Table of Contents
जिल्हा न्यायालय भरती 2023 परीक्षेचे स्वरूप
जिल्हा न्यायालय भरती 2023 परीक्षेचे स्वरूप: जिल्हा न्यायालय भरती 2023 (Jilha Nyayalay Bharti) तयारी करतांना आपणास जिल्हा न्यायालय भरती 2023 परीक्षेचे स्वरूप बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देऊ शकतो. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या संवर्गातील 4629 पदांसाठी जिल्हा न्यायालय भरती 2023 जाहीर (Maharashtra District Court Bharti 2023) झाली आहे. या लेखात आपण जिल्हा न्यायालय भरती 2023 परीक्षेचे स्वरूप बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
जिल्हा न्यायालय भरती 2023 परीक्षेचे स्वरूप: विहंगावलोकन
जिल्हा न्यायालय भरती 2023 परीक्षेचे स्वरूप: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | मुंबई उच्च न्यायालय |
भरतीचे नाव |
जिल्हा न्यायालय भरती 2023 |
पदांची नावे | लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल |
अधिकृत संकेतस्थळ | www.bombayhighcourt.nic.in |
जिल्हा न्यायालय भरती 2023: अधिसुचना
जिल्हा न्यायालय भरती 2023 (Maharashtra District Court Bharti 2023) अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची तपशीलवार अधिसुचना दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर पत्र खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.
जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसुचना PDF
जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसुचना PDF( इंग्रजीमध्ये)
जिल्हा न्यायालय भरती 2023 परीक्षेचे स्वरूप
जिल्हा न्यायालय भरती 2023 परीक्षेचे स्वरूप सविस्तरपणे खाली दिलेले आहे.
चाचणी परीक्षेचे नाव | लघुलेखक | कनिष्ठ लिपिक | शिपाई/ हमाल |
गुण | गुण | गुण | |
चाळणी परीक्षा | * | 40 | 30 |
इंग्रजी लघुलेखन चाचणी | 20 | लागू नाही | लागू नाही |
मराठी लघुलेखन चाचणी | 20 | लागू नाही | लागू नाही |
इंग्रजी टंकलेखन चाचणी | 20 | 20 | लागू नाही |
इंग्रजी टंकलेखन चाचणी | 20 | 20 | लागू नाही |
स्वच्छता आणि चापल्यता चाचणी | लागू नाही | लागू नाही | 10 |
मुलाखत | 20 | 20 | 10 |
एकूण गुण | 100 | 100 | 50 |
- उच्च न्यायालयाने लघुलेखक पदासाठी चाळणी परीक्षा घेण्याचा अधिकार, प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार राखून ठेवला आहे.
कनिष्ठ लिपिक व शिपाई/हमाल पदाच्या चाळणी परीक्षेचे स्वरूप
अ.क्र. | पदाचे नाव | एकूण गुण | प्रश्नांची संख्या |
1. | कनिष्ठ लिपिक | 40 | 40 |
2. | शिपाई/हमाल | 30 | 30 |
पदानुसार परीक्षेचा तपशील
खाली पदानुसार जिल्हा न्यायालय भरती 2023 परीक्षेचा तपशील देण्यात आला आहे.
लघुलेखक (श्रेणी – 3)
- लघुलेखक (श्रेणी – 3) या पदासाठी चाळणी परीक्षा घेण्यात आली नाही तर, सर्व पात्र उमेदवारांना खाली नमूद केलेल्या लघुलेखन चाचणीसाठी बोलावले जाईल.
- चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण प्राप्त केल्यानंतर (कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चाळणी परीक्षेप्रमाणे घेण्यात आल्यास) काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या पदांच्या सातपट उमेदवारांना खाली नमूद केलेल्या लघुलेखन चाचणीसाठी बोलावले जाईल. 1:7 गुणोत्तर राखण्यासाठी अल्पसुचीमधील शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणांइतके गुण एकापेक्षा जास्त उमेदवारांनी मिळवले असतील तर, अशा सर्व उमेदवारांना लघुलेखन चाचणीसाठी उपस्थित राहण्यासाठी बोलावले जाईल.
