Marathi govt jobs   »   Job Notification   »   जिल्हा न्यायालय भरती 2023

जिल्हा न्यायालय भरती 2023, 4629 पदांसाठी अधिसुचना जाहीर

जिल्हा न्यायालय भरती 2023

जिल्हा न्यायालय भरती 2023: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या संवर्गातील 4629 पदांसाठी जिल्हा न्यायालय भरती 2023 जाहीर (Maharashtra District Court Bharti 2023) झाली आहे. सदर भरतीची तपशीलवार अधिसुचना दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आली. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 04/12/2023 ते 18/12/2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण जिल्हा न्यायालय भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Maharashtra District Court Bharti 2023| जिल्हा न्यायालय भरती 2023: विहंगावलोकन 

जिल्हा न्यायालय भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग मुंबई उच्च न्यायालय 
भरतीचे नाव

जिल्हा न्यायालय भरती 2023

पदांची नावे लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
अधिकृत संकेतस्थळ www.bombayhighcourt.nic.in

जिल्हा न्यायालय भरती 2023: अधिसुचना 

जिल्हा न्यायालय भरती 2023 (Maharashtra District Court Bharti 2023) अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची तपशीलवार अधिसुचना दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर पत्र खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसुचना PDF

जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसुचना PDF( इंग्रजीमध्ये)

जिल्हा न्यायालय भरती 2023: रिक्त पदांचा तपशील 

जिल्हा न्यायालय भरती 2023 (Bombay High Court Recruitment) मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र तपशील लघुलेखक कनिष्ठ लिपिक शिपाई/हमाल
1 निवड यादी 568 2795 1266
2 प्रतीक्षा यादी 146 700 318

जिल्हा न्यायालय भरती 2023 मधील जिल्ह्यानुसार रिक्त पदांचा तपशील

अ.क्र. जिल्हा न्यायालय  लघुलेखक  कनिष्ठ लिपिक शिपाई/हमाल
निवड यादी  प्रतीक्षा यादी  निवड यादी  प्रतीक्षा यादी  निवड यादी  प्रतीक्षा यादी 
1 अहमदनगर 14 141 35 64 16
2 अकोला 18 5 48 12 35 9
3 अमरावती 25 6 128 32 42 11
4 औरंगाबाद 16 4 77 19 42 10
5 बीड 11 2 72 18 35 9
6 भंडारा 7 2 29 7 16 4
7 बुलढाणा 15 4 79 20 43 11
8 चंद्रपूर 19 5 69 17 35 9
9 धुळे 5 1 38 9 14 3
10 गडचिरोली 5 1 32 8 8 2
11 गोंदिया 5 1 34 9 11 3
12 जळगाव 6 2 92 23 34 9
13 जालना 9 2 30 8 11 3
14 कोल्हापूर 11 3 61 15 37 9
15 लातूर 10 3 36 9 32 8
16 नागपूर 26 7 107 27 36 9
17 नांदेड 10 3 51 13 25 6
18 नंदुरबार 10 3 39 10 37 9
19 नाशिक 38 10 178 45 61 15
20 उस्मानाबाद 7 2 60 15 26 6
21 परभणी 18 5 121 30 48 12
22 पुणे 52 13 144 36 86 22
23 रायगड 18 5 97 24 54 14
24 रत्नागिरी 8 2 49 12 20 5
25 सांगली 14 4 36 9 12 3
26 सातारा 24 6 65 16 28 7
27 सिंधुदुर्ग 4 1 37 9 21 5
28 सोलापूर 15 4 66 17 20 5
29 ठाणे 49 12 229 57 84 21
30 वर्धा 20 5 22 6 7 2
31 वाशिम 1 0 47 12 18 5
32 यवतमाळ 21 5 107 27 26 7
33 शहर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई 0 0 229 57 101 25
34 मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय, मुंबई 4 1 74 19 37 9
35 कोर्ट ऑफ स्मॉल कॉज, मुंबई 12 3 71 18 60 15
एकूण 568 146 2795 700 1266 318

जिल्हा न्यायालय भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

जिल्हा न्यायालय भरती 2023 (Bombay High Court Recruitment) च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

जिल्हा न्यायालय भरती 2023: महत्वाच्या तारखा
जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसूचना 04 डिसेंबर 2023
जिल्हा न्यायालय भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात 04 डिसेंबर 2023
जिल्हा न्यायालय भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

 18 डिसेंबर 2023

जिल्हा न्यायालय भरती 2023 परीक्षेची तारीख 05 ते 14 फेब्रुवारी 2024

जिल्हा न्यायालय भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक 

जिल्हा न्यायालय भरती 2023 (Maharashtra District Court Bharti 2023) साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.

जिल्हा न्यायालय भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक

जिल्हा न्यायालय भरती 2023: पात्रता निकष

जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी पात्रता निकष खाली देण्यात आला आहे.

