Marathi govt jobs   »   जिल्हा न्यायालय भरती 2023   »   जिल्हा न्यायालय भरती 2023, कनिष्ठ लिपिक...

जिल्हा न्यायालय भरती 2023, कनिष्ठ लिपिक पदासाठी पात्रता निकष तपासा

जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपिक पदासाठी पात्रता निकष 2023

जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपिक पदासाठी पात्रता निकष 2023: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या संवर्गातील 4629 पदांसाठी जिल्हा न्यायालय भरती 2023 (Maharashtra District Court Bharti 2023) जाहीर झाली आहे. यात लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. त्यातील प्रत्येक पदासाठी पात्रता निकष हा वेगवेगळा असून या लेखात आपण जिल्हा न्यायालय भरती 2023  कनिष्ठ लिपिक पदासाठी पात्रता निकष बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपिक पदासाठी पात्रता निकष 2023: विहंगावलोकन 

जिल्हा न्यायालय भरती पात्रता निकष 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग मुंबई उच्च न्यायालय 
भरतीचे नाव

जिल्हा न्यायालय भरती 2023

पदांची नावे लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
अधिकृत संकेतस्थळ www.bombayhighcourt.nic.in

Maharashtra District Court Bharti 2023| जिल्हा न्यायालय भरती 2023: अधिसुचना 

जिल्हा न्यायालय भरती 2023 अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची तपशीलवार अधिसुचना दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर पत्र खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसुचना PDF

जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसुचना PDF( इंग्रजीमध्ये)

जिल्हा न्यायालय भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

जिल्हा न्यायालय भरती 2023 (Bombay High Court Recruitment) च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

जिल्हा न्यायालय भरती 2023: महत्वाच्या तारखा
जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसूचना 04 डिसेंबर 2023
जिल्हा न्यायालय भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात 04 डिसेंबर 2023
जिल्हा न्यायालय भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

 18 डिसेंबर 2023

जिल्हा न्यायालय भरती 2023 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

जिल्हा न्यायालय भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक 

जिल्हा न्यायालय भरती 2023 (Maharashtra District Court Bharti 2023) साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.

जिल्हा न्यायालय भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक

जिल्हा न्यायालय भरती 2023: कनिष्ठ लिपिक पदासाठी पात्रता निकष

जिल्हा न्यायालय भरती 2023 कनिष्ठ लिपिक पदासाठी पात्रता निकष खाली देण्यात आला आहे.

  1.  वय
    1. शासनाने निर्दिष्ट केल्यानुसार, सर्वसाधारण प्रवर्गाच्या बाबतीत वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
    2. योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य/केंद्र सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही.
  2. उमेदवारास 28.03.2006 नंतर जन्मलेल्या हयात मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी.
  3. जर उमेदवारास नैतिक अध:पतनाचा समावेश असलेल्या गुन्हयासाठी शिक्षा झाली असेल किंवा त्याला/तिला उच्च न्यायालय/जिल्हा न्यायालय किंवा संघ लोकसेवा आयोग किंवा इतर कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाने त्यांच्याद्वारे घेतलेल्या परीक्षेस बसण्यापासून कायमची मनाई केली असेल किंवा निवडीसाठी प्रतिबंधित ठरविले असेल तर तो / ती नियुक्तीसाठी पात्र असणार नाही.
पदाचे नाव  पात्रता निकष 
कनिष्ठ लिपिक पात्र होण्यासाठी उमेदवाराने –

  1.  कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. (कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल)
  2. त्यास जिल्हयातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  3. सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र (GCC-TBC किंवा I.T.I.) – यामध्ये इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती.
  4. खालीलपैकी कोणत्याही संस्थेतून प्राप्त M.S.Office, M.S.Word, Wordstar-7 आणि Open Office Org. या व्यतिरिक्त Windows आणि Linux मध्ये Word Processor चालवण्यामध्ये प्राविण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
    1. महाराष्ट्र किंवा गोवा राज्यातील वैधानिक विद्यापीठे, यथास्थिती.
    2. महाराष्ट्र किंवा गोवा राज्य तंत्र शिक्षण मंडळ, यथास्थिती.
    3. NIC, DOEACC, APTECH, NIIT, C-DAC, DATAPRO, SSI, BOSTON, CEDIT, M. S. CIT.
    4. महाराष्ट्र किंवा गोवा सरकारने जारी केलेले संगणक ज्ञानाच्या पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र, यथास्थिती.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
महापारेषण भरती 2023 SBI क्लर्क भरती 2023
SSC GD भरती 2023  SIDBI भरती 2023

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

जिल्हा न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालय 2023 भरती बॅच 

Sharing is caring!

FAQs

जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपिक पदासाठी पात्रता निकष 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपिक पदासाठी पात्रता निकष 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

जिल्हा न्यायालय भरती पात्रता निकष 2023 काय आहे?

जिल्हा न्यायालय भरती पात्रता निकष 2023 प्रत्येक पदासाठी वेगवेगळा असून तो या लेखात दिलेला आहे.