Marathi govt jobs   »   Study Materials   »   संगणक: ओळख, वैशिष्ट्ये व इतर माहिती
Top Performing

संगणक: ओळख, वैशिष्ट्ये व इतर माहिती | जिल्हा न्यायालय भरतीसाठी अभ्यास साहित्य

संगणक

संगणक: संगणक ही आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय उपयोगाची वस्तू आहे. आज कालच्या तंत्रज्ञानातील जगात संगणक हे मानवासाठी सर्वात उपयुक्त साधन आहे. आगामी काळातील जिल्हा न्यायालय भरती परीक्षेत संगणकावरील ज्ञान या विषयावर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे आज या लेखात आपण संगणक: ओळख, वैशिष्ट्ये इत्यादीवर सविस्तर माहिती पाहणार आहोत.

संगणक : विहंगावलोकन

संगणक : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
विषय संगणक
उपयोगिता जिल्हा न्यायालय भरती परीक्षा
लेखाचे नाव संगणक: ओळख, वैशिष्ट्ये व इतर माहिती
लेख तुम्हाला काय प्रदान करतो?
  • संगणक म्हणजे काय?
  • ओळख
  • संगणकाच्या पिढ्या
  • वैशिष्ट्ये

संगणक म्हणजे काय?

संगणक हे एक असे उपकरण आहे की ज्याच्या सहाय्याने आपण आपले काम लवकर व अचुकपणे करू शकतो. सरकारी ते खाजगी कार्यालयांमध्ये मध्ये संगणकाचा उपयोग पत्र लेखन, अहवाल लेखन, रेखाचित्र, आलेख तसेच चालू घडामोडीवरून भविष्यातील श्यक्यता काढण्यासाठी होतो.

संगणक: ओळख

ओळख: आपल्या दैनंदिन जीवनात संगणक  हे उपकरण वापरले जाते. हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे व याच्या मदतीने आपण खूप कमी वेळात भरपूर गणिती प्रक्रीया करू शकतो व मोठ्या प्रमाणावर माहिती साठवून त्यावर प्रक्रिया करू शकतो. या लेखात आपण संगणकाविषयी मुलभूत माहिती पाहणार आहोत.

संगणकाच्या पिढ्या

आज आपण जो संगणक वापरतो तो एका दिवसात तयार झालेला नाही. त्याच्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये अनेक बदल झाल्यानंतर तो आजचा आधुनिक संगणक म्हणून उदयास आला आहे.

संगणकाची पहिली पिढी:- आय.बी.एम. कंपनीचे जनक, हेरमन हॅलिरेथ यांनी साधारणपणे 1950 च्या दशकात पहिला संगणक तयार केला. जुन्या रेडिओप्रमाणे यामध्येही व्हॉल्व्हस्चा  वापर केला होता. याचा आकार व किंमतही खूप जास्त होती. हा सेकंदात 5000 बेरजा व 350 गुणाकार करण्याची क्षमता यात होती.

दुसरी पिढी :- दुसऱ्या पिढीचा कॉम्प्युटर साधारणतः 1960 च्या दशकात तयार झाला. यामध्ये ट्रान्झिस्टर्सचा वापर केला होता. याचा वेग पुर्वीच्या कॉम्प्युटरपेक्षा जास्त होता.

तिसरी पिढी :- दुसऱ्या पिढीच्या कॉम्प्युटरमध्ये अमूलाग्र बदल करून त्यामध्ये ट्रान्झिस्टर्स ऐवजी डायोड वापरल्याने त्याचा आकारही लहान झाला, यालाच आपण तिसऱ्या पिढीचा संगणक म्हणू. यामध्ये इंटिग्रेटेड सर्किट (I.C.) चा वापर करण्यात आला होता. त्यामुळे याच्या कामाचा वेग पूर्वीच्या संगणकापेक्षा जास्त होता व आय. सी.च्या वापरामुळे साहजिकच काम करताना हा संगणक पूर्वीच्या संगणकाइतका लवकर गरम होत नसे.

