भरती 2023 थेट लिंक अपडेट केली आहे. शेवटच्या क्षणी तांत्रिक समस्या टाळण्यासाठी उमेदवारांना शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करण्याची सूचना देण्यात आली होती.
DFCCIL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक (नोंदणी बंद)
DFCCIL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
DFCCIL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.
- DFCCIL विभागाच्या अधिकृत वेबसाइट iedfccil.com ला भेट द्या
- मुख्यपृष्ठावरून, “DFCCIL भरती 2023” या टॅब वर क्लीक करा.
- रजिस्टर वर क्लीक करा.
- आता आपली सर्व माहिती अचूक भरा.
- ऑनलाइन अर्ज पूर्ण करा आणि पेमेंट पृष्ठावर जा.
- डेबिट, क्रेडिट किंवा नेट बँकिंग कार्डने अर्ज फी भरा.
- नोंदणी आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून घ्या.
DFCCIL भरती 2023: निवड प्रक्रिया
DFCCIL भरती 2023 मध्ये उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे. DFCCIL भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत.
- ऑनलाईन परीक्षा (CBT)
- प्रमाणपत्र पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.