  1.  वय
    1. शासनाने निर्दिष्ट केल्यानुसार, सर्वसाधारण प्रवर्गाच्या बाबतीत वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
    2. योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य/केंद्र सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही.
  2. उमेदवारास 28.03.2006 नंतर जन्मलेल्या हयात मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी.
  3. जर उमेदवारास नैतिक अध:पतनाचा समावेश असलेल्या गुन्हयासाठी शिक्षा झाली असेल किंवा त्याला/तिला उच्च न्यायालय/जिल्हा न्यायालय किंवा संघ लोकसेवा आयोग किंवा इतर कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाने त्यांच्याद्वारे घेतलेल्या परीक्षेस बसण्यापासून कायमची मनाई केली असेल किंवा निवडीसाठी प्रतिबंधित ठरविले असेल तर तो / ती नियुक्तीसाठी पात्र असणार नाही.
पदाचे नाव  पात्रता निकष 
लघुलेखक पात्र होण्यासाठी उमेदवाराने –

  1.  कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. (कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल)
  2. त्यास जिल्हयातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  3. सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र (GCC-TBC किंवा I.T.I.) – यामध्ये
    1. इंग्रजी लघुलेखन 100 श. प्र. मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी लघुलेखन 80 श. प्र. मि. किंवा त्याहून अधिक गती आणि
    2. इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन 30 श. प्र. मि. किंवा त्याहून अधिक गती असणे आवश्यक आहे.
  4. खालीलपैकी कोणत्याही संस्थेतून प्राप्त M.S.Office, M.S.Word, Wordstar-7 आणि Open Office Org. या व्यतिरिक्त Windows आणि Linux मध्ये Word Processor चालवण्यामध्ये प्राविण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
    1. महाराष्ट्र किंवा गोवा राज्यातील वैधानिक विद्यापीठे, यथास्थिती.
    2. महाराष्ट्र किंवा गोवा राज्य तंत्र शिक्षण मंडळ, यथास्थिती.
    3. NIC, DOEACC, APTECH, NIIT, C-DAC, DATAPRO, SSI, BOSTON, CEDIT, M. S. CIT.
    4. महाराष्ट्र किंवा गोवा सरकारने जारी केलेले संगणक ज्ञानाच्या पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र, यथास्थिती.
कनिष्ठ लिपिक पात्र होण्यासाठी उमेदवाराने –

  1.  कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. (कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल)
  2. त्यास जिल्हयातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  3. सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र (GCC-TBC किंवा I.T.I.) – यामध्ये इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती.
  4. खालीलपैकी कोणत्याही संस्थेतून प्राप्त M.S.Office, M.S.Word, Wordstar-7 आणि Open Office Org. या व्यतिरिक्त Windows आणि Linux मध्ये Word Processor चालवण्यामध्ये प्राविण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
    1. महाराष्ट्र किंवा गोवा राज्यातील वैधानिक विद्यापीठे, यथास्थिती.
    2. महाराष्ट्र किंवा गोवा राज्य तंत्र शिक्षण मंडळ, यथास्थिती.
    3. NIC, DOEACC, APTECH, NIIT, C-DAC, DATAPRO, SSI, BOSTON, CEDIT, M. S. CIT.
    4. महाराष्ट्र किंवा गोवा सरकारने जारी केलेले संगणक ज्ञानाच्या पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र, यथास्थिती.
शिपाई/हमाल
  1. उमेदवाराने किमान 7 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्याची शरीरयष्टी चांगली असावी.

जिल्हा न्यायालय भरती 2023: अर्ज शुल्क

जिल्हा न्यायालय भरती 2023 (Maharashtra District Court Bharti 2023) प्रवर्गानुसार अर्ज शुल्क खाली देण्यात आले आहे.

प्रवर्ग  अर्ज शुल्क 
सर्वसाधारण प्रवर्ग रु. 1000/-
इतर सर्व प्रवर्ग रु. 900/-
कनिष्ठ लिपिक टेस्ट सिरीज
कनिष्ठ लिपिक टेस्ट सिरीज

जिल्हा न्यायालय भरती 2023: परीक्षेचे स्वरूप

जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात दिले आहे.

चाचणी परीक्षेचे नाव  लघुलेखक  कनिष्ठ लिपिक  शिपाई/ हमाल 
गुण गुण गुण
चाळणी परीक्षा * 40 30
इंग्रजी लघुलेखन चाचणी 20 लागू नाही लागू नाही
मराठी लघुलेखन चाचणी 20 लागू नाही लागू नाही
इंग्रजी टंकलेखन चाचणी 20 20 लागू नाही
इंग्रजी टंकलेखन चाचणी 20 20 लागू नाही
स्वच्छता आणि चापल्यता चाचणी लागू नाही लागू नाही 10
मुलाखत 20 20 10
एकूण गुण  100 100 50
  • उच्च न्यायालयाने लघुलेखक पदासाठी चाळणी परीक्षा घेण्याचा अधिकार, प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार राखून ठेवला आहे.
शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज
शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज

जिल्हा न्यायालय भरती 2023: वेतनश्रेणी 

जिल्हा न्यायालय भरती 2023 (Maharashtra District Court Bharti 2023) वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव वेतनश्रेणी
लघुलेखक S-14 :38600-122800
कनिष्ठ लिपिक S-6 :19900-63200
शिपाई/हमाल S-1 :15000-47600

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
महापारेषण भरती 2023 SBI क्लर्क भरती 2023
SSC GD भरती 2023  SIDBI भरती 2023

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

जिल्हा न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालय 2023 भरती बॅच 
Mission संहिता लाइव्ह बॅच

Sharing is caring!

FAQs

जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसुचना कधी जाहीर झाली आहे?

जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसुचना 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे.

जिल्हा न्यायालय भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

जिल्हा न्यायालय भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.