चौथी पिढी :- चौथ्या पिढीच्या कॉम्प्युटरमध्ये मायक्रोप्रोसेसरचा वापर करण्यात आल्यामुळे त्याचा आकार खूपच लहान झाला व अतिशय सोप्या पद्धतीने सर्वांना वापरता येऊ लागला. आजकाल आपण याच पिढीचे कॉम्प्युटर वापरत आहोत.

पाचवी पिढी :- आता मात्र असे कॉम्प्युटर तयार करण्यात येत आहेत की जे स्वतःचा निर्णय स्वतःच घेऊ शकतील व विचारही करूशकतील. (Artificial Intelligence)

जुन्या पिढीतील संगणक
जुन्या पिढीतील संगणक

संगणकाची वैशिष्ट्ये:

1) वेग: संगणक हे एक खूप वेगाने काम करणारे मशिन आहे. ते एका सेकंदाला हजारो प्रक्रियांवर काम करते, संगणकाचा काम करण्याचा वेग हा माणसापेक्षा 100 पटीने जास्त असतो. हजारो गणितीय प्रक्रिया काही मिनिटांमध्ये सोडविणे हे आपल्याला शक्य नाही. परंतु संगणक हजारो गणिती प्रक्रिया काही मिनिटात सहजरित्या सोडवू शकतो.

2)भावनाहीनता: संगणकाला कुठल्याही प्रकारची जाणीव किंवा भावना नसते. संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे.

3)अष्टपैलुत्व: संगणक हा मनोरंजन, व्यवसाय, दळणवळण, आर्थिक व्यवहार, उद्योग, हवामान अंदाज, इ. वेगवेगळ्या प्रकारची कामे करू शकतो. यालाच अष्टपैलुत्व असे म्हणतात.

4)भरपूण साठवणूकीची क्षमता: संगणकाची मेमरी आपण हवी तेव्हा व हवी तितकी वाढवू शकतो. जेव्हा जास्त डेटा साठवणूक करण्याची गरज असते तेव्हा आपण संगणकाची मेमेरी वाढवू शकतो असे आपल्या बाबतीत शक्य नसते.

5) अचुकता: संगणक एखादे कार्य वेगातच नाही तर अचूकपणेसुध्दा पार पाडतो. संगणकाच्या कामाची अचुकता ही मानवी अचूकतेपेक्षा खूप पटीने जास्त आहे. आपण एखादे समीकरण फक्त एक किंवा दोन अंक पर्यंतच गणना करू शकतो, परंतु संगणक अनेक दशांश अंक पर्यंत आउटपुट देऊ शकतो. संगणकाला माहिती पुरवताना काही मानवी चुकांमुळेच फक्त संगणकाच्या च्या रीजल्ट मध्ये चुका आढळू शकतात.

6)आपोआप काम करण्याची क्षमता: कॉम्प्युटरच्या सहाय्याने अनेक कामे आपोआप होऊ शकतात. मानवाला ही कामे आपोआप होत असताना फारच कमी वेळा कॉम्प्युटरकडे लक्ष द्यावे लागते. कॉम्प्युटरला फीड केलेल्या प्रोग्रॅमद्वारे कॉम्प्युटर बरीच कामे स्वतःच करू शकतो.

7) कष्टाळूपणा: संगणक हा सतत असलेल्या कामांमुळे कधीच धकत नाही किंवा सतत त्याच त्याच प्रकारचे काम करण्यात कंटाळत सुध्दा नाही किंवा मनुष्याप्रमाणे चुकाही करत नाही.

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा-महापॅक
महाराष्ट्राचा-महापॅक

Sharing is caring!

संगणक: ओळख, वैशिष्ट्ये व इतर माहिती | जिल्हा न्यायालय भरतीसाठी अभ्यास साहित्य_5.1

FAQs

संगणक विषयातील माहिती मला कोठे मिळेल?

संगणक विषयातील माहिती या लेखात दिली आहे.

संगणक म्हणजे काय?

संगणक हे एक असे उपकरण आहे की ज्याच्या सहाय्याने आपण आपले काम लवकर व अचुकपणे करू शकतो.