-
अ.क्र. भाषा श्रुतलेखनाचा कालावधी श्रुतलेखनाची गती एकूण शब्द प्रतीलेखनाची वेळ 1. इंग्रजी 6 मिनिटे 100 शब्द प्रती मिनिट 600 40 मिनिटे 2. मराठी 8 मिनिटे 80 शब्द प्रती मिनिट 640 45 मिनिटे - लघुलेखन चाचणीमध्ये किमान गुण प्राप्त केल्यानंतर, उमेदवाराला संगणकावर 10 मिनिटात (गती 30 शब्द प्रति मिनिट) टंकलिखित करावयाच्या 300 शब्दांच्या 20 गुणांच्या मराठी टंकलेखन परीक्षेला उपस्थित राहावे लागेल.
- ज्या उमेदवारांना मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळतील त्यांनाच इंग्रजी टंकलेखन चाचणीला बसण्यास पात्र मानले जाईल.
- इंग्रजी टंकलेखन चाचणी 20 गुणांची असेल, ज्यात 400 शब्दांचा समावेश असेल ते उमेदवारांना संगणकावर 10 मिनिटांच्या आत (गती 40 श. प्र. मि.) टंकलिखित करायचे आहे. 6. जे उमेदवार इंग्रजी टंकलेखनामध्ये किमान गुण मिळवतील त्यांनाच मुलाखतीसाठी पात्र मानले जाईल.
- प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर, पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी संबंधित जिल्हा न्यायालयांच्या सूचना फलकावर आणि संबंधित जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल.
- चाळणी परीक्षा (घेतल्यास) इंग्रजी लघुलेखन चाचणी, मराठी लघुलेखन चाचणी, मराठी टंकलेखन चाचणी आणि इंग्रजी टंकलेखन चाचणीमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे, काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे, जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या 3 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. 1:3 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळविलेल्या गुणांइतकेच गुण मिळविणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
कनिष्ठ लिपिक
- चाळणी परिक्षेमध्ये किमान गुण मिळविल्यानंतर, काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या पदांच्या सातपट उमेदवारांना संगणकावर 10 मिनिटांत (गती 30 श.प्र.मि.) टंकलिखित करावयाच्या 300 शब्दांच्या 20 गुणांची मराठी टंकलेखन चाचणीसाठी बोलावले जाईल. 1:7 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळविलेल्या गुणांइतकेच गुण मिळविणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मराठी टंकलेखन परीक्षेसाठी बोलावले जाईल.
- मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळवणारे उमेदवार इंग्रजी टंकलेखन चाचणीला बसण्यास पात्र असतील.
- इंग्रजी टंकलेखन चाचणी 20 गुणांची असेल, ज्यात 400 शब्दांचा समावेश असेल ते उमेदवारांना संगणकावर 10 मिनिटांच्या आत (गती 40 श. प्र. मि.) टंकलिखित करायचे आहे.
- जे उमेदवार इंग्रजी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र मानले जाईल.
- प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी संबंधित जिल्हा न्यायालयांच्या सूचना फलकावर व संबंधित जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल.
- चाळणी परीक्षा, मराठी टंकलेखन चाचणी आणि इंग्रजी टंकलेखन चाचणीमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे, काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे, जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या 3 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल, 1:3 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळविलेल्या गुणांइतकेच गुण मिळविणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
शिपाई/हमाल
- चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळविल्यानंतर, काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे, जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या पदाच्या सातपट उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी बोलावले जाईल. 1:7 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळविलेल्या गुणांइतकेच गुण मिळविणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी बोलावले जाईल.
- जे उमेदवार स्वच्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र धरले जाईल.
- प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर, जे पात्र उमेदवार असतील त्यांची यादी ही संबंधित जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावर आणि संबंधित जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल.
- चाळणी परीक्षा आणि स्वच्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे, काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे, जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या पदांच्या संख्येच्या 3 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. 1:3 हे गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणांइतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष :
लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/ हमाल च्या पदानुसार चाळणी परीक्षा, लघुलेखन चाचणी, टंकलेखन चाचणी, स्वच्छता आणि चापल्यता चाचणी आणि मुलाखतीसाठी सामान्य प्रवर्गासाठी 35% गुण असतील आणि शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग किंवा विशेष मागास वर्गातील उमेदवारांना त्यामध्ये 5% गुणांची सूट दिली जाईल.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप