Marathi govt jobs   »   Study Materials   »   Diseases and types of Diseases
Top Performing

रोग व रोगांचे प्रकार: जिल्हा परिषद भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

रोग व रोगांचे प्रकार

रोग व रोगांचे प्रकार: सामान्यतः, एक रोग ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या शरीराला किंवा संरचनेला कोणत्याही प्रकारचे नुकसान होते. हे आजार (रोग) विविध प्रकारचे असतात. संक्रमणामुळे होणारे रोग, रोगजनकांमुळे होणारे रोग, सूक्ष्मजीवांमुळे होणारे रोग आणि संक्रमणामुळे होणारे रोग अशी रोगांची विभागणी केली जाते. आगामी काळातील जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाच्या दृष्टीने हा घटक फार महत्वाचा आहे. कारण रोग व रोगांचे प्रकार हा घटक बहुतांशी पदांच्या परीक्षेत सामान्य ज्ञान आणि तांत्रिक विषय दोन्हीमध्ये येतो. या लेखात आपण रोग आणि रोगाचे प्रकार जाणून घेणार आहोत.

जिल्हा परिषद 07 दिवसाचा रिव्हिजन प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

रोग व रोगांचे प्रकार: विहंगावलोकन

रोग व रोगांचे प्रकार या लेखात आपणास संक्रामक आणि प्रसारानुसार रोगाचे प्रकार व रोगाचे कारक याबद्दल माहिती मिळणार आहे. रोग व रोगांचे प्रकार या लेखाचा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

रोग व रोगांचे प्रकार: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता तलाठी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
विषय सामान्य विज्ञान (जीवशास्त्र)
लेखाचे नाव रोग व रोगांचे प्रकार
लेख तुम्हाला काय प्रदान करतो
  • संक्रामक रोगांचे प्रकार
  • प्रसारानुसार रोगांचे प्रकार
  • रोगजंतुंच्या आधारे रोगांचे प्रकार
  • काही रोगांचे कारक सूक्ष्मजीव

 

रोग व रोगांचे प्रकार – संक्रामक रोगांचे प्रकार

संक्रामक रोगांचे तीन प्रमुख  प्रकार पडतात. त्यांची नावे व व्याख्या खालीलप्रमाणे आहे.

संक्रामक रोग (Infectious diseases)

  • संसर्गजन्य रोग (Communicable Diseases)
  • संपर्कज्यन्य रोग (Contagious Diseases)
  • साथीचे रोग

संसर्गजन्य रोग (Communicable Diseases) : सततच्या सहवासाने रोग्याच्या शरीरातील रोगजंतू निरोगी व्यक्तींमध्ये प्रादुर्भाव होतो अशा रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात. उदा. क्षयरोग

संपर्कज्यन्य रोग (Contagious Diseases): आजारी व्यक्तीमधील रोगजंतूंचा स्पर्शावाटे निरोगी व्यक्‍तीमध्ये प्रादुर्भाव झाल्यास त्यालाच संसर्गजन्य रोग असे म्हणतात.
उदा. कुष्ठरोग, गजकर्ण

साथीचे रोग: हवामानातील विशिष्ट बदलामुळे एकाच वेळी अनेक व्यक्तींना एकच रोग होतो  त्या रोगांना साथीचे रोग असे म्हणतात.
उदा. कॉलरा, हगवण, डोळे येणे, इन्फ्युएंझा, विषमज्वर

रोग व रोगांचे प्रकार – प्रसारानुसार रोगांचे प्रकार

प्रसारानुसार रोगांचे तीन प्रकार पडतात. ते प्रकार व त्यांच्या व्याख्या खाली दिलेल्या आहेत.

प्रसारानुसार रोगांचे प्रकार (Types of diseases according to prevalence)

  • सार्वत्रिक रोग (Pandemic diseases)
  • प्रदेशनिष्ठ रोग (Endemic Diseases)
  • व्यापक रोग (Epidemic Diseases)

सार्वत्रिक रोग (Pandemic diseases): जे आजार संपूर्ण जगामध्ये पसरलेले असतात त्यांनाच सार्वत्रिक रोग असे म्हणतात. उदा. कोरोना

प्रदेशनिष्ठ रोग (Endemic Diseases): जे आजार विशिष्ट प्रदेशामध्येच आढळतात त्यांनाच प्रदेशनिष्ठ रोग असे म्हणतात. उदा. केरळ मधील अल्लापुझा, कोट्टायम व एर्नाकुलम या तीन जिल्ह्यांमध्ये हत्तीपाय ( फायलेरिआसिस ) या रोगाचा प्रादुर्भाव आहे.

व्यापक रोग (Epidemic Diseases): जे आजार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसावर मोठ्या प्रमाणात परिणाम करत पसरतात त्यांनाच व्यापक आजार असे म्हणतात. उदा. कॉलरा, टायफाईड

रोग व रोगांचे प्रकार – रोगजंतुंच्या आधारे रोगांचे प्रकार

ज्याप्रमाणे रोगांचे त्यांच्या प्रसार व किती भागात रोगाचा विस्तार झाला आहे त्यानुसार प्रकार पडतात. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या रोगजंतुंच्या आधारे रोगांचे प्रकार (Diseases and Types of Diseases) आहेत. ते  खालील प्रमाणे आहेत.

  • विषाणूजन्य आजार (Diseases Caused by Viruses)
  • जीवाणूजन्य आजार (Diseases Caused by Bactria)
  • आदिजीवजन्य आजार (Protozoal diseases)
  • कवके (Fungus) व कृमी (Worms) यांच्यामुळे होणारे आजार
Adda247 Marathi App
अड्डा247 मराठी अँप

रोग व रोगांचे प्रकार – काही रोगांचे कारक सूक्ष्मजीव

परीक्षेत वारंवार रोग व त्याचे कारक जीव (म्हणजेच कोणता रोग कोणत्या रोगजंतूमुळे होतो) यावर प्रश्न विचारातात. त्याचा संपूर्ण तक्ता खाली दिलेला आहे.

विषाणूजन्य रोग

विषाणूजन्य रोग
रोगाचे नाव  कारक विषाणू
इन्फ्लुएंझा

(Influenza)

मायक्सोव्हायरस ए, बी, सी

(Myxovirus A, B, C)

स्मॉल  पॉक्स

(Small Pox)

व्हेरिओला विषाणू

(Variola virus)

कांजिण्या

(Chicken pox)

व्हेरिसेला झोस्टर

(Varicella Zoster)

गोवर

(Measles)

पॅरामीक्सोव्हायरस

(Paramyxovirus)

जर्मन गोवर (रुबेला)

(German Measles (Rubella))

रुबेला विषाणू

(Rubella virus)

रेबीज

(Rabies)

रेबीज विषाणू

(Rabies Virus)

गलगंड

(Mumps)

पॅरामीक्सो व्हायरस

(Paramyxo virus)

ट्रेकोमा

(Trachoma)

क्लॅमिडीया ट्रॅकोमाटिस

(Chlamydia trachomatis)

पोलिओमायलायटीस

(Poliomyelitis)

पोलिओव्हायरस (पिकोर्ना व्हायरस)

(Poliovirus (Picorna virus))

पीतज्वर

(Yellow fever)

आर्बो व्हायरस

(Arbo virus)

एड्स

(AIDS)

एचआयव्ही

(HIV)

हिपॅटायटीस

(Hepatitis)

HAV, HVB, HCV HDV, HEV
डेंग्यू ताप

(Dengue fever)

DEN₁, DEN₂, DEN₃, DEN₄
डिप्थीरिया

(Diphtheria)

कॉर्नेबॅक्टेरियम डिप्थीरिया

(Cornebacterium diphtheriae)

जीवाणूजन्य रोग

जीवाणूजन्य रोग
रोगाचे नाव  कारक जीवाणू
क्षयरोग

(Tuberculosis)

मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस

(Mycobacterium tuberculosis)

डांग्या खोकला (पर्टुसिस)

(Whooping cough(pertussis))

बोर्डेटेला पेर्टुसिस

(Bordetella pertusis)

गोनोरिया

(Gonorrhea)

निसेरिया गोनोरिया

Neisseria gonorrhea

उपदंश

(Syphilis)

ट्रेपोनेमा पॅलिडम

(Treponema pallidum)

धनुर्वात

(Tetanus)

क्लोस्ट्रीडियम टेटानी

(Clostridium tetani)

कॉलरा

(Cholera)

व्हिब्रियो कोमा, व्ही. कॉलरा

(Vibrio coma, V. Cholera)

विषमज्वर

(Typhoid)

साल्मोनेला टायफी किंवा एस टायफोसा

(Salmonella typhi or S. typhosa)

न्यूमोनिया

(Pneumonia)

डिप्लोकोकस न्यूमोनिया

(Diplococcus Pneumonia)

प्लेग

(Plague)

येर्सिनिया पेस्टिस किंवा पाश्चुरेला पेस्टिस

(Yersinia pestis or Pasteurella pestis)

कुष्ठरोग (हेन्सेन रोग)

(Leprosy (Hensen’s disease))

मायकोबॅक्टेरियम लेप्रेल

(Mycobacterium leprale)

प्रोटोझोअन्स रोग

प्रोटोझोअन्स रोग
रोगाचे नाव  कारक प्रोटोझोअन्स
मलेरिया

(Malaria)

प्लास्मोडियम विवाक्स

(Plasmodium vivax)

अमीबियासिस

(Amoebiasis)

एंटामोएबा हिस्टोलिटिका

(Entamoeba histolytica)

ट्रायपॅनोसोमियासिस (झोपेचा आजार)

(Trypanosomiasis (Sleeping sickness))

ट्रायपॅनोसोमा एसपी.

(Trypanosoma sp.)

कीटक वाहून नेणारे रोग

कीटक वाहून नेणारे रोग
डास (एनोफिलीस)

(Mosquito (Anopheles))

मलेरिया

(Malaria)

एडीस इजिप्ती

(Aedes aegypti)

डेंग्यू ताप

(Dengue fever)

उंदीर, पिसू

(Rat. flea)

प्लेग

(Plague)

क्युलेक्स

(Calex)

फायलेरियासिस किंवा हत्तीरोग

(Filariasis or elephantiasis)

घर माशी

(House fly)

कॉलरा

(Cholera)

जिल्हा परिषद परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य

सरळ सेवा जसे की, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.

लेखाचे नाव लिंक
राष्ट्रीय आरोग्य अभियान
महाराष्ट्रातील लोकजीवन
भारतीय संविधानाची उद्देशिका
मराठा साम्राज्य – इतिहास, शासक, राज्य विस्तार आणि प्रशासन
2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला
जालियनवाला बाग हत्याकांड – पार्श्वभूमी, कारणे आणि परिणाम
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023)
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे
चंद्रयान 3
भारताची जणगणना 2011
लोकपाल आणि लोकायुक्त
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
कार्य आणि उर्जा
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

रोग व रोगांचे प्रकार: तलाठी भरती 2023 साठी अभ्यास साहित्य_5.1

FAQs

रोग म्हणजे काय?

रोग म्हणजे कोणत्याही अवयवाच्या / उपांगाच्या संरचनेत किंवा कार्यामध्ये बदल होणे.

संक्रामक रोगांचे किती प्रकार आहेत?

संक्रामक रोगांचे 3 प्रकार आहेत. ते पुढीलप्रमाणे संसर्गजन्य रोग, संपर्कजन्य रोग आणि साथीचे रोग

गोवर कोणत्या विषाणूमुळे होते?

पॅरामीक्सोव्हायरस मुले गोवर हा रोग होतो.

प्रदेशनिष्ठ रोग म्हणजे काय?

जे आजार विशिष्ट प्रदेशामध्येच आढळतात त्यांनाच प्रदेशनिष्ठ रोग असे म्हणतात.